Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2709

भारतीयांनो, आजच्या आज कीव शहर सोडा; दूतवासाचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सलग सहाव्या दिवशीही सुरूच असून रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव शहराकडे कूच केली आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेन मधील भारतीय नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत कीव शहर सोडा असे आदेश भारतीय दूतावासाकडून देण्यात आले आहेत.

भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत तातडीनं कीव शहर आजच्या आज सोडून जावं अशा सूचना दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत. ज्या मिळेल त्या माध्यमातून कीव शहर सोडण्याचं आवाहन भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरीकांना करण्यात आलं आहे. भारतीय दूतावासानं जारी केलेल्या याच अ‍ॅडवायझरीवरुन तेथील परिस्थितीचा अंदाज लावता येऊ शकेल.

आत्तापर्यंत रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या अनेक भागात बॉम्ब हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे कीव राजधानीतील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे रशिया कडून युक्रेन वर अजून जोरदार हल्ले होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कीव शहरातील भारतीयांना कोणत्याही परिस्थितीत शहर सोडण्याचा आदेश दूतवासाने दिला आहे.

तासगावात खासदारांच्या कार्यालयाबाहेर ‘मोदी माफी मागो’ आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत महाराष्ट्राचा अपमान केलाय. यावेळी उपस्थित असणाऱ्या खासदार संजय काकांनी स्वाभिमान असेल राजीनामा देत महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही हे कृतीतून दाखवावे असे आव्हान कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिले. तासगावात नरेंद्र मोदी माफी मागो या आंदोलनात ते बोलत होते.

खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आमदार विक्रम सावंत यांच्यासह जिल्ह्यातील नेतेमंडळी उपस्थित होती. तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी याचे आयोजन केले. यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्राचा अपमान करत असताना संजयकाका शांतपणे कसे बसू शकतात. स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दयावा.

उत्तरप्रदेश सह पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधान महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. कोरोना काळात तुम्ही नमस्ते ट्रम्प कार्यक्रम करून देशाला कोरोनाच्या खाईत लोटलं. पण महाराष्ट्राने प्रत्येक राज्यातील माणसांना त्यांच्या घरापर्यंत व्यवस्थित पोहचवले. तरी तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करता आणि आमचे खासदार ते ऐकून घेतात. वसंतदादांनी पक्षाध्यक्ष यांच्याशी न पटल्याने राजीनामा दिला होता. तुम्ही आता लाखाची प्रॉपर्टी हजार कोटींच्या घरात आणली आता तरी स्वाभिमान दाखवा असे आव्हान दिले.

दाऊदचा खरा फंट मँन नवाब मलिकच; निलेश राणेंचा गंभीर आरोप

nilesh rane nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. त्यानंतर भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले जात आहे. दरम्यान आज भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी मलिक यांच्यासह राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रू आहे. बॉम्ब स्फोट घडवणाऱ्यां कडून तुम्ही जमीन खरेदी करता, यामुळे दाऊदचा खरा फंट मँन नवाब मलिक असू शकतो, असा आरोप राणे यांनी केला आहे.

निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवाद काँग्रेससाठी हा किती गंभीर विषय आहे हे आम्ही पाहिले. मात्र, मलिक यांच्यावर झालेल्या आरोपानुसार मलिक यांनी दाऊदच्या माणसाकडून कवडीमोल भावात जमीन खेरदी केली. त्यातही ब्लॅक मनीचा वापर झाल्यामुळे याचा ट्रेंड ईडीकडून घेतला जात आहे.

राष्ट्रवादी पक्षातील नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या गंभीर विषयावर शरद पवार हे बोलत नाहीत. मात्र, युक्रेनसाठी भाजपच्या नेत्यांना फोन लावतात. आणि त्याच्याकडे विचारपूस करतात. नबाव मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरते. नबाव मलिकांचे हे प्रकरण गंभीर आहे. देशाच्या संरक्षणासाठी हे प्रकरण धोकादायक आहे. मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादीने घ्यायला पाहिजे, असे राणे यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी युवक राष्ट्रवादीकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा निषेध

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन समाजात व्देषभावना निर्माण करणारे वक्तव्य करुन दोन्ही समाजाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे,अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी आज सांगली येथे व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस सांगली जिल्ह्याच्या वतीने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करुन निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, औरंगाबाद उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते नसल्याचे सांगितले असतानाही राज्यपालांसारखी जबाबदार व्यक्ती दोन समाजात व्देषभावना निर्माण करत असल्याने या गोष्टीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवकचे निरिक्षक अरुण हसबे, शरद लाड, राजू जानकर, भरत देशमुख, विश्वास पाटील, किसन जाणकर, मोहन पाटील, विजय पाटील, अजित दुधाळ, संग्राम जाधव, शिवाजी माळी, हर्षद बागल, मोहन खोत, आदिंसह युवक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, भाजप पाठिंबा देईल; शेलारांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. उद्धवजींनी ठाम भूमिका घेतल्यास भाजप 100 % शिवसेनेला समर्थन देईल असे मोठे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे.

आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताठमानेने उभं राहावं. त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. मुख्यमंत्र्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश द्यावेत की, दाऊद, दाऊदचे हस्तक, दाऊदच्या गँगमधली लोक आणि त्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या नवाब मलिकांसारख्या सगळ्या लोकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

महाविकासआघाडीतील तीन पक्षांपैकी दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा केवळ उद्धव ठाकरे यांच्याकडूनच आहे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतल्यास भाजप त्याला पूर्णपणे पाठिंबा देईल, असे आशिष शेलार यांनी जाहीर केले.

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा मी निषेध करतो : मंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे अनेक वादग्रस्त वक्तव्य करतात. शास्त्राने सिध्द केलेले आहे, जगामध्ये मनुष्याला आजार झाल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असते. पुरातन काळात आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार केले जात होते. कालातरांने विज्ञान पुढे गेलं आजाराच्या बाबतीत संशोधन होवू लागले. आज आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. डॉक्टर हे समाजाचे फार मोठी गरच आहे. त्यांची तुलना होवू शकत नाही. संभाजी भिडेंच्या त्या वक्तव्याचा मी निषेध करत असल्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कराड येथील वखार महामंडळाच्या गोडाउनमध्ये 5 मे टन प्रतितास क्षमतेच्या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा शुभारंभ सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी या नावीन शुभारंभ झालेल्या यंत्रनेमुळे भागातील शेतक-यांचा फायदा होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला.

राज्य सरकार चांगला मार्ग काढेल ः बाळासाहेब पाटील

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे देण्यात आलेल्या कर्जाच्या व्याजाच्या परताव्याबाबत संबधित अधिका- यांशी चर्चा करेन. राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयातून निश्चित चांगला मार्ग काढेल, असा विश्वास मंत्री बाळासाहेब पाटील व्यक्त केला..

काय म्हणाले, संभाजी भिडे

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कोरोनात 105 टक्के लोकांचा भीतीनंच मृत्यू झाल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहे, डॉक्टर मारायच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी डॉक्टरांबाबत अपशब्द वापरले.

अग्निशमन दलाने विझवली कचऱ्याला लागलेली मोठी आग, भीषण अनर्थ टळला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली-मिरज रस्त्यावरील सर्वहित रुग्णालयाच्या बाजुला असलेल्या बोळात कचऱ्याचे पेट घेतला. मात्र अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली.
सर्वहीत रुग्णालयाच्या बाजूला असणाऱ्या बोळात कचऱ्याने पेट घेतला. या बोळात कचरा पेटल्याने मोठा धूर पडला. आजूबाजूला व्यावसायिक संस्था आणि घरे असल्याने तातडीने महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला.

अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि टीमने तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. पेटलेल्या कचऱ्याची आग फायरफायटरने नियंत्रणात आणली. यावेळी अग्निशमन जवांनानी बोळात पाण्याच्या फवाऱ्याने ही आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घरफोडी करणाऱ्या चौघांना पोलिसांकडून अटक, 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरजेतील सुंदरनगर येथे राहणारे अरूण जयवंत जगताप यांच्या बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 6 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. गांधी चौकी पोलिसांनी जलदगतीने तपास करून 2 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली 2 लाख रूपये किंमतीची रिक्षा असा एकूण 4 लाख 40 हजार रूपयांचा रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दरोडा प्रकरणातील चार आरोपींना अटक केली. त्यापैकी एका आरोपीस गांधी चौकी पोलिसांनी अटक केली असून तिघांना एमआयडीसी हद्दीत घडलेल्या चोरी प्रकरणाच्या तपासासाठी ताब्यात दिले आहे.

अरूण जगताप हे हॉटेल व्यवसायिक आहेत. एमआयडीस येथे त्यांचे हॉटेल आहे. अरूण जगताप हे सुंदर नगर येथील प्रतिक्षा बंगल्याला कुलूप लावून पत्नी व त्यांची व मुले हे सर्वजण महाबळेश्र्वरला गेले होते. महाबळेश्र्वरला गेल्यानंतर जगताप यांनी हॉटेल मॅनेजरला घरी जावून पाहून येण्यास सांगितले. मॅनेजर हा जगताप यांच्या सुंदरनगर येथे असलेल्या बंगल्याकडे गेला होता. त्यावेळी त्यांना बंगल्याचे घराचे दरवाजाचे कडीकोयंडा उचकटलेले दिसले.

पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा माहिती घेतली असता पोलिसांनी परिसरातील सी.टी.व्ही.फुटेजची माहिती घेतली. त्यानंतर संशयीत आरोपीस ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी अनिस अल्ताफ सौदागर, वैभव आवळे, नेहाल मोमीन, समर्थ गायकवाड यांना अटक केली. या चौघांकडून 4 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल गांधी चौकी पोलिसांनी हस्तगत केला आहे.

“उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई….”; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे माजी खासदार यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान आज त्यानु पुन्हा ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. ” माझ्यावर कारवाई करणार असे सांगितले जात आहेत. उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी किरीट सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाहीत. घोटाळे ऊद्धव ठाकरे करतात आणि आमच्यावर काय कारवाई करणार?, अशी टीका सोमय्या यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर कारवाई करणार असे ठाकरे सरकारमधील मंत्री सांगत आहेत. मात्र, त्यांना सांगतो कि उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी ते माझ्यावर कारवाई करू शकत नाहीत. राज्य सरकारने काल जनतेला कळवले की नील सोमय्या निर्दोष आहे, त्यांना मुंबई पोलिसांनी निर्दोष ठरवले नाही तर त्यांची बदली केली.

यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका करताना सोमय्या म्हणाले की, संजय राऊत तुम्ही नौटंकीबाज आहेत हे त्यांनी कबूल करावे. कसला गेम बिगीन, इडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे आहे. अगोदर उद्धव ठाकरे यांनी सांगावे कि पोलीस कमिश्नरची हकालपट्टी का केली?, असा सवाल यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला.

गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या आजचा दर

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता कमर्शियल गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. कमर्शियल गॅसच्या दरात 105 रुपयांची वाढ झाली असून महागाईचा भडका उडाला आहे.सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्यासाठी LPG गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर केल्या असून सर्वसामान्याना झटका दिला आहे.

तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी इंडियन ऑइल (IOC) ने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 105 रुपयांनी वाढ केली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर नवी दिल्लीत 19 किलो गॅस सिलिंडरचा नवा दर 2,012 रुपये झाला आहे. नवीन किमती 1 मार्च 2022 पासून लागू झाल्या आहेत.

तर दुसरीकडे घरगुती गॅस च्या दरात अद्याप कोणतीही वाढ झाली नसून थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज १ मार्च २०२२ रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरच्या किमती डिसेंबर २०२१ नुसार स्थिर आहेत. मुंबई आणि दिल्लीत १४.२ किलो सिलिंडरचा दर ९०० रुपये आहे. कोलकात्यात ९२६ रुपये आणि चेन्नईत ९१६ रुपये दर आहे.