Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2880

सातारा जिल्ह्यात 913 कोरोना पाॅझिटीव्ह : रूग्णालयात केवळ 416 बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 913 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 26. 72 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होतना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 417 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 921 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 27 टक्क्यांवर आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी दिवसभरात 1369 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  काल सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी 7905 रूग्ण सक्रीय होते. तर केवळ 416 रूग्ण रूग्णालयात उपरार्थ आहेत. रिकव्हरी रेट 94.5 टक्के इतकी आहे.

अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे- सहृदयी व्यक्तिमत्व हरपले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्येष्ठ साहित्यिक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे आज निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवचट यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट ठरत दुःख व्यक्त केले. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले असे पवारांनी म्हंटल.

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरले. शोकाकुल अवचट कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असे ट्विट शरद पवार यांनी केलं.

दरम्यान, अनिल अवचट यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनिल अवचट यांनी केवळ साहित्य विश्वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अनिल अवचट हे एक डॉक्टर होते, मात्र त्यांनी समाजसेवेतही मोलाचं योगदान दिलं.

Cryptocurrency Prices: क्रिप्टो मार्केटमध्ये पुन्हा मोठी घसरण, कालचे सर्व नफा आज गमावला

Cryptocurrency

नवी दिल्ली । काल क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सुमारे 4 टक्क्यांची उसळी होती, मात्र अवघ्या 24 तासांत बाजाराने ती गमावली. आज, गुरुवार, 27 जानेवारी, 2022 रोजी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये पुन्हा मोठी घसरण झाली. गेल्या 24 तासांत ग्लोबल क्रिप्टो मार्केट 4 टक्क्यांहून अधिक घसरले आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी 10:58 वाजता, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $1.62 ट्रिलियन पर्यंत घसरले आहे, जे काल त्याच वेळी सुमारे $1.69 ट्रिलियन होते.

गुरुवारी बिटकॉइनसह, इथेरियम, बीएनबी, कार्डानो, एक्सआरपी, सोलाना, टेरा लुना आणि डॉगकॉइनसह जवळजवळ सर्व क्रिप्टो टोकन रेड मार्कवर ट्रेड करत होते.

बातमी लिहिण्याच्या वेळी, बिटकॉइन 4.46% च्या घसरणीसह $36,021.71 वर ट्रेड करत होते. बिटकॉइनने गेल्या 24 तासांत $35,690.05 ची नीचांकी आणि $38,825.41 चा उच्चांक केला. इथेरियम 3.53% वाढली आहे आणि हे कॉइन $2,400.53 वर ट्रेड करत होते. इथेरियमने त्याच कालावधीत $2,366.13 ची नीचांकी आणि $2,705.78 ची उच्च पातळी गाठली. Bitcoin चे मार्केट वर्चस्व 42 टक्के आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 17.6 टक्के आहे.

24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सी
CryptoSword (SWD), Kuai Token (KT) आणि NinjaFloki (NJF) हे गेल्या 24 तासांत टॉप गेनर्समध्ये होते. CryptoSword (SWD) ने 620.42%, सिल्वा टोकन (SILVA) 388.71% आणि NinjaFloki (NJF) ने 212.73% वाढ नोंदवली.

आज कोणत्या कॉइनची किंमत किती आहे?
खालील तक्त्यामध्ये, आम्ही सकाळी 11:00 ते रात्री 11:09 पर्यंतच्या किमती देत ​​आहोत.

क्रिप्टो / टोकन बदल (% मध्ये) प्राइस
 BNB  – 4.48%  $364.96
 Cardano (ADA)  – 2.58%  $1.03
 XRP  – 4.32%  $0.6001
 Solana (SOL)  – 8.19%  $88.06
 Terra LUNA  – 9.15% $57.07
 Dogecoin  – 3.50%  $0.141
Polkadot (DOT) – 7.00%  $17.56
 Shiba Inu  – 5.50%  $0.00002045
 Cosmos (ATOM)  – 13.07%  $30.51

Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजची किंमत तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आज घसरण झाली आहे. तुम्ही देखील यावेळी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 1.12 टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घट झाली आहे.

MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये, प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. दुसरीकडे, MCX नुसार, आज सोन्याचा दर 48,305 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे, म्हणजेच सोने अजूनही त्याच्या सर्वोच्च पातळीपासून 7,900 रुपयांनी स्वस्त होत आहे.

आज सोने किती स्वस्त झाले जाणून घ्या
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 1.12 टक्क्यांनी घसरून 48,305 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, चांदीचा भाव 1.23 ने कमी होऊन 63,282 रुपये प्रति किलो झाला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,450 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,450 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,500 रुपये
पुणे – 45,500 रुपये
नागपूर -45,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,450 रुपये
पुणे -49,650 रुपये
नागपूर – 49,450 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4576.00 Rs 4575.00 -0.022 %⌄
8 GRAM Rs 36608 Rs 36600 -0.022 %⌄
10 GRAM Rs 45760 Rs 45750 -0.022 %⌄
100 GRAM Rs 457600 Rs 457500 -0.022 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4991.00 Rs 4990.00 -0.02 %⌄
8 GRAM Rs 39928 Rs 39920 -0.02 %⌄
10 GRAM Rs 49910 Rs 49900 -0.02 %⌄
100 GRAM Rs 499100 Rs 499000 -0.02 %⌄

टिपू सुलतान हे स्वातंत्र्यसेनानी होते- नवाब मलिक

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर पलटवार करत टिपू सुलतान नामकरणा वरून भाजप लोकांची दिशाभूल करत आहे असं म्हंटल आहे.

नवाब मलिक म्हणाले, टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते. ते ब्रिटिशांना कधीही शरण गेले नाहीत. ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी त्याकाळी हादरवून सोडले होते, असे मलिक म्हणाले. याआधी २०१३ मध्ये भाजप नगरसेवकांनी अशाच प्रकारे टिपू सुलतानच्या नामकरणा साठी पत्र लिहिले होते ही गोष्टही मलिक यांनी निदर्शनास आणून दिली.

मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव दिले म्हणून त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप करत आहे. टिपू सुलतान यांच्या बाबतीत राष्ट्रपतीनी सभागृहात संबोधित करत असताना टिपू सुलतान यांच्याबद्दल काय सांगितले होते याची माहिती भाजपच्या नेत्यांनी घ्यावी असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला.

Stock Market: शेअर बाजारात खळबळ, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला तर निफ्टी 17000 च्या खाली आला

Share Market

नवी दिल्ली । आज जागतिक बाजारासह भारतीय बाजारातही जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. ट्रेडिंगच्या सुरुवातीला शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 1100 अंकांपेक्षा अधिकने घसरला. दुसरीकडे, निफ्टी 17000 च्या खाली ट्रेड करताना दिसत आहे.

आज म्हणजेच 27 जानेवारीला भारतीय बाजाराची सुरुवात कमकुवतपणाने झाली. सेन्सेक्स 981.97 अंकांनी किंवा 1.70 टक्क्यांनी घसरून 09.20 च्या आसपास 56,876.18 वर उघडला, तर निफ्टी 279.50 अंकांनी किंवा 1.62 टक्क्यांनी घसरून 16,998.45 च्या पातळीवर उघडला.

या शेअर्समध्ये 10 वाजता घसरण पाहायला मिळाली
सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्समध्ये घसरणीने वर्चस्व राखले. दुसरीकडे, बँक निफ्टीच्या 12 पैकी 10 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. टायटनचे शेअर्स सर्वात मोठ्या घसरणीसह ट्रेड करत आहेत. याशिवाय एक्सिस बँकेचे शेअर्स 0.27 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करताना दिसत आहेत. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 पैकी 48 शेअर्समध्ये विक्री होत आहे.

Adani Wilmar IPO आज उघडणार आहे
Adani Wilmar ची 3 दिवसांची IPO ऑफर आज 27 जानेवारी 2021 रोजी उघडेल. या IPO ची किंमत 218-230 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 3600 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. अदानी विल्मरने मंगळवारी सांगितले की त्यांनी अँकर गुंतवणूकदारांकडून 940 कोटी रुपये उभे केले आहेत.

हा IPO पूर्णपणे फ्रेश इश्यूवर आधारित असेल म्हणजेच त्यात ऑफर फॉर सेलअसणार नाही. ऑफर फॉर सेलमध्ये अनेकदा कंपनीचे प्रवर्तक आणि इतर भागधारक त्यांचे स्टेक विकतात.

ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. अवचट यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संवेदनशील मत, अभ्यासक आणि संशोधक वृत्ती या अवचट यांच्यामध्ये होत्या.

1969 साली अवचट यांचे पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध झाले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केकरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

डॉ. अनिल अवचट यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (2021) मसाप जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. अवचट यांनी साहित्यिक विश्वात आपले योगदान दिले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले असून दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय,असा मोठा मित्रपरिवार आहे.

औरंगाबादेत थंडीचा उच्चांक; शहराचे तापमान मोठ्या प्रमाणावर घसरले

औरंगाबाद – उत्तरेकडील शीतवाऱ्यांच्या प्रभावामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे आज सकाळी शहराचे तापमान मोठ्या प्रमाणावर घसरले. औरंगाबाद शहरात आज सकाळी साडे सहा वाजता किमान तापमान 7.3 अंश सेल्सियसपर्यंत घसरले. मागील तीन दिवसांपासून शहराच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. कालच्या पेक्षा आज तापमानाचा पारा आणखी एक अंश सेल्सियसने घसरला आहे. औरंगाबादसह मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांतील तापमानातही घट झालेली दिसून आली.

उत्तरेकडील शीत वाऱ्यांची लाट महाराष्ट्रात दाखल झाल्याने दिवस आणि रात्रीचे तापमान निचांकी पातळीवर घसरले आहे. हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच औरंबादचे तापमान 7.3 अंशावर घसरले आहे. शहराच्या कमाल तापमानातही 6 अंशांनी घसरण झाल्याची नोंद झाली आहे. हे तापमान 23 अंश सेल्सियस पर्यंत घसरल्याचे दिसून आले.

आठवड्याच्या सुरुवातीला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धुळीच्या वादळाने धडक दिली होती. त्यामुळे कोकण ते गुजरातपर्यंतचा पट्टा धुळीने झाकोळून गेला होता. तर दुसरीकडे उत्तर भारतात हिमवृष्टी सुरु आहे. तेथील अतिशीत वारे खेचून आणण्यासाठी आपल्याकडे पोषक वातावरण तयार झाल्याने आता ही थंडीची लाट पसरली आहे. मागील वर्षी 17 जानेवारी 2020 रोजी शहराचे तापमान 8.1 अंश सेल्सियसवर पोहोचल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली होती. यंदा 27 जानेवारील प्रथमच 7.3 अंशांची नोंद झाली आहे. मागील वर्षी औरंगाबाद शहराचा पारा दहा अंश सेल्सियसच्या खाली गेला नव्हता.

 

विरोधकांच्या या नामर्दपणाला महाराष्ट्रातील जनतेनेच सडेतोड उत्तर दिले ; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावत वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कवरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावली. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आजारी असतानाच्या काळात विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. विरोधक मुख्यमंत्र्यांवर भावनाशून्यपणे टीका करत होते. विरोधकांच्या या नामर्दपणाला महाराष्ट्रातील जनतेनेच सडेतोड उत्तर दिले आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी भाजपवर केला.

संजय राईट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री आजारी असताना विरोधकांकडून मात्र मुख्यमंत्र्यांवर टीका करून मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर तोंडसुख घेतले जात होते. मुख्यमंत्री आज समोर आले.आता ते सर्व कामात सक्रिय होणार आहेत. राज्यातील विरोधी पक्ष भावनाशून्य होऊन मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका करत होता. हे कोणत्याही प्रकारच्या राजकीय नितीमत्तेला धरून नव्हतं. माणुसकीला धरून नव्हते.

या नामर्दपणाला आज महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एक दोन दिवसांपासून सक्रिय झाले. सकाळी वर्षावर ध्वज फडकवला. ते शिवतीर्थावर आले. दोन दिवसांपासून बैठका घेत आहेत. ज्यांनी मुख्यमंत्र्यांवर नामर्दपणाच्या कॉमेंटस केल्या त्यांना चपराक बसलीच आहे, असे राऊत यांनी म्हंटले.

सातारच्या सुपुत्राचा केंद्रात गौरव : आसामचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्याचे व माणचे सुपुत्र व आसाम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे यांनी निवडणुकीसंबंधी राबविलेल्या नाविन्यपूर्ण यशस्वी उपक्रमांची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने माण तालुक्याच्या व सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचा देशपातळीवर होणारा गौरव प्रत्येकासाठीच अभिमानास्पद वाटत आहे.

कोव्हिड19चा प्रादुर्भाव लक्षात घेता आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूका शांततेत व भितीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे काम यशस्वी पार पाडले. कारण आसाममध्ये अतिरेकी, जातीय आणि वांशिक हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. निवडणूकीच्या काळात अतिरेकी हिंसाचाराच्या घटना पूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत. या सर्व घटनांचा सखोल अभ्यास करून एक वेगळा “आसामचा निवडणूक पॅटर्न” तयार करून तो यशस्वी देखील करून दाखविला. याचे फलित म्हणजे मतदानाची टक्केवारी जवळपास 0.5 ने वाढली. निवडणूक कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन सोशल मिडियाचा प्रभावी वापर केला. या दरम्यान 80 वर्षावरील वयोवृद्ध शारीरिक विकलांग असणाऱ्या मतदारांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोना कालावधीत निवडणूक अर्ज भरताना सार्वजनिक मेळावे, मिरवणुकीस मनाई करून प्रचारा दरम्यान रोड शो, मोटार सायकल रॅली काढण्यास सक्तमनाई केली. घरोघरी प्रचारासाठी 5 व्यक्तींनाच परवानगी दिली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुध्द व सोशल मिडियावरुन आणि प्रत्यक्ष शांतता व सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या घटनांना वेळीच पायबंद घालून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवून पायबंद घालण्यात आला. पोलिस आणि प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेत समन्वय राखण्यात आला. असे काही विविध प्रयोग देखील केले. याचा फायदा म्हणजे भयमुक्त वातावरणात मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर पडले. मतदानाची टक्केवारी वाढली.

कोविड सह अनेक आव्हाने समोर असताना देखील नितीन खाडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक आणि काटेकोरपणे निवडणूक यंत्रणा राबवली. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत असताना निवडणूक निष्पक्ष रितीने पार पडावी, जास्तीत जास्त मतदारांनी कोविडच्या अनुषंगाने नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली असून त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये नितीन खाडे यांना गौरविण्यात येणार आहे.

▪️ बीड जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना राबविलेला “आयुर्मंगलम” प्रोजेक्ट आजही त्यांच्याच नावाने ओळखला जातो. याची दखल त्यावेळी तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेतली.

राष्ट्रीय पुरस्कारासाठी याच ठरल्या उल्लेखनीय गोष्टी-

▪️14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत कोविड 19 महामारीच्या काळातही एकूण 9 लाख 15 हजार 993 नवीन मतदार मतदार यादीत जोडले गेले.

▪️कोविडचा प्रार्दुभाव असूनही 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी मतदान 0.5 टक्के ने वाढले.

▪️मतदान कर्मचाऱ्याचा कोविड संबंधित मृत्यू झाला नाही आणि हिंसाचारात देखील झाला नाही.

▪️सर्व मतदान कर्मचाऱ्यांचे लसीकरण मार्च पुर्वी पुर्ण केले.

▪️निवडणूका निष्पक्ष अाणि सुरक्षित पार पाडली गेली.

▪️ऑनलाइन यंत्रणा व सोशल मिडियाचा प्रभावी वापर

निवडणूककामी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हिड चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांना ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.