अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रीय संकटात विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आताचे विरोधक थोडे विचलित झाल्यासारखे वाटतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
थोडे सॅनिटायझर राखून ठेवा लाॅकडाउन संपल्यानंतर १०५ डोकी साफ करण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली होती. मिटकरी यांच्या सदर ट्विटला प्रतिक्रिया देत पवार यांनी आमले मत व्यक्त केले आहे. जेव्हा देशावर संकट आलेले असते तेव्हा विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र सध्याचा विरोधीपक्ष थोडा विचलित झाल्याचे दिसत आहे. पण तेही ही परंपरा पाळतील अशी मी आशा व्यक्त करतो अस पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय संकटात विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आताचे विरोधक थोडे विचलित झाल्यासारखे वाटतात पण तेही ही परंपरा पाळतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपल्या अकोला जिल्ह्यासाठी सॅनिटायझर पाठवलं आहे ते आपल्यापर्यंत पोचलंच असेल. https://t.co/NAKaF48rvC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 11, 2020
तसेच आपल्या अकोला जिल्ह्यासाठी सॅनिटायझर पाठवलं आहे ते आपल्यापर्यंत पोचलंच असेल असंही पवार यांनी म्हटले आहे. आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता एकमेव धंदा शिल्लक आहे असे म्हणत मिटकरी यांनी आपले मत ट्विट केले होते. आता रोहित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ, टीका करणे हा एकमेव धंदा शिल्लक – अमोल मिटकरी@amolmitkari22 @RohitPawarSpeak @RRPSpeaks @RohitPawarOffic @NCPspeaks #HelloMaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 11, 2020
https://t.co/bpD4B2CPGi
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
वाधवान कुंटुंबाच्या पाचगणी प्रवासाबाबत रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..@RRPSpeaks @RohitPawarSpeak @RohitPawarOffic #HelloMaharashtra #Mahabaleshwar https://t.co/o7BGs5fmsa
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in