Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 1587

IND vs AUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर डावाने विजय: तिसऱ्याच दिवशी कांगारूंना लोळवले

IND vs AUS Test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नागपूर येथील पहिल्या कसोटी सामन्याय भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. 5 दिवसांच्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया वर मात केली आहे. 1 डाव आणि 132 धावा राखून भारतीय संघाने कांगारूंचा दारुण पराभव केला आहे.

कर्णधार रोहित शर्माचे शतक आणि भारतीय फिरकीपटूंची जादू हे या पहिल्या कसोटी सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात अवघ्या 177 धावा केल्यांनतर भारतीय संघाने 400 धावांचा डोंगर उभा केला. मात्र ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुद्धा अवघ्या 91 धावात आटोपला. भारताचा स्टार फिरकीपटू रवी अश्विनने दुसऱ्या डावात 5 बळी घेत कांगारूंना आपल्या फिरकीपुढे नाचवले. अश्विन व्यतिरिक्त रवींद्र जडेजा- मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 तर अक्षर पटेलने 1 बळी घेतला.

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला त्याच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या कसोटी सामन्यातील विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पोलिसाच्या वेशात रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न; सोयाबीन, कापूस प्रश्नासंदर्भात आक्रमक

Ravikant Tupkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने लक्ष घालावे नाहीतर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनकरू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. दरम्यान, त्यांनी पोलिसाच्या वेशात येऊन मोर्चावेळी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

सोयाबीन, कापूस दरवाढ नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेत तसेच पीक विमाची रक्कम, अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसून ती तत्काळ द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली होती. तर मागील तीन महिन्यापासून तुपकरांकडून आंदोलन केले जात आहे. तुपकर यांच्या या आंदोलनाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.

शेतकरी प्रश्नासंदर्भात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 10 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा AIC विमा कंपनीच्या मुंबई स्थित कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

 

त्या दिवसापासून रविकांत तुपकर हे भूमिगत आहे. ते नेमके कुठे आहेत? त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. ते भूमिगत झाल्यामुळे पोलिसांचे टेन्शन वाढले होते. दरम्यान, तुपकरांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपला आणि तुपकर आपल्या शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी; चिंचवड मधील बॅनर चर्चेत

banners in pimpari chinchwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. यातील चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून नानासाहेब काटे यांना तिकीट देण्यात आलं. त्यांनतर नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरल्याने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती करूनही राहुल कलाटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्याने महाविकास आघाडीला नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता चिंचवड परिसरातील बॅनरने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतलं आहे. यामध्ये राहुल कलाटे यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

बॅनरवरील मजकुर नेमका काय?

एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून… नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दरी, एकदम ओक्के डोक्यातून… खरा शिवसैनिक या आशयाचा मजकूर लिहून राहुल कलाटे यांना विरोध दर्शविला आहे. हे बॅनर नेमकं कोणी लावले हे समोर आलेलं नाही. मात्र शिवैनिकांमध्ये राहुल कलाटे यांच्या भूमिकेमुळे नाराजी असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे.

कलाटे यांच्या बंडखोरीमागे तिसराच सूत्रधार ?

दरम्यान, राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमागे तिसराच कोणीतरी सूत्रधार असल्याची शंका राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली होती. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोरी करण्यामागचा सूत्राधार कोणतरी तिसराच दिसतोय. मतांचे विभाजन करण्यासाठी हे केल्याचं दिसून येतेय. मात्र महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे काम करणार आहे असं अजित पवार म्हणाले.

टायगर अभी जिंदा है; मुंडेंच्या स्वागतासाठी परळीत 50 फुटी बॅनर्स

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे हे मुंबईत उपचार घेतल्यानंतर पहिल्यांदाच परळीत परतत आहेत. ते येत असल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्याचा निर्णय समर्थकांनी घेतला आहे. उद्या रविवारी धनंजय मुंडे परळीत येत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परळीत तब्बल 50 फुटी बॅनर लावला असून टायगर अभी जिंदा है…असे त्यावर लिहण्यात आले आहे. असे बॅनर्स येथे जास्त लक्ष वेधून घेत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा 4 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी परळीत भीषण अपघात झाला होता. या घटनेत त्यांच्या कारचा चक्काचूर झाला होता. तर मुंडे यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला होता. मुंबईतील बीचकँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी तब्बल 35 दिवसानंतर ते परळीत परतत आहेत.

दरम्यान, मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी शहरात पन्नास फुटी बॅनर लावण्यात आले असून शहरातील प्रत्येक प्रवेश द्वाराला कमानीने सजवण्यात आले. मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत भव्य मिरवणूक निघणार आहेत. विशेष म्हणजे या रॅलीत केरळ आणि तिरुपती बालाजी इथून बँड पथक, तसेच मुंबईतलं ढोल पथक मागवण्यात आले आहे. मुंडे उद्या दुपारी 12.30 वाजता बीड जिल्ह्यात येतील. अगोदर गहिनीनाथ गडावर जावून दर्शन घेतील. त्यानंतर ते मूळ गावी परळीत येतील. दुपारी 4 वाजता ते परळीत येऊन वैद्यनाथाचे दर्शन घेतील. नंतर पांगरी येथे गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतील.

उदयनराजेंच्या प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी मंजूर

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा शहराच्या दक्षिणेकडे विलासपूर आणि लगतच्या परिसरातील सुचवलेली साडेचार कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून नुकतीच मंत्रालयातून या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी सांगितले.

या कामांमध्ये विलासपूर येथील फॉरेस्ट कॉलनी गणेश नगरलगत ओढ्याला वॉकिंग ट्रॅक आणि ड्रेनेज सिस्टीम करणे एक कोटी 35 लाख, गोळीबार मैदानातील साई कॉलनी ते पालवी चौक दोन्ही बाजूंनी सिस्टीम रस्ता करणे एक कोटी दहा लाख , काळंबीचा ओढा येथे साकव पूल बांधणे 30 लाख ,साई कॉलनी येथील ओपन स्पेस मध्ये वॉकिंग ट्रॅक ओपन जिम 30 लाख ,सुतार कॉलनी येथील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे 30 लाख, सुतार कॉलनी येथील मोकळ्या जागेत सभा मंडप बांधणे 30 लाख ,नंदादीप गृहनिर्माण संस्थेमध्ये अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे दहा लाख,अवि कॉलनी येथील 100 मीटर रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करणे दहा लाख, बापूजी साळुंखे नगर व शिवशक्ती नगर येथे डांबरीकरण दहा लाख, गणेश नगर ते गणेश नगर फॉरेस्ट कॉलनी यांना जोडणारा रस्ता डांबरीकरण खडीकरण करणे दहा लाख,कारंजकरनगर येथे रस्ता डांबरीकरण करणे दहा लाख, विनायक हाऊसिंग सोसायटी येथील रस्ते खडीकरण व डांबरीकरण 15 लाख ,सहजीवन सोसायटी येथील मोकळ्या जागेत बाग बगीचा विकसित करणे 30 लाख ,राधिका नगर येथे बंदिस्त कटर बांधकाम 10 लाख,पायरी पार्क गोळीबार मैदान येथील ओपन स्पेस विकसित करणे 20 लाख, अशा 14 कामांना एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

या संदर्भातील प्रस्ताव संग्राम बर्गे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यामार्फत नगर विकास विभागाकडे सादर केला होता उदयनराजे यांनी या 14 कामांविषयी सातत्याने पाठपुरावा करून विलासपूर आणि लगतच्या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे या कामाच्या निविदा लवकरच काढल्या जाणार असून प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

राष्ट्रवादीच्या माजी आमदारावर ED ची कारवाई; 26 कोटींची संपत्ती जप्त

ED action NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीच्या वतीने ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. अनेक बढया नेत्यांच्या घरावर धाडी टाकून संपत्ती जप्त केली जात आहे. नुकतेच पिंपरी चिंचवड येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यावर कारवाई केल्यानंतर ईडीकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेतील 71 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार अनिल भोसले यांची 26 कोटी 26 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बँकेतील 71 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात अनिल भोसले यांना मागील वर्षी मार्च महिन्यात अटक झाली होती. यावेळी भोसले यांच्यासह सूर्याजी पांडुरंग जाधव, नूसर शनूर मुजावर यांच्यासह अन्य आरोपींवर यापुर्वीच गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने भोसले यांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.

आता ईडीनेही अनिल भोसले यांची पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 26 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. भोसले यांनी बनावट कर्ज प्रकरणे मंजूर केली होती. त्यामाध्यमातून ठेवीदारांचे पैसे त्यांनी अन्यत्र वळवले होते. यामुळे बँक अडचणीत आली आहे.

FD Rates : खुशखबर!! ‘या’ बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ

kotak mahindra bank FD rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही सुद्धा बँकेत (Bank) गुंतवणूक करून खात्रीदायक रिटर्न मिळवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या कोटक महिंद्राने (Kotak Mahindra Bank) आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. 0.25 टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. नुकतंच RBI ने रेपो रेट मध्ये वाढ केल्यांनतर कोटक महिंद्रा बँकेने FD वरील व्याजदर वाढवले आहेत. शुक्रवारपासून बँकेचे नवे व्याजदर लागू झाले आहेत. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि 2 ते 5 कोटींच्या एफडींना लागू होते.

यानुसार, 15 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या ठेवींवर 7.25 टक्के आणि 12 महिने 25 दिवस ते 2 वर्षांच्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 7.10 टक्के व्याज दिले जाईल. आरबीआयने व्याजदरात वाढ केल्याने, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या सेविंग वर जास्त रिटर्न देण्याचा निर्णय घेतला आहे असं बँकेचे प्रमुख विराट दिवाणजी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

कोटक महिंद्रा बँक 180 दिवसांपासून ते 364 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.50 टक्के व्याजदर देत आहे. 364 दिवसांच्या FD वर सामान्य नागरिकांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याजदर मिळत आहे. 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर सामान्य ग्राहकांना 6.90 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.40 टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच 12 महिने 25 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर कोटक मंहिद्रा बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर मिळेल.

नियमित ग्राहकांना 6.25 टक्के आणि 364 दिवसांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वर नियमित ग्राहकांना 6.90 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.40 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. त्याच वेळी, 12 महिने 25 दिवसांपासून ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर, ते नियमित ग्राहकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देत आहे.

प्रांत मुंबईला गेले अन् आजारीही पडले : पालकमंत्री म्हणाले…चाैकशी लावा

Shamburaj Desai

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
अधिकारी म्हणतो प्रांत मुंबईला गेले, तहसिलदार म्हणतात प्रांत आजारी पडले मंत्री शंभूराज देसाई म्हणाले चाैकशी लावा अन् खुलासा करा. खंडाळा तालुक्यातील विंग येथे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दाैरा काल होता. मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यक्रमाला खंडाळा तालुक्याचे प्रातांधिकारी अनुपस्थित नव्हते. यावरून मंत्री श्री. देसाई यांना वेगवेगळी उत्तरे मिळाल्याने ते चांगलेच भडकले अन् त्यांनी भरसभेत अधिकाऱ्यांच्या चाैकशीचेच आदेश दिले.

विंग येथे आयोजित कार्यक्रमात शंभूराज देसाई म्हणाले, जे अधिकारी गैरहजर असतील त्यांना नोटीस काढायला कलेक्टरांना सांगा. सामान्य जनतेचे, शेतकऱ्याचे काम आहे. एक अधिकारी आजारी पडतो, एक अधिकारी गैरहजर राहतो ते चालणार नाही. सरकार सामान्य लोकांसाठी काम करत आहे, लोक सहा वाजले तरी थांबले आहेत. त्यामुळे जे कोणी अधिकारी गैरहजर असतील त्यांना खुलासा करावा लागेल. मला प्रांत मुंबईला गेल्याचे सांगितले, तहसिलदार म्हणतायत आजारी पडले आहेत. नक्की खरं कोण बोलतयं. यावर तहसिलदारांनी मुंबईला पण गेले अन् आजारी पण पडले असल्याचे म्हणताच. तुम्ही वकील असल्याचे म्हणताच लोकांच्यात हशा पिकला.

https://www.facebook.com/watch?v=869976580880589

लोकांच्यासाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे जागेवरच काम झाले पाहिजे. लोक खंडाळ्यात कार्यालयात जायचे अन् तिथे अधिकारी नसायचा, म्हणजे लोकांचा नुसताच हेलपाटा होणार. तेव्हा अधिकाऱ्यांनी लोकांसाठी काम करावे, असा सज्जड दमच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिला.

अजितदादा मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करायचं आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलं होत. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात या चर्चेला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी लागणारी संख्याच नाही त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नसल्याचे म्हंटल आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, कोणाला काहीही आवडेल परंतु तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? आमच्याकडे संख्या नाही, जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडं शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळं त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, गेल्या महिन्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी २ वेळा मुंबईत आले याबाबत शरद पवारांना विचारलं असता मुंबई महानगर पालिका निवडणूक जवळ आल्या असल्याने मोदी पुन्हा पुन्हा येत आहेत. महाराष्ट्राला काय ते देणार असतील आणि राज्याचे हित असेल तर त्यांना विरोध करायच आमचं काही कारण नाही परंतु इथं येऊन ते राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा असं शरद पवार म्हणाले.

सह्याद्रि साखर कारखान्याच्या वतीने शक्तीमान “प्रोटेक्टर 600” यंत्राने फवारणी

Spraying by Shaktiman "Protector 600" machine
कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाच्या शेती व ऊसविकास विभागाच्या वतीने ऊस लागण व खोडवा पिक व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत माळवाडी (मसूर) येथे शक्तीमान कंपनीच्या “प्रोटेक्टर 600” फवारणी यंत्रचे प्रात्यक्षिक राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यामध्ये एकावेळी 600 लिटर पाणी व औषधांचे मिश्रण साठवून ठेवण्याची क्षमता आहे. एकावेळेस 8 ते 10 मिनिटे वेळेमधे एका एकरावर फवारणी होते, एकावेळी 32 फूट क्षेत्रावर कोमिकल आणि फ्लॅट फवारणी करू शकतो. एक मिनिटामध्ये 20 नोझलच्या साहाय्याने 20 लिटर पाणी आणि औषधाच्या मिश्रणाची फवारणी होते. यामुळे वेळेची आणि पैशाची बचत होण्यास मदत होते.
याप्रसंगी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, जशराज पाटील, डी. बी. जाधव, माणिकराव पाटील, अविनाश माने, लहुराज जाधव, पै. संजय थोरात, बजरंग पवार, रामदास पावर, वसंतराव कणसे, जयवंत थोरात, पांडुरंग चव्हाण, मंगेश पाटील, पांडुरंग कदम, शंकरराव थोरात, युवराज शिंदे, शक्तीमान कंपनीचे मॅनेजर महेश सुळ, असिस्टंट मॅनेजर राजदीप पाटील, ॲग्री अडवायझर मोहनराव पाटील, शेती अधिकारी व्ही. बी. चव्हाण, उसविकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण, उपशेती अधिकारी नितीन साळुंखे यांचेसह सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे शेती विभागाचे कर्मचारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.