Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 2681

बारावीच्या प्रश्नपत्रिकेत चूक; विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 गुण मिळणार

exams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली आहे. त्याच दरम्यान काल काल बारावीची परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये 1 गुणांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आला होता. त्या एका प्रश्नाचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्रजी पेपर मध्ये बोर्डाकडून चूक झालेल्या आणि विद्यार्थ्यांने सोडवलेल्या एका प्रश्नाचा 1 मार्क विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे

दरम्यान, राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रावर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेतली जात आहे. एका वर्गात 25 विद्यार्थी बसवत परीक्षा केंद्रांवर 12वीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परीक्षा 7 एप्रिल पर्यंत चालणार आहेत.

अमूलसोबत व्यवसाय करून दरमहा कमवा 5 लाख; त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

Amul

नवी दिल्ली । आज आपण अशा एका बिझनेस आयडियाबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याची सुरूवात करून पहिल्या दिवसापासून मोठी कमाई करता येऊ शकेल. अमूल या दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीसोबत व्यवसाय करण्याची यावेळी मोठी संधी आहे. वास्तविक, अमूल फ्रँचायझी देत ​​आहे. छोट्या गुंतवणुकीत दर महिन्याला नियमित कमाई करता येते. अमूलची फ्रेंचायझी घेणे हा एक फायदेशीर करार आहे. यामध्ये नुकसान होण्याची शक्यता कमीच आहे.

2 लाखांपासून सुरू करता येऊ शकतो व्यवसाय
अमूल कोणतीही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायझी देत ​​आहे. इतकेच नाही तर अमूलची फ्रँचायझी घेण्याचा खर्चही फारसा जास्त नाही. तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपये खर्च करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. याद्वारे व्यवसायाच्या सुरुवातीलाच चांगला नफा देखील मिळू शकतो. फ्रँचायझीच्या माध्यमातून दरमहा सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. मात्र ते आपल्या लोकेशनवर देखील अवलंबून असते.

फ्रँचायझी कशी मिळवायची ?
अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझी देत ​​आहे. एक अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रँचायझी आणि दुसरी अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी. जर तुम्हाला पहिल्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही दुसरी फ्रेंचायझी घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील.

इतके कमिशन मिळेल ?
अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमूल प्रॉडक्ट्सच्या मिनिमम सेलिंग प्राइसवर (MRP) कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पाऊचवर 2.5 टक्के, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी घेतल्यावर रेसिपीवर बेस्ड आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळते. त्याच वेळी, कंपनी प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रॉडक्ट्सवर 10 टक्के कमिशन देते.

इतकी जागा लागेल
तुम्ही अमूल आउटलेट घेतल्यास, तुमच्याकडे 150 चौरस फूट जागा असावी. त्याच वेळी, अमूल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी, किमान 300 चौरस फूट जागा असावी.

अर्ज कसा करायचा ?
जर तुम्हाला फ्रँचायझीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला [email protected] वर मेल करावा लागेल. याशिवाय http://amul.com/m/amul scooping parlors या लिंकवर जाऊनही माहिती घेता येईल.

डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध देण्यास नकार दिल्याने नशेखोरांनी केमिस्टचे दुकान फोडले

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये काही नशेखोरांनी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध देण्यास मेडिकल चालकाने नकार दिल्याने केमिस्टच्या दुकानाची तोडफोड केली आहे. कल्याणजवळ असलेल्या बनेली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोरेक्स औषध देण्यास केमिस्टने नकार दोघा तरुणांनी मेडिकलची तोडफोड केली. तोडफोड करतानाची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1500076753725063168

काय आहे प्रकरण?
घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास आरोपी तरुण बनेली परिसरात डॉ. आंबेडकर चौक येथील वेलकम मेडिकलमध्ये आले. त्या ठिकाणी त्यांनी मेडिकल चालकाकडे कोरेक्स औषध मागितले. मात्र मेडिकल चालकाने डॉक्टरच्या परवानगी शिवाय हे औषध देऊ शकत नाही, असे त्या आरोपी तरुणांना डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणण्यास सांगितले. या आरोपींनी मेडिकल चालकाला विनंती केली मात्र मेडिकल चालकाने औषध देण्यास नकार दिला.

यानंतर संतापलेल्या या दोन्ही नशेखोर आरोपी तरुणांनी मेडिकल चालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे आरोपी तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मेडिकलचा आणि दोन फ्रिज ढकलून देत तोडफोड केली. तसेच काऊण्टर वरील औषधे अस्ताव्यस्त फेकली. हि संपूर्ण घटना मेडिकलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

रवींद्र जडेजाला द्विशतकापासून कोणी रोखले? सचिनची आठवण काढत युझर्सनी द्रविड आणि रोहितला सुनावले

नवी दिल्ली । मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. यावेळी अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. जडेजाने 228 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने 228 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) स्टेडियमवर शनिवारी जडेजाने वर्चस्व गाजवले. रविचंद्रन अश्विनने 82 चेंडूत 62 धावांची खेळी केली तर शमी 20 धावा करून नाबाद राहिला. जडेजा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यामुळे तो कारकिर्दीतील आपले पहिले द्विशतक सहज झळकावेल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही.

जडेजा हळूहळू द्विशतकाकडे वाटचाल करत असताना कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित केला. यानंतर टी ब्रेकही घेण्यात आला. रोहितच्या डाव घोषित करण्याबाबत लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर चाहते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. जडेजाकडे द्विशतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती, मात्र प्रशिक्षक आणि कर्णधाराने ती पूर्ण होऊ दिली नाही, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

युझर्सना यावेळी 2004 चा दौरा आठवला आहे, जेव्हा टीम इंडिया द्रविडच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी मुलतान कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर 194 धावांवर फलंदाजी करत असताना द्रविडने डाव घोषित करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. द्रविड त्यावेळी कर्णधार होता आणि आता तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. युझरने लिहिले की, ‘रवींद्र जडेजाच्या जागी रोहित किंवा विराट कोहली असते तर असा डाव घोषित केला असता का???’ दुसऱ्या युझरने लिहिले, ‘मी राहुल द्रविडवर पूर्णपणे बहिष्कार टाकते, हे अन्यायकारक आहे. रवींद्र जडेजा द्विशतकाला पात्र होता.’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 400 बळी घेणारा जडेजा हा भारताचा दुसरा क्रिकेटर आहे. यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी भारतासाठी 356 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 9031 धावा निघाल्या. याशिवाय कपिलने 687 विकेट्स घेतल्या आहेत.

तोंडी परीक्षेहून परत येताना काळाने केला घात ! बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

nagpur crime

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येत असताना एका विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला आहे. या विद्यार्थ्याच्या बाईकला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक यामध्ये बाईकवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर हि दुर्दैवी घटना घडली आहे. दिशांत महादेव पटेल असे या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तसेच मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे विद्यार्थी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेले विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे होते.

नेमकं काय घडलं?
कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना ही घटना घडली आहे. या अपघातात बाईकवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकाचा मृत्यू, दोघे जखमी
या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव दिशांत महादेव पटेल असे आहे. तर मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे विद्यार्थी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हे सगळे विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

पुढील आठवड्यात शेअर बाजाराची वाटचाल कशी असेल ? तज्ञांकडून समजून घ्या

Share Market

मुंबई । युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनिश्चिततेचे वातावरण आहे. भारतीय शेअर बाजारातही सातत्याने घसरण सुरू आहे. 4 मार्च 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात प्रचंड अस्थिरता असताना इक्विटी मार्केट सलग चौथ्या आठवड्यात रेड मार्कमध्ये बंद झाले. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,524.71 अंकांनी म्हणजेच 2.72 टक्क्यांच्या घसरणीसह 54,333.81 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 413 अंकांनी म्हणजेच 2.47 टक्क्यांनी घसरून 16,245.4 च्या पातळीवर बंद झाला.

गेल्या आठवड्यातही भारतीय बाजारात FII ची विक्री सुरूच होती. FII ने 22,563.08 कोटी रुपयांची विक्री केली तर DII ने याच कालावधीत 16,742.75 कोटी रुपयांची खरेदी केली.

पुढील आठवड्यात बाजाराची वाटचाल कशी असेल ?
सॅमको सिक्युरिटीजच्या येशा शाह सांगतात की,”पूर्व युरोपमध्ये सुरू असलेल्या तणावाचा पुढील आठवड्यात बाजाराच्या दिशेवर सर्वाधिक परिणाम होईल. जर आपण मॅक्रो इकॉनॉमिक आघाडीवर नजर टाकली तर गुंतवणूकदारांच्या नजरा चीन आणि अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीवर असतील. युक्रेन आणि रशिया यांच्यातील भांडणामुळे कमोडिटी आणि कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे चलनवाढीचा डेटा यूएस फेडच्या पुढील चरणाचा अंदाज लावण्यास मदत करेल.”

देशांतर्गत बाजाराबाबत बोलायचे झाले तर बाजाराचे लक्ष पुढील आठवड्यात असणाऱ्या निवडणूक निकालांवर असेल. या निकालांचा गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम होईल. या घटनांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास बाजार एका वर्तुळात ट्रेड करताना दिसेल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून निवडक दर्जेदार शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जाईल.

निवडक स्टॉक्सवर पैसे लावा
रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा सांगतात की,” अल्पावधीत बाजार अडचणीत राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना सावधगिरीने ट्रेडिंग करण्याचा सल्ला दिला जाईल. बाजाराचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित बातम्यांवर असेल. याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. कच्च्या तेलाशी संबंधित क्षेत्र आधीच दबावाखाली आहेत. अशा परिस्थितीत धोका पत्करण्याची ही वेळ नाही, असे आम्हाला वाटते. केवळ निवडक स्टॉक्सवर पैसे लावा. मूलभूतपणे मजबूत असलेले आणि बाजार स्थिर झाल्यावर त्वरित रिकव्हरी करण्याची क्षमता असलेले स्टॉक पहा.

दबाव सुरू राहण्याची शक्यता आहे
कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणतात की,”ट्रेडर्ससाठी 16,350 -16,400 वर इन्स्टंट रेझिस्टन्स दिसून येतो. जर निफ्टीने हा रेझिस्टन्स मोडला, तर आपण त्यात 16,550- 16,700 ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, जोपर्यंत निफ्टी 16,350 च्या खाली राहील तोपर्यंत तो दबावाखाली राहण्याची शक्यता आहे. जर तो 16,350 च्या खाली घसरला तर ही कमजोरी त्याला 16,000-15,900 च्या दिशेने नेऊ शकते.

भारतीय दूतवासाने कोणतीही मदत केली नाही, याला सुटका म्हणतात का? विद्यार्थिनीचा संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत तर काही विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. एकीकडे सरकार कडून विद्यार्थ्यांच्या सुटकेवरून श्रेय घेण्याचे काम सुरू असतानाच दिव्यांशी सचान या विद्यार्थिनींने सरकार वर संताप व्यक्त केला आहे. आम्ही 15 किमी चालत गेलो. भारतीय दूतावासाने कोणतीही मदत केली नाही, याला सुटका म्हणतात का? असा थेट सवाल तिने केला आहे.

दिव्यांशी म्हणाली, आम्ही विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका केली असा सरकारचा दावा असेल तर तो पूर्णपणे खोटा आहे. पोलंडहून मोफत विमान प्रवास करून भारतात आणणं याला सुटका म्हणत नाही. भारत सरकारनं युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी आमची मदत केली असती तर त्याला सुटका म्हणता आलं असतं. देशातल्या लोकांना सत्य कळायला हवं, असं दिव्यांशी म्हणाली.

‘आम्ही खूप अस्वस्थ होतो, आम्ही आमची स्वतःची बस केली, पैसे दिले आणि स्वखर्चाने सीमेवर पोहोचलो. तिथे गेल्यावर कळलं की 12 ते 15 कि.मी. अजून चालावे लागणार . अन्न, पाणी, अंथरूणही आमचं आम्हीच घेतले होते . सरकारकडून आम्हाला काहीही दिले गेले नाही. सरकारने तर मागच्या वेळी सांगितले होते की, तुम्ही बाहेर गेलात तर त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. काही झाले तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. याची जबाबदारी सरकार घेत नाही.

वैयक्तिक खिशातून सुमारे तीन हजार रुपये दिले आणि सुमारे 50 कि.मी. पर्यंत चालावे लागले. उणे 10 ते 20 अंश तापमानात मी सीमेवर तीन दिवस आणि तीन रात्र खुल्या आकाशाखाली काढली, आमच्या मतदीला दूतवासातील कोणीही नव्हते असे तिने सांगितले

VIL साठी फंड रेझिंग प्लॅन वर काम सुरू; 3375 कोटी रुपये गुंतवण्याची व्होडाफोनची तयारी

Vodafone Idea

नवी दिल्ली । व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) या टेलिकॉम कंपनीला कर्जातून बाहेर काढण्यासाठी कंपनीचे प्रमोटर्स सतत प्रयत्न करत आहेत. कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता व्होडाफोन कंपनीचे प्रमोटर्स यामध्ये 3,375 कोटी रुपये गुंतवण्याचा विचार करत आहेत.

शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन व्यतिरिक्त, पार्टनर आदित्य बिर्ला ग्रुप देखील कर्जाने बुडलेल्या VIL मध्ये 1,125 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. टेलिकॉम कंपनी 14,500 कोटी रुपयांचा फायनान्स उभारण्याच्या प्रस्तावावर भागधारकांची मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय कंपनीचे अधिकृत भागभांडवल 75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्तावही असाधारण सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे.

फंड रेझिंग प्लॅन
VIL च्या बोर्डाने फायनान्स उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला यांच्याकडून 4,500 कोटी रुपये उभे करण्याव्यतिरिक्त, इक्विटी किंवा कर्जाच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये उभे करण्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात, व्होडाफोन ग्रुपने ब्लॉक डीलद्वारे इंडस टॉवर्समधील 2.4% हिस्सा विकून सुमारे 1,442 कोटी रुपये उभे केले. भारती एअरटेलने व्होडाफोन ग्रुपकडून इंडस टॉवर्समधील अतिरिक्त 4.7% स्टेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी या अटीवर करारावर स्वाक्षरी केली आहे की, व्होडाफोन ही रक्कम व्होडाफोन आयडिया (VI) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि नंतर इंडस टॉवर्सला पैसे देण्यासाठी वापरेल.

14,500 कोटी रुपयांचा फंड रेझिंग प्लॅन मंजूर
व्होडाफोन आयडियाच्या बोर्डाने गुरुवारी 14,500 कोटी रुपयांच्या फंड रेझिंग प्लॅनला मंजुरी दिली. इक्विटी आणि डेट इंस्ट्रुमेंट्सद्वारे 10,000 कोटी उभारले जातील. तर कंपनी आपल्या प्रमोटर्सना युरो पॅसिफिक सिक्युरिटीज लिमिटेड, प्राइम मेटल्स लिमिटेड आणि ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स यांना 20% प्रीमियमवर 13.30 रुपये दराने 3.39 अब्ज शेअर जारी करेल. यातून 4500 कोटी रुपये उभारले जाणार आहेत.

कर्जाच्या जाळ्यात कंपनी
Vodafone Idea ने Q3FY22 मध्ये 7,230.9 कोटींचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवला आहे, तर Q3FY21 मध्ये 4,532.1 कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. तिमाही महसुलात 3.3% ने सुधारणा होऊन रु. 9,720 कोटी झाला आहे. महसुलात सुधारणा होण्याचे कारण म्हणजे नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आलेली दरवाढ आहे.

Gold Price : सोन्याच्या किंमतीत मे 2021 पासूनची सर्वात मोठी वाढ

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग तणावात आहे. यामुळे कच्च्या तेलापासून ते महागाईपर्यंत अनेक नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. जगभरात अनेक वस्तूंच्या किंमतीतही मोठी वाढ होत आहे. MCX वर सोन्याच्या किंमतीत मे 2021 पासूनची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. आज MCX वर सोन्याची किंमत 52,549 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नजीकच्या काळात सोने 54,000 रुपयांची पातळी गाठू शकते, असे सर्व कमोडिटी तज्ज्ञांचे मत आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगच्या सुगंधा सचदेव म्हणतात की,” रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे बाजारात जोखीम वाढली आहे. ज्यामुळे लोकं सोन्यात मोठी गुंतवणूक करताना दिसत आहेत. सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाचे आवाहन आणखी वाढले आहे. वाढत्या भू-राजकीय तणावादरम्यान या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मे 2021 नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक वाढ दिसून आली.”

सोने आणखी वाढण्याची शक्यता आहे
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध गंभीर स्वरूप धारण करेल. त्याचप्रमाणे सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इतर वस्तू आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाईशी संबंधित चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे महागाईला तोंड देण्यासाठी लोकं हेजिंगपॉलिसी खाली सोने खरेदी करताना दिसतात.

रुपयाची वाईट स्थिती
IIFL सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणतात की,” स्पॉट मार्केटमध्ये 2022 मध्ये आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया 2.48 टक्क्यांनी घसरला आहे, तर 1 आठवड्यात 1.10 टक्क्यांनी घसरला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे भारतातून डॉलर्स काढून घेण्यास आणखी गती येईल, असा अंदाज आहे, त्यामुळे नजीकच्या काळात रुपया 77 च्या पातळीवर जाणार आहे.”

अनुज गुप्ता पुढे सांगतात की,”डॉलरच्या तुलनेत रुपयात 1 रुपयाचा बदल झाल्याने प्रति 10 ग्रॅम सोन्यामध्ये 250-300 रुपयांचा बदल होतो. अशा परिस्थितीत MCX वर सोन्याच्या किंमती वाढण्यामागे रुपयाचा कमकुवतपणा हे आणखी एक कारण असू शकते.”

अनुज गुप्ता पुढे म्हणतात की,” MCX सोने 53,800-54,000 च्या टार्गेटसह 51,500 – 51,800 च्या कॅटेगिरीमध्ये खरेदी केले जाऊ शकते. यासाठी, तुम्ही 51,000 रुपयांचा स्टॉप लॉस सेट केला पाहिजे.”

… तेव्हा नारायण राणेंचा राजीनामा भाजपने का घेतला नाही? पवारांचा थेट सवाल

Rane Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या अटकेचा दाखल देत भाजपवर निशाणा साधला आहे

शरद पवार म्हणाले, एखाद्या मुस्लिम कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांला अटक केली तर त्याचा संबध दाऊदशी जोडणे हे चुकीचे आहे. मलिक हे मुस्लीम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जातो. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण सिंधुदुर्गचे माझी सहकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही, असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात नारायण राणे यांना अटक केली तेव्हा त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याचा भाजपने निर्णय का घेतला नाही ? असाही सवाल शरद पवार यांनी केला. उद्या पंतप्रधान पुण्यात येत आहेत, ते खुलासा करतील. एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय लावण्याचा प्रकार आहे. नारायण राणेंना एक न्याय लावता, दुसरा नवाब मलिकांना दुसरा न्याय लावता, असाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया पवारांनी यावेळी दिली.