जर्मनीचे सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम डार्टमंड आता बनणार मेडिकल सेंटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या साथीच्या काळात रूग्णांवर उपचाराला मदत करण्यासाठी जर्मनीतील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम बोरसिया डार्टमंड येथील सिग्नल इदुना पार्कचे अंशतः रूपांतर मेडिकल सेंटरमध्ये होणार आहे. जर्मनीच्या बुंडेस्लिगा क्लबने शुक्रवारी ही माहिती दिली.

क्लबचे संचालक हंस जोकिम वत्झके आणि कार्लस्टन क्रेमर यांनी निवेदनात म्हटले आहे की, “आपले स्टेडियम हे आपल्या शहराचे प्रतीक आहे. संभाव्य संक्रमितांच्या मदतीसाठी हे आदर्श ठरू शकते. स्थानिक वैद्यकीय संघटनेच्या सहकार्याने त्यांनी नॉर्दर्न स्टँडचे उपचार केंद्रात रूपांतर केले असल्याचे डार्टमंड यांनी सांगितले. ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’