Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2867

महापालिका निवडणुकांसाठी मनसे सज्ज; 2 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई , नाशिक आणि ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने कंबर कसली असून 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.

नाशिक, ठाणे, मुंबई येथील परिस्थितीचा आढावा राज ठाकरे पधाधिकाऱ्यांकडून घेणार असल्याचे समजते. शिवाय यावेळी राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना कानमंत्रही देणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असल्याने त्यांना रोखणं अवघड बनलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात माहाराष्ट्राचे राजकारण नेमकं कुठे जातंय हे पाहावं लागेल

खासगी सावकारी जोमात : जिल्ह्यात 7 दिवसात 15 गुन्हे दाखल

Ajaykumar Bansal Satara Police

सातारा | सातारा जिल्ह्यात वाढत्या खासगी सावकरी प्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घातले असून जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी जिल्ह्यात 7 दिवसात 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील खासगी सावकारी जोमात असून अजूनही बडे मासे पकडणे गरजेचे आहे.

सातारा जिल्हयात अवैध सावकारी व्यवसाय करणारे इसमांचे विरुध्द 22 जानेवारी 2022 रोजी पासून अवैध सावकारी विरुध्द विशेष मोहिम राबवून कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्हा पोलीस दलातर्फे 22 जानेवारी 2022 रोजी पासून 28 जानेवरी 2022 पर्यंत विशेष मोहिम राबवुन सातारा जिल्हयामध्ये अवैध सावकारी व्यवसाय करणा-या सावकारांविषयी गोपनीय माहिती प्राप्त करुन, अवैध सावकारांच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडीतांच्या तक्रारी घेवुन महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अवैध सावकारांच्या कारवाईची मोहिम यापुढे देखील सुरुच राहणार असून ज्या नागरीकांना बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणारांकडुन त्रास होत आहे. अशा तक्रारदारांनी संबंधीत पोलीस ठाणेस त्यांचे विरुद्ध तक्रार दाखल करावी जेणे करुन अवैध सावकारी व्यवसायाचे समूळ उच्चाटण करता येईल, असे आवाहन अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील नागरीकांना केले आहे.

फोनवरून सेक्ससाठी महिलांची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून बेदम चोप

विरार : हॅलो महाराष्ट्र – विरारमध्ये एका महिलेने शिवसेनेच्या विभागप्रमुखाला चपलेने बेदम मारहाण केली आहे. आरोपी तरुण हा फोन कॉल करुन सेक्ससाठी महिलांची मागणी करत होता. त्याच्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर या महिलेच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण ?
विरार पूर्वेकडील साईनाथनगर येथील शिवसेनेचा विभाग प्रमुख जितू खाडे असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. तर संबंधित महिला ही विरारलाच राहते. आरोपी जितू हा तिला फोन करुन, आयटम आहे का? अशी विचारणा करुन त्रास देत होता. यानंतर या महिलेने आरोपी जितू खाडे याला रिक्षामध्ये बसलेला असताना चपलेने बेदम मारहाण केली. यानंतर महिलेने जितू खाडे विरोधात विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल होताच जितू खाडे हा फरार झाला आहे.

जितू खाडे च्या कृतीला आमचा पाठिंबा नसून, वरिष्ठांशी बोलून, त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार असल्याचे शिवसेनचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे शिवसेना विभागप्रमुखाचे नाव समोर आल्याने आता पक्षाकडून जितू खाडेवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

SBI ने गर्भवती महिलांच्या भरतीचे नियम बदलले; आयोगाने जारी केली नोटीस

PIB fact Check

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI च्या महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबतच्या नियमांमध्ये झालेल्या बदलांवरून गदारोळ सुरू झाला आहे. SBI ने गर्भवती महिलेला तात्पुरते अयोग्य ठरवून 3 महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी नियुक्तीवर बंदी घातली आहे. यानंतर दिल्ली महिला आयोगाने बँकेला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

SBI ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, 3 महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिलेला त्वरित नवीन नियुक्ती दिली जाऊ शकत नाही. प्रसूतीनंतर चार महिन्यांनी त्या नोकरीवर रुजू होऊ शकतात. तोपर्यंत त्यांना तात्पुरते अनफिट मानले जाईल. या वादग्रस्त नियमावर CPI खासदार बिनॉय विश्वम यांनीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. त्या म्हणाल्या कि,” हे कसले महिला सक्षमीकरण आहे, जिथे तिला गर्भवती असताना अनफिट घोषित केले जाते. कामाच्या ठिकाणी हा महिलांशी भेदभाव आहे.”

आयोगाने भेदभाव करणारा कायदा म्हंटले
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी SBI चा नवीन नियम हा महिलांशी भेदभाव करणारा कायदा असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या कि, एखाद्या महिलेला 3 महिन्यांपेक्षा जास्त गर्भधारणेसाठी अनफिट घोषित करणे हे तिच्या मातृत्व अधिकारांचे उल्लंघन आहे. आम्ही त्यांना नोटीस बजावून हा महिलाविरोधी कायदा मागे घेण्याची मागणी करतो. 2009 मध्ये देखील बँकेने असाच कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता, जो नंतर मागे घ्यावा लागला होता.”

प्रमोशनवरही होऊ शकेल परिणाम
नव्या नियमावर टीका करताना ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन (AIDWA) ने म्हटले आहे की,” याचा महिला कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनवरही परिणाम होऊ शकतो. हा नवीन नियम 21 डिसेंबर 2021 पासून लागू झाला असला तरी प्रमोशनच्या बाबतीत तो 1 एप्रिल 2022 पासून लागू होईल. यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनवर परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत 6 महिन्यांच्या गरोदर महिलेला बँकेत रुजू करण्याचा नियम होता.

बँक संघटनांनीही आवाज उठवला
ऑल इंडिया एसबीआय एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस केएस कृष्णा यांनी SBI व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात नवीन मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याचे आवाहन केले आहे. हा नवा नियम पूर्णपणे महिलाविरोधी असून महिलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचे ते म्हणाले. गर्भधारणा कोणत्याही प्रकारे अयोग्य म्हणता येणार नाही. स्त्रीला तिच्या मुलाची प्रसूती किंवा नोकरी यापैकी एक निवडण्याची सक्ती करता येत नाही, कारण दोन्ही तिचे हक्क आहेत.

प्रभास, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मधील आवडता हिरो कोण ? राजामौली यांनी उघडपणे केलं ‘या’ अभिनेत्याचे कौतुक

नवी दिल्ली । बाहुबलीनंतर, देशभरातील लोकं आता राजामौली यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, मात्र कोविड-19 च्या वाढत्या उद्रेकामुळे, त्याच्या रिलीजची डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी 7 जानेवारी 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता, मात्र आता त्याच्या रिलीजची नवीन तारीख समोर आली आहे. रिलीज होण्यात उशिर होत असल्यामुळे त्यांचे चाहते निराश झाले आहेत, मात्र निर्मात्यांच्या मते या चित्रपटासाठी देखील लोकांचा तोच उत्साह दिसून येतो आहे जो बाहुबलीसाठी होता.

मात्र, येथे आम्ही तुम्हाला ‘RRR’ चा लीड अ‍ॅक्टर राम चरणबद्दल राजामौली यांनी केलेल्या कौतुकांबद्दल सांगणार आहोत, या अभिनेत्याने यापूर्वी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, त्यापैकीच एक असलेला मगधीरा हा चित्रपट देशभरातील लोकांना आवडला आहे. राजामौली यांना विशेषतः राम चरण फार आवडतो आणि त्यांनी अनेक प्रसंगी त्याची प्रशंसा देखील केली आहे.

आपल्या या आवडत्या हिरोचे कौतुक करताना राजामौली यांनी सांगितलेले काही कोट्स मायक्रो-ब्लॉगिंग साइट- ट्विटरवर व्हायरल होत आहेत. त्यापैकीच काही खाली दिले आहेत.
1. ‘मला राम भीमापेक्षा थोडा जास्त आवडतो’
2. ‘राम चरणचा इनसेन स्क्रीन प्रेझेन्स’
3. ‘राम चरण माझा हीरो आहे; मी त्याच्याकडून खूप काही शिकलो’
4. ‘RRR’ मधला राम चरणचा इंट्रो शॉट माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील सर्वोत्तम शॉट आहे’
5. ‘डेमी गॉड अल्लुरीच्या भूमिकेत राम चरणची उपस्थिती, तुम्ही वर्णन केलेल्या कोणत्याही पात्रात तो सहजपणे फिट होतो’

RRR या दोन तारखांना होऊ शकतो रिलीज
एसएस राजामौली हे मेगा पॉवर स्टारचे नेहमीच कौतुक करतात. ट्विटरवर व्हायरल होत असलेले हे कोट्स अनेक मुलाखती आणि लॉन्च इव्हेंटमधून काढले गेले आहेत, जे स्पष्टपणे सिद्ध करतात की, राजामौली यांना राम चरण खूप आवडतो. ‘RRR’ आता एकतर 18 मार्च किंवा 28 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार आहे, तिसरी लाट किती लवकर जाते आणि सामान्यता टिकते यावर ते अवलंबून आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होताच सर्व चित्रपटगृहे उघडतील आणि चित्रपट प्रदर्शित होईल.

माजी प्राचार्यांच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करत 10 कोटींची मालमत्ता परस्पर विकली

औरंगाबाद – एका माजी प्राचार्यांच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करून त्यांची सुमारे दहा कोटींची मालमत्ता परस्पर विकण्यात आल्याच्या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा तसेच बारा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित बारा वर्षीय मुलाच्या चुलत भावांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

एका माजी प्राचार्यांच्या पहिल्या पत्नीचे 2015 मध्ये निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीने त्यांच्या बारा वर्षीय मुलाचे शोषण केले. हा प्रकार उघडकीस आल्यावर सिटीचौक पोलीस ठाण्यात बाल कल्याण समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल नोंदविण्यात आला. याप्रकरणी भारती रगडे आणि तिचा प्रियकर विक्की ऊर्फ आयुष विजय मगरे यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात एकूण बारा जणांचा समावेश असल्याचे माजी प्राचार्यांच्या मुलाचा व पुतण्याचा दावा आहे. माजी प्राचार्यांची फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी येथील गट क्र. 107 व 92, नारळी बाग येथील सिटी सर्व्हे क्र. 2940 व बेगमपुरा येथील खुशबू हाऊसिंग सोसायटीतील स्थायी संपत्ती भूमाफियांनी गिळंकृत केली आहे. त्याचे खरेदीखत करून कोणत्याही प्रकारची रक्कम न देता फक्त बेनामी खरेदीखत करत फसवणूक केली. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावा.

या प्रकरणात भारती रगडे, विक्की मगरे यांच्यासोबतच सय्यद वाहेद सय्यद अमीर (रा. शंभूनगर, गारखेडा परिसर), शेख मोहम्मद शेख मुस्ताक (रा. गणेश कॉलनी), योगेश उत्तमराव पाथ्रीकर (रा. पार्थी, ता. फुलंब्री), विष्णू रंगनाथ काकडे (रा. वाघलगांव, ता.फुलंब्री), अब्दुल हकीम अब्दुल हमीद मोमीन (रा. छत्रपती चौक, एन-12, सिडको), अकिल भिकन शेख (रा. टिळकनगर, सिल्लोड), रोशन किसन औसरमल (रा. डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री), आप्पासाहेब शिवाजी साबळे (रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री), बालाजी गणपत हेंबारे (रा. घर क्र. 124, एन-2) आणि नाथा सुपडू काकडे (रा. वाघला, ता. फुलंब्री) यांचीदेखील चौकशी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त छत्तीसगड सिमेस लागून असलेल्या गॅरापत्ती या गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पोलिसांच्या आणि दुर्गम नक्षलग्रस्त भागातील स्थानिक आदिवासी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई थेट पोहोचले. नक्षलवादी हल्ल्यामुळे नेहमी संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्हयामध्ये शंभूराज देसाई यांनी ग्यारापत्ती येथील पोलीस आऊट पोस्टला जाऊन पोलिसांमार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण अशा दादालोरा खिडकी योजनेमधील विविध उपक्रमांची माहिती घेऊन आदिवासी बांधवांचे जनजागृती मेळाव्यास उपस्थिती दशर्वत या दुर्गम भागातील आदिवासी समाजाशी संवाद साधत त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन पोलीस विभागामार्फत मनोधैर्य वाढविण्याचा मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या प्रयत्न केला.

राज्यातील गडचिरोली या जिल्ह्याकडे नेहमीच संपूर्ण देशाचे लक्ष असते. कारण या जिल्ह्याला नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखले जाते. नक्षलवादी कारवाईंमुळे या डोंगरी व दुर्गम भागामध्ये सोई सुविधांचा अभाव असल्याने अद्यापही मागासलेपणा असलेल्या आदिवासी समाजामध्ये मनोधैर्य वाढवत त्यांची प्रगती साधणे, विकासापासून वंचित समाजाचे हित जोपासणे हे या जिल्ह्यातील पोलीस खात्यापुढे नेहमीच एक आव्हान आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या जिल्ह्यात पोहचवून त्या प्रभावीपणे राबविणे हे स्थानिक प्रशासनापुढे जिकरीचे काम असते.

गत महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या व छत्तीसगडच्या सीमा भागात गॅराबत्ती अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कामांडोनी धडाकेबाज कारवाई करून 27 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. एवढेच नव्हे, तर जहाल नक्षलवाधी मिलिंद तेलतुंबडे या सर्वोच्च नेत्याचा खातमा ही याच ठिकाणी गडचिरोली पोलिसांनी केला होता. यासंदर्भात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात गडचिरोली पोलीसांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव ही केला होता आणि योगायोग म्हणजे हेच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पोलिसांच्या सुरक्षेविषयीची पाहणी करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना नक्षलग्रस्त भागांत पोहचविण्यासाठी थेट गडचिरोलीला पोहोचले. या धाडसी दौऱ्यात मंत्री देसाई यांनी अतिदुर्गम विभागातील दादालोरा खिडीकी उपक्रमाची थेट ग्यारापत्ती येथे जावून प्रत्यक्ष केली पाहणी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी या केवळ पाहणी दौराच केला नाही, तर या अतिसंवेदनशील भागातील दादालोरा महामेळाव्यात स्थानिकांशी संवाद साधत प्रमाणपत्र व साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त भागात शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी पोलीस विभागाने अनेक उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ठ कार्य केले आहे. यामुळेच आता स्थानिक नागरिकांनी नक्षल विचार सारणी झुगारून त्यांना स्विकारलं असल्याचे मत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी गडचिरोली येथे व्यक्त केले.

एवढेच नव्हे तर मंत्री देसाई यांनी ग्यारापत्ती येथील आऊट पोस्टला जावून पोलीसांशी संवाद साधत प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. तर गडचिरोली येथील मेळाव्यात ही मंत्री देसाई यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय असल्याचे सांगून गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ही त्यांनी आपल्या दौऱ्यात आवर्जून उल्लेख केला.

Google सोबतच्या भागीदारीबाबत Airtel चे स्पष्टीकरण; म्हणाले की, आमचा स्मार्टफोन आणण्याचा ……

Airtel

नवी दिल्ली । Airtel चा Google सोबत स्मार्टफोन बनवण्याचा कोणताही प्लॅन नसला तरी, ते त्यांच्या धोरणात्मक भागीदारीचा भाग म्हणून युझर्समध्ये स्मार्टफोनचा वापर वाढविण्याच्या दिशेने काम करतील. ज्यामुळे सरासरी महसूलावर युनिट- ARPU वाढेल.”असे स्पष्टीकरण Bharti Airtel चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी दिले आहे.

ते पुढे म्हणाले की,” ते ARPU वर जोर देत राहतील कारण आम्हाला हे देखील माहित आहे की, प्रत्येक स्मार्टफोन युझरमुळे ARPU मध्ये लक्षणीय वाढ होते, जो आमच्या अजेंड्याचा भाग आहे.” ते पुढे म्हणाले की,”ARPU ची पातळी 200 रुपयांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. आणि दीर्घ मुदतीसाठी, ते 300 रुपयांपर्यंत घ्यावे लागेल. सध्या ते 153 च्या पातळीवर आहे.”

“आमचे स्वतःचे उपकरण (स्मार्टफोन) बनवण्याचे कोणतेही प्लॅनिंग नाही, मात्र फीचर फोनमधून स्मार्टचा वापर करण्यास गती देण्यासाठी इकोसिस्टममध्ये भागीदार होण्याची आमची योजना आहे,” असे ते म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले की,” स्मार्टफोन आणखी परवडणारे बनवणे हा व्यवसायातील प्रमुख उपक्रमांपैकी एक असेल.”

विठ्ठल म्हणाले की,”आम्ही नेहमीच म्हंटले आहे की,आमचा सबसिडीकडे कल नसून आम्ही बाजारात स्पर्धात्मक राहणार आहोत, त्यामुळे जिथे जिथे प्रोत्साहन द्यावे लागेल, त्या आधारे आम्ही सॉफ्टवेअरची क्षमता विकसित केली आहे. जेणेकरून खरे तर तंत्रज्ञानाच्या आघाडीवर आम्ही आणखी स्मार्ट होऊ आणि आर्थिक खर्च कमी करू.”

Google-Airtel भागीदारी
शुक्रवारी जागतिक टेक कंपनी Google आणि दिग्गज भारतीय टेलिकॉम सर्व्हिस भारती एअरटेल यांनी धोरणात्मक भागीदारी अंतर्गत हातमिळवणी केली. या भागीदारीअंतर्गत Google आता एअरटेलमधील 1.28 टक्के हिस्सा खरेदी करेल. Google ने म्हटले आहे की,” ते भारती एअरटेलमध्ये $ 1 बिलियन किंवा सुमारे 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. Google ही गुंतवणूक Google फॉर इंडिया डिजिटायझेशन फंडाचा भाग म्हणून करत आहे.”

BSE ला दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेलने स्पष्ट केले आहे की, Google कंपनीतील हा स्टेक 734 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी करेल. Google परवडणारे फोन विकसित करण्यासाठी Bharti Airtel सोबत काम करेल आणि $70 कोटीं मध्ये 5G तंत्रज्ञानावर रिसर्च करेल. उर्वरित $30 कोटी एक व्यावसायिक करार म्हणून वापरला जाईल

दारू आणि वाईन एकच, सरकारने निर्णय मागे घ्यावा अन्यथा..; आठवलेंचा इशारा

ramdas aathwale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे असं म्हंटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया देत सरकारला निर्णय मागे घेण्याचा इशारा दिला आहे.

दारू आणि वाईन हे दोन्ही येकच आहे त्यामुळे अजित पवार जस म्हणले हि दारू आणि वाईन मध्ये फरक आहे ते विधान चुकीचे आहे असं आठवले म्हणाले. सरकारने लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आरपीआय राज्यभर आंदोलन करेल असा इशारा आठवलेंनी दिला

यावेळी त्यांनी कविता म्हणत ठाकरे सरकार वर निशाणा साधला. किराणा दुकानात जर दारूचा आला माल तर लोकांचे होणार आहेत हाल …. सरकारची हि चुकीची आहे चाल आणि त्यामुळे भविष्यात सरकारचे असेच होणार आहे हाल अशी टीका रामदास आठवले यांनी केली

क्रेडिट कार्डची वार्षिक शुल्क कमी करण्याचे अमिश दाखवत 2 लाखाला घातला गंडा

Credit Card

औरंगाबाद – क्रेडिट कार्डची वार्षिक फी कमी करून देण्याचे आमिष दाखवून परप्रांतीय भामट्याने कामगाराला ऑनलाईन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. 29 ते 31 मे 2021 दरम्यान तो घडला. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आठ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्तरंजन शिवाजीराव लोणीकर हे अदालत रोडवरील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांनी एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते क्रेडिट कार्ड वापरत आहेत. 18 मार्च 2021 रोजी त्यांना वार्षिक फी म्हणून पाच हजार रुपयांचे बिल देण्यात आले होते. त्यानंतर 29 मे रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्यांच्याशी एका भामट्याने संपर्क साधला. तो ‘तुमच्या क्रेडिट कार्डवर लावलेली वार्षिक फी कमी करून नवीन क्रूड देतो’ असे म्हणाला. त्यावर लोणीकर यांनी संमती दर्शविताच जुने कार्ड बदलून घेताना काही व्यवहार करावे लागतात, असे भामट्याने सांगितले. त्यानंतर नवीन कार्ड मिळेल व त्याला वार्षिक फी लागणार नाही, असेही भामटा म्हणाला. त्या दरम्यान भामट्याने त्यांना तीन वेळा ओटीपी पाठवून क्रमांक विचारले लोणीकर यांनी ओटीपी क्रमांक सांगताच तीन वेळा त्यांच्या खात्यातून प्रत्येकी 73 हजार व त्यावरील किरकोळ रक्कम भामट्याच्या खात्यात जमा झाली.

खात्यातील रक्कम कपात झाल्याचे मेसेज आल्यावर लोणीकर यांनी 31 मे रोजी क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट पाहिले. तेव्हा खात्यातून 2 लाख 19 हजार 697 रुपये हाऊसिंग डॉट कॉम या खात्यावर जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लोणीकर यांनी पोलिसांत तक्रार दिली. चौकशीनंतर बुधवारी क्रांतीचौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.