Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2769

क्रिप्टो मार्केटमध्ये थोडीशी घसरण, मात्र एका कॉइनने घेतली 3000% पेक्षा जास्त उडी

Online fraud

नवी दिल्ली | गुरुवार, 17 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10:20 वाजता, क्रिप्टोकरन्सी मार्केट 0.54% ने खाली आले आहे. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप काल याच वेळी असलेल्या $1.97 ट्रिलियन वरून $1.96 ट्रिलियन पर्यंत वाढली आहे. Bitcoin आणि Ethereum सह जवळपास सर्व प्रमुख करन्सीमध्येही घसरण झाली आहे. Avalanche आणि Shiba Inu टोकन ग्रीन मार्कवर ट्रेड करत होते.

आज सर्वात मोठे चलन Bitcoin 0.53% खाली $43,630.75 वर ट्रेडिंग करत आहे, तर Ethereum गेल्या 24 तासांत 1.62% खाली आहे आणि $3,071.30 वर ट्रेडिंग करत आहे. बातमी लिहिण्याच्या वेळी, क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे मार्केट वर्चस्व 42.2 टक्के आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 18.7 टक्के आहे.

24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सी
यावेळी सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सीबद्दल बोलायचे झाल्यास, Shiba toby (SHBT), NOONE आणि CATCOIN (CATS) मध्ये जबरदस्त वाढ झाली. गेल्या 24 तासांत Shiba toby (SHBT) 3068.38%, NOONE 1027.55% तर CATCOIN (CATS) 464.91% वाढले आहेत.

कोणत्या कॉईन्स मध्ये किती वाढ झाली

>> Avalanche : प्राइस – $95.56, वाढ – 1.44%
>> Shiba Inu : प्राइस – $0.00003082, वाढ – 1.89%
>> BNB : प्राइस – $424.33, घसरण – 1.28%
>> XRP : प्राइस – $0.8236, घसरण – 0.93%
>> Cardano – ADA : प्राइस – $1.07 , घसरण – 1.54%
>> Solana – SOL : प्राइस – $99.64, घसरण – 1.93%
>> Terra – LUNA : प्राइस – $55.91, घसरण – 0.27%
>> Dogecoin – DOGE : प्राइस – $0.1478, घसरण – -0.84%

“19 बंगले नावावर करण्यासाठी रश्मी ठाकरेंनीच ग्रामपंचायतीला लिहिले पत्र”; किरीट सोमय्यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आता रश्मी ठाकरेंचेच पत्र त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हे 19 बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिले होते,” असे सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहार की, जानेवारी (आणि मे) 2019 मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्स्फर करण्यासाठी पत्र लिहिले आहे. या संदर्भात सोमय्या यांनी म्हंटले की, “ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड गेल्या वर्षी मी मिळवला आहे. त्यात ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्यातर्फे 30 जानेवारी 2019 रोजी घरपट्टी नावे करण्याचा अर्ज आला असून मान्य करण्यात आल्याचं नमूद आहे.

रश्मी ठाकरेंच्या नावाने घरं दाखवत आहेत. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी एप्रिल 2014 मध्ये करार केला. त्यात घरं असल्याचे पुरावे त्यांनी जोडले असून किरीट सोमय्या, नील सोमय्या यांनी जोडलेले नाहीत. महत्वाचं म्हणजे हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

आता शिक्षकांच्या खिशालाही लागणार कात्री; गेस्ट लेक्चररला भरावा लागणार मोठा टॅक्स

GST

नवी दिल्ली । आता गेस्ट लेक्चरर म्हणून कमाई करणाऱ्या मास्तरच्या खिशालाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कात्री लावली आहे. आता या कमाईवर 18 टक्के दराने GST भरावा लागेल. अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग (AAR) च्या कर्नाटक खंडपीठाने एका निर्णयात हा आदेश दिला आहे.

याबाबत श्रीराम गोपालकृष्ण यांनी AAR समोर अपील करत गेस्ट लेक्चरर म्हणून कमावलेल्या उत्पन्नावर टॅक्स कसा भरावा लागेल अशी विचारणा केली होती. यावर निर्णय देताना खंडपीठाने म्हटले की, “प्रोफेशनल किंवा टेक्निकल किंवा बिझनेसशी संबंधित कोणतीही सर्व्हिस जर सूटच्या कक्षेत येत नसेल तर तिला सामान्य सर्व्हिस टॅक्सप्रमाणे 18 टक्के GST भरावा लागेल.”

‘या’ आदेशाचा अर्थ काय आहे ?
AAR ने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, कोणतेही सर्व्हिस प्रोफेशनल्‍स ज्यांची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना गेस्‍ट लेक्‍चरच्या माध्यमातून मिळालेल्या अतिरिक्त कमाईवर 18 टक्के दराने GST भरावा लागेल. याचा अर्थ या सर्व्हिसवरही आता दूरसंचार किंवा इतर कंपन्यांप्रमाणे सर्व्हिस टॅक्स म्हणून GST आकारला जाईल.

‘या’ लोकांच्या कमाईवर परिणाम होणार आहे
या निर्णयानंतर फ्रीलांसर म्हणून काम करणाऱ्या लाखो लोकांच्या कमाईवर परिणाम होणार असल्याचे टॅक्स एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे. याशिवाय शैक्षणिक, रिसर्चर, प्रोफेसर आणि अशा इतर व्यावसायिकांशी संबंधित लोकांनाही मोठा टॅक्स भरावा लागेल. जे इंस्ट्रक्टर किंवा ट्रेनर किंवा मेंटॉर म्हणून पार्ट टाइम काम करतात त्यांना आपल्या कमाईवर 18 टक्के GST भरावा लागेल.

तरुण पिढी अशा प्रकारे वाचवू शकते टॅक्स, ‘असे’ आहेत गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

Investment

नवी दिल्ली । तुम्ही जेव्हा नोकरी सुरू करता तेव्हा खर्च करणे किंवा होणे हे सामान्य आहे. प्रत्येक पगारदार व्यक्तीला वर्षातील कमाईचा काही भाग टॅक्सच्या स्वरूपात द्यावा लागतो. यासाठी तुम्हाला सेव्हिंग्स आणि गुंतवणूक यांच्यात योग्य संतुलन साधावे लागेल. योग्य नियोजन करून तुम्ही टॅक्स वाचवू शकता.

आयकर कायद्यामध्ये उपलब्ध असलेल्या कपातींपैकी कलम 80C ही सर्वात सामान्य आहे. लोकं याचा सर्वाधिक वापर टॅक्स सेव्हिंग्ससाठी करतात. या कलमांतर्गत, तुम्ही आर्थिक वर्षात जुन्या/सध्याच्या टॅक्स सिस्टीमची निवड केली असेल तरच तुम्ही डिडक्शनचा क्लेम करू शकता. जर तुम्ही कमी दराच्या इन्कम टॅक्सची नवीन सिस्टीम निवडली असेल तर तुम्ही या कलमांतर्गत डिडक्शनचा क्लेम करू शकणार नाही.

कलम 80C द्वारे 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स वाचवू शकतो. ही रक्कम एकूण उत्पन्नातून वजा केली जाते. यामुळे करपात्र उत्पन्न कमी होते. त्यामुळे कर दायित्वही त्याच प्रमाणात कमी होते. या डिडक्शनचा पूर्णपणे उपयोग करून 30 टक्क्यांच्या सर्वोच्च ब्रॅकेटमध्ये येणारी व्यक्ती 46,800 रुपये (4 टक्के सेससह) वाचवू शकते.

>> सरकारी आणि खाजगी कर्मचारी नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक करू शकतात. ही देखील एक टॅक्स सेव्हिंग योजना आहे. यामध्ये, आयकराच्या नियम 80C नुसार, तुम्हाला 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळू शकते.

>> युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) अंतर्गत तुम्हाला इन्शुरन्स आणि गुंतवणूक दोन्ही मिळते. यामध्ये तुम्हाला 1.5 लाखांच्या गुंतवणुकीपर्यंत टॅक्स सूट मिळते.

>> याशिवाय पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक अतिशय प्रसिद्ध योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळते. यासोबतच गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याजदरही उपलब्ध आहे. तुम्हाला 1.5 लाखांच्या गुंतवणुकीपर्यंत टॅक्स सूट मिळू शकते.

>> टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड ELSS (Equity Linked Savings Schemes) मध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एक, आयकराच्या कलम 80C अंतर्गत, 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सूट उपलब्ध आहे. दुसरीकडे, ते इतर सर्व टॅक्स सेव्हिंग योजनांमध्ये सर्वाधिक रिटर्न देखील देते.

>> टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजनांना फक्त 3 वर्षांचा लॉक इन पिरियड असतो. सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीममध्ये 5 वर्षे, NSC मध्ये 5 वर्षे आणि पब्लिक प्रोव्हीडन्ट फंडमध्ये 15 वर्षांचा लॉक-इन पिरियड आहे, मात्र 6 वर्षांनंतर तुम्ही आंशिक पैसे काढू शकता.

होय मी राष्ट्रवादी!! प्रचंड राष्ट्रवादी, अन् माझा डोळा…; राऊतांचे राणेंना प्रत्युत्तर

raut rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर घणाघात केला. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि त्यांचा डोळा मुख्यमंत्रीपदावर आहे असा आरोप त्यांनी केला. याबाबत संजय राऊताना विचारले असता त्यांनी होय मी राष्ट्रवादी आहे असे प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत म्हणाले, होय, मी राष्ट्रवादी आहे. मी प्रचंड राष्ट्रवादी आहे. आणि माझा डोळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर नाही तर शिवसेनेच्या प्रसारावर आहे. असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले. 2024 च्या निवडणुकीनंतर भाजपमधील अनेकजण बेरोजगार झालेले असतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले-

संजय राऊत हे पूर्णपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कडून सुपारी घेतली असून त्यांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. असा आरोप नारायण राणे यांनी केला. तसेच लोकप्रभात ला असताना संजय राऊतांनी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती असेही राणे म्हणाले.

GST मध्ये होऊ शकतो मोठा बदल, कर सवलतीत होणार कपात

नवी दिल्ली । राज्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि दर सुलभ करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) सिस्टीममध्ये बदल केला जाऊ शकतो. 2017 पासून GST लागू झाल्यापासून केंद्र सरकार राज्यांना कर महसुलात झालेल्या नुकसानीची भरपाई देत आहे. GST भरपाईची मुदत या वर्षी जूनमध्ये संपणार आहे.

सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की,”केंद्र सरकार GST बदल हळूहळू लागू करणार आहे आणि एकाच वेळी नाही. हे करण्यामागे या बदलांचा वस्तूंच्या वापरावर होणारा परिणाम कमी करणे हा आहे. या बदलांशी संबंधित शिफारशींना अंतिम रूप देण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगटाची लवकरच बैठक होणार आहे.

टॅक्स स्लॅब कमी केले जातील
लाइव्हमिंटच्या रिपोर्ट्स नुसार, GST मध्ये बदल करून सध्याच्या चार स्लॅबऐवजी तीन स्लॅब केले जातील. याशिवाय, कच्चा माल आणि इंटरमीडिएट्सवरील टॅक्स सूट आणि करातील कपातीशी संबंधित विसंगती दूर केल्या जाऊ शकतात. GST टॅक्स स्लॅब कमी करण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.

वस्त्रोद्योगासाठी करात वाढ
वस्त्रोद्योगाच्या टॅक्स रेट मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. असे करून इनवर्टेड ड्यूटी स्ट्रक्चर मधील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. यापूर्वी 31 डिसेंबर रोजी झालेल्या GST कौन्सिलच्या बैठकीत कापड आणि वस्त्र उद्योगातील अनेक वस्तूंवरील GST रेट 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.

GST भरपाई 1 जुलैपासून संपत आहे
1 जुलै रोजी, सध्याच्या GST सिस्टीमला पाच वर्षे पूर्ण झाल्यामुळे राज्यांना दिलेली भरपाई संपेल. GST लागू झाल्यानंतर केंद्र सरकार राज्यांना कर महसुलाचे नुकसान भरून काढण्यासाठी ही भरपाई देत आहे. GST भरपाई संपल्याने आता राज्यांच्या बजटवर परिणाम होईल. त्याचा मोठा फटका मोठ्या राज्यांना बसणार आहे. त्यामुळेच राज्यांना विविध वस्तूंवरील कर सवलत काढून आणि स्लॅबची संख्या कमी करून महसूल वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील.

भारत UAE सोबत करणार मुक्त व्यापार करार; ‘हे’ फायदे होणार

नवी दिल्ली । भारत शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबत मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी करू शकतो. या करारामुळे, भारताला UAE मध्ये सोन्याचे दागिने, इंजीनियरिंग सामान, कापड, पोशाख, खाद्य उत्पादने आणि इतर श्रम-केंद्रित क्षेत्रांच्या निर्यातीमध्ये करांमध्ये सवलत मिळू शकते. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात होणाऱ्या व्हर्चुअल शिखर परिषदेत या कराराला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार (CEPA) अंतर्गत झालेला हा पहिला मोठा मुक्त व्यापार करार आहे. या करारामुळे भारतातील रत्ने आणि दागिने, इंजीनियरिंग सामान आणि खाद्यपदार्थांच्या निर्यातीला चालना मिळेल, तसेच भारतीय कामगार आणि व्यावसायिकांना UAE मध्ये जाणेही सोपे होईल. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. याशिवाय भारतीय उद्योगांना अरब जगतातील इतर बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

इंजीनियरिंग निर्यात पाच वर्षांत दुप्पट होईल
भारत आणि UAE यांच्यातील या करारामुळे भारताच्या इंजीनियरिंग वस्तूंची निर्यात पुढील पाच वर्षांत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. तसेच याद्वारे 1 लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. इंजीनियरिंग निर्यात सध्या $4-5 अब्ज इतकी आहे. वार्षिक आधारावर डिसेंबर तिमाहीत UAE मध्ये भारताची निर्यात 77 टक्क्यांनी वाढून $20 अब्ज झाली आहे. भारताच्या एकूण निर्यातीत UAE चा वाटा 6.6% आहे.

हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीला ऑक्सिजन मिळेल
गेल्या काही दिवसांत यूएईला निर्यात होणारी रत्ने आणि दागिन्यांमध्ये घट झाली आहे. जर या करारामुळे सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवर कर सूट दिली गेली तर रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत मोठी वाढ होऊ शकते. भारताच्या साध्या सोन्याच्या दागिन्यांच्या एकूण निर्यातीपैकी 80 टक्के वाटा UAE चा आहे. एकूण स्टडेड ज्वेलरी निर्यातीत यूएईचा वाटा 20 टक्के आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) म्हणते की,”एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान, UAE मधील हिरे आणि दागिन्यांची निर्यात वार्षिक आधारावर 41.50 टक्क्यांनी घसरली आहे.”

UK आणि EU मध्ये निर्यात शक्य
ICRIER प्रोफेसर अर्पिता मुखर्जी यांनी लाइव्ह मिंटला सांगितले की,”भारतातील रत्ने आणि दागिने इंजीनियरिंग सामान आणि कापड आणि वस्त्रे यांसारखे क्षेत्र निर्यातीवर अवलंबून आहेत. जर हा करार झाला तर भारताला नवीन बाजारपेठा मिळतील, ज्याचा या प्रदेशांना खूप फायदा होईल. याशिवाय यूएईमधून इंग्लंड आणि युरोपियन युनियनमध्येही निर्यात करता येईल. तर भारतातील काही वस्तू थेट इंग्लंड, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलियाला निर्यात करता येत नाहीत.

“मुख्यमंत्र्यांचे ते 19 बंगले हरवलेत, मी बघायला जाणार; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राऊतांच्या आरोपांवर पलटवार केला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019 मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा, असे सांगितले होते. त्यांचे बंगले मी दाखवणार नाही. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही. त्याबद्दल मी तक्रार केली आहे. त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबांनी बोलावे, आता उध्या मी पुन्हा त्या 19 बंगल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी बघायला जाणार आहे,” अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेचे इंटरनल राजकारण मला समजत नाही. मात्र राऊत अडचणीत आले आहेत. त्यांना धास्ती वाटत आहे. मी दिल्लीला जाऊन या प्रकरण विरोधात तक्रार करुन आलो आहे. आता हे राऊतांनी हे प्रकरण रश्मी ठाकरे, त्यांच्या भावाच्या गळ्यात टाकले आहे. अन्वय नाईकने 2008 ला ग्रामपंचायतीकडे घरं बांधण्यासाठी अर्ज केला. 2009 ला घरं बांधून झाली. 2013 मध्ये उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात करार झाला. असेही यावेळी सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान, मी उद्या कोर्लई गावात जाणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तेथील ग्रामपंचायतीला भेट देणार आहे. तसेच त्या ठिकाणी जो जमीन, गारांचा घोटाळा झाला आहे, त्याची माहिती मी घेणार आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट करून लुटणाऱ्या महिला सावकाराच्या आवळल्या मुसक्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या शामरावनगर मध्ये राहणाऱ्या महिला सावकाराच्या मुसक्या आवळण्यात पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या पथकाला यश आले. सुवर्णा माणिक पाटील असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून महागड्या गाड्या, पैसे, कोरे चेक असा एकूण १ लाख ७७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे. महानगरपालिकेच्या गरजू कामगारांच्या असहाय्यतेचा फायदा उचलून त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देऊन वसुली सुरु केली होती.

संशयित सुवर्णा पाटील हि पहिल्यापासून सावकारी परवाना घेवून त्या परवान्यांचा भंग करून कोरे स्वाक्षरी केलेले चेक घेणे, उसनवर पावतीवर स्वाक्षरी घेणे, कोरे बॉन्ड घेणे, लोकांची वाहने तारण ठेवूण घेणे अशा प्रकारे सावकारी करून मोठया प्रमाणात व्यवहार करत होती. सुवर्णा पाटील या महिलेने म.न.पा. विभागाच्या कर्मचाऱ्यांना टारगेट करून त्यांचेकडून मोठया प्रमाणात सावकारीतून वसूली केली आहे.

सध्या काही कामगारांकडे तिने मोठया रक्कमांची मागणी करून ते दिले नाही तर कोर्टातील १३८ च्या कलमाखाली केसेस करेल, तुमच्या घरावर जप्ती आणेल वगैरे धमक्या देवून तसेच वेळ पडल्यास स्त्री असल्याचा फायदा घेवून स्त्रियांचे कायदे वापरून कारवाई करेन अशी धमकी देवून खंडणी मागणीचे कृत्य करीत होती. याबाबतची तक्रार पिडीतांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सावकारी सेलकडे केली. या तक्रारीची शहनिशा करून सावकारी सेलच्या पथकाने तिच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तिच्याकडे २७ हजार २०० रुपये रोख, एक मोबाईल, एक ज्युपिटर गाडी, एक चार चाकी कार, एक ऍक्टिव्हा गाडी, कोरे चेक, २५ ते ३० कोरे बॉण्ड तसेच उसनवार ६० ते ७० खरेदी दस्त असा एकूण १ लाख ७७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

“साखर कारखान्यांपेक्षा वीज कंपन्यांत मोठा घोटाळा, 27 प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव” – राजू शेट्टी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राज्यातील साखर कारखान्यांपेक्षा वीज कंपन्यांमध्ये मोठा घोटाळा आहे. 27 जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदा विभागाचा डाव आहे. खाजगीकरण करण्यामागे कोणाचा हात आहे, हे आता कळले पाहिजे. वीज प्रकल्प घेणार्‍या खाजगी कंपन्या या राज्यातल्या नेत्यांच्या आहेत. विजेचे जे बोके आहेत, त्यांना आम्ही करंट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केला.

विजेचे खासगीकरण, एकरकमी FRP साठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी शेतकर्‍यांचा मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेट्टी पुढे म्हणाले की, “मागील अनेक वर्षे आपण साखर साखर कारखान्यांनी केलेले घोटाळे पाहिले आहेत. परंतू साखर कारखान्यांच्या घोटाळ्यापेक्षा वीज प्रकल्पाच्या खाजगीकरणाचा मोठा घोटाळा जलसंपदा विभागाकडून केला जात आहे. जलविद्युत प्रकल्पांना 35 वर्षे झाल्याचे कारण देऊन राज्यातील 27 प्रकल्प खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा डाव आहे.”

या प्रकल्पांच्या खासगीकरणात मोठा घोटाळा आहे. या प्रश्नावर संघटना राज्यभर आवाज उठविणार असल्याचं ते म्हणाले. देशामध्ये सर्वात जास्त घोटाळे हे गुजरातमध्ये होत आहेत. अशातच घोटाळेबाजांची चौकशी करण्याऐवजी ED आणि CBI मंडप डेकोरेटर्सची चौकशी करीत आहे. त्यामुळे ED ही खरोखरच ऐडी झाली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.