Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2830

पुण्यातील पहिली ते आठवी शाळा पूर्णवेळ सुरु; अजित पवारांची माहिती

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे जिल्ह्यातील शाळा १ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आल्या आहेत. यापूर्वी पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग हे हाफ डे पद्धतीने सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आता पूर्णवेळ शाळा भरतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. ज्या वेळेस शाळा सुरु करण्याची माहिती देण्यात आली होती तेव्हा त्यावेळच्या परिस्थिती नुसार शाळा हाफ डे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आत्ताची स्थिती पाहता पुण्यात पहिले ते आठवी शाळा पुर्ण वेळ शाळा सुरु होणार असल्याची अजित पवारांनी दिली

दरम्यान पुणे जिल्ह्यात कोरोना निर्बंधात कोणतीही शिथिलता नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुण्यात सद्यस्थितीला 45 टक्के रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येत घट झाली असली तरी घाईत निर्णय घेणार नाही. अजून एकदोन आठवडे थांबूनच मगच कोरोना निर्बंधाच्या शिथिलते बाबत निर्णय घेण्यात येणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

राष्ट्रवादीकडून मला अडकविण्यासाठी खोट्या अपरहणाचे नाटक : शिवसेनेच्या नेत्याचा आरोप

दहिवडी | दहिवडी नगरपंचायतीत अपक्ष उमेदवार हा आमच्या विचाराचा होता. त्यामुळे आम्ही त्याविरोधात उमेदवार दिला नाही. निवडीनंतरही अपक्ष उमेदवाराने आमच्याशी संपर्क साधला होता. सध्या ते राष्ट्रवादीच्या बरोबर असले तरी नगरपंचायतीच्या सत्तेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही अपक्ष नगरसेवकाशी संपर्क साधला होता. यादरम्यान राष्ट्रवादीने मला अडकवण्यासाठी खोट्या अपरहणाचे नाटक केले असल्याचा आरोप शिवसेनेचे युवानेते व सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक शेखर गोरे यांनी केला प्रसिध्दी पत्रकाद्वारे आहे.

शेखर गोरे पुढे म्हणाले, आपली राज्यात सत्ता आहे. एकविचाराने राहिलो तर आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यावर वर्चस्व मिळवू शकतो. यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यासाठी सकारात्मक होतो. प्रभाकर देशमुख दिलेला शब्द पाळतील असे वाटत होते. परंतु स्वत: राजकारणात काहीच करत नाहीत आणि कुणाला काही करून देत नाहीत. बगलबच्चे व भुरट्यांच्या ऐकण्यावरून देशमुखांनी दिलेला शब्द फिरवला. मार्केट कमिटीलाही आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र याच भुरटे व बगलबच्यांचे ऐकून शिवसेनेला कमी लेखण्याची चूक त्यांनी केली होती. सत्तेपासून दूर राहण्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. माण तालुक्यात शिवसेनेला कमी समजणार्‍यांना मार्केट कमिटी व दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे हे शिवसेना ठरवू शकते. तेवढी ताकद आम्ही निर्माण केली आहे. दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना पॅनेल टाकू शकत नाही, अशी चर्चा होती. त्याच भीतीने आमच्या काही प्रमुखांनी आमची साथ सोडली. आपण उशीरा का होईना पण नगरपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नवख्या युवकांना बरोबर घेत फळी उभी करून अगदी शेवटपर्यंत जोरदार झुंज दिली. पाच जागा लढवत तीन जागांवर यश मिळवले. एक उमेदवार फक्त वीस मतांनी पराभूत झाला आहे. दहिवडीतील दिग्गज नेतेमंडळींना आमच्या शिलेदारांनी पराभूत केले, तर काहींना घाम फोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे शिवसेनेची काय ताकद आहे ते सर्वांना समजले आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍यांना सत्ता स्थापनेत आमच्या मदतीचा व दिलेल्या शब्दांचा विसर पडला असून आगामी निवडणुका व नगरपंचायतीत येणार्‍या काळात शिवसेना पुन्हा आपली ताकद दाखवून देईल, असा इशाराही त्यांनीदिला.

शब्द न पाळणारा नेता म्हणून ओळख होवू नये 

दहिवडी नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्याशीही आमची चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी नगरपंचायत संदर्भात आपल्याला पहिला शब्द दिला होता. त्यानंतर दुसर्‍या बैठकीत आगामी निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात तसेच नगरपंचायती संदर्भातला दुसरा शब्द दिला होता. मात्र, त्यांनी आम्हाला दोनवेळा दिलेले शब्द पाळले नाहीत. तालुक्यात शब्द न पाळणारा नेता म्हणून आपली ओळख होवू नये यासाठी तरी त्यांनी यापुढील काळात काम करावे हा आमचा सल्ला राहील. आगामी जि. प., पं. स., म्हसवड नगरपालिका एकत्र लढवण्यासंदर्भात आम्ही विचार करत होतो. मात्र शब्द न पाळणार्‍या लोकांसोबत जाण्यापेक्षा स्वबळावर लढलेले बरे. मार्केट कमिटी, दहिवडी नगरपंचायतप्रमाणे पुन्हा एकदा शिवसेना आपली ताकद दाखवून देईल, असेही शेखर गोरे म्हणाले.

राष्ट्रवादीचे तीन उमेदवार शिवसेनेमुळे नगरसेवक

नगरपंचायत निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांना सर्व बाजूने ताकद दिली होती. शिवसेनेमुळेच ते आज नगरसेवक आहेत. आमची मदत नसती तर ते आज नगरसेवक नसते. त्या तीन नगरसेवकांचा जर आपण फक्त राष्ट्रवादीमुळेच जिंकलोय असा भ्रम झाला असेल तर त्यांचाही हा शेवटचा गुलाल असेल. त्यांनी राजीनामा देऊन फक्त पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असा इशाराही शेखर गोरेंनी दिला.

आमच्यावर ट्रॅप लावणारे जन्माला यायचे आहेत

दहिवडी नगरपंचायतीच्या सत्तेसंदर्भात आम्ही अपक्ष नगरसेवकाशी चर्चेसाठी संपर्क केला होता. राष्ट्रवादीच्या लोकांनी या चर्चेला अपहरणाचे स्वरूप आणत आमचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अपहरणाचं नाटक करून आमच्यावर ट्रॅप लावणारे अजून जन्मायचे आहेत. त्यांनी व त्यांच्या बगलबच्यांनी ती स्वप्नेही पाहू नयेत. सर्वांना पुरून उरणारी आमची औलाद आहे. आम्ही एक तर कोणाच्या वाटेला जात नाही आणि एखादा आमच्या अंगावर आलाच तर त्याला सोडतही नाही, असेही शेखर गोरे म्हणाले.

आगामी लोकसभेला शिवसेना देशभरात 100 जागा लढवणार- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना देशभरात १०० जागा लढवू शकते, त्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत सध्या उत्तरप्रदेश मध्ये असून आज शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत म्हणाले, आम्ही काय उत्तरप्रदेश मध्ये विधानसभेसाठी २०० जागा लढवत नाही. आम्ही जास्तीत जास्त ५० -५५ जागा लढवत आहोत. खरे तर ही 2027 ची तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशात आम्ही लोकसभा लढतोय. आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात 100 उमेदवार उभे करायचा शिवसेनेचा विचार आहे, तशी चाचपणी सुरू असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

दरम्यान, यावेळी त्यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत भाष्य केले. मतांच्या ध्रुवीकरणासाठी केलेला हा प्रयत्न आहे असे त्यांनी म्हंटल तसेच ज्या ५ गोळ्या ओवेसींच्या गाडीवर फायर केल्या गेल्या. त्यातली सर्व गोळ्या टायरच्या वर लागतात, हे नेमके काय आहे? असा सवाल त्यांनी केला. ओवेसींकडे मुस्लीमही आकर्षित होत नाहीत. त्यासाठी हे सारे काही सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

तत्वतः मंजूरी : सातारा जिल्ह्यातील तीन गडावर आता रोप- वे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोल्हापूर- कागल राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याकरीता 2009 कोटी रूपये, खंबाटकी दुस-या बोगदयाच्या उर्वरित कामासाठी 493 कोटी आणि कराड-चिपळुण नवीन राष्ट्रीय महामार्गाचे कामासाठी असे मिळुन, रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 3000 कोटी रूपयांची उपलब्धता करण्यात आली आहे. तर प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड रोप-वे च्या प्रस्तावाला नितिन गडकरी यांनी तत्वत: मंजूरी देवून, पुरेसा निधी देण्याचे मान्य केले आहे. रोप-वे मुळे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्टया सातारा जिल्हयाच्या विकासाला एक वेगळी उंची आणि चालना मिळणार आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्ली येथून दिली आहे.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाकरीता तसेच बोगद्याच्या कामाकरीता निधीची मागणी सातारा जिल्हयातील तीन ठिकाणच्या रोप-वे चा दिलेला प्रस्ताव तसेच सातारा जिल्हयासह पश्चिम महाराष्ट्राच्या विविध विकासकामांचा पाठपुराव्याच्या अनुषंगाने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, चालु अधिवेशन काळात, रस्ते वाहतुक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंत्रालयात सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करताना, किल्ले अजिंक्यतारा किल्ले प्रतापगड आणि सज्जनगड या किल्ल्यांवर जाण्यासाठी रोप-वे चा प्रस्तावास नितिन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच प्रदान करण्यात येईल असे ठामपणे सांगितले आहे.

तसेच राष्ट्रीय महामहार्गाचे शेंद्रे ते कागल टप्प्यातील सहापदरीकरणाचे कामास रूपये 2009 कोटी आणि खंबाटकी बोगदयाच्या उर्वरीत कामासाठी 493 कोटी रूपये, तर चिपळुण ते कराड या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी देखिल मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचे नितिन गडकरी यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

कामाची निकड आणि आमची मागणी विचारात घेवून, नागरीकांच्या हितासाठी सुमारे 3 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीची उपलब्धता करून दिल्याबददल गडकरी यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आभार मानलेच तथापि तमाम जनतेच्या वतीने धन्यवाद देखील दिले आहेत.

शहरात दोन वर्षात 12 लाख 50 हजार कोरोना तपासण्या

Corona

औरंगाबाद – मागील दोन वर्षापासून देशभरात कोरोना तपासण्या मोफत केल्या जात आहेत. परंतु कोरोना टेस्ट वर होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च आता शासनाला परवडत नाही. त्यामुळे भविष्यात या तपासण्या सशुल्क कराव्या लागणार आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ॲंटीजेनची कीट 450 रुपयांना खरेदी करण्यात आली. आता खासगी कंपन्या त्याच कीट आरोग्य यंत्रणांना अवघ्या 9 रुपयांना विकत आहेत.‌ कोरोनाची पहिली लाट मार्च 2020 मध्ये आली. तेव्हा कोरोना तपासण्या कशा करायच्या असा प्रश्न पडला. केंद्र राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे अँटीजेन, आरटीपीसीआर पद्धतीने तपासणी करण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात किट खरेदी करण्यात आल्या. कीट मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेची मोठी दमछाक होत होती. औरंगाबाद महापालिकेने दिल्ली येथील खासगी कंपनीकडून किट खरेदी केल्या होत्या. ॲंटीजेनची एक किट 450 रुपयांना तर आरटीपीसीआरची एक किट 110 रुपयांना देण्यात आली. हळूहळू कंपन्यांनी किटचे दर कमी केले. आता ॲंटीजेनची कीट 9 रुपये 50 पैसे तर आरटीपीसीआर 13 रुपये 50 पैशांना मिळत आहे.

राज्य शासनाने महापालिकांना किट खरेदी साठी लागणारी रक्कमही नंतर प्रदान केली. औरंगाबाद महापालिकेला आतापर्यंत 18 ते 20 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. मागील दोन वर्षांमध्ये शहरात 7 लाख 32 हजार 764 ॲंटीजेन तपासण्या करण्यात आल्या तर 5 लाख 29 हजार 217 आरटीपीसीआर तपासण्या केल्या. आता महापालिकांनी कोणत्याही प्रकारच्या किटची खरेदी करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत. शासनच किट खरेदी करून महापालिकांना देणार आहे. भविष्यात मोफत तपासण्या बंद करण्याचा विचारही शासनाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सार्वत्रिक निवडणूक : राज्यातील 25 जिल्हा परिषद व 284 पंचायत समितीची प्रभाग रचना

State Election Commission

सातारा |  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांची प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. दि. 8 ते 14 फेब्रुवारी 2022 या दरम्यान प्रभाग रचना करण्यासाठी संबधितांना हजर राहण्यासाठी सांगितले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे की, सदरचे कामकाज हाताळणारे उप जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांनी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीकरिता सोबत जोडलेल्या तक्त्यामधील नमूद केलेल्या दिनांकास आयोगाच्या कार्यालयात सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहावे. तसेच प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणी करण्यासाठी आयोगाचे दि.4/10/2011 च्या आदेशासोबतचे प्रपत्र-1, प्रपत्र-3, प्रपत्र-4, प्रपत्र-6 व प्रपत्र – 7 मधील माहिती (हार्ड तसेच सॉफ्ट कापी Excel Formatसह) तसेच नकाशे इ. कागदपत्रे आणावीत.

खालील 25 जिल्ह्यांचा समावेश 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या 25 जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या 284 पंचायत समितीचा समावेश आहे.

सातारा शहरात मुख्य रस्त्यावर भगदाड, सर्वत्र पाणीच पाणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडईच्या समोर मेन रस्त्याला मोठे भगदाड पडून रस्ता खचला आहे. रस्त्याला भगदाड पडल्याने प्रतापसिंह भाजी मंडईत पाणीच पाणी साठले होते. यामुळे प्रवाशी व भाजी मंडईतील ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

पोवाई नाका ते एसटी बसस्थानक दरम्यान असलेल्या तहसिलदार कार्यालयासमोरील रस्त्यांवर हे भगदाड पडलेले आहे. या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. अशातच भगदाड पडल्याने आणि पाणी वाहत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली.

रस्त्यांचे ऑडिट करण्याची मागणी

भाजी मंडईच्या समोर मेन रस्त्याला मोठे भगदाड पडून संपूर्ण मंडईत पाणीच पाणी झाले. या रस्त्याचा वाली कोण आहे. पीडब्ल्यूडीने नगरपालिका सातारा शहरातील चालू असलेल्या रस्त्यांचे व पूर्वीच्या झालेल्या रस्त्यांचे ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचे आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी सांगितले.

संजय राऊत आणि मित्र परिवाराचा 100 कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत आणि त्यांचे मित्र सुजित पाटकर यांचा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा आहे असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोव्हिड केंद्रांवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर्स पुरवले जायचे. या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

दरम्यान, यापूर्वी संजय राऊत यांचे जवळचे असलेले उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडी ने मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल करत अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्यावर १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या नातेवाईकांवर एकामागून एक चौकशी होत असताना आता राऊतांकडून नेमकं काय प्रत्युत्तर येत हे पाहावे लागेल.

‘वाईन’वरुन झेडपीतही शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

औरंगाबाद – सुपर शॉपी, किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय रद्द करावा, असा ठराव भाजप सदस्यांनी मांडताच शिवसेनेच्या सदस्याने देशात दारूबंदी करा असा ठराव केंद्र सरकारला पाठवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे ‘वाईन’ वरून काल जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. सुमारे अर्धा तास वाईन वर चर्चा झाली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यात दारूबंदी झाल्यास तुम्ही निवडणुकांना सामोरे कसे जाल, असा सवाल उपस्थित केल्याने या विषयावर पडदा पडला.

स्थायी समितीच्या बैठकीत सुरूवातीलाच सदस्य मधुकर वालतुरे यांनी राज्य सरकारने सुपर शॉपी, किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे तरूण देशोधडीला लागतील. त्यामुळे राज्य सरकारने सुपर शॉपी येथील वाईन विक्रीच्या परवानगीचा निर्णय रद्द करावा असा ठराव मांडला. या ठरावाला थेट विरोध न करता बांधकाम व अर्थ सभापती किशोर बलांडे यांनी ठराव योग्य असल्याचे नमूद करून, देशात दारुबंदी करावी असा ठराव केंद्र सरकारला पाठवावा अशी मागणी केली.

यावरून बलांडे आणि वालतुरे यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली. यानंतर आरोग्य सभापती गलांडे, सदस्य केशवराव तायडे, रमेश गायकवाड, उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड आणि शिवाजी पाथरीकर यांनी या चर्चेत उडी घेतली. राज्यातील वाईन विक्रीचा ठराव आणि देशात दारूबंदीचा ठरावावर सुमारे अर्धा तास आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.

सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य; शिवसेनेची टीका

Raut Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे तर केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत अशी टीका शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून केली आहे. शिवसेनेनं सामनातून राहुल गांधींचे अभिभाषण आणि केंद्राच्या अर्थसंकल्पावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

2014 च्या प्रचारात दिलेली वचने केंद्र सरकारच्या स्मरणात नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख, महागाई खतम करणार, इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. पाकव्याप्त कश्मीर पुन्हा परत आणणार, दोन कोटी बेरोजगारांना प्रत्येक वर्षी नोकया या वचनांची आठवण करून देणारे राष्ट्रद्रोही ठरवले जातात असे शिवसेनेनं म्हंटल.

2014 सालीच देश निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला आहे. माझे पणजोबा पंडित नेहरू हे देशासाठी पंधरा वर्षे तुरुंगात होते. माझ्या आजीने, इंदिरा गांधींनी देशासाठी शरीरावर 35 गोळ्या झेलल्या. माझे वडील राजीव गांधी हेसुद्धा देशासाठीच हुतात्मा झाले. तुम्ही मला काय देश शिकवता? मला माझा देश चांगला माहीत आहे, असा तीर राहुल गांधींनी सोडला व त्यामुळे सत्ताधारी घायाळ झाले.

देशासाठी बलिदान, रक्त सांडणे, त्याग वगैरे गोष्टींशी सध्याच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांचा संबंध राहिलेला नाही. दोन-पाच उद्योगपतीभोवतीच देशाचे चक्र फिरते आहे. सरकार म्हणजे काय? याचा विसर पडला आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हेच जणू मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. पुलवामा घडले ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांना संरक्षण व्यवस्थेची मोठी चूक वाटत नाही. हे का घडले? असे विचारणारे पाकचे एजंट ठरविले जातात असेही शिवसेनेनं म्हंटल.