Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 2682

साताऱ्यात मोबाईलचा हप्ता न भरल्याने तिघांवर चाकू हल्ला

Crime

सातारा | स्वत:च्या नावावर हप्त्याने मोबाईल घेऊन देत त्या मोबाईलचे हप्ते न भरल्याचा राग मनात धरुन वाद झाला. या वादातून तिघांवर चाकूने वार करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सोमवार पेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी अनिकेत विश्वास साळुंखे (वय -25, रा. शाहूनगर) याने तक्रार दिली आहे. यानंंतर विराज विनोद साळुंखे (वय- 22, रा. रामाचा गोट, सातारा), जय गायकवाड (पूर्ण नाव समजू शकले नाही) या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगरमध्ये राहत असलेला अनिकेत विश्वास साळुंखे याला विराज विनोद साळुंखे याने स्वत:च्या नावावर कर्ज करुन मोबाईल घेऊन दिला होता. या मोबाईलचे हप्ते अनिकेत भरणार होता. परंतु त्याने हफ्ते न भरल्याने फायनान्स कंपनीकडून विराजला वारंवार हप्ते भरण्यास सांगण्यात येत होते. यामुळे विराज याने अनिकेतला साडेदहा वाजण्याच्या सुमारास फुटका तलाव येथे बोलावून हप्ते भरण्यास सांगितले.

यावेळी जय गायकवाड हाही सोबत होता. यावेळी दोघांच्यात शाब्दिक वादावादी होऊन हाणामारी झाली. यामधील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर दोघांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी सहायक फौजदार भिसे हे तपास करीत आहेत.

‘या’ पाच बँका बचतीवर देतात 7% व्याज; जाणून घ्या तुम्हाला कुठे जास्त व्याज मिळेल

Bank FD

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे महामारी किंवा संकट यासारख्या अनिश्चित काळात आपत्कालीन परिस्थितीसाठी सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्या बचतीचा काही भाग ठेवावा. सेव्हिंग अकाउंटमधील डिपॉझिट्समधून तुम्हाला व्याज उत्पन्न देखील मिळेल. BankBazaar ने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, घसरलेल्या व्याजदरांदरम्यान, स्मॉल फायनान्स बँका जास्त व्याजदर देतात. आज आपण येथे स्मॉल फायनान्स बँक आणि खाजगी बँक बचत खात्यांवरील सर्वोत्तम व्याजदरांची लिस्ट देत आहोत.

AU Small Finance Bank बचत खात्यांवर 7% व्याजदर देत आहे. ऍव्हरेज मंथली बॅलन्स आवश्यकता रुपये 2,000 ते 5,000 आहे.

Ujjivan Small Finance Bank बचत खात्यांवर 7% व्याजदर देत आहे.

Equitas Small Finance Bank बचत खात्यांवर 7% पर्यंत व्याज दर देत आहे. ऍव्हरेज मंथली बॅलन्स आवश्यकता रुपये 2,500 ते रुपये 10,000 आहे.

DCB Bank बचत खात्यांवर 6.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर देते. खाजगी बँकांपैकी ही बँक सर्वोत्तम व्याजदर देते. मिनिमम बॅलन्सची रक्कम 2,500 रुपये ते 5,000 रुपये आहे.

RBL Bank बचत खात्यांवर 6.25 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. मिनिमम बॅलन्सची रक्कम 2,500 रुपये ते 5,000 रुपये आहे.

BankBazaar ने 16 फेब्रुवारी 2022 पर्यंतचा डेटा गोळा केला आहे. ज्या बँकांच्या वेबसाइट्स डेटाची जाहिरात करत नाहीत त्यांचा विचार केला जात नाही. रेग्युलर सेव्हिंग अकाउंट आणि बेसिक सेव्हिंग अकाउंट डिपॉझिट्स (BSBD) खाते वगळता मिनिमम बॅलन्स आवश्यकतेचा विचार केला जातो.

या राज्यपालांवर न बोललेलंच बरं; शरद पवारांचा खोचक टोला

pawar koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. महाराष्ट्राला कर्तृत्ववान राज्यपालांचा वारसा आहे, त्यामुळे या राज्यपालांवर न बोललेलंच बर असा टोला शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार म्हणाले, हे राज्यपाल आल्यानंतर अनेक प्रकार घडले. महाराष्ट्रात यापूर्वी सी प्रकाश हे राज्यपाल होते. त्यावेळी मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. राज्याचे राज्यपाल सी प्रकाश यांचं त्यावेळी देशात आणि देशाबाहेर नावलौकिक होता. त्यांना मी राज्यपाल म्हणून पाहिलं आहे. त्याचबरोबर या राज्यात पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखा कर्तुत्ववान राज्यपाल मी स्वतः पाहिला आहे. अशा राज्यपालांमध्ये हल्लीच्या राज्यपालांचं नाव ऐकायला मिळतं यावर भाष्य न केलेलं बर.

यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या कारवाई वरूनही भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. लिक यांच्यावरील कारवाई ही राजकीय हेतूनेच केली आहे. असा आरोप पवारांनी केला. तसेच यापूर्वी नारायण राणेंना देखील अटक झाली होती, त्यावेळी त्यांचा राजीनामा का घेतला नाही? उद्या पंतप्रधान पुण्यात याबाबत खुलासा करतील अस म्हणत नारायण राणे आणि नवाब मलिकांनी वेगळा न्याय का? असा सवाल पवारांनी भाजपला केला आहे.

LIC IPO बाबत DIPAM सचिवांनी केलं हे महत्वाचे विधान, म्हणाले की…

LIC IPO Date

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेता, सरकार गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC IPO) IPO बाबत कोणताही निर्णय घेईल. डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (DIPAM) चे सचिव तुहिन कांत पांडे, यांनी शुक्रवारी सांगितले की,”सरकारला चालू आर्थिक वर्षातच LIC चा IPO आणायचा आहे, मात्र सध्याची परिस्थिती बरीच गतिमान झाली आहे.
सरकार मार्च 2022 मध्येच ते आणण्याची तयारी करत होते, मात्र युक्रेन संकटामुळे शेअर बाजारातील गोंधळ पाहता त्यावर आता पुनर्विचार होताना दिसत आहे.”

60,000 कोटींहून जास्तीचा फंड उभारण्याची अपेक्षा आहे
LIC मधील 5 टक्के शेअर्सच्या निर्गुंतवणुकीतून सरकार 60,000 कोटी रुपयांहून जास्त पैसे उभारण्याची अपेक्षा करत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 78,000 कोटी रुपये उभारण्याचे त्याचे लक्ष्य आहे, ज्यापासून ते खूप मागे आहे.

DIPAM सचिव काय म्हणाले ?
‘स्पर्धा कायद्याचे अर्थशास्त्र, 2022’ या विषयावर आयोजित परिसंवादात पांडे म्हणाले, “यावेळी काही अनपेक्षित घटना घडत आहेत. आम्ही बाजारावर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि सरकार जी काही पावले उचलेल ती गुंतवणूकदार आणि IPO च्या हितासाठी असेल. सरकारला चालू आर्थिक वर्षातच हा IPO आणायचा आहे, मात्र या संकटाच्या आगमनाने परिस्थिती खूपच बदलू लागली आहे. अशा परिस्थितीत सतर्क राहून त्यानुसार रणनीती बनवण्याची गरज आहे.”

याबाबत सरकार व्यावसायिक सल्लागारांचा सल्ला घेत असून गुंतवणूकदार आणि भागधारकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे पांडे यांनी सांगितले. DIPAM चे सचिव म्हणाले की,”LIC ही केवळ धोरणात्मक गुंतवणूक नसून एक अतिशय महत्त्वाची घटना आहे. LIC ही खूप जुनी संस्था असल्याने तिची सार्वजनिक मालकीही खूप विस्तृत आहे.”

Cryptocurrency Prices : बिटकॉइन, इथरसह अनेककरन्सीमध्ये मोठी घसरण; क्रिप्टो मार्केटची स्थिती जाणून घ्या

Cryptocurrency

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटामुळे जागतिक बाजारपेठेची स्थिती बिकट झाली आहे. शेअर बाजार मोठ्या चढ-उतारातून जात आहे. क्रिप्टो मार्केटचीही हीच स्थिती आहे. गेल्या 24 तासांत, क्रिप्टोकरन्सी मार्केटची मार्केटकॅप 4.49 टक्क्यांहून अधिकने घसरून $1.75 ट्रिलियन इतकी झाली आहे. त्याच कालावधीत, त्याच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये देखील 3.43 टक्क्यांनी घट झाली आहे आणि ती $ 83.23 अब्ज झाली आहे.

डिसेंट्रलाइज्ड फायनान्स (DeFi) गेल्या 24 तासांत $14.08 अब्ज होते, जे गेल्या 24 तासांतील क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या सुमारे 16.92 टक्के आहे. याच कालावधीत stablecoins मधील टोटल व्हॉल्यूम $69.85 अब्ज होता, जो गेल्या 24 तासात क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या सुमारे 83.92 टक्के आहे.

बिटकॉइन 40 हजार डॉलर्सच्या खाली
गेल्या 24 तासांत बिटकॉइनच्या मार्केट शेअरमध्ये 0.57 टक्क्यांची घसरण झाली असून तो 42.44 टक्क्यांवर दिसत आहे. 5 मार्च रोजी सकाळी बिटकॉइन $ 39,047.24 वर दिसले.

Cardano
जर आपण रुपयावर नजर टाकली तर, गेल्या 24 तासात 4.43 टक्क्यांच्या घसरणीसह, बिटकॉइन 31,20,419 वर दिसला, तर इथेरियम 2.6 टक्क्यांनी घसरून 2,09,584.5 वर दिसत आहे. त्याच कालावधीसाठी, Cardano 2.98 टक्क्यांनी घसरून 66.86 रुपयांवर आणि Avalanche 2.01 टक्क्यांनी घसरून 6,003.3 रुपयांवर दिसत आहे.

दुसरीकडे, Polkadot 3.65 टक्क्यांनी घसरून 1,319.01 रुपयांवर आणि Litecoin 4.3 टक्क्यांनी घसरून 8,058 रुपयांवर आहे. दुसरीकडे, Tether 0.86 टक्क्यांच्या वाढीसह 79.52 रुपयांवर दिसत आहे.

Dogecoin
दरम्यान, Memecoin SHIB 1.96 टक्क्यांनी घसरत आहे, तर Dogecoin 1.27 टक्क्यांनी 9.79 रुपयांवर आणि Terra (LUNA) 10.78 टक्क्यांनी घसरत 6,549.03 रुपयांवर आला आहे.

क्रिप्टोमार्केटशी संबंधित इतर बातम्या पाहिल्यास, फायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, स्विस फेडरल सरकार रशियन नागरिक आणि व्यावसायिकांची क्रिप्टो ऍसेट्स freeze करण्याची तयारी करत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मुद्दा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतीला दहा तास वीज देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे आठ ठिकाणी चक्काजाम आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

शेतीसाठी दहा तास दिवसा वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील आठ ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन केले. विटा, इस्लामपूर, पलूस, कडेगाव, शिराळा, सांगली लक्ष्मी फाटा, भोसे फाटा, कवठेमहांकाळ या ठिकाणी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन झाले. माजी खासदार राजू शेट्टी यांचे कोल्हापूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर हे आंदोलन झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

“शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील महावितरणची सर्व कार्यालये पेटवून देऊ,” असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. दिवसा सलग दहा तास वीज द्या, वीज तोडणी मोहीम थांबवा, वाढीव वीज दरवाढ रद्द करा, मागेल त्याला वीज कनेक्शन द्या, बंद पडलेले ट्रान्सफॉर्मर तत्काळ सुरू करा आदिंसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन झाले. स्वाभिमानीने आपला बझार जवळ शिराळा-कोकरूड मुख्य रस्तावर रस्ता रोको आंदोलन केले.

स्वाभिमानीने पलूस येथील मुख्य, जुन्या बसस्थानक चौकात तासगाव-कराड रस्त्यावर सकाळी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वीज महावितरण कंपनीच्या आनागोंधी कारभारा विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पेठ- सांगली रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले. संघटनेचे राज्य प्रवक्ते एस. यु. संदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. दिग्विजय पाटील, शकिर ताबोळी, आप्पासाहेब पाटील यांची भाषणे झाली. जगन्नाथ भोसले, तानाजी साठे, प्रभाकर पाटील उपस्थित होते.

प्रकाश कामगार युनियनच्या आत्मक्लेश आंदोलनाला सर्वपक्षीय पाठींबा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

प्रकाश शिक्षण कामगार युनियनने प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर मधील कोरोना योध्दावर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दबावाला बळी पडुन दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. यासाठी शहरातील आष्टा नाका परीसरातील लोकनेते राजारामबापु पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना, रासप, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांनी पाठींबा दर्शवत पोलिस व आरोग्य अधिकार्‍यांच्या बेकायदेशीर कारभाराचा पंचनामा केला.

सर्व पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री जयंत पाटील, पोलिस व आरोग्य अधिकारी यांच्या हुकुमशाहीचा व बेकायदेशीर कारवाई बाबत निषेध नोंदविला. प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर मधील डॉक्टर व सहकारी स्टाफवर राजकीय व्देषातुन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हुकुमशाहीला बळी पडुन पोलिस व आरोग्य अधिकारी चौकशीचा फार्स करुन खोटे गुन्हे दाखल करीत आहे.

तक्रार दाखल करणारे जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. हे खोटे गुन्हे मागे घ्यावेत व कोरोना योध्दांना न्याय द्यावा या मागणीसाठी प्रकाश कामगार युनियनच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन केले. प्रकाश शिक्षण कामगारांनी लोकनेते राजारामबापु पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी आम्ही कोरोना योध्दा, आम्हाला न्याय द्या, राजकीय हुकुमशाहीचा धिक्कार असो, पोलिस व आरोग्य प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन अन्यायी कारवाई विरोधात आक्रोश केला.

युक्रेनमध्ये अडकलेले ‘या’ जिल्ह्यातील 16 विद्यार्थी परतले, आणखी चार विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरु

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्हयातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या 20 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी सुखरुप घरी परतले. अद्याप चार विद्यार्थी अडकले असून त्यांना आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत, त्यांना हंगेरी, रोमालियामार्गे भारतात आणले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थी घरी सुखरुप परतल्यानंतर पालकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. विद्यार्थ्यांचे युद्धामुळे आलेल्या कटू आठवणी सांगताना अश्रूंचा बांध फुटल्याचे चित्र होते.

जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जात आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. रशियाकडून युक्रेनमधील महत्वाच्या शहरांवर हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीत प्रचंड तणावाचे वातावरण असताना शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी तिथे अडकले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील वीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर त्याची सर्व माहिती जिल्हा नियंत्रण विभागामार्फत सरकारकडे पाठविण्यात आली होती. युक्रेनमध्ये अडकलेल्या वीस विद्यार्थ्यांपैकी सोळा विद्यार्थी परतले आहेत.

तुंग येथील अभिषेक प्रकाश पाटील, कसबेडिग्रज येथील प्रथमेश सुनिल हंकारे, सांगलीतील तोहिद बशी मुल्ला, दिघंचीतील विठ्ठल सुभाष मोरे, दिघंचीतील स्नेहल नवनाथ सावंत, दिघंचीतील संध्याराणी रामचंद्र मोरे, आटपाडीतील कोमल तानाजी लवटे, जत मधील यश मनोज पाटील, साक्षी महावीर शेटे, श्रद्धा महावीर शेटे दोघी वाटेगाव, राहुल संजीव माने गुंडेवाडी, सौरभ विजय इसापुरे मिरज, योगिनी विघ्नेश देशपांडे मिरज, वैष्णवी गणपतराव शिंदे तिप्पेहळ्ळी, यशराज पराग पवार जत हे सोळा विद्यार्थी घरी परतले आहेत. विद्यार्थी घरी सुखरुप परतल्यानंतर पालकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. विद्यार्थ्यांनी तेथील युद्धामुळे आलेल्या कटून आठवणींना वाट करुन दिली.

शेअर बाजार हादरला!! गेल्या 12 ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 4000 अंकांनी घसरला

मुंबई । रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारांची अवस्था बिकट झाली आहे. भारतीय शेअर बाजारही सातत्याने खाली येत आहेत. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स निफ्टीही मोठ्या घसरणीसह बंद झाला. काल शुक्रवारी सेन्सेक्स 768.87 अंकांच्या किंवा 1.40 टक्क्यांच्या घसरणीसह 54,333.81 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 252.60 अंकांनी म्हणजेच 1.53 टक्क्यांनी घसरून 16,245.40 वर बंद झाला. अवघ्या एका दिवसात भारतीय गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींहून जास्त रुपये बुडाले.

शुक्रवारी सेन्सेक्स 54,333 अंकांवर बंद झाला. 23 फेब्रुवारी रोजी तो 57232 अंकांवर बंद झाला. हल्ल्याच्या वृत्तामुळे 24 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजार 2700 अंकांनी घसरला होता. मात्र, त्यानंतरच्या हंगामात ते बऱ्यापैकी सावरण्यात यशस्वी झाले. 15 फेब्रुवारीपासून भारतीय गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. 15 फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला करण्याची तयारी सुरू केली. नंतर त्यांनी मोठ्या हल्ल्यासाठी सीमेवरून आपले काही सैन्य मागे घेण्याची घोषणा केली.

हल्ल्यानंतरचे 10 दिवस
रशियाने 24 फेब्रुवारीला (भारतीय वेळेनुसार) सकाळी युक्रेनवर हल्ला केला. हल्ल्याचा आज 9वा दिवस आहे. 24 फेब्रुवारीपासून सेन्सेक्स सुमारे 3000 अंकांनी घसरला आहे. या दरम्यान निफ्टी 818 अंकांनी घसरला आहे. 15 फेब्रुवारीपासून सेन्सेक्स जवळपास 4,000 अंकांनी घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे 197 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पहिले युक्रेनमधील लुहान्स्क आणि डोनेत्स्क या दोन प्रदेशांना स्वतंत्र प्रांत म्हणून घोषित केले. त्यानंतर 23 फेब्रुवारीला त्यांनी आणीबाणी जाहीर केली. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला झाला. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे शुक्रवारी सकाळी युक्रेनच्या सर्वात मोठ्या अणुभट्टीला आग लागल्याचे वृत्त आले आहे. मात्र, ही आग विझवण्यात आली.

संकट लवकर संपण्याची शक्यता कमी आहे
बाजारावरील दबाव कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचे कारण युक्रेनचे संकट अद्याप संपण्याची आशा नाही. चर्चेच्या तीन फेऱ्या होऊनही कोणताही निकाल लागलेला नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या वृत्तीत कठोर निर्बंधानंतरही बदल झालेला नाही. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे. त्यांनी एकाच वेळी जास्त गुंतवणूक करणे टाळावे.