खुल्या मैदानावरील स्पर्धांना परवानगी द्यावी-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व कराड तालुका अॕथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना जिल्ह्यातील ॲथलेटिक्स खेळ सराव व क्रीडा स्पर्धा संबंधी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात खुल्या मैदानावरील स्पर्धाना परवानगी द्यावी. महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनने कोरोना परिस्थितीत लागू केलेल्या मानक कार्यप्रणाली (SOP) द्वारे जिल्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्यास मान्यता देऊन खेळाडूंना न्याय द्यावा. अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

संघटनेच्या वतीने निवेदन देताना संघटनेचे उपाध्यक्ष क्रीडाभूषण अशोकराव थोरात भाऊ यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना ॲथलेटिक्स खेळाच्या स्पर्धा घेणे आवश्यक का आहे व खेळाडूंचे भवितव्य त्यावर कसे अवलंबून आहे याबाबत माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment