हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये रिकरींग डिपॉझिट अर्थात आरडी खाते असणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकारने या खात्यांच्या नियमांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. आरडी अकॉउंट असणारे लोक मार्च, एप्रिल, मे आणि जूनमधील हप्ते ३१ जुलैपर्यंत जमा करू शकणार आहेत यासाठी त्यांना कोणतीच अतिरिक्त फी भरण्याची गरज भासणार नाही आहे. सोबतच त्यांना डिफॉल्ट फी देखील भरावी लागणार नाही आहे. या खात्यांची थोडक्यात माहिती देत आहोत.
आरडी ही छोटी बचत योजना आहे यामध्ये दरमहा किमान १०० रुपये भरता येऊ शकतात. हे खाते ५ वर्षांनी परिपकव होते पण आपण ५-५ वर्षे वाढवू शकतो. आपण या खात्यावर ऑनलाईन पैसे भरू शकतो. दहा रुपयांपेक्षा कितीही जास्त रक्कम आपण यात भरू शकतो यासाठी कोणतीच मर्यादा नाही आहे. एक व्यक्ती आपल्या नावावर कितीही खाती उघडू शकतो. केवळ व्यक्ती खाते उघडू शकतात, संस्था अथवा कंपनी नाही मात्र दोन व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात. ५ वर्षाच्या परिपक्वतेची रक्कम १.०५ लाख, दहा वर्षाची २.७५ लाख आणि १५ वर्षाच्या परिपक्वतेची रक्कम ४.३ लाख होते. अगदी सहज आपण खाते उघडू शकतो.
सामान्य खाते उघडत असताना आपल्याला एक कालावधी आणि रक्कम ठरवावी लागते जर आपण पुढच्या ५ वर्षासाठी ५०० रु भरण्याचे ठरवले तर तेवढेच भरता येतात. त्यात बदल करता येत नाही. तसे केल्यास दंड आकारला जातो. आपण जर खाते परिपक्व होण्याआधी अर्ज केला तर खात्याची मुदत वाढवता येऊ शकते. फ्लेक्झी रिकरिंग खाते असे असते ज्यामध्ये आपण एक वेळ निश्चित करून पैसे भरू शकतो या खात्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपण यामध्ये पैसे वाढवू किंवा कमी करू शकतो. छोटी बचत करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.