Monday, December 15, 2025
Home Blog Page 1883

गुजरात सोडण्यासाठी भाजपाने AAP ला दिली ऑफर; मुख्यमंत्री केजरीवालांच्या दाव्याने खळबळ

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने येथे रणधुमाळी सुरु झाली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. अशात आज आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक दावा केला आहे. “आप पक्षाने गुजरात निवडणुकीतून माघार घेतली तर भाजप केंद्रीय यंत्रणांच्या तपासात अडकलेले मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना सोडेल, अशी भाजपने त्यांना ऑफर दिल्याचे केजरीवाल यांनी म्हंटले आहे.

अरविंद केरीवाल यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते अगोदर मनीष सिसोदिया यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, आता ते मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम आदमी पक्षाला सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याचा भाजपचा प्रस्ताव मनीष सिसोदिया यांनी नाकारला होता.

आम्हाला दोन्ही जागा जिंकण्याचा आत्मविश्वास असता तर त्यांनी असा आग्रह धरला नसता. भाजपला गुजरात आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीत पराभव होण्याची भीती आहे, म्हणून त्यांनी दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याची खात्री केली असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

… यामुळे राष्ट्रवादीमधील बंडाळी बाहेर येत नाही; बावनकुळेंनी लगावला टोला

bawankule and ajit pawar

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज शिर्डी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहिले मात्र अजित पवार काही कारणास्तव अणुउपस्थित राहिले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चाना मोठे उधाण आले. या प्रकारावरून भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

नेमके काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
अजित पवार कधीही कुठे जातात आणि परत येतात. अजित पवार कधी नाराज होतील, याचा नेम नाही. यावरुन असं दिसतय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस आहे. सत्ता गेल्यापासून सर्वच अस्वस्थ आहेत. गेल्या अडीच वर्षात जो भ्रष्टाचार झाला त्याची भिती आता त्यांना वाटत आहे. शरद पवार साहेबांमुळे ही बंडाळी रस्त्यावर येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व पवार साहेबांमुळे आहे, ते असेपर्यंत हे कुठे जातील एवढी त्यांच्यात हिम्मत नाही, असा टोलादेखील बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही : बावनकुळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपा 40 वर्षे विरोधात होती. हे क्ष वाचवण्यासाठी आघाडी करतील. मागच्या वेळेस कपट कारस्थान करुन सत्तेत आले अशी टीकादेखील त्यांनी (chandrashekhar bawankule) यावेळी केली. यादरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

काँग्रेसमधील नितीमत्ता संपली,दहा पिढ्या बसून खातील इतकं त्यांच्याकडे; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म मेळावा पार पडला. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून टीका केली. “काँग्रेसची सध्याची अवस्था पाहिल्यास या पक्षामधील नीतिमत्ता संपली आहे. यांच्याकडे दहा पिढ्या बसून खातील इतकं आहे, असे आंबेडकरांनी म्हंटले.

नांदेडमध्ये धम्म मेळाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, मात्र त्यांच्याकडे मुद्दाच नाही. हे सामान्यांचं सरकार नाही. हे लुटारुंचं सरकार आहे, राहुल गांधींनी हे मांडायला शिकलं पाहिजे. हा चालणारा खेळखंडोबा काँग्रेस वाले मांडू शकत नाहीत कारण तेही यात एकेकाळी सहभागी होते. देशात खाजगीकरण काँग्रेसच्या काळात सुरू झाले आहे.

राज्यातील शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी महत्वाचे विधान केले. 16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, असे आंबेडकर म्हणाले.

मनसेच्या उपशहर अध्यक्षावर कार्यकर्त्याकडूनच जीवघेणा हल्ला, पनवेलमधील घटना

brutal attack

पनवेल : हॅलो महाराष्ट्र – राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पनवेल येथे मनसे उपशहर अध्यक्षावर जीवघेणा हल्ला (brutal attack) करण्यात आला आहे. मनोज कोठारी असे त्या जखमी उपशहर अध्यक्षाचे नाव आहे. कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बी.के. ढाबा येथे 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता हा हल्ला (brutal attack) करण्यात आला आहे. मनोज कोठारी आणि त्यांचा मित्र जेवण आणण्यासाठी गेले होते. यावेळी हॉटेलबाहेर ओळखीचे आरोपी खाडे आणि त्याचे दोन ते तीन साथीदार उभे होते. मनोज कोठारी हॉटेलमधून बाहेर येताच खाडे आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर गाडीत असलेल्या हॉकी स्टिकने आणि लाथाबुक्क्यांनी कोठारीला मारहाण (brutal attack) करण्यास सुरुवात केली.

यानंतर मुख्य आरोपी आणि त्यांचे साथीदार घटनास्थवरून पळून गेले. त्यानंतर सोबत असलेल्या मित्राने कोठारी यांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं. कोठारी यांच्या मित्राने कामोठे पोलिसांना घडलेली घटना सविस्तर सांगितली. यानंतर कामोठे पोलिसांनी आरोपी खाडे आणि त्याच्या साथीदारांवर 323/326/506/560 अंतर्गत गुन्हा दाखल करून (brutal attack) पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

फिर्यादीने हा हल्ला (brutal attack) पूर्व वैमन्यस्यातून झाला असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आरोपी खाडे याची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. आरोपी आणि फिर्यादी हे एकाच पक्षाचे असल्यामुळे हा हल्ला नक्की कोणत्या कारणातुन झाला याचा सविस्तर तपास कामोठे पोलीस करत आहेत.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

बाळासाहेबांचे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत माहिती दिली. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम 58 टक्के पूर्ण झाले असून हे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी काढले.

मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे म्हणाले की, दादरमधील मुंबई महापौरांच्या जुन्या बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात येणार आहे. या स्मारकात बाळासाहेबांच्या आठवणी. फोटो असतील. या स्मारकाचे बांधकाम ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता करण्यात आलेले आहे.

बाळासाहेबांची भाषणं जनतेला जागृत करणारी आहेत. बाळासाहेबांची भाषणं जुनी भाषण मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्मारक कधी होणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. आम्ही स्मारकासाठी एकही झाड तोडलं नाही. स्मारकासाठी अनेक बैठका घेतल्या. स्मारकाबाबत सर्व परवानग्या घेतल्या आहेत. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे ठाकरे यांनी म्हंटले.

स्मारकात शिवसेनेचे तोतयागिरी करुन झालेले मुख्यमंत्री नसतील

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात असतील, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेल्यांचे फोटो नसतील, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

फडणवीसांना टोला

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ते म्हणाले की, आधी मी बोलतो नंतर सुभाष देसाईंना माईक देईन. नंतर त्यांच्या हातून माइक परत घेणं बरोबर नाही, असे म्हणत ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

अंगात ताप, हाताला पट्टी अन कातर आवाज असलेल्या पॉवरफुल पवारांची मंथन शिबिरास हजेरी

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणातील एका पॉवरफुल नेते म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख. ते सध्या आजारी असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकीकडे त्यांच्यावर उपचार सुरु असताना दुसरीकडे शिर्डीत पार पडत असलेल्या पक्षाच्या मंथन शिबीरास पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचा आवाज थोडा क्षीण होता. चेहरा थोडा निस्तेज दिसत होता. तसेच त्यांनी आज आपलं भाषण उभं न राहता बसूनच केले. हाताला बँडेज लावलेल्या पॉवरफुल पवारांनी कार्यकर्त्यांशी केवळ पाच मिनिटे संवाद साधला.

शिर्डीत कालपासून सुरु झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरास आज पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने ते या शिबिरास उपस्थित राहतील का? अशी चर्चा केली जात होती. मात्र, त्यांनी प्रकृती नाजूक असताना देखील शिबिरास उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित केलं.”तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल असी आशा आहे, असा कानमंत्र यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

पवारांनी आजच्या सभेत फक्त पाचच मिनिटं भाषण केलं. प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी अधिक संवाद साधला नाही. मात्र, त्यांचं लिखित भाषण राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल असी आशा आहे, असा कानमंत्रही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

सभेनंतर शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मंथन शिबिरातील प्रवेशाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. जनतेवर आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा लोकनेता. राज्याच्या हितासाठी लढण्याची वेळ येताच स्वतःची पर्वा न करता प्राणपणाने मैदानात उतरणारा योद्धा ! असे नातू रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवारांसाठी म्हंटले आहे.

संघर्ष समितीची मागणी : उसाची पहिली ऊचल 3 हजार 500 रूपये द्या

Sugarcane Sangharsh Committee

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
ऊस शेतीचे उत्पन्न घेण्यासाठी लागणारी खते- बियाणे, औषधे, मजुरी, मशागत व शेतीपंपाचे वीज बिल इत्यादी साधनांचा खर्च दुप्पट- तिप्पट झाला आहे. ऊस शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस शेती तोट्यात गेली आहे. आपल्या शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी 3 हजार रूपयांच्या पुढे पहिली उचल जाहीर केली आहे. या कारखान्यांचा आदर्श घेऊन आपणही उसाची पहिली उचल तीन हजार 500 रूपये दर जाहीर करावा, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील ऊस दर संघर्ष समितीने केली आहे.

आज ऊस दर संघर्ष समिती सातारा यांच्या वतीने आज पहिल्या टप्प्यात कृष्णा, सह्याद्री व जयवंत शुगर या साखर कारखान्यांना उसाची पहिली उचल 3 हजार 500 रुपये द्यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. आपल्या कारखान्यात उसापासून साखर सोबत इतर उपपदार्थाचे उत्पन्न घेतले जाते. त्याच्या माध्यमातून आपणाला तीन हजार 500 रुपये दर शेतकऱ्यांना देणे शक्य असल्याचे म्हटले आहे. तसेच साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी शासन निर्णयानुसार आपला यावर्षीचा ऊसदर वृत्तपत्रातात प्रसिध्द करावा आणि कारखाना कार्यस्थळावर लावण्यात यावा, अशी ही मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सचिन नलावडे, विश्वास जाधव, अधिक सावंत, अमोल करांडे, भागवत भोसले, विशाल पुस्तके, सचिन पाटील, हेमंत पाटील, योगेश झांबरे, काकासो सगरे, सुभाष नलवड़े, दत्ता काळे, अविनाश पवार, विकास पवार, भरत चव्हाण, विक्रम थोरात, उत्तम खबाले, नीलेश पवार उपस्थित होते.

लवकरच अनेक पक्षांत बॉम्बस्फोट, ‘मविआ’ला तर…; भाजपच्या नेत्याचे मोठे विधान

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून शिंदे – फडणवीस सरकार पडण्याचे भाकीत केले जात आहेत. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मोठे विधान केले असून आगामी काळात सर्वच पक्षांमध्ये मोठे बॉम्बस्फोट घडणार आहेत. महाविकास आघाडीला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार मिळणं कठीण होईल, असे बावनकुळे यांनी म्हंटले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
काँग्रेसमढील नेते नाना पटोले सध्या अस्वस्थ आहेत. सरकार गेल्यामुळे त्यांची ही अवस्था आहे. लाचार, दुराचार, भ्रष्टाचार यासाठी हे तीन लोक एकत्र आले होते. मूळ विचाराचे काँग्रेसचे लोक आपल्याच चुकीमुळे नाराज आहेत.

या लोकांनी बेईमानी करून सरकार स्थापन केले. काँग्रेस उद्धवजींसोबत गेल्याने पक्षातील अनेक लोक नाराज आहेत. ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे उद्धव ठाकरे, युतीबद्दल ते टीका करत आहेत, असे बावनकुळे यांनी म्हंटले.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल. मात्र फडणवीस हे हुशार माणूस आहेत. त्यांनी सरकार पडेल म्हणून काँग्रेसचे 22 आमदार आधीच तयार करून ठेवले आहेत. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून त्यांनी हे केलं आहे, असं ते म्हणाले.

Maruti Suzuki Cars : Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या फायदा

Maruti Suzuki Cars

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी (Maruti Suzuki Cars) आपल्या काही ठराविक मॉडेल्सवर 57 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या मॉडेल्समध्ये Alto K10, Celerio, S Presso, Wagon R आणि DZire यांचा समावेश आहे. यावर एक्सचेंज बोनस, रोख सवलत आणि कॉर्पोरेट फायदे मिळू शकतात. चला आज आपण पाहूया कोणत्या गाडीवर नेमका किती डिस्कॉऊंट आहे याबाबत..

ALTO K10

Alto K10- (Maruti Suzuki Cars)

मारुती सुजूकीने काही दिवसांपूर्वीच लॉंच केलेल्या Alto K10 साठी 57,000 रुपयांची ऑफर आहेत. यामध्ये 35,000 रुपयांची रोख सूट, 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. तसेच Alto K10 च्या व्हेरिएन्टवर एकूण 22,000 रुपयांची ऑफर आहेत, ज्यामध्ये 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट लाभ आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.

Maruti Dzire

Maruti Dzire-

मारुती सुजूकी (Maruti Suzuki Cars) आपल्या डिझायरच्या AMT व्हेरिएन्ट वर 32,000 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे, ज्यामध्ये रु. 15,000 कॅशबॅक, रु. 7,000 कॉर्पोरेट फायदे आणि रु. 10,000 एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. त्याच वेळी, डिझायरच्या मॅन्युअल ट्रान्समिशन वेरिएंटवर 17,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Maruti Wagon R

Wagon R-

कंपनी ग्राहकांना Wagon R च्या ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरिएन्ट वर 41,000 रुपयांची सूट देत आहे, ज्यामध्ये रु. 20,000 कॅशबॅक, रु. 6,000 कॉर्पोरेट फायदे आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज (Maruti Suzuki Cars) बोनस मिळेल. Wagon R च्या मॅन्युअल व्हेरियंट LXi आणि VXi वर 31,000 रुपयांची सूट दिली जात आहे, तर त्याच्या AMT व्हेरिएंटवर 21,000 रुपये आणि CNG व्हेरिएंटवर 40,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

maruti celerio

 

Celerio –

मारुती सुझुकी Celerio च्या मिड-स्पेक VXi मॅन्युअल वेरिएंटवर 56,000 रुपयांची सूट देत आहे. ज्यामध्ये 6,000 रुपयांचे कॉर्पोरेट फायदे, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 35,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. याशिवाय कंपनी Celerio च्या LXi, ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरियंटवर 41,000 रुपयांची सूट देत आहे.

Maruti S- Presso

 

Maruti S-Presso-

मारुती सुझुकीच्या एस प्रेसो मॅन्युअल व्हेरिएंटवर जवळपास 56,000 रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यामध्ये रु. 35,000 कॅशबॅक, रु. 6,000 कॉर्पोरेट फायदे आणि रु. 15,000 एक्सचेंज बोनस समाविष्ट आहेत. तसेच कंपनी S Presso च्या AMT वेरिएंटवर 46,000 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय S Presso CNG व्हेरिएन्ट वर 35,000 रुपयांची सूट दिली जात आहे, ज्यामध्ये 20,000 रुपये कॅशबॅक आणि 15,000 रुपये एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे.

हे पण वाचा : 

Maruti Ertiga CNG : Maruti Suzuki च्या या CNG कारला ग्राहकांची मोठी मागणी; खास कारण काय?

Tata Blackbird SUV : Tata Motors लॉन्च करणार ब्लॅकबर्ड SUV; Hyundai Creta ला देणार थेट टक्कर

Tata Tiago EV : टाटा मोटर्सने लॉन्च केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; पहा किंमत आणि फीचर्स

जगातील पहिली Solar- Electric कार लॉन्च; 700 किमी रेंज

BYD ATTO 3 : BYD ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 521 किमी रेंज

काॅलेजच्या विद्यार्थ्यांने कृष्णा पूलावरून नदीत उडी घेतली, शोध सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड- काॅलेज मार्गावर असलेल्या कृष्णा पूलावरून एका कॉलेज विद्यार्थ्यांने नदी पात्रात उडी घेतली आहे. आत्महत्या करण्यासाठी उडी घेतलेला विद्यार्थी अद्याप आढळून आलेला नाही. या प्रकारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थींनी व पालकांच्यात खळबळ उडाली. अनेकांनी कृष्णा पूलावर धाव घेतली आहे. कृष्णा पूलाच्या खाली नदीपात्रात उडी घेललेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कराड पोलिसांनी पूलावर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

विद्यालयीन विद्यार्थ्याच्या अद्याप दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या नाहीत. परंतु महाविद्यालयीन विद्यार्थीचे काॅलेज 31 आॅक्टोंबरपासून सुरू झाले आहे. तसेच काही विद्यानगर परिसरातील कॉलेजेस, क्लासेस सुरू असलेने कृष्णा पुलावरून रोज शेकडो विद्यार्थी- विद्यार्थींनी चालत ये- जा करत असतात. आज दुपारी कॉलेज कडून कराडकडे येत असलेल्या विद्यार्थ्यांने कृष्णा पुलाच्या मध्यावरून नदीपत्रात उडी घेतली. त्यावेळी त्याच्या पाठीमागून येत असलेल्या दोघांनी हा प्रकार पाहिला. मात्र, ते त्या विद्यार्थ्याला वाचवू शकले नाहीत. विद्यार्थ्याने नदीपात्रात उडी घेतली. संबंधित विद्यार्थ्यांने नदीत उडी टाकल्यानंतर काही वेळाने तो अनेकांना दिसला, मात्र त्यानंतर दिशेनास झाला. ज्याठिकाणी उडी टाकली, त्या ठिकाणी पाणी कमी आहे. पुलावरून जाणाऱ्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

सध्या कृष्णा पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात असून त्या विद्यार्थ्यांचा नदीपात्रात शोध घेण्याचे काम सुरू आहे. कृष्णा पूलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. संबंधित विद्यार्थी कोणत्या कॉलेजचा, कोणत्या गावचा, त्याचे नांव काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र कॉलेजचा गणवेशातील विद्यार्थ्यांने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली.