Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2753

‘ड्राय डे’ ला दारुचा महापूर; अकरा जणांवर कारवाई

औरंगाबाद – शिवजयंतीनिमित्त ड्राय डे असताना देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या अकरा जणांवर विविध भागांत कारवाई करण्यात आली. या अवैध दारू विक्रेत्यांकडून 22 हजार 410 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

ड्राय डे असताना दारूची अवैध विक्री करणाऱ्या अकरा जणांना छापा मारून पोलिसांनी पकडले. मिटमिटा भागातील एलपीजी गॅस पंपाजवळ हॉटेलचालक महेश रावसाहेब घोडके (28, रा. मारुती मंदिरामागे) हा नाश्‍ता कॉर्नर हॉटेलमधून देशी दारूची विक्री करत होता. त्याला छावणी पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक हजार दोनशे रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. सातारा गावातील शाक्यनगरात एक महिला देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून छापा मारण्यात आला. तिच्याकडून नऊशे रुपयांची दारू हस्तगत केली. रेल्वेस्टेशन रोडवरील हमसफर ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर अनीस लालमिया शेख (48, रा. हुसेननगर, बीड बायपास) हा देशी दारू विक्री करीत असताना त्याला सायंकाळी पावणेआठच्या सुमारास पकडण्यात आले. त्याच्याकडून 660 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. तसेच चिकलठाणा मिनी घाटीच्या बाजूला देशी दारू विकणाऱ्या संजय देवराव बनकर (45, रा. चिकलठाणा) याला पकडण्यात आले. त्याच्याकडून नऊशे रुपयांची दारू एमआयडीसी सिडको पोलिसांनी जप्त केली.

किराडपुऱ्यातील पाण्याच्या बंबाजवळ विशाल गणेश इंगळे (34) हा देशी दारू बाळगत असल्याने जिन्सी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून 960 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ताहेर बिस्मिल्लाह शेख (23, रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) याला काबरानगर रस्त्यावर देशी दारू विक्री करताना जवाहरनगर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक हजार 50 रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. संदीप सुखदेव आहेर (42, रा. गार्डन हाउसिंग सोसायटी, बीड बायपास रोड) हा जवाहर कॉलनीतील अरिहंतनगरात विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून पाच हजार 760 रुपयांचा साठा जप्त केला. आंबेडकरनगरात सिडको पोलिसांनी छापा मारून सुधाकर पांडुरंग चव्हाण (35) त्याच्याकडून पोलिसांनी आठ हजार 640 रुपयांची दारू जप्त केली. तर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी महाराणा प्रताप चौकाजवळ शिवशंकर नारायण पवार (26, रा. बजाजनगर), विशाल बाळू सदाशिवे (19, रा. तीसगाव, खवड्या डोंगराशेजारी) आणि मनोज पृथ्वी चंद्रा (21) यांना पकडले. त्यांच्याकडून दोन हजार 340 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

Video महाबळेश्वरला निघालेली 39 पर्यटकांची चालती बस आगीत जळून खाक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

रविवारच्या सुट्टीसाठी महाबळेश्वरला निघालेल्या पर्यटकांच्या चालत्या बसला आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली. वाई- महाबळेश्वर या मार्गावरील पसरणी घाटात नागेवाडी फाट्याजवळ एका खाजगी बसने पेट घेतला होता. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जाळून खाक झाली, परंतु सुदैवाने शेजारील वाहन चालकांच्या सतर्कतेमुळे सर्व पर्यटक काही मिनिटांतच बसमधून उतरल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माणगांव (गोरेगांव) येथील खाजगी कंपनी मधील कर्मचाऱ्यांची सहल सपकाळ ट्रॅव्हल्सच्या बस ( एम एच -06 एस- 9345) ने पंढरपूरला गेली होती. तेथून रविवारी सकाळी मांढरदेव मार्गे महाबळेश्वरला निघाले असता, दुपारी तीनच्या सुमारास पसरणी घाटात बस आली. त्यावेळी शेजारून जाणाऱ्या वाहन चालकाने बसमधून धूर येत असल्याचे चालकास सांगून सतर्क केले. चालक रवींद्र कोळसकर (वय- 47, रा.माणगांव) यांनी प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील सर्व प्रवाशी खाली उतरविले. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1495627074773880833

या बसमध्ये लहान मुलांसह 39 प्रवाशी होते, या घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घटनेची गांभीर्य ओळखून वाई-पाचगणी अग्निशमन बंबाला पाचारण केले. वाई पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्याचे प्रयत्न केला. परंतु संपूर्ण बस जाळून खाक झाली. दरम्यान या घटनेमुळे वाई पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बस विझविल्या नंतर पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली.

संजय राऊतांना स्वत: मुख्यमंत्री बनायचं होतं, युती तोडण्याचे काम त्यांनीच केलं; भाजप नेत्याची टीका

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वैर वाढतच चालल आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत याना स्वतःला च मुख्यमंत्री व्हायचं होत असा दावा भाजप नेते मोहित कंभोज यांनी केला आहे. मोहित कंभोज यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची खोटी कथा संजय राऊत यांनीच रचली होती. संजय राऊत यांना स्वत:ला मुख्यमंत्री बनायचं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती तोडण्याचं काम संजय राऊत यांनीच केलं. तसेच भाजपा आणि शिवसेनेमधील दुरावा कायम राहावा यासाठी दररोज सकाळी 9 वाजता येऊन बोलणे हे संजय राऊत यांचं राजकारण आहे असे मोहित कंभोज यांनी म्हंटल.

यावेळी वाधवान प्रकरणावरूनही त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. राऊत साहेब वाधवान यांना कोविड काळात कुणी पास दिला? त्यांच्यासाठी कुठल्या बंगल्यावरून फोन गेला होता. गेल्या एक वर्षापासून वाधवान कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे. कोण कोण नेते त्यांना भेटायला गेले होते. जेलमधील कैद्याला पंचतारांकित सुविधा मिळत आहेत. या सरकारमध्ये कोण मदत करत आहे. हॉस्पिटलला अय्याशीचा अड्डा कुणी बनवला आहे, असा सवालही मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.

पुणे- बंगळूर महामार्गावर खांबाटकी बोगद्याजवळ 5 वाहने एकमेकांवर आदळली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा-पुणे मार्गावरील खांबाटकी बोगद्याजवळ असलेल्या पुढील उतारावर लक्झरी बसचं ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झाला. बसचा ब्रेक निकामी झाल्यानंतर 5 गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात टाटा स्टॉर्म व महिंद्रा मॅक्स जीपचे प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रविवारी दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बस (MH-09 – CV – 9207) ही खांबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यावर उतारावर बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
नंतर बसने पुढे चाललेल्या टाटा स्टॉर्म (MH- 12- LJ- 3643), महिंद्रा मॅक्स जीप (MH- 12- EF- 5066) बजाज मोटार सायकल (MH- 09- CP- 5047) आणि लक्झरी बस (MH- 46- BB- 9564) या वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात टाटा स्टॉर्म व महिंद्रा मॅक्स या दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं. सुदैव म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या अपघातात बस रस्त्यातच आडवी झाली. त्यामुळे तासभर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. दुर्घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्यात आली. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, वाहतूक पोलीस विठ्ठल पवार, शरद यादव, एएसआय अहेरराव, पी. एस. फरांदे, ए. एम. जाधव, एस. डी. जाधव, एस. ए. मोरे, विजय पिसाळ यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

धक्कादायक! अल्पवयीन मुलांनी केला चिमुकलीवर अत्याचार

औरंगाबाद – एका चार वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घराच्या गच्चीवर नेऊन दोन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी वाळूज उद्योगनगरातील बजाजनगरात घडली. याप्रकरणी चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध एमायडीसीवाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी शेजारील एक 13 वर्षीय व दुसर्‍या 10 वर्षीय मुलाने चिमुकली खाऊ देत आपण गच्चीवर जाऊन खाऊ असे म्हणून गच्चीवर नेले. तेथे दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या चिमुकलीने रडत आईकडे जाऊन आपबिती कथन केली. तिच्या आईला धक्का बसला. रात्री पती घरी आल्यानंतर आपल्या चिमुकलीवर शेजारील दोघांनी अत्याचार केल्याचे सांगितले. रात्री मुलीवर घरच्या घरी उपचार केल्यानंतर घाबरलेल्या तिच्या पालकांनी तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी चिमुकली घेऊन पालक खाजगी रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.

चिमुकलीच्या आईने रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. त्यांनी चिमुकलीच्या पालकांना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आणले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्‍त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी माहिती जाणून घेतली व विधिसंघर्षग्रस्त मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आमदार बोरनारे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी

औरंगाबाद – वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे व कुटुंबियांना लोक सुरक्षेचा विसर पडला असून ते मस्तवालपणे वागत आहेत. त्यामुळेच त्यांनी महिलेला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आमदार बोरनारे यांचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करत भाजप महिला आघाडीने या घटनेचा निषेध केला. आज भाजप महिला मोर्चाच्या शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देणार आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार केल्याने 18 फेब्रुवारी रोजी आमदार बोरणारे यांच्यासह दहा जणांनी चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. या घटनेचे राजकीय तसेच सामाजिक पडसाद उमटू लागले आहेत. आमदार झाल्या पासून बोरनारे व कुटुंब तसेच समर्थक पक्ष संघटनेत मस्तवालपणे वागत असून गटबाजीच्या राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा प्रकार जानेवारीत समोर आला. आजी व माजी असे दोन गट तालुका पक्षसंघटनेत पडले. त्यातच कौटुंबिक वादातून मारहाणीच्या घटनांमुळे शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्यात आमदार बोरनारे व कुटुंब हातभार लावत आहे. या सगळ्या प्रकरणी पक्षप्रमुख काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार बोरनारे कुटुंबाने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचा स्वतःच्या कौटुंबिक वादासाठी गैरवापर केला आहे. भावजयीला राजकीय द्वेषापोटी मारहाण केली. त्या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर खाजगी सचिवाला पुढे करून मारहाण झालेल्या फिर्यादी वरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले. त्यामुळे जयश्री बोरणारे यांच्यावर दाखल ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करून त्याचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे रिपाई (आठवले गट) युवक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी गृहमंत्री, पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देशाच्या परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून; भाजपच्या अडचणी वाढणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी आमच्यात देशाच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असून देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे असा नारा दोन्ही नेत्यांनी दिला. तसेच इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत अस चंद्रशेखर राव यांनी म्हंटल.

आम्ही दोघं भाऊ लागतो, कारण आमची हजार किलोमीटरची सीमा जोडली आहे. त्यामुळे एकत्र काम करावे लागते, पुढेही एकत्र काम करू असे त्यांनी म्हंटल. आज ज्या पद्धतीने देश चालला आहे, त्यात बदल झाला पाहिजे.देशात एका मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. असे म्हणत देशातील परिवर्तनाची ही सुरुवात आहे असं चंद्रशेखर राव यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोलण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना भेटून खूप आनंद झाला. देशाच्या विकासाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार आहे. तेथे आम्ही एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत.”

उद्धव ठाकरे- चंद्रशेखर राव यांची संयुक्त पत्रकार परिषद; भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघात केला. देशात सुडाचे राजकारण चालले असून राजकारण गढूळ बनत असल्याचं दोन्ही मुख्यमंत्र्यांनी म्हंटल.

यावेळी चंद्रशेखर राव म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भेटून प्रसन्न वाटले. आमच्यात देशाच्या राजकारणाविषयी चर्चा झाली. बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विशेष उल्लेख केला. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांकडून देशाला खूप प्रेरणा मिळाली. त्याच प्रेरणेवर आम्हाला वाटचाल करायची आहे. आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. अनैतिक गोष्टींविरुद्ध आम्हाला लढायचं आहे. आमच्या दोघांमध्ये आज जी चर्चा झाली त्याचा पुढील काही काळातच खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल.”

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. देशात सूडाचं राजकारण वाढत आहे. ही आपल्या देशाची हिंदुत्वाची संस्कृती नाही. हे असंच सुरु राहिलं तर देशाला भविष्य काय? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र आणि तेलंगना सख्खे शेजारी आहेत. राज्या राज्यात एक आपुलकीचं नातं राहिलं पाहिजे. नवी सुरुवात आज झालीय. त्याला आकार येण्यास वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत असे त्यांनी म्हंटल.

अजिंक्य मंडळाचे कार्य आदर्शवत : डॉ. रणजीत पाटील

कराड:-  छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राची नव्हे तर आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यांनी कायम जनतेच्या सुरक्षेचाच विचार केला. लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. छत्रपतींच्या विचारांचा वारसा जोपासत अजिंक्य मंडळाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवून आदर्शवत कार्य केले आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

आगाशिवनगर आझाद कॉलनी येथील अजिंक्य नवरात्र व  गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त सीसीटीव्ही लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा निलम येडगे, नगरसेविका सुशिला शिंगण, नगरसेवक सागर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्याताई खराडे, दैनिक मुक्तागिरी कराड कार्यालयाचे प्रमुख संदीप चेणगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बी. आर. पाटील म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. जिद्दीने, चातुर्याने आणि बुध्दी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली.  मंडळांनी महाराजांच्या विचारांचे आचरण करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपापल्या विभागात उपाययोजना कराव्यात. अजिंक्य मंडळाने आजपर्यंत राबवलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

नगराध्यक्षा येडगे म्हणाल्या, उत्स्फूर्तपणे व मंगलमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. अजिंक्य मंडळातर्फे आझाद कॉलनीमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे कायदा, सुव्यवस्था व गुन्हेगारी रोखण्यास चांगली मदत होणार आहे. इतर मंडळांनाही याप्रमाणे आपल्या विभागात सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिक लोखंडे, अमित कचरे, स्वप्नील जाधव, विनायक चव्हाण, अथर्व केळुसकर, मयूर चव्हाण, समीर शिकलगार  यांच्यासह अजिंक्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रविंद्र काजारी यांनी सुत्रसंचालन केेले. राजेंद्र केळुसकर यांनी आभार मानले.

LIC चा IPO मोडणार अनेक रेकॉर्ड, 1 कोटी रिटेल गुंतवणूकदार होऊ शकतात सहभागी

LIC IPO Date

नवी दिल्ली । LIC IPO जसजसा जवळ येत आहे तसतशी त्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. एकीकडे गुंतवणूकदार यासाठी सज्ज होत आहेत तर दुसरीकडे सरकारही या IPO साठी जोरदार तयारी करत आहे. आयुर्विमा महामंडळाचा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO असेल. ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.

LIC चा अंदाज आहे की, या मेगा IPO मध्ये 75 लाख ते 1 कोटी रिटेल गुंतवणूकदार सहभागी होऊ शकतात. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील कोणत्याही IPO साठी गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक हिस्सा असेल. वित्तीय बाजारपेठेत गुंतवणूक करणाऱ्या एकूण भारतीय लोकसंख्येपैकी सुमारे 14 टक्के लोकं या IPO मध्ये पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांसह गुंतवणूक करू शकतात.

व्यक्तीची सरासरी गुंतवणूक 30 ते 40 हजार असेल
मार्केट एक्सपर्ट्स च्या मते, या IPO बद्दल जितका प्रचार झाला आहे, त्या अर्थाने तो सबस्क्रिप्शन होण्याचा विक्रमही मोडू शकतो. यावेळी ओव्हरसबस्क्रिप्शन मिळणे अपेक्षित आहे. या गुंतवणूकदारांकडून LIC सुमारे 25 हजार कोटी गोळा करेल असा अंदाज आहे. कंपनीचा अंदाज आहे की, त्याच्या IPO मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सरासरी गुंतवणूक 30 ते 40 हजार असेल. इकॉनॉमिक टाइम्सने LIC च्या सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तात ही माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, LIC ने हा अंदाज बुक रनर्स आणि स्टॉक मार्केटमधील इतर सहभागींकडून मिळालेल्या प्रारंभिक प्रतिक्रियांच्या आधारे काढला आहे.

उघडली जात आहे डीमॅट खाती
मार्केट एक्सपर्ट्स च्या मते, भारतात आतापर्यंत 7 कोटींहून जास्त डिमॅट खाती आहेत. LIC गेल्या काही काळापासून जाहिराती आणि मेसेजेस द्वारे आपल्या पॉलिसीधारकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना डिमॅट खाती उघडण्याचे आवाहन करत आहे. जेणेकरून त्याचे पॉलिसीधारक LIC च्या IPO मध्ये सहभागी होऊ शकतील.

LIC ला अपेक्षा आहे की, त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्चपर्यंत देशातील एकूण डिमॅट खात्यांची संख्या 8 कोटींच्या पुढे जाईल. LIC चा IPO मार्चच्या शेवटच्या पंधरवड्यात येणे अपेक्षित आहे.

11 मार्च रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी IPO लॉन्च होऊ शकतो
याआधी शुक्रवारी, न्यूज एजन्सी रॉयटर्सने काही विश्वसनीय सूत्रांचा हवाला देऊन सांगितले की,” LIC च्या IPO चा आकार सुमारे $8 अब्ज (सुमारे 60,000 कोटी रुपये) असेल आणि तो 11 मार्च रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी लॉन्च केला जाईल. त्याच वेळी, दोन दिवसांनंतर, 14 मार्च रोजी, ते उर्वरित गुंतवणूकदारांसाठी उघडले जाऊ शकते.”