डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार अंडरटेकरची आपल्या निवृत्तीची घोषणा; पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमधील सर्वात मोठा खेळाडू असणाऱ्या अंडरटेकरने व्यावसायिक कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. अंडरटेकरने आपल्या डॉक्युमेंटरीच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आपल्या चाहत्यांना सांगितले की,”आता रिंगमध्ये परत जाण्याचा आपला कोणताही हेतू नाही आहे.”

यानंतर #ThankYouTaker हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली तसेच चाहत्यांनी यावेळी अंडरटेकरचे आभारही मानले आहेत. सुमारे तीन दशकांपर्यंत डेडमॅन म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंडरटेकरने आपली स्टाईल, आपला हटके अंदाज तसेच रिंगमधील त्याच्या फायटिंगने स्वत: ला या खेळातला एक दिग्ग्ज म्हणून सिद्ध केले.


View this post on Instagram

Redemption is a long road… #TheLastRide @wwenetwork

A post shared by Undertaker (@undertaker) on Jun 13, 2020 at 1:14pm PDT

अंडरटेकरचा शेवटचा सामना हा रेसलमेनिया ३६ मध्ये होता, जो त्याने एजे स्टाइल्स शी खेळला होता. अंडरटेकरच्या म्हणण्यानुसार त्याने त्या सामन्यातील विजयासह आपल्या कारकीर्दीचा योग्य आणि नेमका असा शेवट केला आहे.

 

अंडरटेकरने त्याच्या डॉक्यूमेंट्रीमध्ये सांगितले की,” तो सामना माझ्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. डब्ल्यूडब्ल्यूईचे चेअरमन विन्स यांनी बोलावले तर परत येणार का ? या विचारलेल्या प्रश्नाला त्याने उत्तर दिले की, हे तर फक्त येणार काळच सांगू शकेल. पण जर वेळ आलीच तर मी त्याबद्दल विचार करू शकतो, मात्र याक्षणी तरी माझा असा कोणताही हेतू नाही आहे.

 

१९९० साली अंडरटेकर डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगमध्ये पहिल्यांदा आला. इथे आल्यानंतर त्याने त्या वेळेचा स्टार हल्क होगनचा पराभव केला होता. यानंतर, कोणीही त्याच्याकडून वाचू शकला नाही. रसेलमेनीयामध्ये त्याचा २५-२ असा शानदार रेकॉर्ड आहे. त्याने दोन दशकांपर्यंत २१-० चा रेकॉर्ड कायम राखला होता. तो ७ वेळा वर्ल्ड डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन होता, त्याने सहा वेळा डब्ल्यूडब्ल्यूएफ टॅग टीम चॅम्पियनशिप जिंकली आणि २००७ मध्ये त्याने रॉयल रंबल जिंकले.

 

 

 

 

 

 

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment