Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2710

Cryptocurrency Prices : क्रिप्टोकरन्सी तेजीत, सर्व मोठ्या कॉईन्समध्ये झाली 10% पेक्षा जास्तीची वाढ

नवी दिल्ली । रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती, मात्र आता त्याचा प्रभाव संपल्याचे दिसत आहे. आज मंगळवारी सकाळी 9:55 वाजता, ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅपमध्ये 10.72% ची जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे आणि यासह ती काल $1.71 ट्रिलियनच्या तुलनेत आज $1.90 ट्रिलियनवर पोहोचली आहे.

मार्केट कॅपनुसार सर्व प्रमुख करन्सीमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. बिटकॉइन, इथेरियमपासून शिबा इनूपर्यंत सर्व कॉईन्समध्ये सुमारे 10 टक्के वाढ झाली आहे.

coinmarketcap च्या डेटानुसार, मंगळवारी बातमी लिहिली तेव्हा, बिटकॉइन 14.07% वाढून $43,201.25 वर ट्रेड करत होते तर इथेरियमची किंमत गेल्या 24 तासांत 11.23% वाढून $2,914.96 वर पोहोचली. बिटकॉइनचे बाजारातील वर्चस्व लक्षणीयरित्या वाढले आहे. काल ते 41.9% होते तर आज 43% आहे. इथेरियमचे मार्केट वर्चस्व केवळ 18.3% आहे.

कोणत्या कॉईन्समध्ये किती वाढ झाली ?
– Terra – LUNA – प्राइस: $88.53, वाढ : 23.99%
– Avalanche – प्राइस: $87.48, वाढ : 17.51%
– Solana – SOL – प्राइस: $97.35, वाढ : 11.80%
– Cardano – ADA – प्राइस: $0.9639, वाढ : 9.21%
– Shiba Inu – प्राइस: $0.00002579, वाढ : 9.14%
– XRP – प्राइस: $0.7744, वाढ : 7.27%
– Dogecoin – DOGE – प्राइस: $0.1324, वाढ : 7.32%
– BNB – प्राइस: $393.99, वाढ : 7.96%
– Cronos – CRO – प्राइस: $0.4433, वाढ : 11.98%

सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स
Crypto Inu (ABCD), Meme Machine (MeMa) आणि OBRok Token (OBROK) हे गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स आहेत. वाचून विश्वास ठेवणे अवघड होईल मात्र Crypto Inu (ABCD) ने 4200.28% उडी घेतली आहे. Meme Machine (MeMa) दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये 309.48% वाढ झाली आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर OBRok Token (OBROK) आहे. OBRok Token (OBROK) 270.84% ​​वाढला आहे. यामध्ये कालच्या याच वेळेपर्यंत 501.23% ची वाढ दिसून आली.

“भारतीयांचा जीव कसा धोक्यात घालावा हे भाजपकडून शिकावं”; प्रकाश आंबेडकर यांची टीका

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस असून त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय विध्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी “मिशन गंगा” राबविले जात आहे. दरम्यान अजूनही विध्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर याणी भाजपवर टीका केली आहे. “भारतीयांचा जीव कसा धोक्यात घालावा हे भाजपकडून शिकावे. युक्रेनमधून भारतीयांना आणण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहार, असे आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या युक्रेनमध्ये भारतीय विध्यार्थी अडकले आहेत. त्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, मिशन गंगा या मोहिमेत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. वास्तविक पाहता भाजपकडे कुठलीही फॉरेन पॉलिसी नाही. इतर देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी महिनाभर प्रयत्न केले, पण भारत सरकारने ती पाऊल उचलले नाहीत. आणि आता भारतीय विध्यार्थ्यांना मायदेशी आणले जात आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि केंद्र सरकावर गंभीर आरोप केला. भाजपकडून धार्मिक राजकारण केले जात असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी केली. त्याच्या टीकेला. आता भाजप नेते काय उत्तर देणार याकडे पहावे लागेल.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे निधन

नवी दिल्ली । सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांचा मुलगा झेन नडेला याचे सोमवारी सकाळी निधन झाले. तो 26 वर्षांचा होता आणि त्याला जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार होता. मायक्रोसॉफ्टने आपल्या कार्यकारी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे सांगितले की,”झेनचे निधन झाले आहे. या मेलमध्ये, अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितले गेले आहे.”

2014 पासून मायक्रोसॉफ्टचे सीईओ नडेला यांनी अपंग युझर्सना आणखी चांगल्या प्रकारे सर्व्हिस देण्यासाठी प्रॉडक्ट्स डिझाइन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ते म्हणाले की,”मुलगा झेनचे संगोपन आणि सपोर्ट करताना त्यांना खूप काही शिकायला मिळाले आहे.” सिएटल चिल्ड्रन्स सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचा एक भाग म्हणून गेल्या वर्षी, चिल्ड्रन हॉस्पिटलने नडेला यांच्यासमवेत पेडियाट्रिक न्यूरोसायन्सेसमध्ये झेन नडेला एंडॉव्ड चेअरची स्थापना केली.

झेनला संगीताची चांगली जाण होती
चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे सीईओ जेफ स्पिरिंग यांनी आपल्या बोर्डाला दिलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, “झेनला त्याच्या उत्कृष्ट संगीताची जाणीव, त्याचे तेजस्वी हास्य आणि त्याने आपल्या कुटुंबासाठी आणि प्रियजनांना दिलेला आनंद यासाठी लक्षात ठेवले जाईल.”

भारतीय रेल्वेने पुन्हा सुरू केली विशेष सुविधा; प्रवासाचा खर्च होणार कमी

Railway

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेच्या निर्णयामुळे आता प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी कमी भाडे मोजावे लागणार आहे. वास्तविक, कोरोना संकटाच्या काळात बंद पडलेल्या अनारक्षित डब्यांमध्ये प्रवासाची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाल्यास, आता रेल्वेच्या अनारक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऍडव्हान्स तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. पूर्वीप्रमाणेच आता प्रवाशांना अनारक्षित तिकीट म्हणजेच ट्रेनचे भाडे कमी करून सर्वसाधारण डब्यातून प्रवास करता येणार आहे.

कोविड-19 मुळे प्रवाशांना अनेक महिने सामान्य डब्यांसाठीही आरक्षण करावे लागले. आता या डब्यांसाठी आरक्षण करण्याची गरज भासणार नाही. यापूर्वी एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये जाणाऱ्या गाड्या केवळ आरक्षणाच्या धर्तीवरच धावत होत्या. आता प्रवाशांना सामान्य तिकीट काढूनही सामान्य डब्यात प्रवास करता येणार आहे. मात्र, ही सुविधा 4 महिन्यांसाठी बुक केलेल्या जागांसाठी लागू होणार नाही.

गाड्यांमधील सामान्य व्यवस्था कधी पूर्ववत होईल?
रेल्वेने सांगितले आहे की, ज्या गाड्यांमध्ये आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे, त्यामध्ये आगाऊ आरक्षणाचा कालावधी संपल्यानंतरच सामान्य व्यवस्था पूर्ववत केली जाईल. मात्र, होळीसाठी धावणाऱ्या गाड्यांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या डब्यात सामान्य तिकीट काढूनही प्रवास करता येणार आहे. यानंतर प्रवाशांना पूर्वीपेक्षा कमी भाडे मोजावे लागेल, असे थेट म्हणता येईल.

रेल्वे होळी स्पेशल ट्रेन सुरु करणार आहे
रेल्वेने नुकतेच स्पेशल गाड्यांची घोषणा केली होती. देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच रेल्वे प्रवाशांसाठी सातत्याने आनंदाच्या बातम्या येत आहेत. धुक्यामुळे रद्द झालेल्या रुळांवर आजपासून 100 गाड्या धावणार आहेत. यासोबतच 7 मार्च ते 20 मार्च या कालावधीत होळीच्या सणादरम्यान देशात 250 स्पेशल गाड्याही सुरु करण्यात येणार आहेत.

एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची आत्महत्या : चिठ्ठीत लिहीलं… अभ्यासाला कंटाळलेय, पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही

सातारा | सातारा शहरातील विलासपूरमधील एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दि. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. अभ्यासाला कंटाळलेय; पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही, अशी चिठ्ठी लिहून विद्यार्थिनीने स्वत:च्याच मृत्यूचं गूढ वाढवलंय. प्रियांका निलकंठ आलाटकर (वय- 19, रा. विलासपूर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रियांका आलाटकर ही तरूणी पुणे येथील ससून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. मंगळवारपासून तिची परीक्षा सुरू होणार होती. त्यासाठी ती सोमवारी सायंकाळी चार वाजता पुण्याला जाणार होती. मात्र, तत्पूर्वीच तिने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

प्रियांकाच्या बेडरुममधील खोलीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये प्रियांकाने ‘मी अभ्यासाला कंटाळले आहे. पण माझ्या मृत्यूचं कारण ते नाही. हा माझा स्वत:चा निर्णय असून, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा उल्लेख केला आहे. यामुळे प्रियांकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. सोमवार सकाळपासून ती तणावात होती. फारशी कोणाशी बोलायचीही नाही. असे पोलीस सांगत आहेत. अचानक तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याने तिच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. कितीही अडचणी आल्या तरी तीडगमगणारी नव्हती. तिला डाॅक्टर होऊन स्वत:चं हाॅस्पीटल थाटायचंहोतं. असं एका तिच्या नातेवाइकांन सांगितलं.

“महाविकास आघाडी सरकारकडून दाऊद संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न”; प्रवीण दरेकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मलिकांना भाजपने नव्हे, तर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू केले आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. एसटी आंदोलनाकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. मात्र, दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी वेळ आहे,” असा आरोप दरेकर यांनी केला.

प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या महाविकास आघाडी सरकारचा कारभार पाहिला तर एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. आता तर गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी नव्हेत, असा जावई शोध महाविकास आघाडी करत आहे. या घटनेला मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याशी भाजपचा संबंध जोडला. मात्र, यात भाजपचा कोणताही संबंध नाही. ठाण्याचे आमदार सरनाईक यांनी परदेशात व्यवहार केला त्यामुळे ईडीने कारवाई केली. वनमंत्री संजय राठोड यांनी मुलीला आत्महत्या करायला भाग पाडले, असे दरेकर यांनी सांगितले.

आजपासून ‘या’ बँकेने बदलले IFSC आणि MICR कोड, ट्रान्सझॅक्शन करण्यापूर्वी जाणून घ्या

Bank FD

नवी दिल्ली । देशातील दोन बँकांनी आजपासून म्हणजेच 1 मार्च 2022 पासून आपला IFSC कोड बदलला आहे. आता या बँकांच्या ग्राहकांना कोणतेही ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी नवीन IFSC कोड टाकावा लागेल. लक्ष्मी विलास बँकेच्या ग्राहकांसाठी ही बातमी खूप उपयुक्त आहे. बँकेने 28 फेब्रुवारी रोजी त्यांचे IFSC आणि MICR कोड बदलले आहेत.

डिजिटल बँकिंगसाठी ग्राहकांना IFSC कोड अनिवार्यपणे आवश्यक आहे. याशिवाय, ग्राहक आपल्या खात्यातून NEFT/RTGS/IMPS द्वारे पैसे पाठवू किंवा मिळवू शकत नाहीत. बँकेने 25 ऑक्टोबर 2021 पासून नवीन कोड ऍक्टिव्ह केले असले तरी, 28 फेब्रुवारीपासून जुन्या कोडचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ग्राहकांना आता 1 मार्चपासून पेमेंटसाठी नवीन कोड वापरावा लागणार आहे.

म्हणून IFSC कोड बदलला
नोव्हेंबर 2020 मध्ये लक्ष्मी विलास बँकेचे DBS बँकेत विलीनीकरण करण्यात आले. या विलीनीकरणानंतर लक्ष्मी विलास बँकेच्या सर्व शाखांचे IFSC आणि MICR कोड बदलले आहेत. 1 मार्चपासून बँकेच्या ग्राहकांना NEFT/RTGS/IMPS साठी नवीन DBS IFSC कोड वापरावा लागेल. बँकेने ग्राहकांना या बदलाची माहिती शाखांमध्ये प्रत्यक्ष भेटून ईमेल आणि SMS द्वारे दिली आहे.

ग्राहकांनी ‘हे’ बदल करणे आवश्यक आहे
28 फेब्रुवारी 2022 नंतर, ग्राहकांनी आपल्या थर्ड पार्टीना जारी केलेले सर्व जुने धनादेश नवीन कोडसह चेकने बदलले पाहिजेत. 28 फेब्रुवारीनंतर जुना MICR कोड असलेले धनादेश नाकारले जातील. नवीन चेकबुक 1 नोव्हेंबर 2021 पासून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्राहक 1860 267 4567 या क्रमांकावर कॉल करून किंवा इंटरनेट/मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकतात.

लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
ज्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक किंवा IFSC कोड मिळाले आहेत त्यांनी आपल्या वेगवेगळ्या थर्ड पार्टी संस्थांकडे अपडेट करावेत. ग्राहकांना अनेक ठिकाणी IFSC कोड अनिवार्यपणे अपडेट करावा लागेल. यामध्ये इन्कम टॅक्स, इन्शुरन्स कंपन्या, म्युच्युअल फंड, नॅशनल पेन्शन सिस्टम आणि डिमॅट खाती यांचा समावेश आहे.

संजय राऊतांनी थेट पंतप्रधान कार्यालयालाच दिले पुरावे; भाजपला दिला इशारा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले असून त्यासंदर्भात लवकरच मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. तसेच तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत. त्या महाराष्ट्रातही आहेत, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनिल सिंडिकेट चालवत आहेत याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवणं हे संसदेचा सदस्य आणि शिवसैनिक म्हणून देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यानुसार मी माहिती दिली आहे. अशी माहिती मी वारंवार देत जाईल. यानंतर मुंबईत येऊन याबाबत पत्रकार परिषद घेईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडून कारवाईची अपेक्षा नाही. कारण केंद्रातल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशांनुसार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या सूडाच्या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्रात जास्त. जणूकाही केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच काम आहे. महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचं. खोटी प्रकरणं, खोटे पुरावे उभे करायचे. अशी चिखलफेक सुरू आहे. पण जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हात देखील किती बरबटलेले आहेत हेसुद्धा देशाला कळायला हवं”, असं राऊत म्हणाले

तिसर्‍या तिमाहीत भारताच्या GDP मध्ये झाली 5.4% ची वाढ, ठरलेल्या अंदाजापेक्षा कमी राहिला वेग

नवी दिल्ली । भारत सरकारने GDP ची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे, GDP म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा GDP 5.4 टक्के दराने वाढला आहे. आकडेवारीनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 5.4 टक्के दराने वाढली आहे. गेल्या दोन तिमाहींच्या तुलनेत या तिमाहीत GDP चा वाढीचा दर कमी आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP 20.1 टक्के होता. दुसऱ्या तिमाहीत GDP वाढीचा दर 7.5 टक्के होता. तिसर्‍या तिमाहीत GDP वाढीचा दर इतर दोन तिमाहींपेक्षा कमी आहे. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, आठ पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील वाढही जानेवारीत 3.7% पर्यंत घसरली आहे जी मागील महिन्यात 4.1% होती. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात आठ प्रमुख उद्योगांचा वाटा 40.27% आहे.

दरम्यान, आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत सरकारची वित्तीय तूट पूर्ण वर्षाच्या अंदाजाच्या 59% एवढी होती, यावरून हे सूचित होते की, सरकार वर्षासाठी GDP च्या 6.9% चे सुधारित वित्तीय तूट लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे.

मंद विकास दराचे कारण
बरोबर एक वर्षापूर्वी, डिसेंबरच्या तिमाहीत, भारताचा विकास दर 0.40 टक्के होता. या तिमाहीत वाढीचा वेग मंदावला आहे. सांख्यिकी मंत्रालयाच्या मते, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा GDP 8.9 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक वर्ष 2019-20 च्या तिसर्‍या तिमाहीत 6.1% वाढून प्री-कोविड कालावधीपेक्षा अर्थव्यवस्था मजबूत झाली.

GDP
सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) किंवा सकल देशांतर्गत उत्पन्न (GDI), अर्थव्यवस्थेच्या आर्थिक कामगिरीचे मोजमाप आहे. हे एका वर्षातील सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे देशाच्या हद्दीतील बाजार मूल्य आहे. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था तेव्हाच चांगली मानली जाते जेव्हा त्याचा GDP चांगला असतो. देशाचा GDP घसरला तर त्या देशाची अर्थव्यवस्था चांगली मानली जात नाही. खराब अर्थव्यवस्थेचा सर्व दोष सरकारला दिला जातो, कारण देशाचे सरकार आपल्या देशाचे आर्थिक धोरण ठरवते.

खाम नदीपात्रासाठी 50 कोटींचा डीपीआर सादर

औरंगाबाद – खाम नदीपात्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी मागील वर्षभरापासून एक रुपयाही खर्च न करता विविध विकास कामे करण्यात येत आहेत. नदीपात्रातील पुढील टप्पे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने 50 कोटी रुपयांचा डीपीआर काल राज्य शासनाला सादर केल्याची माहिती प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला. या कामासाठी पांडेय यांनी पुढाकार घेतला. महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी परिषद, इकोसत्व, व्हेरॅक यासह सामाजिक संस्थांच्या विद्यमाने लोखंडी पूल परिसरात तब्बल सात किलोमीटर पर्यंत विविध विकास कामे करण्यात आली. खाम नदीपात्राची अवस्थांना आल्यासारखी झाली होती. शेकडो नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी पात्रात सोडले होते. हजारो टन प्लास्टिक कचरा उचलण्यात आला. त्यानंतर नदीपात्राची रुंदीकरण केले. पिचिंग ची कामे करण्यात आली. पात्रात रंगरंगोटी वृक्षारोपण करण्यात आले 7 किलोमीटर अंतरापर्यंत नदीकाठचे रूप बदलले. आता उर्वरित विविध विकास कामांसाठी निधीची गरज आहे.

शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने 50 कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला. डीपीआर मध्ये मागणी केलेल्या निधीचे अर्थसंकल्पात तरतूद करावी लागणार असल्याचे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.