ईडीच्या 5 हजारांपैकी केवळ 7 केसेचा निकाल लागला : आ. पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर | युपीए सरकारच्या पीएमएलए आणि ईडीने 10 वर्षाच्या काळात 29- 30 छापे टाकले होते. सदरचे छापे आतंकवादी कारवायांना पैसे पुरविणाऱ्याच्या विरोधात होते. मोदी सरकारने कायद्यात बदल करून 5 हजारांच्यावर ईसीआयर (एफआयआर) दाखल केल्या. यामध्ये 2 हजार 900 रेड केल्या आणि केवळ अंतिम निकाल 7 ते 8 केसेसचा लागलेला आहे. कायदा इतका कडक पध्दतीने वापरला जात आहे, छापा टाकायचा माणसाला चाैकशीला बोलायवयचे. त्याला लगेच तुरूंगात टाकायचे अन् एकदा तुरूंगात टाकले की वर्ष- वर्षभर जामीन मिळून द्यायचा नाही. हा कायदा मानवतेच्या विरोधात आहे. न्यायव्यवस्थेचा मूलभूत सिध्दांत डोक्यावर उभा केला आहे. आज या कायद्यामुळे देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारसह पीएमएलए आणि ईडीच्या कारवायाबाबत हल्लाबोल केला. आ. पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली असून लोकशाही संकटात आहे. अर्थव्यवस्था मंदावली असून ती कोव्हिडमुळे झाले असल्याचे उत्तर सरकारकडून दिले जात आहे. मात्र ते तसे नाही तर त्यापूर्वीपासूनच अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. उंच्चाकी विकासदर 8 ते 9 टक्क्यापर्यंत युपीए सरकारच्या काळात होता. त्यानंतर मोदी सरकारने अनेक चुका केल्या. जानेवारी ते मार्च 2020 या काळात कोव्हीड अगोदरची आकडेवारी 4.1 टक्के असा होता. तोही आकडा खरा आहे की नाही याबाबत साशंकता आहे. बेरोगजगारीचा दर गेल्या 45 वर्षातील उंच्चाकी आहे. आंतरराष्ट्रीय कर्ज काढण्याची मर्यादा संपत आलेली आहे.
काॅंग्रेस पक्ष नियुक्त लोकांच्यामुळे मजबूत नाही
जी 23 मध्ये मी होतो. पक्ष नेतृत्वासोबत कोरोनामुळे समोरासमोर बसून चर्चा करत येत नव्हती. आमच्या भावना पक्षाला गोपनीय पत्र दिलेलं होते. आम्ही पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष, सल्लामसलत करून निर्णय व्हावे. राहूल गांधी अध्यक्षपद स्विकारणार नसतील. तर निवडणुकीत दुसरा अध्यक्ष व्हावा. गेल्या 24 वर्षात काॅंग्रेस पक्षाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. 1998 नंतर पासून निवडणुका झालेल्या आहेत. सर्वच निवडणुका घटनेप्रमाणे व्हाव्यात. काॅंग्रेस अध्यक्ष, वर्किंग कमिटी, निवड समिती आणि पार्लिमेंटरी बोर्ड निवडणूकीतून लोक निवडल्यास पक्ष मजबूत होईल. परंतु नियुक्त लोकांच्यामुळे पक्ष मजबूत होत नाही.