Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2832

Meta चे शेअर्स घसरले, झुकेरबर्गच्या संपत्तीत झाली 31 अब्ज डॉलरची घट

नवी दिल्ली । Meta चे सीईओ मार्क झुकेरबर्गलाही फेसबुकच्या युझर्समध्ये घट झाल्यानेधक्का बसला आहे. मेटाच्या शेअर्समध्ये सुमारे 25 टक्के घसरण झाल्यामुळे मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत एका दिवसात $31 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. यासोबत झुकेरबर्ग जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या लिस्ट मधून बाहेर पडला आहे. 2015 नंतर ही अशी पहिलीच वेळ आहे की झुकेरबर्ग श्रीमंतांच्या टॉप 10 मध्ये नाही.

मेटाचा सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ याची संपत्ती देखील मेटाच्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे जवळपास $3 अब्जने घसरून $21.2 अब्ज झाली आहे. डस्टिन हे जगातील 79 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याच्याकडे सध्या $92 अब्ज एवढी निव्वळ संपत्ती आहे, जी बुधवारी बाजार बंद असताना $120.6 अब्ज होती

शेअर्सच्या किंमती घसरल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या संपत्तीत लक्षणीय घट होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, टेस्लाच्या एलन मस्कचे नोव्हेंबरमध्ये शेअर्स कोसळल्यामुळे एका दिवसात $ 35 अब्जांचे नुकसान झाले आहे. टेस्लाच्या शेअर्सच्या घसरणीमागे स्वतः मस्क कारणीभूत होते. त्यांनी ट्विटर पोलद्वारे लोकांना विचारले होते की, त्यांनी टेस्लाची 10 टक्के विक्री करावी का? यानंतर टेस्लाचे शेअर्सघसरले.

त्रैमासिक निकालांमुळे घसरले मेटाचे शेअर्स
Meta ने जारी केलेल्या त्रैमासिक रिपोर्ट्स नुसार, 2021 च्या चौथ्या तिमाहीत फेसबुकने मागील तिमाहीच्या आधारे अर्धा मिलियन (सुमारे 5 लाख) जागतिक डेली युझर्स गमावले आहेत. 2004 मध्ये फेसबुकच्या स्थापनेनंतर ही पहिलीच वेळ आहे की, त्याचे डेली अ‍ॅक्टिव्ह युझर्स (DAUs) कमी झाले आहेत. या काळात कंपनीच्या नफ्यातही घट झाली आहे. मेटाच्या रिपोर्ट्स नुसार, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामच्या युझर्सची वाढही नगण्य आहे. 17 वर्षांत पहिल्यांदाच फेसबुकचे युझर्स आणि उत्पन्न दोन्हीमध्ये घट झाली आहे.

1.930 ते 1.929 अब्ज युझर्स
मेटा चे तिमाही आर्थिक परिणाम दर्शवतात की, Facebook च्या डेली अ‍ॅक्टिव्ह ग्लोबल युझर्सची संख्या एका तिमाहीपूर्वी 1.930 अब्ज वरून आता 1.929 अब्ज इतकी कमी झाली आहे. त्याच वेळी, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम सारख्या इतर मेटा अ‍ॅप्समध्ये युझर्सची वाढ खूपच कमी होती. जगभरात त्याचे 5 लाख युझर्स कमी झाले आहेत. मेटा ने डिसेंबर तिमाहीत $10.3 अब्ज कमावले. या कालावधीत, कंपनीची विक्री एका वर्षापूर्वी $ 28.1 बिलियन वरून $ 33.67 बिलियन झाली आहे. मात्र, आम्ही प्रति शेअर कमाई पाहिल्यास, ती एका वर्षापूर्वी $3.88 वरून $3.67 वर आली आहे.

फेसबुक देत आहे विना गॅरेंटी 50 लाखांपर्यंतचे लोन; असा करा ऑनलाइन अर्ज

नवी दिल्ली । आपल्यापैकी बरेच जण आपले फोटो, व्हिडिओ आणि विचार शेअर करण्यासाठी Facebook वापरतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की फेसबुकवरून तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता? होय, तुम्ही कोणत्याही गॅरेंटी शिवाय Facebook वरून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

Facebook ने Small Business Loans Initiative सुरू केला आहे. यासाठी त्यांनी Indifi सोबत पार्टनरशिप केली आहे. यापूर्वी फेसबुकने केवळ 200 शहरांमध्ये लोन सर्व्हिस सुरू केली होती आणि आता ती 329 शहरांमध्ये विस्तारली आहे. कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. या लोनसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

तुम्हाला किती लोन मिळेल ?
फेसबुक किंवा मेटा स्वतः लोन देत नाही तर हे लोन Indifi ही कंपनी देते. याद्वारे तुम्हाला 2 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळू शकते. या लोनसाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. मात्र या लोनवर तुम्हांला 17 ते 20 टक्के वार्षिक व्याज भरावे लागेल. महिला उद्योजकांना व्याजदरात 0.2% सूट मिळेल. एकदा तुमचे लोन मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला फक्त एका दिवसात कन्फर्मेशन मिळेल. उर्वरित कागदपत्रे फक्त 3 दिवसात पूर्ण केली जातील.

लोन कोण-कोण घेऊ शकेल ?
या लोनसाठी फेसबुकने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या लोनसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय त्याच्या सर्व्हिस नेटवर्कसह भारतीय शहरात असावा. दुसरी अट म्हणजे तुम्ही मेटा किंवा फेसबुकशी संबंधित कोणत्याही अ‍ॅपशी किमान गेल्या 6 महिन्यांपासून कनेक्ट असला पाहिजे आणि तुमच्या व्यवसायाची जाहिरात केली पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत फक्त लहान उद्योजकांनाच लोन मिळणार आहे.

अशा प्रकारे अर्ज करा
लोनसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला Facebook Small Business Loans Initiative पेजवर जावे लागेल. तुम्ही Apply Now वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. यावर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित आणखी काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. मागितलेली सर्व माहिती भरून ती सादर करावी लागेल. तुम्ही लोनसाठी पात्र असल्याचे समजल्यास, कंपनी तुमच्याशी संपर्क करेल.

नांदेड-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; पादचाऱ्याला 100 फुट ओढत नेले

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड-हैदराबाद महामार्गावर रात्री एक भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देगलूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूर या ठिकाणी भरधाव ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडले आहे. या ट्रकचालकाने पादचाऱ्याला 100 फुट ओढत नेले आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात पादचाऱ्याच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले आहेत.

तरूणाचा जागीच मृत्यू, ट्रकचालक फरार
सोमनाथ हंटे असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मात्र गावकऱ्यांनी या ट्रकचालकाचा पाठलाग करून तेलंगणातून ट्रक ताब्यात घेतले. या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

खानापूर फाटा ठरलाय मृत्यूचा सापळा
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा हे ठिकाण सध्या मृत्यूचा सापळा बनले आहे. नांदेडहून हैद्राबादकडे जाणारी वाहने याच फाट्यावरून जात असतात. तसेच खानापूर फाट्यावर असलेल्या चौकातून मुखेड आणि बिलोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात गाड्या असतात. खानापूर फाटा या ठिकाणी भर चौकात देशी आणि विदेशी मद्य विक्रीची दुकाने आहेत. या दुकानातून दारू पिऊन आल्यानंतर अनेक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूचा सापळा म्हणून खानापूर फाटा अशी ओळख निर्माण झाली आहे.

‘या’ वर्षी सुरू होऊ शकते महिलांची आयपीएल; सौरव गांगूलींची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल ही भारतीय क्रिकेट स्पर्धा सर्वोच्च स्थानी पोचल्यानंतर आता महिलांचीही आयपीएल स्पर्धा भरवण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असतानाच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.

महिलांची आयपीएल स्पर्धा ही 2023 मध्ये आयोजित होऊ शकते. बोर्ड सध्या महिला आयपीएल स्पर्धेची तयारी करत आहे. 2023 मध्ये पुरुष आयपीएलसारखीच स्पर्धा आयोजित केली जाईल. अशी माहिती सौरव गांगुली यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत दिली.

दरम्यान, जागतिक क्रिकेटचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया येथील महिला बीग बॅश लीग आणि इंग्लंड टी-20 ब्लास्ट आणि द हंड्रेड सारख्या स्पर्धा सुरु आहेत. मात्र भारतात क्रिकेटचे एवढे वेड असून पण अद्याप महिलांची आयपीएल सुरू करण्यात आली नव्हती.

UAE ने लागू केला नवा कामगार कायदा; जाणून घ्या भारतीय कामगारांना काय सुविधा मिळणार

अबू धाबी । संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2 फेब्रुवारीपासून या देशात नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. या नव्या कायद्यात कामगारांना नवीन अधिकार देण्यात आले आहेत. UAE च्या अर्थव्यवस्थेत भारतीय नागरिकांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत भारतीय कामगारांनाही या नवीन कायद्याचे अनेक फायदे मिळतील, असे मानले जात आहे.

देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के भारतीय आहेत आणि त्यांची संख्या 35 लाख आहे. UAE च्या खाजगी क्षेत्रात मोठ्या संख्येने भारतीय नागरिक काम करतात. नवीन फेडरल डिक्री कायदा क्रमांक 33 हा कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणाची गॅरेंटी देतो. UAE च्या मानव संसाधन मंत्रालयाने सांगितले की, आता नवीन कायद्यानुसार आता प्रत्येक छोट्या गोष्टीची माहिती जॉब कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट केली जाईल.

नवीन करारामध्ये प्रत्येक माहिती समाविष्ट केली जाईल
नवीन करारामध्ये कामगार, त्याचा नियोक्ता, नोकरीचे वर्णन, कामाचे तास, सुट्ट्या, सामील होण्याची तारीख, कामाचे ठिकाण, पगार, वार्षिक रजा, सूचना कालावधी यासह प्रत्येक माहितीचा समावेश असेल. गल्फ न्यूजशी बोलताना UAE चे वकील अली मुसाबा म्हणाले की,” या नवीन कायद्यामुळे आता नोकरीचा करार मर्यादित काळासाठी असेल, जो पूर्वी नव्हता. कंपन्या आता जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी कामगार ठेवू शकतील. त्यानंतर पुन्हा रिन्यूअल करावे लागेल.”

आठवड्यातून किमान एक सुट्टी मिळेल
सरकारने सर्व खाजगी कंपन्यांना नवीन कायद्यानुसार नवीन करार तयार करण्यास सांगितले आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत कंपन्यांना नोकरीचे करार बदलावे लागतील. या नवीन कायद्यामुळे आता कोणताही मालक कायमस्वरूपी कामगार ठेवू शकणार नाही. आता कामगारांनाही काही नव्या सुट्या मिळणार असल्याचे मुसाबा यांनी सांगितले. या कायद्याअंतर्गत कंपन्यांना आता दर आठवड्याला किमान एक तरी सुट्टी द्यावी लागेल.

याशिवाय घरी कोणाचा मृत्यू झाल्यास तीन ते पाच रजा, परीक्षेच्या तयारीसाठी 10 दिवसांची रजा, महिलांना 60 दिवसांची प्रसूती रजा, 45 दिवसांची गरोदरपणात रजा पगारासह आणि 15 दिवसांची रजा अर्ध्या पगारासह सशर्त मिळतील. या नवीन कायद्यामुळे कर्मचारी आणि मालक यांच्यात पारदर्शकता वाढेल. नवीन कामगार कायदा लागू करण्यामागे UAE चा उद्देश विदेशी कामगारांना आकर्षित करणे हा आहे. यामुळे UAE मधील नियोक्ते आणि कर्मचारी यांच्यात चांगले संबंध निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.

पदोन्नती मिळताच एसीबीचे पोलीस निरीक्षक गायब; विभागात खळबळ

जालना – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे हे दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक जालना विभागातील संग्राम ताटे यांना दोन दिवसांपापूर्व गृहविभागाने काढलेल्या पदोन्नती आदेशानुसार पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. पदोन्नतीसह त्यांची कोकण विभागात बदली झाली होती. दरम्यान बुधवारी रात्री ते शहरातील यशवंतनगर येथील राहत्या घरातून मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगत ते घरातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी त्यांचा मोबाईलसह इतर साहित्य ही घरीच ठेवले. रात्री उशिरापर्यंत ते परत आले नाही.

या घटनेची माहिती गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांना मिळाली. त्यानंतर ते गुरुवारी दिवसभर जालना शहरात ठाण मांडून होते. शिवाय पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांचीही त्यांनी भेट घेतले. दरम्यान पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांचा शोध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला. मात्र ते मिळून आले नाही. अखेर गुरुवारी रात्री उशिरा पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल झाली आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे एक व कदीम जालना पोलिसांचे एक असे दोन पथक तापस कामी नेमण्यात आले आहेत. मात्र, पोलिस निरीक्षक अचानक गायब झाल्यावर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

आता फक्त रजिस्‍टर्ड ऑटोमेटिक टेस्टिंग सेंटर्समधूनच वाहनांची फिटनेस टेस्ट घेणे बंधनकारक असणार

Cars

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांच्या फिटनेसबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील वर्षापासून सरकारने रजिस्‍टर्ड ऑटोमेटिक टेस्टिंग स्‍टेशनमधून वाहनांची फिटनेस टेस्ट घेणे बंधनकारक केले आहे. याशिवाय इतर कोणत्याही फिटनेस सेंटर्समधील फिटनेस व्हॅलिड असणार नाही. यासंदर्भात मंत्रालयाने अधिसूचना जारी करून वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी मुदत ठेवली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जुन्या वाहनांना सरकारने मान्यता दिलेल्या ऑटोमेटिक टेस्टिंग स्‍टेशनमधून फिटनेस टेस्ट करावी लागेल. 1 एप्रिल 2023 पासून अवजड वाहने, अवजड प्रवासी वाहने आणि मध्यम भार असलेली वाहने तसेच प्रवासी वाहने आणि कमी वजनाची वाहने यांना 1 जून 2024 पासून सरकारी मान्यताप्राप्त ऑटोमेटिक टेस्टिंग स्‍टेशनमधून घेणे बंधनकारक असेल. वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी दोन वर्षांसाठी तर आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी एक वर्षाचे असेल.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत या संदर्भात जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. लोकांना 30 दिवसांत सूचना करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. लोक आक्षेप आणि सूचना संयुक्त सचिव (परिवहन), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली-110001 यांना किंवा [email protected] या ईमेलद्वारे पाठवू शकतात.

पतीच निघाला सूत्रधार; वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजेंच्या हत्येचे गूढ उलघडण्यात पोलिसांना यश

suvarna waje

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह एका गाडीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यांचा मृत्यू हा अपघात होता कि घातपात होता हे स्पष्ट झाले नव्हते. यानंतर जळालेल्या गाडीत आढळलेल्या मृतदेहाचा डीएनए अहवाल समोर आल्यानंतर मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए सेम असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांच्या जबाबावरून मृत सुवर्णा यांचे पती संदीप वाजेला अटक केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पती संदीप वाजेसह त्याच्या अन्य पाच साथीदारांविरोधात नाशिक ग्रामीणच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या सिडको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. घटनेच्या दिवशी रायगड नगर परिसरात एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. डॉ. सुवर्णा वाजे या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनासुद्धा दिली होती. पोलीस तपासात जळालेल्या गाडीचा चेसी नंबर आणि गाडी नंबर यावरुन ही गाडी डॉ. सुवर्णा वाजे यांची असल्याचं स्पष्ट झालं होते. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए चेक केला असता तो एकच असल्याचे समोर आले.

या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली असता डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप यानेच आपल्या पत्नीचा थंड डोक्याने काटा काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. कौटुंबीक कलह आणि त्यातून उडणारे वारंवार खटके यातूनच संदीप वाजे याने आपल्या मित्रांच्या मदतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी गाडीसह पत्नीचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी याचा कसून तपास करून आरोपी पतीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. कणकवली न्यायालयात याबाबत आज सुनावणी झाल्यानंतर नितेश राणे यांना न्यायालययीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नितेश राणे यांना आज दुपारी सिंधुदुर्ग कोर्टात आणण्यात आलं. त्यानंतर कोर्टात युक्तिवाद झाला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अपूर्ण असून अजून खूप तपास करायचा असल्याचे सांगत पोलिसांकडून नितेश राणे यांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी अमान्य करत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन अर्ज मोकळा झाला आहे.

जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे हे जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत. तशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे त्यामुळे सत्र न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

बंडातात्या कराडकरांची जामिनावर सुटका, पोलिसांकडून तब्बल अडीच तास चौकशी

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यांना सकाळी ताब्यात घेत त्याची तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांची तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान त्यांची पोलिसांकडून तब्बल अडीच तास चौकशी केली. याबाबत त्यांचे वकील संग्राम मुंढेकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. सातारा शहर पोलिसानी तात्यांना चौकशीसाठी बोलावत त्याच्याकडून चौकशी केली. तब्बल अडीच तासानंतर त्यांची तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

बंडातात्या नेमकं काय म्हणाले –

हभप बंडातात्या कराडकर यांनी सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर दारु पिण्याचे आरोप केले. या सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारुपिऊन रस्त्यावर नाचतात असा आरोप बंडातात्या यांनी केला. सुप्रिया सुळे दारुपिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो तुम्हाला ढिगाने मिळतील. राजकारणात येण्याआधी त्या दारुपिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतायत”, असं बंड्यातात्या म्हणाले.