पोरांनी थापल्या भाकऱ्या, पोरी बनल्या वायरवुमन; Work for Equility ने दिली स्त्री पुरुष समानतेची अनोखी शिकवण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – “मी भाकर करायला माझ्या आईपाशी शिकलो, ती भाकर करत असताना मी बघायचो आणि मला सुद्धा ते खूप आवडायचे” , “बहिणीशी भांडण झाल्यामुळे तिने, रागाने माझ्यासाठी भाकर केली नाही म्हणून मीच भाकर बनवायला शिकलो”, आई वडील शेतीच्या कामाला बाहेर गेल्यावर मी आणि माझी बहीण मिळून काम करतो, मी सकाळचा स्वयंपाक करतो म्हणून तिला सकाळी सहा वाजता ट्युशन ला जाता येते अशा मनाला भिडणाऱ्या दिलखुलास प्रतिक्रिया किशोरवयीन मुलांनी दिल्या तर घरात इलेक्ट्रिकच्या वस्तूमध्ये काही बिघाड झाला तर घरातील कोणी पुरुष येण्याची आम्ही वाट बघत बसायचो आता मात्र आम्हाला माहित आहे कि कोणती वायर कुठे जोडली कि लाईट लागते असे अत्यंत अभिमानाने खेड तालुक्यातील 100 किशोरवयीन मुले मांजरेवाडी पिंपळ येथील एका अनोख्या कार्यक्रमात सांगत होते.

“घरकाम दोघांचे -अवकाश दोघांचे ” या स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेने केले होते. समाजाने स्त्री आणि पुरुषांमध्ये लिंगभेदाच्या आधारावर त्याच्या भूमिकांच्या ज्या चौकट तयार केलेल्या आहेत त्या स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी देखील अन्यायकारक आहेत. अनेक मुलांना लहानपणी घरकाम करण्यात खूप रस असतो पण त्याला वारंवार तू काय मुलगी आहेस का असे म्हणून हिनवले जाते आणि कालांतराने घरकाम हे कमी प्रतिष्ठेचे असते आणि ते स्त्रियांनीच करायचे असते, ते पुरुषाचे काम नाही हा विचार मुलांच्या मनात वाढीस लागतो. तसेच मुलींना देखील लहान पणापासून घरकाम करण्याची इतकी सक्ती केली जाते की घरकामासाठी अनेक मुलींना त्यांच्या स्वप्नांवर, इच्छा आकांशावर पाणी सोडावे लागते.

पुढे जाऊन याचा परिणाम केळव त्या स्त्री पुरुषाच्या नात्यात कटुता आणि दुरावा निर्माण होण्यातच होत नाही तर संपूर्ण मानव जातीच्या विकासावर या लिंगभेदावर आधारित अन्यायकारक सामाजिक चौकटीचा परिणाम होत आहे. ही चौकटी मोडून ज्याला जे काम करायला आवडेल ते करण्याची संधी असावी व मुलांनी आणि पुरुषांनी देखील घरकामात सहकार्य करून स्त्रियांना आपल्या सोबत बरोबरीने येण्याची संधी द्यावी हा संस्कार रुजविण्यासाठी हा प्रकल्प इथल्या 10 गावांमधील युवांमध्ये राबविला जात आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही किशोरवयीन मुले अभिमानाने आम्हाला भाकरी येते आणि आम्ही भविष्यात सुद्धा आमच्या कुटुंबातील स्त्रियांना घरकामात मदत करू असे अभिमानाने सांगत होते. समाजात पुरुषांना घरकाम करण्यासाठी त्यांचा जो गर्व आड येतो, त्यांना कमी पणाचे वाटते, समाजात सुद्धा पुरुष भाकरी थापताना दिसल्यास हे चित्र सामान्य व्हावे म्हणुन हा प्रयत्न सुरू आहे. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राची कन्या अहमदनगरची श्रद्धा ढवण ढोरमले उपस्थित होती. जिने दूध डेअरी चा व्यवसाय जो तथाकथीत पुरुषांचा व्यवसाय समाजाला जातो तो अत्यंत यशस्वीरित्या सांभाळून हि कामाच्या विभागणीची अन्यायकारक चौकट तोडण्याचा प्रयत्न केला आहे. श्रद्धा ने उपस्थित मुलांसोबत संवाद साधला आणि चौकटीच्या बाहेर जाऊन माणूस बनून आपण एकमेकांना सहकार्य केले पाहिजे असे मत मांडले. तिच्या सोबत आणि तिचे सहकारी चैतन्य ढोरमले यांनी मुलांशी संवाद साधला आणि बदलत्या काळात पुरूषांनी स्त्रियांना मदत केली तरच त्यांना प्रगती करता येईल असे मत व्यक्त केले.

स्त्री आणि पुरुषांमध्ये निसर्गाने निर्माण केलेला फरक हा एकमेकांना पूरक आहे मात्र समाजाने त्यातुन भेदभाव निर्माण केला जो केवळ स्त्रियांवरच नाही तर पुरुषांवर देखील अन्यायकारकच आहे, मुलाला जन्म देणे आणि स्वतःचे दूध पाजणे या स्त्रियांमधील दोन वैशिट्य सोडल्यास सर्व प्रकारची कामे स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात, मुलांना लहानपणी घरकाम करणे, मदत करणे, दुःख झाल्यावर रडणे, या सर्व गोष्टी करायला आवडतात पण हळूहळू आपण त्यांना यापासून थांबवतो, स्वयंपाक घरात मुलगा लुडबुड करायला लागला की घरातले सर्व त्याला तू काय बाई आहेस का असे हिणवतात. भांडण नाही केले मार खाऊन आला की तू काय बायल्या आहेस का?, हातात बांगड्या भरल्या आहेस का? अशा पद्धतीने त्याला हिंस्र बनण्यासाठी प्रेरित केले जाते आणि मग ती हिंसा किंवा क्रुरता इतकी वाढते की आपण रोज नवीन आणि विचारही करू शकत नाही अशा घटना घडताना आपल्याला ऐकायला मिळतात.

ही क्रुरता मुलांमध्ये काही एका रात्रीत येत नाही तर ती हळू हळू तयार होते आणि याकडे आपण तो मुलगा आहे, पुरुष आहे तो असा वागला तर चालतं असं म्हणुन त्याकडे दुर्लक्ष करतो. जे अत्यंत चुकीचे आहे तसचं मुलीला सुद्धा लहानपणापासुन आपण स्त्री च्या भूमिका तिला करण्याची सवय लागली म्हणुन बाहुली, भातुकली असे खेळ देतो आणि एका जागेवर बसायला सांगतो तू एका ठिकाणी बसून हा स्वैपाक आणि मूल सांभाळ असेच आपण तिला ट्रेनिंग देतो, आणि आपण हे खूप सहज करतो वाढदिवसाला जाताना आपण म्हणुनच मुलीला बाहुली घेऊन जातो आणि मुलींना बाहुली आवडते असे पक्के करून टाकतो पण तिला batball दिला, गाडी दिली, बंदूक दिली तर तिला सुद्धा ते आवडेलच हे आपण विसरून जातो.

त्यामुळे याचाच परिणाम मुलींना अनुभवाची कमतरता, आत्मविश्वासाची कमी, त्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढलेले पहातो.यासाठी संस्थां मुला आणि मुलींना वेग वेगळ्या माध्यामातून एकत्रीत आणण्याचा, त्यांना एकमेकांना समजून घेण्याचा, मैत्री करण्याची संधी देते आहे. जेणेकरून त्यांच्यातील आदर वाढेल यासाठी पालकांची भूमिका महत्वाची आहे, घरात मुलांना मुली एवढीच कामांची जबाबदारी द्या, जबाबदारपणे वागण्यासाठी नियम दोघांना पण सारखेच लावा, दोघानाही जग समजण्याची संधी द्या , स्त्री पुरुषांसाठी ही समाजाची अन्यायकारक चौकट आपण हळूहळू तोडली तर आपल्याला समतेवर आधारीत समाजाची रचना करणे सोपे जाईल आणि हे जग अधिक सुखकर होईल.

या कार्यक्रमामधून समाजातील अनेक मुलं मुलींनी प्रेरणा घेऊन समतेवर आधारीत नवसमाजाची निर्मिती करण्यासाठी हातभार लावला असे मत संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी मांडले. कार्यक्रमाला मांजरे वाडी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, मुख्यध्यापक तसेच गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन मी शक्ती प्रतिनिधी प्राची खंडागळे हिने केले. कार्यक्रमात प्रियांका, श्वेता, सुरज, गणेश, प्राजक्ता, स्वानंदी, शिल्पा, स्वाती या कार्यकर्त्यांनी प्रमुख भूमिका घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले. या कार्यक्रमाला तेरे देस होम्स आणि Volkswagen कंपनीचे सहकार्य लाभले आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती