Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2770

लूटमारीच्या उद्देशाने रेल्वे मार्गावर सिमेंटचे खांब ठेवणाऱ्या परप्रातीयांना मिरज रेल्वे पोलिसांकडून अटक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज-पुणे रेल्वेमार्गावर लोणंद ते सालपे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेगाड्या रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर सिमेंटचे खांब ठेवणाऱ्या दोघांना मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली. लालसिंग कमलसिंग पंद्दू व सुखदेव बुटासिंग सरोते या दोघांनी दारूच्या नशेत लूटमारीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. पद्दू व सरोते या दोघांनी लोणंद व सालपे या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर तीन ठिकाणी सिमेंटचे खांब ठेवून रेल्वेगाड्या आडविण्याचा प्रयत्न केला होता.

रेल्वे मार्गावर सिमेंट खांबामुळे महालक्ष्मी व गोवा एक्स्प्रेस काही काळ थांबविण्यात आल्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे घटनास्थळी धाव घेत, सिमेंटचे खांब हटवून रेल्वे वाहतूक सुरळीत केली. हा प्रकार करणाऱ्या पंद्दू व सरोते या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांनी हा प्रकार दारूच्या नशेत रेल्वे प्रवाशांची लूटमार करण्यासाठी रेल्वे अडविण्यासाठी केला, का घातपातासाठी? याचा मिरज रेल्वे पोलीस तपास करीत आहेत. रेल्वे अडविण्याच्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

“भांडणे लावून बहुजन समाज संपविण्याचा भाजपाचा डाव” – मराठा स्वराज्य संघ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

बहुजन समाजामध्ये भांडणे लावून समाज संपविण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे, असा आरोप मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत केला. ते म्हणाले,”सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र काहीजण स्वतःची राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी तिथीनुसार जयंती साजरा करण्याचा घाट घालत आहेत. तसेच जाणीवपूर्वक वाद निर्माण करीत आहेत. मात्र लोकांनी इतिहास समजून घेण्याची गरज आहे. साळुंखे म्हणाले, खरे तर मोदी सरकारला बहुजन समाज संपवायचा आहे.”

ते पुढे म्हणाले,” छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे सुख, सुरक्षा यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. मात्र काही सनातनी, कर्मठ लोकांनी शिवरायांना राज्यभिषेक करताना देखील त्रास दिला आणि आज त्यांचेच वारसदार मते मिळविण्यासासठी शिवरायांचा जयजयकार करीत आहेत.” स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी असणारा उद्योग त्यांनी थांबवावा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सातारा शहराजवळील पुरातन काळातील गाडे वाड्याला मध्यरात्री आग, कारण अस्पष्ट

सातारा | कोंडवे येथील पुरातन काळातील असलेल्या गाडे वाड्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये वाड्यामधील तीन घरातील घरगुती साहित्य जळून गाडे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, अगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल बुधवारी दि. 16 रोजी मध्यरात्री जुन्या काळातील लाकडाच्या असलेल्या गाडे वाड्याला अचानक आग लागली. आग लागल्याची चाहूल वाड्यामध्ये कुटुंबातील एक झोपलेल्या व्यक्तीस लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली. लाकडाच्या वाड्याने पेट घेतल्याने आगीचा डोंबाळा उडाला होता. संबंधित गावकऱ्यांनी दूरध्वनीवरून नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेबाबत कळविले. घटनास्थळी अग्निशामन दल दाखल होऊन अग्निशामन बंबाच्या सहाय्याने सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नातून आग विझवण्यात यश आले.

आग विजवण्यासाठी गावकऱ्यांनीही मोठी धडपड केली होती. आगीत घरातील कपडे, धान्य, कपाट आदी साहित्य जळून रहिवाशाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या वाड्यात एका व्यक्ती शिवाय कोणीही राहण्यास नसल्याने मोठी जीवितहानी टळली. वाड्याला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारी घरांना आगीची झळ लागून घरांचे तडे जाऊन काही प्रमाणात शेजारील घरांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

LPG वर सबसिडी मिळत आहे की नाही ते अशा प्रकारे तपासा

Cashback Offers

नवी दिल्ली । LPG गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, LPG सबसिडीद्वारे तुम्हांला मोठा दिलासा मिळू शकतो. सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात. यासाठी आधी तुम्ही सबसिडी मिळवण्यास पात्र आहात की नाही हे पाहावे लागेल.

तुम्ही LPG सबसिडी मिळवण्यास पात्र असाल तरच तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही ते तपासा. जर मिळत असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे येत आहेत की नाही हे पहावे लागेल. जर पैसे येत नसतील तर तुम्ही ताबडतोब तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्या. आधार लिंक केल्यानंतर, पैसे थेट तुमच्या खात्यात येऊ लागतील.

सबसिडी न मिळण्याचे प्रमुख कारण
सबसिडी न मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे LPG आयडी खाते क्रमांकाशी लिंक न करणे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डिस्ट्रिब्यूटरशी संपर्क साधून त्याला तुमच्या समस्येची जाणीव करून द्यावी. त्याच वेळी, तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. LPG ची सबसिडी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सबसिडी दिली जात नाही.. 10 लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांची मिळकत आहे.

घरबसल्या अशा प्रकारे तपासा
>> सर्वप्रथम तुम्हाला http://www.mylpg.in या वेबसाइटवर जावे लागेल.
>> यानंतर येथे तुम्हाला उजवीकडे तीन कंपन्यांच्या गॅस सिलेंडरचा फोटो दिसेल.
>> येथे तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरसोबत असलेल्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा.
>> यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल, त्यामध्ये तुमच्या गॅस सर्व्हिस प्रोव्हायडरची माहिती असेल.
>> यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला Sign In आणि New User चा पर्याय असेल, तो निवडा.
>> यानंतर तुमचा आयडी राहिल्यास येथे साइन इन करा, अन्यथा तुम्हाला नवीन युझर निवडावा लागेल.
>> यानंतर आणखी एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये उजव्या बाजूला View Cylinder Booking History हा पर्याय असेल, तो निवडा.
>> तुम्हाला सबसिडी मिळतेय की नाही ते कळेल. तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता.

“बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली, आता उरली ती फक्त पवार- गांधी सेना”; निलेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर निशाणा साधला. यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे याचे पुत्र था भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राईट व राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “बाळासाहेबांचे विचार ऐकल्यावर कळेल सत्ता आणि खुर्ची मिळवायला कोणी व किती लाचारी केली. बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली आता उरली ती फक्त पवार गांधी सेना, अशी टीका राणे यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे याच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, कोणी कोणा समोर लोटांगण घातलं हे स्व. बाळासाहेबांना पूर्वीच कळलं होतं, बाळासाहेबांचे विचार ऐकल्यावर कळेल सत्ता आणि खुर्ची मिळवायला कोणी व किती लाचारी केली. बाळासाहेब गेले तेव्हाच शिवसेना संपली आता उरली ती फक्त पवार गांधी सेना,” असे राणे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, आज राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पुनर्वसनाच्या नावाखाली राज्यात मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोपही केला आहे.

आता हवेत उडणारी बस येणार; नितीन गडकरींचे आश्वासन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता लवकरच हवेत उडणारी बस येईल, आपल्याकडे पैशांची कमी नाही अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज शहर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत यांनी हे आश्वासन दिले आहे.

आता, लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील, त्यासाठी हवाई बसचा डीपीआर तयार आहे. या योजनेबाबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही कळवले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार असल्याचे गडकरींनी म्हटलं. आपल्याकडे पैशाची कमतरता नाही, असेही त्यांनी म्हटले

उत्तरप्रदेशात ऊसाचे उत्पन्न मुबलक प्रमाणात घेतले जाते. याच्या मदतीने इथेनॉल तयार केले जाईल, जे वाहनांमध्ये टाकले जाईल. सध्या जी वाहने ११० रुपये लिटर पेट्रोलवर चालतात, त्यात इथेनॉलच्या वापरामुळे हा खर्च ६८ रुपयांपर्यंत खाली येणार आहे, असे त्यांनी सांगितलेले.

RBI ने ‘या’ बँकेचे लायसन्स केले रद्द

RBI

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी आणखी एका बँकेचे लायसन्स रद्द केले. RBI ने कमकुवत आर्थिक स्थितीचे कारण देत महाराष्ट्र स्थित मंथा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स रद्द केले. RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, 16 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेचा व्यवसाय संपल्याने त्यांचा बँकिंग बिझनेस बंद करण्यात आला आहे.

यामुळे लायसन्स रद्द झाले
बुधवारी जारी केलेल्या निवेदनात, सेंट्रल बँकेने म्हटले आहे की,” सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना बँक बंद करण्याचे आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे.” एका निवेदनात पुढे असे म्हटले गेले आहे की, RBI ने बँकेचे लायसन्स रद्द केले आहे, कारण बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि कमाईची शक्यता नाही.

RBI ने म्हटले आहे की,”बँक चालू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी प्रतिकूल आहे आणि बँक सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार ठेवीदारांना पैसे देऊ शकणार नाही.” यापुढे बँकेला बँकिंग बिझनेस सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास त्याचा जनहितावर विपरीत परिणाम होईल, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की,”मंथा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स रद्द केल्यामुळे, ठेवी स्वीकारणे किंवा ठेवी भरणे यांचा समावेश असलेला बँकिंग बिझनेस ठप्प झाला आहे.”

पैशांचे काय होईल ते जाणून घ्या
RBI पुढे म्हणाले की,”लिक्विडेशनवर असलेल्या प्रत्येक ठेवीदाराला DICGC कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांच्या आर्थिक कमाल मर्यादेपर्यंत डिपॉझिट इन्शुरन्स क्लेम मिळवण्याचा अधिकार असेल.” RBI ने असेही म्हटले आहे की,” बँकेने जमा केलेल्या डेटानुसार, 99 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार असेल.”

मनपाने शिवप्रेमींचे बॅनर हटवले; शहरात मध्यरात्री राडा

औरंगाबाद – काल रात्री शहरातले काही शिवप्रेमींचे बॅनर महापालिकेने हटवल्याने शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकात बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेने रात्री उशिरा बॅनर काढल्याने घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते. गोंधल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांना या प्रकरणाची भणक लागताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कार्यकर्त्यांना तिथून पांगवले आहे. घटनास्थळी रात्री अनेक पोलिस उपस्थित होते. तसेच रात्री तिथं बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

सध्या औरंगाबादच्या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी मुद्दाम खोडसाळपणा केला असल्याचा आरोप बॅनर कार्यकर्त्यांचा आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं वातावरण निवळल्याचं आम्हाला समजतंय. शिवजयंती तोंडावर आल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवजयंती बॅनर लावण्यात येतात. पण महापालिकेने कारवाई केल्याने तिथं चांगलाचं गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

रात्री झालेल्या राड्यात अनेकांनी पोलिसांना उर्मट भाषा केली आहे, तर अनेकांनी पोलिसांना जाब विचारला आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती अधिक प्रमाणात चिघळली होती. शिवप्रेमीचे क्रांती चौकातले अनेक बॅनर हटवल्याने कार्यकर्ते एकत्रित आले होते. महापालिने रात्रीचं का बॅनर काढले असे देखील शिवप्रेमींनी पोलिसांना विचारले आहे ? बॅनर काढल्याची माहिती अनेकांना समजताच शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित झाले होते. शिवसेनेकडून आमचा शिवजयंतीचा कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी केला आहे.

Gold Price : सोन्या-चांदीचे भाव घसरले; आजचे दर तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तीन दिवस सोन्याचा दर घसरत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याच वेळी, चांदीच्या किंमतीत 0.42 टक्के घट झाली आहे.

पुन्हा वाढू शकतील सोन्याचे भाव
केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया सांगतात की,”देशात आणि जगभरात महागाई वाढत आहे. याशिवाय युक्रेन आणि रशियामधील वाढत्या वादामुळे जागतिक तणाव वाढला आहे. यामुळे सोन्याला आधार मिळेल आणि तो यंदा 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.

सोन्या-चांदीचा भाव
एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.07 टक्क्यांनी घसरून 49,582 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये 0.42 टक्क्यांच्या घसरणीसह चांदी 63,031 रुपये प्रति किलो पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 59,970 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,800 रुपये
पुणे – 45,760 रुपये
नागपूर – 45,760 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,500 रुपये
पुणे – 49,900 रुपये
नागपूर – 49,900रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4615.00 Rs 4675.00 1.283 %⌃
8 GRAM Rs 36920 Rs 37400 1.283 %⌃
10 GRAM Rs 46150 Rs 46750 1.283 %⌃
100 GRAM Rs 461500 Rs 467500 1.283 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5056.00 Rs 5100.00 0.863 %⌃
8 GRAM Rs 40448 Rs 40800 0.863 %⌃
10 GRAM Rs 50560 Rs 51000 0.863 %⌃
100 GRAM Rs 505600 Rs 510000 0.863 %⌃

Stock Market : शेअर बाजार वाढीसह सुरू, जाणून घ्या आज गुंतवणूकदार कुठे पैसे लावत आहेत

Share Market

नवी दिल्ली । शेअर बाजार गुरुवारीही वाढीसह सुरू झाले. सेन्सेक्स 223 अंकांनी उसळी घेत 58,220 पातळीवर उघडला तर निफ्टीने 85 अंकांची वाढ करून 17,407 पातळीवर ट्रेड सुरू केला.

सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा एकदा बुधवारप्रमाणे प्रगती करत आहेत. आजही तेजीने व्यवसाय सुरू केल्यानंतर काही वेळातच विक्रीला वेग आला होता. सकाळी 9.28 वाजता सेन्सेक्स 175 अंकांनी वर होता तर निफ्टी 59 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. याआधी बुधवारीही बाजाराने तेजीसह ट्रेडिंगला सुरुवात केली होती पण शेवटी तो 145 अंकांच्या घसरणीने बंद झाला.

गुंतवणूकदार येथे पैज लावत आहेत
आजच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांची नजर टीसीएस, विप्रो आणि टाटा मोटर्सच्या शेअर्सवर आहे. दुसरीकडे, एचडीएफसी लाइफ, एचडीएफसी बँक, एचयूएल, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि डॉ रेड्डीज लॅब्स सारख्या स्टॉकपासून दूर आहे. जागतिक ब्रोकर जेपी मॉर्गन यांनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 27 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे, जी येत्या काही दिवसांत दिसून येईल.

आशियाई बाजारात संमिश्र कल
17 फेब्रुवारीला सकाळी उघडलेल्या आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसत आहे. सिंगापूरचा एक्सचेंज 0.29 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता, तर जपानचा निक्केई 0.41 टक्क्यांनी घसरला होता. याशिवाय, दक्षिण कोरियाच्या कॉस्पीमध्येही 1 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली. एका दिवसापूर्वी चीन आणि हाँगकाँग सारखे मोठे एक्सचेंज ग्रीन मार्कवर बंद झाले होते.