Saturday, December 13, 2025
Home Blog Page 1884

Gujarat Election 2022 : काँग्रेसच्या 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Congress Sonia Gandhi Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून पक्षबळकट करण्यास व आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास हालचाली सुरु केली आहे. अशातच या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

काँग्रेस निवडणूक समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. या चर्चांनंतर काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पोरबंदरमधून अर्जुन मोधवाडिया आणि घाटलोडियामधून आणि याज्ञिक यांना संधी देण्यात आली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीची लढत सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष कॉग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात अत्यंत चुरशीची होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुन्हा सत्तेत येण्यासाठी आणि ‘आप’ने भाजपाचा पराभव करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र, भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावांची अद्यापपर्यंत घोषणा केलेली नाही. तर आम आदमी पक्षाने 100 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा व राज्याचा विकास : शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा | खेडी सुधारली, ग्रामीण भागाचा विकास झाला तरच जिल्हा आणि राज्याचा विकास होतो असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील शिंदेवाडी ते कुसरुंडी या राज्य अर्थसंकल्पीय तरतूदीतील रस्त्याचे आज भूमिपूजन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदू, निर्मला देसाई, माजी पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, प्रांताधिकारी सुनील गाडे, गट विकास अधिकारी श्री. शेलार, कार्यकारी अभियंता व्ही. शिंदे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी शिंदेवाडी, कुसरुंड, सुळेवाडी, पाटील वस्ती येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, परतीच्या पावसामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबल्याचे सांगून गावातील रस्ते, साकव, संरक्षण भिंती अशा विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. डोंगरात वसलेल्या गावांपर्यंत विकास पोहचत आहे. ग्रामीण जनतेपर्यंत रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या मूलभूत सोयी पुरवणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. येत्या तीन दिवसात 58 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. विकासाचे एक रोल मॉडेल म्हणून पाटण तालुक्याचा विकास करूया. त्यासाठी नागरिक माझ्यासोबत राहतील आणि साथ देतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

… तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक नेते मोठ मोठे गौप्यस्फोट करू लागले लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात शिंदे गटाचे नेते तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. “आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असती आणि भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.

गुलाबराव पाटील यांनीआज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केलाय. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती.

आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आणि आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून शिंदे सरकार कोसळणार असल्याची विधाने केली जात आहेत. मात्र, आमचं सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे 22 आमदार फुटणार? ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यातच आता काँग्रेसचेही 22 आमदार फुटणार असं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकदा राजकीय भूकंप होतो का ? अशा चर्चाना उधाण आलं आहे.

औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना खैरे यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल. मात्र फडणवीस हे हुशार माणूस आहेत. त्यांनी सरकार पडेल म्हणून काँग्रेसचे २२ आमदार आधीच तयार करून ठेवले आहेत. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून त्यांनी हे केलं आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान खैरे यांच्या या दाव्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याना विचारलं असता त्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. उलट ज्यांना आपला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी इतरांच्या पक्षावर बोलण्याचे कोणतेही कारण नाही, असा टोला नाना पटोले यांनी खैरे यांना लगावला आहे. खैरे यांच्या विधानामुळे आता काँग्रेस-शिवसेना यांच्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे.

 

“सरकार पडलं तर फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत”, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा!

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मात्र अजूनही हे सरकार स्थिर आहे. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येणाऱ्या निर्णयावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. जरी हे आमदार अपात्र ठरले, तरीदेखील शिंदे सरकार पडणार नाही याची तजवीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून ठेवली असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी संभाजीनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
“देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील.कारण मुख्यंमत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो. हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरू असतात”, असे चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.

“निवडणुका कधीही लागू शकतात”
तसेच राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे मोठे विधानदेखील त्यांनी यावेळी केले. “निवडणुका कधीही लागू शकतात. राष्ट्रपती राजवटही लागू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे हे राज्यपाल कसं काम करतात. आपले १२ लोक त्यांनी घेतले नाहीत. आपलं कोणतंच काम केलं नाही”, असे म्हणत त्यांनी सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

काँग्रेसचं खोचक प्रत्युत्तर
चंद्रकांत खैरेंनी हा दावा करताना अप्रत्यक्षपणे काँग्रेसलादेखील लक्ष्य केले. त्यांच्या या दाव्यावर काँग्रेसकडून खोचक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत खैरेंच्या या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “जे आपलाच पक्ष सत्तेत असून सांभाळू शकले नाहीत, तर दुसऱ्या पक्षाविषयी त्यांनी बोलायचं कारण नाही”, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती

खोजेवाडी येथे खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून नवीन वीज उपकेंद्र

MP Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली असून या उपकेंद्रामुळे खोजेवाडी परिसरातील वीजेची समस्या कमी होऊन विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात विकासकामा संदर्भात आग्रही असणारे खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून हे उपकेंद्र मंजूर झाले आहे. पुर्नोत्थान वितरण क्षेत्र योजनेत अतंर्गत खोजेवाडी येथे सुमारे 3 कोटी खर्चाचे 33/11 केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र मंजूर झाले आहे. त्यामुळे खोजेवाडी परिसरातील देशमुख नगर, नांदगाव, फत्त्यापूर मत्यापूर, अपशिंगे, बोरगाव, कामेरी, धोंडेवाडी आदी गावांसह अन्य गावातील वीज पुरवठा नियमित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या सिंगल फेज योजना बंद करून चोवीस तास थ्री फेज वीज पुरवठा गावठाण परिसरात देता येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना, घरगुती वीज व लघु उद्योगांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, खोजेवाडी येथील कामाची लवकरच सुरूवात होणार असून या उपकेंद्रामुळे खोजेवाडी आणि लगतचा ग्रामीण परीसर लोड शेडिंग मुक्त होणार आहे. सदर भागातील लोड शेडींगची समस्या सोडवण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. याबाबत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, बारामती परिमंडळचे मुख्य अभियंता सुनील पावडे, साताराचे अधीक्षक अभियंता
गौतम गायकवाड व उप कार्यकारी अभियंता प्रशांत वाघ यांचे सहकार्य मिळाले. अतित (ता. सातारा) येथेही उपकेंद्र करण्यासाठी प्रस्ताव दिला असून ते केंद्र देखील मंजूर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती खा.श्रीनिवास पाटील यांनी दिली.

नाशिकमध्ये ‘बर्निंग ट्रेन’ चा थरार!! उभी असलेली एक्सप्रेस पेटली, प्रवाशांची पळापळ

nashik burning train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर इंजिनला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शालिमार- हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला ही आग लागली आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियमंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे.

मुंबईकडे येणाऱ्या हावडा एक्सप्रेसच्या बोगीला नाशिक येथे असताना सकाळी 8.30 वाजता अचानक आग लागली. या आगीमुळे स्थानकावर धुराचे लोट पाहण्यास मिळत आहे. आग वाढतच गेल्याने प्रवाशांनी पटापट जीवमुठीत घेऊन रेल्वेतून उड्या मारल्या. आगीची माहिती होताच रेल्वेचे इंजिन डब्यांपासून वेगळे करण्यात आले. आग कशी लागली, याबाबत अजून स्पष्ट झाले नसून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या घटनेबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. ट्रेन 18030 शालीमार ते एलटीटी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पार्सल व्हॅनमध्ये (लगेज डब्बा. या बोगीमध्ये प्रवासी नाही) आग लागल्याने थांबत आहे. आग आता नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रवाशाला/कोणत्याही व्यक्तीला इजा होणार नाही. इंजिनच्या शेजारी असलेली लगेज कंपार्टमेंट/पार्सल व्हॅन ट्रेनमधून वेगळी करण्यात आली आहे आणि लवकरच ट्रेन पुन्हा सुरक्षितपणे सुरू होईल असं त्यांनी म्हंटल आहे.

अखेर 19 व्या दिवशी मृतदेह सापडला : वास्तुशास्त्र सल्लागाराचा सोन्याच्या दागिण्यासाठी खून

Nilesh Varaghde of Vastushastra Consultants

सातारा | दागिन्यांच्या मोहापोटी हत्या करण्यात आलेल्या वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधण्यास तब्बल 19 दिवसांनी रेस्क्यू टीमला यश आले आहे. निलेश वरघडे असे मयत वास्तुशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. मित्रानेच निलेशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत फेकला होता. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दिपक नरळे आणि त्याचा साथीदार रणजित जगदाळे यांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली होती.

पोलिसांनी आरोपींकडून या आधीच कार, दोन दुचाकी, सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण 19 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. निलेश वरघडे यची 16 ऑक्टोबरला हत्या झाली. पोलीस चौकशीत आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गवरील सारोळे येथील नीरा नदीपात्रात टाकल्याची माहिती पोलिसांना दिली होता. त्यानंतर नीरा नदीत मृतदेहचा शोध घेतला जात होता. 16 ऑक्टोबरला मित्र दिपक नरळे याने निलेश यांना पुण्यातील नऱ्हे येथे एका औषध दुकानात पूजेसाठी नेले होते. मात्र निलेश यांच्या अंगावरील दागिने पहिल्यानंतर दिपकने त्यांना लुटण्याचा डाव रचला. आरोपी दिपक आणि त्याचा साथीदार रणजित यांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. ते बेशुद्ध पडल्यानंतर गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गावरच्या नीरा नदीत टाकून दिला.

दरम्यान, निलेश हे घरी परत न आल्याने रुपाली रुपेश वरघडे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत आरोपी दिपक याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने हत्या केल्याची कबुली दिली. आरोपींनी हत्येची कबुली दिल्यानंतर गेल्या 18 दिवसांपासून निलेश यांच्या मृतदेहचा शोध स्थानिक रेस्क्यू टीममार्फत नीरा नदीत घेण्यात येत होता. अखेर 19 व्या दिवशी निलेश यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

मुकेश अंबानींची सलून व्यवसायात एन्ट्री; काय आहे प्लॅन?

Mukesh Ambani Saloon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल पंप, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन, नॅचरल गॅस यांनतर भारताचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आता सलून बिसिनेस मध्ये उतरणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स चेन्नईस्थित नॅचरल्स सलून अँड स्पामधील सुमारे 49 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. रिलायन्स रिटेल 49 टक्के भागभांडवल खरेदी करू शकते आणि संयुक्त उपक्रम तयार करू शकते.

नॅचरल्स सलून अँड स्पाचे भारतात सुमारे 700 आउटलेट आहेत आणि रिलायन्सला हे अजून ४-५ पट वाढवायचे आहे. सध्या ही चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. Groom India Salon & Spa ही कंपनी Natural Salon & Spa चालवते. कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या लॅक्मे ब्रँड आणि एनरिचसह प्रादेशिक ब्रँडशी स्पर्धा करते.

भारतात सलून आणि स्पा उद्योग सुमारे 20,000 कोटींचा आहे, आणि दशेतील जवळपास 65 लाख लोक सध्या या उद्योगाशी निगडीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात आणि त्यानंतर या सलून उद्योगावर देखील खूप परिणाम झाला होता. पण त्यानंतर हळूहळू या व्यवसायालाही गती मिळत असून भविष्यात सलून व्यवसायाचा मोठा विस्तार होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरेंची सिल्लोडमधील सभा रद्द; सभेऐवजी आदित्य ठाकरे यांनी घेतला ‘हा’ निर्णय

aaditya thackeray

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची सिल्लोडमधील सभा रद्द झाली आहे. आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी स्वतःच हि सभा रद्द केली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याने अब्दुल सत्तार यांच्यासाठी ही मोठी चपराक असणार आहे.

येत्या 7 नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची औरंगाबादच्या सिल्लोड येथे सभा होती. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच ही सभा होती. त्याच दिवशी आणि त्याचवेळी आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मैदानात शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा होती. त्यामुळे सिल्लोड नगर परिषदेने आदित्य ठाकरे यांना सभेची परवानगी नाकारली होती.

यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना इतर ठिकाणी सभा घेण्यास सांगण्यात आले. मात्र आदित्य यांनी इतर ठिकाणी सभा घेण्यास नकार देऊन हि सभाच रद्द केली. त्याऐवजी सभा न घेता आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरे दुष्काळाची पाहणी करणार आहेत.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती