Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2831

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकर याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. अबू बकर याला 29 वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. लवकरच संयुक्त अरब अमिराती अबू बकर याला भारताकडे हस्तांतरित करणार आहे.

1993च्या बॉम्बस्फोटाचा अबू बकर हा मुख्य सूत्रधार असल्याचं बोललं जातंय. तो यूएई आणि पाकिस्तानात राहत होता. यूएईमधील भारतीय एजन्सीच्या माहितीनुसार त्याला नुकतच पकडण्यात आल्याचं कळतंय. 2019मध्ये खरंतर बकरला अटकही करण्यात आली होती. मात्र काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. अखेर आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली

अबू बकर याचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख असून तो दाऊदच्या अगदी जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. अबू बकरने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण तसेच स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे पुरावे आढळले आहेत. पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती येथे त्याचे वास्तव्य राहिलेले आहे.

हप्ता घेताना पोलीस निरीक्षक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद – वाळुज हद्दीतून वाळूची वाहतूक करून देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी करणाऱ्या शहर वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक आस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहात पकडले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.‌ पोलिस कर्मचाऱ्याचा गेम करणाऱ्या तक्रारदारानेच अधिकाऱ्याचा गेम केल्याची चर्चा रंगली आहे.

एसीबीकडे वाळूचा व्यवसाय करणाऱ्या एकाने वाळूज वाहतूक विभागाचे निरीक्षक जनार्दन साळुंखे (45) हे मासिक हप्ता म्हणून पाच हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार नोंदवली होती. एसीबीचे निरीक्षक संदीप राजपूत यांच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात तक्रार दाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना साळुंखे यास रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजपूत, हवालदार राजेंद्र जोशी, भूषण देसाई, केवलसिंग गुसिंगे, मिलिंद इप्पर, चांगदेव बागूल यांच्या पथकाने केली.

घरगुती वादातून गडचिरोलीत मुलाने केला जन्मदात्या बापाचाच खून

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोली शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतर असलेल्या विसापूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापावर कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे. काल संध्याकाळी हि धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मृत व्यक्तीचे नाव दामोदर भिकाजी तांगडे असे आहे तर आरोपी मुलाचे नाव तेजस दामोदर तांगडे असे आहे. आरोपी हा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असताना गडचिरोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवला.

मोठा मुलगा पोलिस खात्यात कामाला
मृत दामोदर भिकाजी तांगडे यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा सुरजागड येथील पोलिसांच्या सी 60 या पथकात कार्यरत आहे. तर लहान मुलगा आरोपी तेजस हा बेरोजगार होता. तो घरीच राहत होता. यामुळे आरोपी तेजस आणि त्याच्या वडिलांमध्ये भांडण होत होते. याच वादातून आरोपी तेजसने रागाच्या भरात वडिलांचा खून केला. आरोपी खून केल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

दोन तासांत आरोपी ताब्यात
दारूच्या नशेत असलेल्या वडिलांसोबत आरोपी मुलाचा वाद झाला. वडील नेहमीच दारू पिल्यानंतर अभ्रद्र बोलायचे. याचा राग मनात धरून लहान मुलाने कुऱ्हाडीने जन्मदात्या बापाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला दोन तासांत अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

दारुसाठी मुलाचे पैंजण विकल्याने पत्नीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दारुसाठी पतीने मुलाच्या पायातील पैंजन मोडल्याने पती पत्नींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणातून प्रतिमा बदडे यांनी टोकाचे पाऊल उचलत प्रतिमा हिने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मृत प्रतिमा बदडे हिने आत्महत्या केल्याचे सासू सुनीता अशोक बदडे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी मुलगी सपना बाळू ढोबळे हिच्या मदतीने सून प्रतिमा हिस खाली उतरवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच प्रतिमा बदडे यांचा मृत्यू झाला होता.

प्रतिमा सोमनाथ बदडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी प्रवीण बाळासाहेब मायणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मृत प्रतिमा हिचा सात वर्षांपूर्वी सांगोला येथील सोमनाथ अशोक बदडे यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला लग्नानंतर एक मुलगा, एक मुलगी असे दोन अपत्य आहेत. छोट्याशा कारणावरून प्रतिमाने टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिरजेत सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमविवाह करणे तरुणाला पडले महागात

सांगली : हॅलो महाराष्ट्र – आताच्या घडीला प्रेम विवाह हि क्षुल्लक गोष्ट मानली जात आहे. मात्र आजही आपल्या समाजात प्रेमविवाह केला म्हणजे घराण्याची अब्रू वेशीला टांगली, असे भूरसटलेले विचार असणारी माणसे आहेत. हे चित्त थरारक सत्य सैराट या मराठी चित्रपटातून हुबेहूब मांडण्यात आले आहे. अशाच प्रकारची एक घटना सांगतीमध्ये घडली आहे.

काय आहे प्रकरण ?
सांगली जिल्ह्यातील मिरजेमध्ये एका तरुणावर प्रेम विवाह केला म्हणून त्याच्या सासरच्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेतील पीडित तरुणाचे नाव योगेश लवाटे असे आहे. या तरुणाने दीड महिन्यांपूर्वी वाळवा तालुक्यातील भडकंबे येथील तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या पीडित तरुणाचे त्याच्या पत्नीवर प्रचंड प्रेम होतं. पण मुलीच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी कुटुंबियांना न सांगता प्रेमविवाह केला होता.

यामुळे मुलीच्या कुटुबियांना राग आला होता. त्यांना मुलीपेक्षा प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची वाटत होती. यामुळे त्यांनी या घटनेचा सुड घेण्याचे ठरवले. या दरम्यान दोन दिवसांपूर्वी योगेश लवाटे आणि मुलीचे आई-वडील यांच्यात मोठे भांडण झाले होते. हे भांडण एवढे मोठे झाले कि मिरज शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. यानंतर योगेश लवाटे हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास घरी निधाला असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे मिरज शहरसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

शेअर बाजार 1 लाखांची लेव्हल कधी गाठणार?? एक्सपर्ट म्हणतात की….

Recession

नवी दिल्ली । Jefferies चे जागतिक इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट क्रिस्टोफर वुड यांनी म्हटले आहे की,” भारतीय शेअर बाजार 1,00,000 चा टप्पा गाठण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. त्यांना विश्वास आहे की EPS मध्ये 15 टक्के वाढ होणे शक्य आहे आणि त्यांचे मूल्यांकन हे गेल्या पाच वर्षांच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. भारतीय बाजारासाठी महागाई हा चिंतेचा विषय नसल्याचे वुड यांचे म्हणणे आहे. US Fed पॉलिसी आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय शेअर बाजार धोक्यात आला आहे.

क्रिस्टोफर वुड म्हणाले की,”भारतीय शेअर बाजाराची वाढ ही गुंतवणूकदारांसाठी नेहमीच चांगली राहिली आहे. ग्रोथ ओरिएंटेड इक्विटीसाठी भारत हा प्रमुख केंद्रबिंदू असायला हवा.” वुड पुढे म्हणाले की,” ते आपल्या दीर्घकालीन भारत पोर्टफोलिओमध्ये देशांतर्गत मागणी कायम ठेवतील.”

यापूर्वी, इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत वुड यांनी म्हटले होते की,”US Fed मुळे भारतीय शेअर बाजारात थोडीशी सुधारणा झाल्यास त्यांना अजिबात आश्चर्य वाटणार नाही.” वूड म्हणाले की,” इथे हे समजून घेणे आवश्यक आहे की, वाढती महागाई ही भारतातील समस्या नसून ती अमेरिका आणि G7 जगासाठी चिंतेची बाब आहे.”

भारतीय बाजारपेठ मजबूत आहे
वुड म्हणाले की,”जर Fed पॉलिसीमुळे जागतिक बाजारात सुधारणा होत असेल, तर भारतीय शेअर्स खरेदी करण्याची संधी म्हणून ती घेतली पाहिजे.” वुड पुढे म्हणाले की,” रुपया अजूनही वरच आहे. यावर्षी भारतीय बाजारासाठी दोन धोके आहेत. एक म्हणजे US Fed रिझर्व्हची पॉलिसी आणि दुसरे म्हणजे तेलाच्या वाढत्या किमती. भारतातील हाऊसिंग मार्केट रिकव्हरीच्या टप्प्यात आहे. भारताच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी हे सकारात्मक लक्षण आहे. भारतात देशांतर्गत मागणी वाढत आहे. याचा अर्थ उच्च व्याजदर असूनही मार्केट चांगली कामगिरी करेल.”

केवळ ख्रिस्तोफर वुडच नव्हे, तर अन्य काही दिग्गज मार्केट एक्सपर्टर्सनीही भारतीय शेअर बाजाराच्या भविष्यात नवा आदर्श ठेवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे अध्यक्ष रामदेव अग्रवाल यांनीही पुढील दहा वर्षांत सेन्सेक्स 50,000 वरून 2,00,000 पर्यंत वाढेल असे सांगितले होते. येत्या दहा वर्षांत बाजारपेठ चार पटीने वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. दहा वर्षांत सेन्सेक्सने चार वेळा ही कामगिरी केली आहे.

दररोज 150 रुपयांची गुंतवणुक करून मिळेल 20 लाखांचा फंड, ‘या’ बचत योजनेबद्दल जाणून घ्याच

Business

नवी दिल्ली । जर तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीऐवजी छोट्या गुंतवणुकीत रस असेल तर पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेबद्दल जाणून घ्या, जिथे तुम्ही दररोज 150 रुपये गुंतवून फक्त 20 वर्षांत 20 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा करू शकता.रोजच्या खर्चातून काही अनावश्यक खर्च थांबवल्यास 100-150 रुपये रोजची बचत होऊ शकते. हे पैसे तुम्ही सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये टाकले तर तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.

जाणून घ्या 20 लाख रुपयांहून जास्तीची रक्कम कशी मिळवावी ?
जर तुमचे वय 25 वर्षे असेल तर लहान रकमेमध्ये मोठा रिटर्न मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमचे उत्पन्न 30-35 हजार रुपयांपर्यंत असेल तर इतर कोणत्याही बचतीव्यतिरिक्त, सुरुवातीला तुम्ही दररोज 100-150 रुपये वाचवू शकता. ही बचत तुम्हाला 45 व्या वर्षी 20 लाख रुपयांपेक्षा जास्तीचा फंड देऊ शकते, ज्यामुळे तुम्ही काम करताना तुमच्या मोठ्या गरजा सहजपणे पूर्ण करू शकाल.

>> जर तुम्ही दररोज 150 रुपयांची बचत करण्याच्या उद्देशाने PPF मध्ये गुंतवणूक केली तर ते मासिक 4500 रुपये होईल.
>> दरमहा 4500 रुपयांची गुंतवणूक केल्यास वार्षिक 54 हजार रुपयांची गुंतवणूक होईल.
>> त्याच वेळी, 20 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 10.80 लाख रुपये असेल.
>> 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढीच्या बाबतीत, यामध्ये तुम्हाला 20 वर्षांत 20 लाखांपेक्षा जास्त फंड तयार होईल.

PPF खात्याचे फायदे
>> हे खाते फक्त 100 रुपयांमध्ये उघडता येते. जॉईंट अकाउंट देखील उघडता येते.
>> त्यात फक्त खाते उघडतानाच नॉमिनेशनची सुविधा आहे. 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतरही तो 2 वेळा 5-5 वर्षांसाठी वाढवता येतो.
>> यातून मिळणारे उत्पन्न टॅक्स फ्री आहे. तिसर्‍या आर्थिक वर्षापासून खात्यावर कर्जही घेता येते. बँका, पोस्ट ऑफिस तुम्हाला PPF खाते उघडण्याची सुविधा देतात. हे खाते 15 वर्षांसाठी उघडता येते, जे आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येते.
>> सध्या, PPF वर 7.1 टक्के व्याजदर आहे, जो वार्षिक चक्रवाढ आहे. PPF मध्ये किमान 100 रुपयांमध्ये खाते उघडता येते. यामध्ये एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, तुम्ही एका वर्षात खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.

धक्कादायक ! टवाळखोराचा मुख्याध्यापकावर तलवारीने प्राणघातक हल्ला

औरंगाबाद – मुलींची छेड काढू नये असे समजावून सांगणाऱ्या मुख्याध्यापक व वसतिगृह अधिक्षकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहराजवळ घडली. कन्नड शहरा जवळील साखर कारखान्यासमोर आसलेल्या कर्मवीर काकासाहेब महाविद्यालयात ही खळबळजनक घटना आज घडली. या घडनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुजीब जमील शेख असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुजीब जमील शेख हा मक्रणपूर येथील रहिवासी आहे. मुजीब जमील शेख हा युवक शाळा सुटली की दररोज शाळेबाहेर येवून मुलींची छेड काढत असे. यासंदर्भात मुलींनी हा प्रकार मुख्याध्यापक ए पी चव्हाण यांना सांगितला. दरम्यान, शाळा सुटल्यावर मुजीब जमील शेख हा युवक तेथे दिसल्याने मुख्याध्यापक चव्हाण यांनी त्याला जाब विचारला. दररोज या परिसरात कशाला येतो, असा जाब मुख्याध्यापक यांनी मुजीब जमील शेख याला विचारला. याचा राग आल्याने मुजीब जमील शेख याने तलवारीने मुख्याद्यावक चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला.

मुजीब जमील शेख याने केलेल्या तलवारीचा हल्ला मुख्याद्यापक चव्हाण यांनी चुकवला, मात्र तलवारीचा हा वार मुख्याध्यापक चव्हाण यांच्या खांद्याला व कानावर बसला. त्यामुळे मुख्याध्यापक चव्हाण यांच्या खांद्याला व कानाला गंभीर जखम झाली. दरम्यान ही घटना समजताच वसतिगृह अधिक्षक संतोष जाधव हे मुख्याद्यापक चव्हाण यांच्या मदतीला धावले. याशिवाय अन्य शिक्षक वर्ग मदतीला धावल्याने मुजीब जमील शेख हा घटनास्थळावरून पसार झाला. शिक्षकानी जखमी मुख्याध्यापक व सहकारी यांना रुग्णालायात दाखल केले. या घटनेमुळे मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पैशांपुढे मैत्री हरली! पैशांच्या वादातून तरुणाने आपल्या जिवलग मित्रालाच संपवले

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने पैशांच्या वादातून जिवलग मित्राचीच हत्या केली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज गावामध्ये घडली आहे. या हल्ल्यात शहाजी जाधव या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मुखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरुन झालेल्या वादातून मित्राने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय आहे प्रकरण?
पैशांच्या वादातून तरुणाने मित्राची हत्या केली आहे. आरोपी आणि मृत तरुण हे दोघेजण एकमेकांचे जिवलग मित्र होते. या दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणी वरुन वाद झाला होता.

पैशांच्या मागणीवरुन वाद
आरोपी ज्ञानेश्वर जाधव याने मृत शहाजी जाधवकडे पैशांची मागणी केली होती, मात्र माझ्याकडे पैसे नाहीत, काकाला येऊ दे, देतो, असे शहाजीने ज्ञानेश्वरला सांगितले. यामुळे ज्ञानेश्वरला राग अनावर झाला आणि त्याने जवळच्या धारदार शस्त्राने शहाजीच्या पोटात, छातीवर वार करून त्याला ठार केले.

गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
हा हल्ल्यामध्ये शहाजी हा रक्तबंबाळ झाला होता. यानंतर शहाजीवर मुखेडमध्ये प्राथमिक उपचार करून त्याला नांदेडला हलवण्यात आले. मात्र नांदेडला सरकारी रुग्णालयात आणताच डॉक्टरांनी शहाजीला मृत घोषित केले.

तरुणावर हत्येचा गुन्हा
या प्रकरणी मृत शहाजीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मुखेड पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला गावातून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दररोज 250 रुपये वाचवून तयार करा 62 लाखांचा फंड; कसे ते जाणून घ्या

EPFO

नवी दिल्ली । तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवणूक करायची असेल तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो. 15 वर्षे सतत गुंतवणूक केली जाते. या कालावधीत पैशांची गरज नसल्यास, गुंतवणुकीचा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येतो.

वास्तविक, PPF मध्ये संपूर्ण सुरक्षिततेची हमी सरकारकडून दिली जाते. त्यामुळे त्यावर कोणताही धोका नाही. तुम्ही त्यात दररोज 250 रुपये गुंतवल्यास, तुम्ही मॅच्युरिटीवर 62 लाख रुपयांचा मोठा निधी कमवू शकता. मुलांचे शिक्षण, लग्न आणि आर्थिक आणीबाणीसाठी याचा वापर करता येईल.

PPF वर FD पेक्षा जास्त व्याज मिळते
PPF वरील व्याजदर साधारणत: 7 ते 8 टक्के असतो. सध्या PPF वर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळते. ही रक्कम अनेक बँकांच्या FD पेक्षा जास्त आहे. PPF खात्यात, तुम्ही वार्षिक कमीत कमी 500 रुपये तर जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. याच्या मॅच्युरिटीचा कालावधी 15 वर्षे आहे. यानंतर, तुम्ही हे पैसे काढू शकता किंवा तुम्ही दर 5 वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करू शकता.

अशा प्रकारे गणित समजून घ्या, मॅच्युरिटीच्या पैशावर टॅक्स नाही
जर तुम्ही PPF खात्यात दरवर्षी 1.50 लाख रुपये गुंतवले तर 15 वर्षांनंतर तुम्हाला सुमारे 41 लाख रुपये मिळतील. याशिवाय, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून आणि पुढील 25 वर्षे म्हणजे वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत दररोज 250 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 62.5 लाख मिळतील. विशेष म्हणजे या पैशावर कोणताही टॅक्स लागणार नाही आणि एकूण व्याज सुमारे 40 लाख रुपये असेल.