व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

यशवंतराव चव्हाण, पवारांनी दिल्लीत मान उंचावली, महाराष्ट्राचा अपमान होणार नाही याची मुख्यमंत्री दक्षता घ्या; खरात यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत काल झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीतील फोटोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे राहिले. यावरून राजकीय पक्षांतीळ नेत्यांकडून त्याच्यावर निशाणा साधण्यात आला. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. “राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी हा मान टिकवून ठेवावा, महाराष्ट्र राज्याचा अपमान होणार नाही याची दक्षता माननीय मुख्यमंत्री यांनी घ्यावी,” असे खरात यांनी म्हंटले आहे.

सचिन खरात यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आक व्हिडीओ ट्विट केला असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, माननीय मुख्यमंत्री आपण भारत देशाला हिमालय म्हणतो आणि महाराष्ट्र राज्याला सह्याद्री म्हणतो आणि ज्यावेळेस हिमालयावर संकट येतं त्यावेळेस सह्याद्री मदतीला पुढे जातो. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्यानात ठेवावं. कारण कालच्या नीती आयोगाच्या बैठकीचे फोटो पाहिले या फोटोत आपण मागे दिसला माननीय मुख्यमंत्री आपण राज्याचा अभ्यास करा, असा सल्ला खरात यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आदरणीय शरद पवार यांच्या
कर्तृत्वामुळे त्यांचा आदर राखला गेला हे माहित नसेल तर माहिती करून घ्यावी. तसेच यापुढे महाराष्ट्र राज्याचा अपमान होणार नाही याची दक्षता माननीय मुख्यमंत्री यांनी घ्यावी, असे खरात यांनी म्हंटले आहे.