Monday, December 15, 2025
Home Blog Page 1586

ना पेट्रोलची चिंता, ना चार्जिंगचं टेन्शन; गडकरींची ‘ही’ अप्रतिम कार पहाच

Nitin Gadkari Hydrogen Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव देशात नेहमीच आदराने घेतलं जात. मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरी ओळखले जातात. रस्ते- वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी देशभर रस्त्यांचे मोठं जाळ तयार केलं. गडकरींना गाड्यांमध्ये सुद्धा आवड आहे. देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याबाबत ते सतत बोलत असतात. याशिवाय जैव इंधनावर चालणाऱ्या गाड्यांवरही त्यांचा भर असतो. परंतु गडकरी स्वतः कोणती गाडी चालवतात हे तुम्हाला माहित आहे का? चला आज आपण जाणून घेऊया …

नितीन गडकरी जी कार वापरतात तिचे नाव आहे (Toyota Mirai) टोयोटा मिराई.. ही एक सेडान कार असून ही कार हायड्रोजनवर (Hydrogen Car) चालते. गेल्या वर्षी टोयोटाने ही डेमो कार म्हणून सादर केली असून गडकरींकडे ही कार टेस्टिंग स्वरूपात आहे. नितीन गडकरी म्हणतात की आपण इंधनात स्वयंपूर्ण व्हायला हवे. त्यामुळे हायड्रोजन कारवर भर दिला जात आहे. गडकरींनी सांगितले की एकीकडे इलेक्ट्रिक कारचा खर्च प्रति किमी 1 रुपये आहे तर हायड्रोजन कारमधून प्रवास करताना तुम्हाला प्रति किलोमीटर 1.5 ते 2 रुपये खर्च येऊ शकतो. देशाला जर स्वावलंबी बनवायचे असेल तर आगामी काळात आपण हायड्रोजनवर आधारित इंधनाचे उत्पादन करणे आवश्यक आहे.

टोयोटा मिराई हायड्रोजन फ्युएल सेल टेक्निक वर काम करते. त्यात हायड्रोजन टाकी आहे, ज्याचा गॅस ऑक्सिजनसह रिअक्शन करून गाडीला चालना देतो. यामध्ये एक इलेक्ट्रिक मोटर देखील आहे, जी 182 PS पॉवर आणि 406 Nm टॉर्क जनरेट करते. यात 1.24 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. या सेडान कारमध्ये 5.2 किलोग्रॅम क्षमतेची हायड्रोजन टाकी आहे. एकदा का टाकी फुल्ल भरली की ही कार तब्बल 646  किलोमीटरपर्यंत धावू शकते.

विरोधकांच्या प्रश्नांपासून पळ काढणारे पंतप्रधान; ‘रोखठोक’ मधून राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut BMC BJP Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभर गाजत असलेल्या अदानी प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सामनातील रोखठोक सदरातून राऊतांनी अदानी प्रकरण आणि पीएम केअर फंड वरून मोदी सरकारवर घणाघात केलाय. आठ वर्षांत देश बराचसा विकला गेलाय अशी टीका संजय राऊतांनी केलीय. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाचे कौतुक केलं आहे.

गौतम अदानी यांच्या निमित्ताने निर्माण झालेले वादळ इतक्यात थांबेल असे वाटत नाही. अदानी यांच्या खिशात पंतप्रधान श्री. मोदी यांनी संपूर्ण देश घातला. मोदी यांनी अदानी यांना देश विकला, असे विरोधकांचे म्हणणे आहे. भाजप व अर्थमंत्री अदानी यांची वकिली करताना दिसतात हे आश्चर्य आहे असं संजय राऊतांनी म्हंटल.

मंगळवार, दि. 7-2-2023 रोजी राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. ‘भारत जोडो’ यात्रेनंतर त्यांच्यात निर्माण झालेल्या प्रगल्भतेचे दर्शन या भाषणात झाले. ‘मोदी- अदानी’ युतीने देश कसा एककल्ली भांडवलशाहीकडे जात आहे हे श्री. गांधी यांनी मुद्देसूद मांडले व कोणत्याही प्रकारचा खोटेपणा त्यांच्या संपूर्ण भाषणात नव्हता. राहुल गांधी हे अदानी विषयावर सरकारची पिसे काढतील याची कल्पना असल्याने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह एकही वरिष्ठ नेता व मंत्री सभागृहात उपस्थित नव्हता.

राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधान मोदी उत्तरे देतील असे वाटले होते, पण मोदी यांनी अदानी यांच्याबाबत अक्षरही काढले नाही. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. सरकार म्हणजे दुसरे कोण ? तर एकमेव मोदी ! संपूर्ण देशाचा उद्योग व अर्थव्यवस्था अदानींच्या माध्यमांतून ताब्यात ठेवण्याचा विचार घृणास्पद आहे, राष्ट्रभक्ती या व्याख्ये न बसणारा आहे अशी आहे.

मोदी यांची सत्ता राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाच्या पायावर नाही, तर खोटेपणाच्या टेकूवर उभी आहे. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे ‘पी. एम. केअर्स फंड.’ कोरोना काळात लोकांना मदत व्हावी या उदात्त हेतूने ही योजना पंतप्रधानांनी सुरू केली. पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता, सरकारी चिन्ह, सरकारी प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून हजारो कोटी रुपये या फंडात जमा केले गेले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांतून पैसे कापून या पी. एम. केअर फंडात टाकण्यात आले. त्यासाठी इंटरनेटचे ‘gov.in’ हे सरकारी डोमेन मिळविले.

या केअर फंडाच्या ट्रस्टवर वरिष्ठ सरकारी अधिकारी नेमून उद्योगपती, व्यापारी, परदेशी संस्थांकडून अगणित पैसा बेहिशेबी पद्धतीने जमा केला. या संपूर्ण व्यवहाराचा हिशेब देण्यास व ऑडिट करण्यास प्रधानमंत्री कार्यालयाने नकार दिला. हे सर्व प्रकरण काही बेडर लोकांनी सर्वोच्च न्यायालयात नेले. तेव्हा मोदी सरकारने सांगितले, ‘पी. एम. केअर्स फंड सरकारी नाही व त्यावर सरकारचे कोणतेच नियंत्रण नाही!’ हा सर्वच प्रकार धक्कादायक आहे. स्वतः श्री. मोदी यांनी पंतप्रधानपदाचा अधिकृत वापर करून हा ‘फंड’ असल्याचे भासवून निधी गोळा केला व त्याचा हिशेब दिला नाही हा आर्थिक अपराध नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

अदानी प्रकरणाची चौकशी होणार नाही व पी. एम. केअर्स फंडातील ‘मनी लाँडरिंग’ तपासण्याची हिंमत ईडी व सीबीआयमध्ये नाही. राहुल गांधी यांनी लोकसभेत ‘मोदी-अदानी’ युतीवर व सरकारच्या खोटेपणावर सर्जिकल स्ट्राइक केला. राहुल गांधींचे भाषण संपल्यावर अनेक भाजप खासदारांचे चेहरे समाधानी होते. त्यांच्या मनात आनंद उसळत होता, पण चेहऱ्यावर दाखवता येत नव्हता. 2024 साठी हे आशादायी चित्र आहे. भारत कोणाच्या खिशात जात आहे ते राहुल गांधी यांनी बेडरपणे संसदेत सांगून टाकले. मोदींनी त्यावर उत्तर देण्याचे टाळले. मोदी 2014 पूर्वी गांधी परिवारास उद्देशून म्हणाले होते, “मैं देश नहीं मिटने दूंगा.” आज तेच गांधी मोदींकडे पाहून बोलत आहेत, “मैं देश नहीं बिकने दूंगा!” पण आठ वर्षांत देश बराचसा विकला गेलाय ! अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

 

भाजपच्या बैठकीत टीका करताना फडणवीसांची जीभ घसरली; म्हणाले, मी यांच्या बापालाही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली. महाविकास आघाडी सरकारने मला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन केला होता. परंतु मी त्यांना पुरुन उरलो. मी त्यांच्या बापालाही घाबरत नाही. ज्यांना मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी दिली, तेच जेलमध्ये गेले. हे सरकार गद्दारांचं नसून खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांनी २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसलं ते गद्दार होते, असे फडणवीस यांनी म्हंटले.

नाशिक येथे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आपल्याकडे सेवेची 20-20 आहे. मात्र, मविआने भष्ट्राचाराची 20-20 खेळली. मी यांच्या बापाला कधीही घाबरलो नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी जंगजंग पछाडलं. मात्र, मी जेलमध्ये गेलो नाही.

 

जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा यांनी एक दमडीही नुकसान भरपाई दिली नाही आणि आमच्यावर गद्दारांचं सरकार अशी टीका करत आहेत. हे सरकार गद्दारांचं नसून खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांनी २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसलं ते गद्दार होते. हे सरकार बेकायदेशीर सरकार असं म्हणणारांनाच कायदा कळतो काय? जे उरले-सुरले १०-१५ आहेत, तेही जातील म्हणून विरोधक घाबरले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल, हा मला पूर्ण विश्वास आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले.

भाजपच ठरलं ! आगामी निवडणुकीत शिंदे गटाच्या मदतीनं 200 पेक्षा जागा आणणार; भाजप प्रदेशाध्यक्षांची घोषणा

Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे भाजपची महत्वाची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि मंत्र्यांना महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट मिळून मिशन 200 पेक्षा जास्त जागांचे लक्ष ठेवले असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली. तसेच कार्यकर्त्यांनी आता तयारीला लागावे, त्यांनी राजकारणावर जास्त बोलू नये. तसेच प्रवक्त्यांनीदेखील वायफळ बोलू नये, अशी ताकीद बावनकुळे यांनी दिली.

भाजपच्या नाशिकमध्ये पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीवेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, मंत्र्यानी फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य करू नये. देवेंद्र फडणवीस हेच फक्त राजकीय विषयांवर बोलतील. तसेच आमदार श्रीकांत भारतीय निवडणूक इन्चार्ज म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान आता आगामी निवडणुकीसाठी ‘महाविजय 2024’ म्हणून संकल्प केला असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे नाशिकच्या कार्यकारिणी बैठकीत भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली असून कार्यकर्त्यांना तयारीला लागावे असे आदेशही देण्यात आले आहेत.

‘महाविजय 2024’ चा महासंकल्प

नाशिक येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून भाजपकडून आज मिशन 2024 ची घोषणा करण्यात आली. राज्यातून 48 खासदार निवडून जातात सध्या भाजपकडे 23 खासदार आहेत. भाजपला केंद्रात पुन्हा 47 यायचे असल्यास महाराष्ट्रातून किमान 40 जागांचे बळ भाजपला हवे आहे त्यामुळे केंद्रातून सत्तेचे स्वप्न पाहायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदारांनी खासदारांची कुमक भाजपला हवी आहे त्यामुळे या बैठकीत मिशन 45 अशी घोषणा करण्यात आली आहे तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुका देखील आगामी काळात होणार असल्याने या निवडणुकांसाठी भाजपकडून मिशन 200 चा नारा देण्यात आला आहे.

फडणवीसांनीही केले मार्गदर्शन

नाशिक येथे आज पार पडलेल्या भाजपच्या महत्वाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना त्यांनी मूलमंत्रही दिला. आम्ही 2024 साठी 20-20 ची बॅटिंग सुरू केली आहे. आगामी निवडणुका शिंदे आणि आम्ही एकत्रित लढू आणि जिंकू देखील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तर महाविकास आघाडी सरकारवर अनेक मुद्यांवरून निशाणा साधला.

वयाच्या 22 व्या वर्षीच केली UPSC परीक्षा उत्तीर्ण; DIG वैभव निंबाळकर यांची यशोगाथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपल्या अप्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कितीही संकटे समोर आली की त्यावर मात करू शकतो. त्यासाठी जिद्द असावी लागते. आणि अशीच अधिकारी होण्याची जिद्द मनाशी बाळगून वयाच्या फक्त 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण होत एक धाडसी अधिकारी होण्याची कामगिरी पुण्याच्या वैभव निंबाळकर यांनी करून दाखवली. आज यांची एक धाडसी अधिकारी म्हणून सर्वत्र ख्याती आहे. आपल्या कामगिरीमुले त्याची नुकतीच डीआयजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुळचे पुण्याचे असलेले आसाम केडरचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी वैभव निंबाळकर यांची नुकतीच पोलिस महानिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. निंबाळकर हे पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथील तालुक्‍यातील सणसर गावचे रहिवासी आहेत. निंबाळकर हे “आयपीएस’च्या 2009 च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

वैभव निंबाळकर

22 व्या वर्षी UPSC उत्तीर्ण

वैभव निंबाळकर यांची वयाच्या 22 व्या वर्षी युपीएसएसी उत्तीर्ण झालेले व भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी, अशी ओळख आहे. ते सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असून त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथे झाले आहे. एस.डी.पी.ओ, बोकाखाट म्हणून काम करताना आसाममधील डीजीपींकडून उत्कृष्ट नेतृत्व आणि आदर्श व्यावसायिक क्षमतेबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे.

वैभव निंबाळकर

“व्हिजीलन्स ऍन्ड ऍन्टी करप्शन” चे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत

निंबाळकर हे आसाममधील कचार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक असताना जुलै 2021 मध्ये आसाम-मिझोरम सीमावादातुन उसळलेल्या दंगलीत आसाम पोलिस दलातील 6 पोलिसांचा मृत्यु झाला होता. तर निंबाळकर यांना गोळ्या लागून ते जखमी झाले होते. उपचारातुन बरे झाल्यानंतर निंबाळकर पुन्हा सेवेत रुजु झाले. सध्या ते आसाम पोलिस दलात “व्हिजीलन्स ऍन्ड ऍन्टी करप्शन’ विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Vaibhav Nimbalkar

पहिल्याच प्रयत्नात IPS

वैभव निंबाळकर यांना लहानपणापासूनच वर्दीचे आकर्षण होते. त्यामुळे IPS झाल्याने त्यांना स्वत:चा आनंद गगनात मावेनासा झाला. वैभव यांना 12 वीला चांगले गुण मिळाले होते. त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता. मात्र ते सोडून त्यांनी Bsc ला प्रवेश घेऊन यूपीएससीची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 204 वा नंबर मिळाला. या परीक्षेसाठी वैभव यांनी सोशॉलॉजी आणि मराठी साहित्य हे विषय घेतले होते. मराठी साहित्य आणि निबंध या लेखी परीक्षांमध्ये ते रँक होल्डर ठरले होते.

वैभव निंबाळकर

पहिलं पोस्टिंग आसाममधील बोकाखाटमध्ये

वैभव यांनी ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर 13 सप्टेंबर 2011 रोजी पहिलं पोस्टिंग आसाममधील बोकाखाट या जिल्ह्यात झालं. या ठिकाणीच भारतातील प्रसिद्ध काझीरंगा अभयारण्याचा बराचसा भाग आहे. हा भाग तसा दुर्लक्षित मानला जातो. शेजारील राज्ये-देशांमधून मोठ्या प्रमाणात घुसरखोरी होते. नक्षलवादी, माओवाद्यांच्या हिंसक कारवाया होतात. अशा भागात वैभव यांनी डॅशिंग काम केलं. त्यावेळी आसाममध्ये गेंड्याची तस्करी होत होती. ती वैभव यांच्या पथकाने हाणून पाडली.

उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ

मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ

डिआयजी वैभव निंबाळकर हे मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ आहेत. मराठी- हिंदी मालिकांमधून घरोघरी पोहोचलेली व त्यानंतर आता यूट्यूबच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हि आपल्या भाऊवर खूप प्रेम करते. उर्मिला निंबाळकर ही मराठी युट्युबर आहे. जवळजवळ चार वर्षे झालं तिने या चॅनेलची सुरुवात केली आहे. युट्युब चॅनेल असो किंवा इन्स्टाग्राम उर्मिला नेहमीच विविध विषयांवरील माहिती देणारे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अभिनेत्री उर्मिलाचे वैभव हे भाऊ आहेत.

फिरायचा प्लॅन करताय? केरळमधील या TOP 8 पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

TOP 8 places in Kerala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. थंडी आता निरोप घेण्याच्या मार्गावर असली तरी अनेक राज्यांमध्ये अद्याप थंडी आहे. दिवसा उन्हामुळे आणि संध्याकाळी थंडीपासून नागरिकांना आता हळूहळू दिलासा मिळत आहे. अशा वातावरणात तुम्हीही जर व्हेलेंटाईन वीकमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दक्षिण भारतातील TOP 8 अशी ठिकाणे आहेत. कि जेथे गेल्यावर तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. पाहूया ती ठिकाणी…

जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा पर्यटनासाठी तसा खास महिना मानला जातो. कारण या महिन्यातील गुलाबी थंडीचे वातावरण अनेकांना फिरण्यासाठी परफेक्ट वाटते. त्यामुळे कित्येकजण या महिन्यात पर्यटनाचा प्लॅन करतात. तुम्हीही हिरवाईचा आनंद घेण्यासाठी केरळमधील अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. केरळला भेट देत असताना तुम्ही अनेक ग्रामीण बाज असणाऱ्या काही गावांना आणि शहरांना भेट देऊ शकता.

अलप्पुझा

1) अलप्पुझा (Alappuzha)

अलप्पुझा हे केरळमधील अत्यंत सुंदर अशा ठिकाणांपैकी एक आहे. पूर्वेचे व्हेनिसे म्हणून अलप्पुझा शहराला ओळखले जाते. नौका शर्यत, बॅकवॉटर समुद्रकिनारे, सागरी उत्पादने आणि खाद्यपदार्थ यांसाठी ही शहरे प्रसिद्ध आहेत. पूर्वेचे व्हेनिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलप्पुझाने केरळच्या सागरी इतिहासात नेहमीच महत्वाचे स्थान भूषविले आहे. अलप्पुझा समुद्र किनारा हे एक लोकप्रिय सहलीचे ठिकाण आहे. येथील समुद्रात गेलेला खांब 137 पेक्षा अधिक वर्ष जुना आहे. विजया बीच पार्कमधील मनोरंजनाच्या सुविधा समुद्रकिनाऱ्याच्या आकर्षणात भर घालतात. या ठिकाणी जवळच एक जुने लाईटहाऊसही आहे जे पर्यटकांना आकर्षित करते. हाऊस बोट क्रूझ एक मस्त पर्याय आहे. अल्लप्पुझाच्या बॅकवॉटरमध्ये तुम्हाला हाऊस बोट पहायला मिळतात त्या खरंतर जुन्या काळातल्या केट्टुवल्लमचे सुधारित रुप आहे.

2) मुन्नार (Munnar)

मुन्नार हे केरळचे प्रसिद्ध असे एक ठिकाण होय. तीन पर्वत रांगा- मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडल ह्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि समुद्रसपाटीपासून त्याची उंची अंदाजे 1600 मी आहे. मुन्नारचे हिल स्टेशन कधीकाळी दक्षिण भारताच्या पूर्वकालीन ब्रिटिश प्रशासनाचे उन्हाळी रिसॉर्ट होते. या हिल स्टेशनची ओळख आहे येथील विस्तिर्ण भू भागात पसरलेली चहाची शेती, वसाहती बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान. ट्रेकिंग आणि माउंटेन बाइकिंगसाठीही हे एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. मुन्नार (केरळ) ब्रिटिशांनी विकसित केलेल्या हिल स्टेशनसारखेच मुन्नारही एक थंड हवेचे ठिकाण आहे. केरळच्या इडुवकी जिल्ह्यात मुन्नार आहे. तीन पर्वतरांगा-मुथिरपुझा, नलयन्नी आणि कुंडल यांच्या संगमावर हे वसलेले आहे.  विस्तीर्ण भूभागात पसरलेली चहाची शेती, वसाहती, बंगले, छोट्या नद्या, झरे आणि थंड हवामान यामुळे पर्यटक इकडे आकर्षित होतात.

3) इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान (Irvikulam National Park)

मुन्नार आणि त्याजवळील भागातील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे इरवीकुलम राष्ट्रीय उद्यान होय. हे उद्यान मुन्नारपासून साधारण 15 किमी अंतरावर असून लुप्त होत चाललेला प्राणी “नीलगिरी टार” साठी हे ओळखले जाते. 97 चौरस किमी अंतरापर्यंत पसरलेले हे उद्यान दुर्मिळ जातीची फुलपाखरे, वन्यजीव आणि पक्षांच्या अनेक दुर्लभ जातींचे आश्रयास्थान आहे. हे स्थान ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे. उद्यानातील चहाचे विस्तृत मळे आणि त्याचबरोबर पर्वतरांगावर वेढलेली धुक्याची दाट चादर यांचे एक मनमोहक दृष्य येथे पहावयास मिळते. नीलकुरिंजीच्या फुले फुलल्यानंतर जेव्हा पर्वताची उतरण जणु काही नीळ्या रंगाच्या चादरीने झाकली जाते. हे एक उत्तम असे पर्यटनाचे ठिकाण आहे.

कोची (Kochi)

4) कोची (Kochi)

केरळमधील कोची हे शहर कोचीन नावाने देखील ओळखले जाते. कोचीमध्ये तुम्हाला भरपूर शॉपिंग करता येईल. कोचीन केरळमधील फारच प्रसिद्ध बंदर आहे. येथे पोर्तुगीजांचे राज्य होते. त्यामुळे तिथे आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात चालते. तुम्हाला या ठिकाणी उत्तम ड्रेस मटेरिअल्स, सोनं आणि इतर दागिन्यांचे प्रकार मिळतील. त्यामुळे केरळला आल्यानंतर कोची अगदी मस्त आहे. तुम्हाला या ठिकाणी पोर्तुगीजांच्या अस्तित्वाच्या अनेक गोष्टी पाहाचयला मिळतील. याशिवाय कोची किल्ला, मत्तान चेरी पॅलेस, चेराई बीच आणि बरीच काही ठिकाणे आहेत.

कोवलम (Kovalam)

5) कोवलम (Kovalam)

केरळमधील कोवलम हे ठिकाण वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अगदी हमखास वॉटर स्पोर्टससाठी जाता येते. समुद्राचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही कोवलमला जायलाच हवं. कोवलमचे बीच फारच सुंदर आहेत. जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सची आवड असेल तर तुम्हाला या ठिकाणी अगदी आवर्जुन जायला हवं. तुम्हाला जरी अँडव्हेंचर करायचं नसेल तरी सुद्धा येथील निसर्ग सौंदर्य पाहायला तुम्ही जायला हवं. याशिवाय येथे फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.

कन्याकुमारी

6) कन्याकुमारी (Kanyakumari)

केरळला गेल्यानंतर तामिळनाडूतील कन्याकुमारी हे प्रसिद्ध असे ठिकाण समुद्र किनारी आहे. या ठिकाणी भव्य असे विवेकानंद स्वामींचे स्मारक आहे आणि कन्याकुमारीचे मंदिर आहे. शिवाय येथे सूर्याेदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही गर्दी असते. या ठिकाणी तुम्हाला सुंदर मोत्याचे दागिने मिळतील. हिंदी महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्र यांचा सुरेख संगम या ठिकाणी होत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे तीन वेगळे रंग दिसतात. तामिळनाडूत आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बस करुन येऊ शकता.

एर्नाकुलम (Ernakulam)

7) एर्नाकुलम (Ernakulam)

केरळला फिरण्यासाठी आल्यानंतर एर्नाकुलम हे एक उत्तम असे पर्यटन स्थळ आहे. एर्नाकुलमबद्दल सांगायचे झाले तर ते एखाद्या शहराप्रमाणे आहे. एर्नाकुलम ही केरळची आर्थिक राजधानी असल्यामुळे हे ठिकाण तुम्हाला मुंबई, दिल्ली सारख्या शहरांसारखी जाणवेल. त्यामुळे केरळचे खास कपडे, खाद्यपदार्थ अशा गोष्टी हमखास या ठिकाणी मिळू शकतील. याठिकाणी काही ब्रीज आणि पार्क्स पाहण्यासारखे आहे. तसेच केरळी जेवणाचा आस्वाद उत्तम प्रकारे या ठिकाणी घेऊ शकता.

कोझीकोडे (Kozhikode)

8) कोझीकोडे (Kozhikode)

केरळमधील कोझीकोडे ही जागा कालिकत या नावाने आधी प्रसिद्ध होते. साधारण 500 वर्षांपूर्वी येथून कापड, मसाले आणि अन्य गोष्टींचे निर्यात ज्यू आणि अरब लोकांना केले जात होते. या शिवाय कोझाकोडे येथील मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. त्यांची रचनाही तुम्हाला फार वेगळी जाणवेल. त्यामुळे केरळच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी फारच महत्वाचे आहे. या ठिकाणी कोझीकोड बीच, मनानाचिरा,कदालुंदी बर्ड सेंच्युरी,आर्किओलाॅजी म्युझिअम अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

Bank of India मध्ये 500 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Bank of India Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये (Bank of India Recruitment) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत PO पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक असणारया उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

एकूण पदसंख्या – 500 पदे

भरले जाणारे पद – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023

अर्ज फी –

खुला : रु. 850/-
राखीव : रु. 175/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Credit Officer 350 Graduate in Any Stream (Bank of India Recruitment)
IT Officer 150 B.Tech/ PG in CS/ ECE/ IT OR DOEACC ‘B’ Level

काही महत्वाच्या तारखा –

Bank Of India Recruitment 2023 Short Notice – 08 February 2023
Bank Of India Recruitment 2023 Notification PDF – 10 February 2023 (Bank of India Recruitment)
Bank Of India Recruitment 2023 Apply Online Start Date – 11 February 2023
Last Day to Apply Online for Bank Of India Recruitment 2023 – 25 February 2023

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in

नारायण राणे आंतरराष्ट्रीय नेते, ते अमेरिका- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष पदाचे दावेदार होऊ शकतात

narayan rane sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूवरून शिवसेना खासदार यांनी सरकारवर निशाणा साधला होता, फडणवीस यांच्या कोकणातील भाषणानंतरच पत्रकाराची हत्या करण्यात आली याचा काय संबंध लावायचा असा सवाल त्यांनी केला होता. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारलं असता आपण संजय राऊतांची दखल घेत नाही असं राणे म्हणाले होते. त्यांनतर संजय राऊत यांनी राणेंना प्रतिउत्तर दिले आहे. नारायण राणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेते आहेत त्यामुळे ते आम्हाला लहान बोलत असतील अशी खिल्ली राऊतांनी उडवली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, नारायण राणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेते आहेत. ते इतके मोठे नेते आहेत की फ्रान्स, अमेरिका, लंडन येथील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ शकतात; त्यामुळे ते आम्हाला लहान बोलत असतील. पण, शिवसेनेने राणेंचा दोनवेळा पराभव केला. त्यांच्या पुत्राचाही पराभव शिवसेना खासदार विनायक राऊतांनी केला आहे. हे. नारायण राणेंची मानसिक अवस्था पाहता, त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नये. कारण आपण अशा मानसिक दृष्ट्या विकलांग लोकांकडे पाहू नये. आम्ही कोण आहोत, हे महाराष्ट्राला माहिती,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

आम्ही डरपोक नाही, आमच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला म्हणून ३-४ वेळा पक्ष बदलणारे आम्ही नाही आहोत, आम्ही पळपुटे नाही, आम्ही आमच्या पक्षाबरोबर इमान राखून काम करतोय. आम्ही आमच्या पक्षाच्या भूमिका ठामपणे मांडत राहू असेही राऊत म्हणाले. एका पत्रकाराच्या मृत्यूची चौकशी व्हावं असं मी म्हणल्यावर राणेंना वाईट वाटायचं काय काम असा सवालही त्यानी केला.

‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरसोबत तमन्नाचं होणार होतं शुभमंगल सावधान; पण…

Tamannaah Bhatia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. बाहुबली सिनेमामुळे तमन्ना खूपच लोकप्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘डार्लिंग्स’ स्टार विजय शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांचा लिप लॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण एकेकाळी तमन्ना पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करणार असल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या होत्या.

https://www.instagram.com/reel/ClONg8qDyYp/?utm_source=ig_web_copy_link

दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि पाकिस्तानी क्रिकेटर्शी लग्न? या विचाराने तिचे चाहतेही हैराण झाले होते. तो क्रिकेटर कोण? प्रश्नही त्यावेळी बॉलिवूडमध्ये विचारला जात होता. पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रझाकसोबत तमन्ना भाटियाचे नाव जोडले गेल्याने तमन्ना आणि अब्दुल हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. विशेष म्हणजे दोघे लवकर लग्न बंधनात अडकणार असेही बोलले जात होते.

https://www.instagram.com/p/CTWcq4Ork_s/?utm_source=ig_web_copy_link

यामागचे कारण तसे खास आहे कारण तमन्ना आणि अब्दुलनं एकत्र एका ज्वेलरी शॉपचे उद्घाटन केले होते. तमन्नाचे अब्दुलसोबतचे ज्वेलरी शोरूमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते फोटो पाहिल्यानंतर तमन्नाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळेच त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या.

तमन्ना भाटिया आणि क्रिकेटर अब्दुल रजाक यांच्या लग्नाच्या बातमीने अख्य्या बॉलिवूडमध्ये गोंधळ उडाला होता. त्यावेळी तमन्नाची टेनिसपटू सानिया मिर्झासोबत तुलना होऊ लागली होती.

Okaya Faast F3 : लाँच झाली वॉटरप्रूफ Electric Scooter; 125 किमी रेंज

Okaya Faast F3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Okaya Faast F3) वाढत्या किमतींमुळे अनेक लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या वाढत्या मागणींमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी गेल्या वर्षभरापासून अनेक इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Okaya EV ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F3 लाँच केली आहे. या गाडीची खास गोष्ट म्हणजे ही वॉटरप्रूफ आणि धूळ-प्रतिरोधक स्कूटर आहे.चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कुटरची अन्य फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत…

125 किमीपर्यंत रेंज-

Okaya Faast F3 ला इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. या स्कूटरमध्ये 2500W ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी 3.53 kWh च्या ड्युअल Li-ion LFP बॅटरी पॅकसोबत जोडली गेली आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, ओकायाची Fast F3 स्कुटर तब्बल 125 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. हि बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागतो. स्कूटरच्या बॅटरी आणि मोटरवर कंपनीकडून 3 वर्षे / 30 हजार किमीची वॉरंटी सुद्धा मिळते. गाडीचे टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे.

Okaya Faast F3

फीचर्स – (Okaya Faast F3)

Faast F3 इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, यात रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स मोड आणि पार्किंग मोड यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सस्पेंशनसाठी समोरील बाजूला टेलीस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस हायड्रॉलिक स्प्रिंग शॉक अब्सॉर्बर मिळतात. सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा ही स्कुटर बेस्ट आहे. कारण ही गाडी चोरण्याचा प्रयत्न केल्यास किंवा लॉक केलेल्या स्कूटरला कोणी ढकलण्याचा प्रयत्न केल्यास याची चाके आपोआप लॉक होतील.

Okaya Faast F3

किंमत किती –

Faast F3 स्कुटर इलेक्ट्रिक स्कुटरची एक्स शोरूम किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सायन, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाइट अशा 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे.