Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 2680

“पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह”; फेट्यावरून काँग्रेस नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे मेट्रोचे उदघाटन केले जाणार आहे. त्यासाठी मोदी पुणे येथे येणार आहेत. भाजपने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला असून या फेट्यावरून काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी टीका आक्षेप घेत टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. त्यामुळे राजमुद्रा असलेला फेटा घालण्यात येऊ नये, असे जोशी यांनी म्हंटले आहे.

पुणे येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर टीका केली. यावेळी जोशी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येत आहेत. त्यांना विशेष असा फेटा दिला घातला जाणार आहे. या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे.

राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु असून राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते, असे जोशी यांनी म्हंटले.

मोदींच्या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जागोजागी निदर्शने –

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केला आहे. डेक्कन आणि पुणे स्टेशन परिसरात काँग्रेसने मोदी गो बॅकचे बॅनर लावले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याविरोधात काँग्रेसने पुण्यातील अलका चौकात तर राष्ट्रवादीने पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेसकडून गो बॅक मोदीच्या घोषणा दिल्या जात आहेत.

रशिया – युक्रेन युद्धात पुतिन यांनी NATO ला दिला ‘हा’ इशारा; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान राष्ट्रपती पुतीन काहीही बोलले नव्हते. मात्र दहा दिवसांनी पुतीन यांनी यूरोपियन यूनियन आणि NATO ला इशारा दिला आहे. निर्बंध लावणे म्हणजे युद्धाची घोषणा केल्यासारखे आहे. यूक्रेनला होणारा शस्त्रास्त्र पुरवठा बंद करा, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्री तसेच पुतीन यांनी यूरोपियन यूनियन आणि NATO देशांना इशारा दिला. यावेळी त्यांनी इशारा देताना म्हंटले की, युरोपियन युनियन आणि नाटोने यूक्रेनला केला जाणारा शस्त्रास्त्र पुरवठा बंद करावा. पोर्टेबल अँटी एरियल स्टिंगर क्षेपणास्त्र दहशतवाद्यांच्या हाती पडू शकते याची मॉस्कोला विशेष काळजी आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना

युक्रेनमधील रशियन सैन्य सध्या हाय अलर्टवर आहे. त्यामुळे यापूर्वीही युक्रेनवर अनेकवेळा हल्लेही करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रशिया आणि युक्रेन या दोन देशांच्या मध्ये येणाऱ्यांना आता पुतीन यांच्याकडून इशारा दिला जात आहे.

पवारसाहेब, दाऊद आमचा कोणी दोस्त वगैरे नव्हता; राणेंचं प्रत्युत्तर

rane pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर नारायण राणे यांनी देखील पवारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पवारसाहेब, आमचा कोणी दाऊद दोस्त वगैरे नव्हता, अस म्हणत हीच तर तुमची पुण्याई अस म्हणत थेट पवारांवरच हल्लाबोल केला. ते मालवण पोलीस स्टेशन बाहेर पत्रकारांशी संवाद साधत होते.

नारायण राणे म्हणाले, वा… पवार साहेब, काय बोलावं की कीव करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही. आमचा कोणी दाऊद दोस्त नाही आमचा कधी संबंध आला नाही. तो देशद्रोही आहे आमचे हजारो लोक बॉम्बस्फोटात मारले आहेत. त्या दाऊदशी नवाब मलिकचे संबंध आहेत म्हणून त्याला अटक झाली, म्हणून आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत. तुम्ही आमचे राजीनामे मागताय, हेच तर केलं आयुष्यभर हीच तर तुमची पुण्याई आहे.

यावेळी त्यांनी सुशांत सिंह आणि दिशा सालीयन मृत्यू प्रकरणी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सुशांतच्या हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दोन वेळा फोन केला अन् ते म्हणाले की आपण सुशांत आणि दिशाच्या याप्रकरणी तुम्ही काहीही बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती अस बोलू नका. तुम्हालाही मुले आहेत. मात्र पोलिसांनी माझ्या स्टेटमेंट मधून हे वगळले आहे असे राणेंनी म्हंटल.

सुशांतच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला अन्….; राणेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

rane thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांत सिंह राजपूतचे जेव्हा निधन झाले तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून तुम्ही याविषयी काही बोलू नका अशी विनंती केली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांना मालवण पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नारायण राणे म्हणाले, सुशांतच्या हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दोन वेळा फोन केला अन् ते म्हणाले की आपण सुशांत आणि दिशाच्या याप्रकरणी तुम्ही काहीही बोलू नका. एका मंत्र्याची गाडी होती अस बोलू नका. तुम्हालाही मुले आहेत. मात्र पोलिसांनी माझ्या स्टेटमेंट मधून हे वगळले आहे असे राणेंनी म्हंटल.

दरम्यान, मी आणि नितेश काय बोललो, तिची आत्महत्या नाही हत्या आहे, हे आम्ही वारंवार बोलत होतो. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना तक्रार करायला भाग पाडलं. आमची बदनामी होतेय. अशी तक्रार केली. खोटी तक्रार केली. मात्र आम्ही अन्यायाविरुद्ध लढत राहणार. आम्ही आवाज उठवणार. दिशा सॅलियची केस क्लोज केली जातीय. ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांना संरक्षण दिले जातंय असा आरोप नारायण राणे यांनी केला.

रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीसोबत केले ‘हे’ दुष्कृत्य, मागच्या 6 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

Rape

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 35 वर्षीय रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. मागच्या सहा महिन्यांपासून नराधम आरोपी पीडित मुलीसोबत हे धक्कादायक कृत्य करत होता. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

या आरोपी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल होताच विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दीपक हिवाळे असे या आरोपी नराधमाचे नाव आहे. तो रिक्षाचालक आहे. आरोपी हिवाळे याने काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीसोबत आपली ओळख वाढवली होती. यानंतर या नराधम आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हा सगळा प्रकार मागच्या सहा महिन्यांपासून सुरु होता. या सगळ्या प्रकारची माहिती पीडित मुलीच्या आईवडिलांना समजताच त्यांनी तातडीने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

संतापजनक! पुण्यात शॉर्ट कपडे घातल्यामुळे तरुणींना मारहाण, 6 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपींनी शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण केली आहे. या मारहाणीप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात पोलिसांनी मारहाणीसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षक नगर परिसरामध्ये घडला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार या पीडित तरुणी खराडी येथील रक्षक नगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहतात. त्या वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. या तरुणी राहत्या परिसरात शॉर्ट कपडे घालून फिरतात, या कारणातून आरोपींनी त्यांना चप्पलनं मारहाण केली आहे. या आरोपींविरोधात घरमालकीणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घर पाडण्याची दिली धमकी
‘संबंधित आरोपी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करतात. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या कपड्यांवरून वाद उकरून काढला आहे. बुधवारी रात्री काही आरोपी त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणी शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात, असा आरोप करून भांडणाला सुरुवात केली असे फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. हा वाद मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोपींनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींना चप्पलने मारहाण केली आहे. यानंतर घर मालकिणीने चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 448, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

झोमॅटो वरुन जेवण मागवताय; तर…

औरंगाबाबाद – शहरात फुड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या कामगारांनी तीन दिवसांचा बंद पुकारला आहे. 4 मार्च ते 6 मार्च हे तीन दिवस कामगारांनी फुड डिलिव्हरी न देण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटो कंपनीद्वारे कामगारांची पिळवणूक होत असून त्यांच्या मेहनतीनुसार मोबदला मिळत नाही, अशी तक्रार कामगारांची आहे. जोपर्यंत कंपनी योग्य मोबदला देण्याचे कबूल करत नाही, तोपर्यंत सेवा पुरवणार नसल्याचं कामगारांनी सांगितलं आहे. औरंगाबाद शहरातील साडेतीनशे कामगारांनी यासंदर्भाने खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. कंपनी कामगारांना कशाप्रकारे वागणूक देत आहे, याची तक्रार केली. खासदार जलील यांनी कामगारांना याबाबतीत आपण कंपनीकडे लिखित स्वरुपात व्यवहार करू, असे आश्वासन दिले.

औरंगाबाद फुड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या कामगारांना त्यांच्या मेहनतीनुसार, रोजगार दिला जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. शहरात 15 ते 20 किलोमीटर अंतरावर जाऊन फूड डिलिव्हरी करायची असते. अशा एका डिलिव्हरी मागे केवळ 20 रुपये दिले जातात, त्यातही पेट्रोलसाठी पैसे लागतात. हॉटेलमध्ये बराच वेळ थांबावे लागते, त्याचेही वेगळे पैसे मिळत नाहीत. म्हणजे पाचशे रुपये रोजगार मिळत असेल तर त्यातील तीनशे रुपये पेट्रोलसाठी खर्च होतात, अशी तक्रार झोमॅटोच्या कामगारांनी केली आहे.

औरंगाबादमधील कामगारांनी पुकारलेल्या या संपामुळे शहरातील झोमॅटोच्या सुविधेत अडथळा निर्माण होऊन कंपनीच्या या काळातील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कामगारांनी या प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याची विनंती केली. कारण कंपनीचे कोणतेही अधिकृत कार्यालय औरंगाबाद किंवा परिसरात नाही. त्यानंतर कामगारांचे नियुक्ती पत्र, नियुक्ती वेळेच्या अटी आदी कागदपत्रांसह लेखी निवेदन द्या, त्यानंतर आपण झोमॅटो व्यवस्थापनाकडे आपलं गाऱ्हाणं मांडू, असं आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. मात्र तोपर्यंत झोमॅटोची सेवा शहरातील विस्कळीत होऊ शकते.

धक्कादायक ! ओढ्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलांचा ओढ्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेखा हिरामण गायकवाड, रेणुका अंकुश जाधव, अजय बाळू जाधव अशी या मृत मुलांची नावे आहेत. ऊसतोड कामगार ऊसतोडीच्या कामासाठी गेले असताना दोघी मुली‌ आणि एक मुलगा असे तिघेही आष्टी येथील ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. यादरम्यान या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू ‌झाला‌. हि दुर्दैवी घटना काल दुपारी घडली.

काय घडले नेमके ?
घटनेच्या दिवशी ऊसतोड कामगार ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते. यावेळी दोघी मुली‌ आणि एक मुलगा असे तिघेही आष्टी येथील ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. यादरम्यान या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली.

तिघांचा मृत्यू
ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी घडली आहे. सुरेखा हिरामण गायकवाड, रेणुका अंकुश जाधव, अजय बाळू जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत.

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जात असताना बाईक अपघातात बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

dhule crime

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी जाताना बाईक अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील भडणे फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे. यामध्ये वडील आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन आपल्या नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी जात होते. यादरम्यान अज्ञात वाहनासोबत त्यांच्या बाईकची धडक झाली. यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या लहान मुलाने उपचारादरम्यान प्राण सोडले.

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना अपघात
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण या गावातील विनोद राजपूत हे सुरत येथे कामानिमित्त वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वीच नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी सुरत येथून मुलगा कृष्णासोबत आपल्या गावी आले होते.

पित्याचा जागीच मृत्यू, तर मुलाचा उपचारादरम्यान
घटनेच्या दिवशी विनोद राजपूत हे आपल्या मुलासोबत नातेवाईकाच्या साखरपुड्याला जात असताना त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला. यात विनोद राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलगा कृष्णाला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच या मुलाने आपला दम तोडला.

डंपर चालकाला अटक
हा अपघात इतका भीषण होता की विनोद राजपूत यांचे मुंडके आणि धड वेगवेगळे झाले. या घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी राजपूत यांच्या बाईकला धडक देणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाला ताब्यात घेतले. शिंदखेडा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

कराडला 23 एप्रिल ते 3 मे शिव महोत्सवाचे आयोजन : विनायक पावसकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरात हिंदू एकता समितीच्यावतीने 23 एप्रिल ते 3 मे या दरम्यान शिव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शिवजयंती साजरी करता आली नाही. मात्र, चालू वर्षी विविध कार्यक्रम, उपक्रम व स्पर्धा राबविण्यात येणार असून शिव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे जेष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर यांनी सांगितले.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चंद्रकांत जिरंगे, राहूल यादव, गणेश पाटील- सुपनेकर यांच्यासह हिंदू एकता समितीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यावेळी शिव महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच राज्यस्तरीय चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धा राबविणार असल्याचे सांगण्यात आले. स्त्रियांच्यासाठी मेळावा व बाईक रॅली काढण्यात येईल. आर्किटेक्चर यांच्या डिझाईनच्या स्पर्धा राबविण्यात येणार आहेत.

विनायक पावसकर म्हणाले, छ. शिवाजी महाराज यांचा इतिहास मोठा आहे. हिंदू एकता समिती ही कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. शिव महोत्सावत अनेक ऐतिहासिक गोष्टीचा सहभाग असणार आहे. चित्ररथ हे सामाजिक व ऐतिहासिक संदेश देणार असणार आहेत. चित्ररथ स्पर्धेत पहिले ठराविक नंबर येणाऱ्या रथासोबत सहभागी चित्ररथांनाही प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात येणार आहेत. तेव्हा शिवप्रेमींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.