Oppo Find N2 Flip ची भारतात विक्री सुरू, दिला जातोय जबरदस्त डिस्काउंट

Oppo Find N2 Flip
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Oppo Find N2 Flip : आजकाल बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. आताही OPPO या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीकडून आजपासून (17 मार्च) भारतीय बाजारात आपला नवीन OPPO Find N2 Flip खरेदीसाठी उपलब्ध करून दिला आहे. हा फोन ग्राहकांना फ्लिपकार्ट आणि OPPO स्टोअरमधून खरेदी करता येईल. चला तर मग या स्मार्टफोनच्या फीचर्स बाबतची माहिती जाणून घेउयात…

Pocket-friendly foldable OPPO Find N2 Flip goes global

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास या Oppo Find N2 Flip मध्ये ड्युअल-रिअर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे जो Hasselblad द्वारे ट्यून केलेला आहे. तसेच यामध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे, जो 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससहीत येईल. त्याच प्रमाणे व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यामध्ये 32MP फ्रंट कॅमेरा असेल.

या नवीन OPPO Find N2 Flip मध्ये Full HD+ (2520 × 1080 पिक्सेल) रिझोल्यूशन असलेला 120Hz E6 AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे, जो 403ppi पिक्सेल डेंसिटी, 1600 nits पीक ब्राइटनेस आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट देते. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 लेयरसहीत 60Hz रिफ्रेश रेटचा पॅनेल देखील दिला गेला आहे.

Oppo Find N2 Flip price in India to be revealed on March 13: Check camera  features of flip-style foldable smartphone | Zee Business

Oppo कडून या नवीन फोनला पॉवर देण्यासाठी ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9000+ मोबाइल प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. जो Mali G710 MC10 GPU सहीत येतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज आणि 8GB LPDDR5 रॅम देण्यात आली आहे. हे ColorOS 13 सहीत प्री-लोडेड आहे, जे Android 13 वर बेस्ड आहे.

Oppo च्या या नवीन फोनमध्ये क्लॅमशेल 4300mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्टसहीत 44W चार्जिंग सपोर्ट आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, स्टिरिओ स्पीकर सेटअप मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, यामध्ये ड्युअल-सिम, 5G, वायफाय, ब्लूटूथ 5.3, NFC, GPS, GLONASS, Galileo, BeiDou आणि NAVIC मिळेल.

Oppo Find N2 Flip review: is this flip phone a big flop? | Digital Trends

हा नवीन Oppo Find N2 Flip मध्ये मूनलिट पर्पल आणि एस्ट्रल ब्लॅक हे दोन कलर ऑप्शन मिळतील. या नवीन Oppo Find N2 Flip च्या 8GB+256GB व्हेरिएंटची ची किंमत 89,999 रुपये आहे. यासोबतच कंपनीने कोटक बँक, येस बँक, HDFC, ICICI, SBI आणि अमेरिकन एक्सप्रेस बँकेसोबत भागीदारी करून 5,000 रुपयांची अतिरिक्त सूटही दिली आहे. यासोबतच 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.oppo.com/in/smartphones/series-find-n/find-n2-flip/

हे पण वाचा :
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर
Gold Price Today : देशांतर्गत बाजारात सोने-चांदी वधारली, तपासा आजचा नवीन दर
DigiLocker अ‍ॅपद्वारे अशाप्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवा Driving Licence
Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या
Bank Crisis : 2 आठवड्यात बुडाल्या 3 अमेरिकन बँका, अशावेळी भारतीय बँकांमध्ये आपले पैसे कितपत सुरक्षित आहेत जाणून घ्या