Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2752

“भडवा” या शब्दाचा अर्थ तरी कळतो का?,शिवसेनेचे राऊत पहिले तर वाझे दुसरे प्रवक्ते; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या याच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपानंतर आज मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे किरीट सोमय्या यांच्याकडून पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशिवाय एक शिवीही देऊ शकत नाहीत. त्यांनी मला भडवा असा शब्द वापरला. त्याचा शब्दतरी त्यांना कळतो का? वास्तविक शिवसेनेचे पहिले राऊत तर दुसरे वाझे हे प्रवक्ते आहेत, अशी टीका सोमय्या यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मला दोन भाषेत पत्रे पाठवली होती. त्यापैकी एक पत्र 11 ऑक्टोबर 2021 रोजी पाठवले होते. पत्रात शिवसेनेपैकी सर्वांनी वाझेंचा जयजयकार केला. प्रिय श्री करीट सोमय्याजी, भ्रष्ट्राचार शासकीय पैशाचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण उघड केली, हे राज्यावर उपकार झाले, आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींना तुरुंगात जावे लागले, असे म्हंटले आहे.

माझ्याविरोधात राऊतांनी काही अपशब्द वापरले. ते म्हणजे किरीट सोमय्या हे भडवा आहेत. राऊतांना भडवा या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? असा सवाल सोमय्या यांनी विचारला. मी नुकताच कोव्हीड सेंटरचा घोटाळा बाहेर काढला. माझ्या या आरोपानंतर संजय राऊत उद्धव ठाकरे, ठाकरे यांच्यासह चहावाला सर्वजण अडकणार आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला दोन पत्र पाठवून जमीन नावावर करण्याचे सांगितले. त्याची हि पत्र उद्धव ठाकरे यांना दाखवल्याशिवाय लिहले नसेल, असेहि सोमय्या यांनी म्हंटले.

पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊतांनी ट्विट करीत सोमय्यांना विचारला ‘हा’ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपानंतर आज मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे किरीट सोमय्या यांच्याकडून पत्रकार परिषद घेतली जात आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी ट्विट करीत सोमय्या यांना सवाल केला आहे. “किरीट… आपण हे सांगू शकाल का? वेवूर ( पालघर ) येथील निरव डेव्हलपर मध्ये 260 कोटीची गुंतवणूक कोणाची आहे? यात कोणत्या ED joint director ची बेनामी गुंतवणूक आहे? महाराष्ट्राला कळू द्या, जय महाराष्ट्र !”, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “किरीट… आपण हे सांगू शकाल का? वेवूर ( पालघर )येथील निरव डेव्हलपर मध्ये 260 कोटीची गुंतवणूक कोणाची आहे? येथे nikon green ville ya project मध्ये मेधा व नील किरीट सोमय्या हे संचालक आहेत का.? यात कोणत्या ED joint director ची बेनामी गुंतवणूक आहे? महाराष्ट्राला कळू द्या, जय महाराष्ट्र !”

संजय राऊत यांनी केलेल्या सवालानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून काय उत्तर दिले जाणार हे पहावे लागणार आहे. त्यामुळे राऊतांकडून अजूनही सोमय्या यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

खून : साताऱ्यात पुण्यातील मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळी झाडून हत्या

Crime Gun

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फुलमळा परिसरात लेक पॅलेस अपार्टमेंटच्या छतावर काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका मटका व्यावसायिकाची अज्ञात व्यक्तीने डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय सुभाष पाटोळे (रा. बिबवेवाडी, पुणे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल सायंकाळी एकाची गोळी झाडून हत्या केल्याची माहिती शिरवळ पोलीसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना मृतदेहाच्या जवळ आधार कार्ड सापडले असून त्यावरून मृत व्यक्ती संजय पाटोळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित व्यक्तीची अधिक माहिती घेतली असता तो पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी आज्ञात मारेकर्‍याचा शोध सुरू केला आहे.

मयत संजय पाटोळे यांना सध्या सातारा येथील जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या हत्येमागील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून चाैकशी सुरू आहे. शिरवळ येथे झालेल्या या खूनामुळे परिसर हदरून गेला आहे.

Cryptocurrency Prices : क्रिप्टो बाजार जवळजवळ स्थिर, ‘या’ टोकनमध्ये झाली 4500% पेक्षा जास्त वाढ

Online fraud

नवी दिल्ली । सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 रोजी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये संमिश्र परिणाम दिसून आला. सकाळी 11:05 वाजता ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 0.33% वाढून $1.79 ट्रिलियन झाले. Bitcoin पडले तेव्हा, Ethereum ने हलकीशी वाढ पाहिली.

सोलाना (Solana – SOL), टेरा लूना (Terra – LUNA), आणि शिबा इनु (Shiba Ina) हे मार्केट कॅपनुसार सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सीपैकी एक ठरल्या आहेत. गेल्या 24 तासांत WOLFI नावाचे टोकन 4500% पेक्षा जास्त उडी घेऊन ट्रेड करत होते.

सर्वात मोठे चलन असलेलं Bitcoin आज 0.65% खाली $39,370.68 वर ट्रेड करत आहे, तर Ethereum गेल्या 24 तासांत 2.25% वाढले आहे. ही क्रिप्टोकरन्सी $2,748.53 वर ट्रेड करत होती. बातमी लिहिण्याच्या वेळी, क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे मार्केट वर्चस्व 41.7% होते, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 18.4% होते.

24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सी
या काळात सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सीबद्दल बोलायचे झाल्यास, WOLFI, MetaDogecolony (DOGECO) आणि CryptoPlanes (CPAN) मध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. गेल्या 24 तासांत, WOLFI ने 4503.66%, MetaDogecolony (DOGECO) 313.21% आणि CryptoPlanes (CPAN) 209.49% ची वाढ नोंदवली आहे.

कोणत्या करन्सी वाढल्या आणि कोणत्या घसरल्या ?

“लक्षात ठेवा अन्यथा गाठ माझ्याशी अन् धनगरांशी आहे”; गोपीचंद पडळकरांचा महाविकास आघाडीवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात आगामी महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात मराठा आरक्षण व धनगर समाजाच्या विविध मागण्यांवरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनापत्र लिहिले आहे. “फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी 22 कल्याणकारी योजना व 1000 कोटी निधी दिला. प्रस्थापितांच्या सरकारनं या योजना गुंडाळल्यात. काही घराण्यांची इच्छा आहे की माझ्या धनगर समाजाचा वापर सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे, असा पडळकरांनी पत्रातून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आज ट्विट करीत धनगर आरक्षणाच्या मुद्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी दिलेल्या “जे आदिवासांनी ते धनगरांना” या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह 22 कल्याणकारी योजनेत होती. स्वातंत्र्याच्या 70 वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती.

जोपर्यंत धनगर समाजाला ‘एसटी’चा दाखला मिळत नाही. मुघल, इंग्रज हर एक गनिमांना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज. माझ्या समाजाचा वापर आज प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा आहे. लॉकडाऊन, अतिवृष्टी, गावागावत हल्ले, आघाडीचं सरकार आलं की विस्थापितांना टाचेखाली चिरडण्याचा राक्षसी आनंद प्रस्थापितांना घ्यायचा असतो असे पडळकरांनी सांगितले.

निवडणुका आल्या की भाजपवाले दाऊदचा नागोबा बाहेर काढतात अन्…; शिवसेनेचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | निवडणुका आल्या की भाजपवाले दाऊदचा नागोबा बाहेर काढतात अन् आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात, असं म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानात संपलेला दाऊद आपल्याकडील तपास यंत्रणा व राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी जिवंत ठेवला आहे असेही शिवसेनेनं म्हंटल.

एनआयएची म्हणे अशी माहिती आहे की, मुंबई-दिल्लीतील अनेक राजकीय नेते व शहरे दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर आहेत. आता दाऊदच्या निशाण्यावर भारतासारखा मोठा देश आणखी किती काळ असणार ते ठरवायला हवे. दाऊद पाकिस्तानात आहे व त्यास फरफटत आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. दाऊदला पाकिस्तानचे कवच आहे व ते राहणार, पण भारताचे सरकार ते कवच का तोडू शकले नाही? दाऊद भारतावर हल्ला करीत असल्याच्या ऊठसूट दिल्या जाणाऱ्या बातम्या भारताची बेअब्रू करणाऱ्या आहेत, असं लेखामध्ये म्हटलं आहे

महाराष्ट्राचे पोलीस असे दाऊदी हल्ले उद्ध्वस्त करण्यास समर्थ आहेत, पण पाकिस्तानचे नरडे दाबण्याची ताकद दिल्ली सरकारमध्ये आहे काय? अहमदाबाद येथे जुलै 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील 38 आरोपींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी सामुदायिक फाशी ठोठावली, पण त्या बॉम्बस्फोटांतील प्रमुख आरोपींना पकडून त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे काम सगळय़ात आधी मुंबई पोलिसांनीच केले आहे.

त्यामुळे दाऊद वगैरेंचे काय करायचे ते पाहता येईल. दिल्लीतील सरकार जागेवर आहे काय? हाच खरा प्रश्न आहे. निवडणुका आल्या की, ही मंडळी आपल्या पेटाऱ्यातून दाऊदचा नागोबा बाहेर काढतात व आतंकवादाची पुंगी वाजवत बसतात. हे आता नेहमीचेच झाले. पाकिस्तानात संपलेला दाऊद आपल्याकडील तपास यंत्रणा व राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी जिवंत ठेवला आहे. दाऊद वगैरे टोळय़ांत आता काही घडवायचा दम उरलेला नाही असे शिवसेनेनं म्हंटल.

Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर त्याची किंमत 50 हजारांच्या पुढे गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 0.01 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात 0.38 टक्क्यांनी घट झाली आहे.

साथीच्या आजाराची भीती, महागाईची चिंता, रशिया युक्रेन आणि मजबूत अमेरिकन डॉलर यांच्यातील सततचा तणाव यामुळे सोन्याचे भाव 2022 मध्ये 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीच्या वर जाण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

सोन्या-चांदीचा भाव
एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.01 टक्क्यांनी वाढून 50,119 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 63,659 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,150 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,050 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,990 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,050 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,900 रुपये
पुणे – 46,050 रुपये
नागपूर – 45,990 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,050 रुपये
पुणे – 50,150 रुपये
नागपूर – 50,050 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4614.00 Rs 4615.00 0.022 %⌃
8 GRAM Rs 36912 Rs 36920 0.022 %⌃
10 GRAM Rs 46140 Rs 46150 0.022 %⌃
100 GRAM Rs 461400 Rs 461500 0.022 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5024.00 Rs 5025.00 0.02 %⌃
8 GRAM Rs 40192 Rs 40200 0.02 %⌃
10 GRAM Rs 50240 Rs 50250 0.02 %⌃
100 GRAM Rs 502400 Rs 502500 0.02 %⌃

Stock Market : पाच मिनिटांत सेन्सेक्स 457 अंकांनी घसरला, निफ्टीही कोसळला

Share Market

नवी दिल्ली । सोमवारीही भारतीय शेअर बाजाराची सुरुवात कमकुवतपणाने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्यासह उघडले आणि अल्पावधीतच मोठी घसरण गाठली.

जागतिक बाजाराच्या दबावाखाली सोमवारी गुंतवणूकदारांवर विक्री आणि नफावसुलीचे वर्चस्व राहिले. सेन्सेक्स 281 अंकांनी तर निफ्टी 84 अंकांच्या घसरणीसह उघडला. अल्पावधीतच बाजाराने डुबकी मारण्यास सुरुवात केली आणि व्यवसाय सुरू झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच दोन्ही एक्सचेंजेसमध्ये मोठी घसरण दिसून आली. सकाळी 9.24 वाजता सेन्सेक्स 457 अंकांच्या घसरणीसह 57,371 वर ट्रेड करत होता. निफ्टीही 143 अंकांनी घसरून 17,133 वर पोहोचला होता.

‘या’ शेअर्सपासून गुंतवणूकदार पळत आहेत
बाजारातील घसरणीच्या काळात गुंतवणूकदार हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि विप्रो यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सपासून दूर पळत आहेत. दुसरीकडे, डॉ रेड्डीज लॅब्स, एनटीपीसी, टीसीएस, पॉवर ग्रिड कॉर्प आणि इंडसइंड बँक यांच्या शेअर्सची खरेदी सातत्याने वाढत आहे.

आशियाई बाजारही रेड मार्कवर
सोमवारी बहुतांश आशियाई बाजार घसरणीसह उघडले आहेत. सिंगापूरच्या स्टॉक एक्स्चेंजवर 0.84 टक्के, जपान 0.99 टक्के, हाँगकाँगमध्ये 1.88 टक्क्यांची सुरुवातीची घसरण झाली. याशिवाय दक्षिण कोरियाचे शेअर बाजारही 0.67 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते.

काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी?? संजय राऊत म्हणतात, आम्ही कधीच….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा देशात तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला वेग आला. मात्र या भेटीत चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस नेत्याना भेटणे टाळले. त्यामुळे आगामी निवडणूकीत काँग्रेसला वगळून विरोधकांची आघाडी होणार का याबाबत विचारले असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र काँग्रेस सोबतीला असेल अस म्हंटल.

संजय राऊत म्हणाले, आम्ही कधीच काँग्रेसला वगळून आघाडी करण्याचा उल्लेख केलेला नाही. ज्यावेळी ममता बॅनर्जींनी अशा राजकीय आघाडीबद्दल विषय काढला तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची मागणी केली. केसीआर यांच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

ते पुढे म्हणाले, देशात तिसरी आघाडी, चौथी, पाचवी आघाडी कधीही यशस्वी झाली नाही. निवडणूका आल्या की आघाड्यांचे आकडे येतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साडेचार तास चर्चा झाली. विकास, अर्थिक विषय आणि देशाच्या राजकारणावर प्रदीर्घ चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमती झाली. भविष्यातील राजकीय दिशा बाबत चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.