Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2879

आज टाटा समूहाला मिळणार एअर इंडियाची कमान; पहिल्याच दिवशी सुरू झाली ‘ही’ सेवा

नवी दिल्ली । सरकार आज आपली विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया टाटांच्या हाती सोपवणार आहे. टाटा समूहाने एअर इंडियाच्या हस्तांतरणासाठी सर्व तयारी केली आहे. टाटा समूह मुंबईहून चालणाऱ्या एअर इंडियाच्या चार फ्लाइटवर “उन्नत भोजन सेवा” (enhanced meal service) सुरू करून एक नवीन सुरुवात करेल. मात्र, गुरुवारपासून टाटा समूहाच्या बॅनरखाली एअर इंडियाच्या फ्लाईट्स उड्डाण करणार नाहीत. टाटा समूहाच्या बॅनरखाली एअर इंडियाची सर्व उड्डाणे कोणत्या तारखेपासून उड्डाण करतील याची घोषणा नंतर केली जाईल.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, भारत सरकार गुरुवारी एअर इंडिया टाटा समूहाकडे सोपवू शकते. आणि अशा प्रकारे एअर इंडिया तब्बल 69 वर्षांनी टाटा समूहाकडे परतणार आहे. टाटा समूह आजपासून एअर इंडियामध्ये आपली सेवा सुरू करत आहे. यासाठी निवडक फ्लाइट्समध्ये “उन्नत भोजन सेवा” सुरू करण्यात येत आहे. AI864 (मुंबई-दिल्ली), AI687 (मुंबई-दिल्ली), AI945 (मुंबई-अबू धाबी) आणि AI639 (मुंबई-बेंगळुरू) या चार फ्लाइटमध्ये “उन्नत भोजन सेवा” गुरुवारी दिली जाईल. टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांनी डिझाइन केलेली “उन्नत भोजन सेवा” हळूहळू आणखी फ्लाइट्समध्ये वाढवली जाईल.

18000 कोटींना खरेदी केले एअर इंडिया
तोट्यात चालणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया टाटा समूहाने 18000 कोटी रुपयांच्या बोलीवर विकत घेतली. 8 ऑक्टोबर रोजी एअर इंडिया टेल्स प्रायव्हेट लिमिटेडला 18,000 कोटी रुपयांना विकली गेली. हा टाटा समूहाच्या होल्डिंग कंपनीचा एक भाग आहे.

टाटा समूहाची एअर इंडियासाठी योजना
तोट्यात चाललेल्या एअर इंडियाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी टाटा समूहाने भविष्यातील अनेक योजना तयार केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे वनटाइम परफॉर्मन्स. म्हणजेच उड्डाणाच्या वेळेच्या 10 मिनिटे आधी विमानाचे दरवाजे बंद केले जातील. विमानांच्या वेळेवर उड्डाण करण्यावर पूर्ण लक्ष असेल. याशिवाय प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेतही वाढ करण्यात येणार आहे.

महाबळेश्वर- तापोळा रोडवर स्वच्छता मोहिमेत काचेच्या बाटल्या सर्वाधिक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी अभियाना अंतर्गत 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबळेश्वर शहरातील तापोळा रोडवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर स्वच्छता मोहिमेद्वारे तापोळा रोडवरील रस्त्याच्या आजूबाजूला पडलेला एकूण 45.245 किग्रॅ कचरा गोळा करण्यात आला. यात 18.44 किग्रॅ काचेच्या बाटल्या, 12.315 किग्रॅ पुठ्ठा, 6.805 किग्रॅ चिप्स, बिस्कीटची रिकामी पाकिटे, 2.205 किग्रॅ व्हाईट प्लास्टिक, 5.480 किग्रॅ प्लास्टिकच्या बाटल्या इत्यादी कचरा गोळा करण्यात आला.

सदर मोहिमेसाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आबा ढोबळे, बबन जाधव, सचिन दीक्षित, वैभव साळुंके व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. सदर मोहिमेत हिलदारी टीम सोबतच मनोज चव्हाण, रोहित बांदल, श्रावण कांबळे, राकेश भोसले, संतोष फळणे, आकाश शेलार, सूनिल जाधव, निलेश कोंढाळकर, निसार डोंगरे, राजू नालबंद, संजय सपकाळ, विशाल उतेकर, दीपक कदम, किरण वाघदरे, प्रवीण जाधव, तुकाराम घाडगे, प्रकाश जाधव, पांडुरंग जंगम, नागेश जाधव, आकाश खरे, राहुल जाधव, यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

हिलदारी टीमचे डॉ. मुकेश कुलकर्णी, राम भोसले, सुजित पेंडभाजे, दुर्गेश जाधव, अभिषेक जाधव, खाकसारअली पटेल, गणेश माचुतरे, आरतीका मोरे, अमृता जाधव, गौरी चव्हाण, क्षितिजा जाधव इत्यादींनी परिश्रम घेतले. सदर स्वच्छता मोहिमेची सांगता “माझी वसुंधरा” अभियानाची शपथ घेऊन करण्यात आली.

अगोदर होता पाग्या, मग झाला वाघ्या…”; भाजपाची शिवसेनेवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील एका उद्यानाला टिपू सुलतान असे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सध्या या वरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्याकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. दरम्यान या मुद्द्यावरून आज भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “ही तर संधीसाधू सेना… कॉंग्रेसने जन्माला घातली, मुस्लिमलीगच्या मांडीवर बसली. आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या , त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना!,” अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत शिवसेनेवर निशाण साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ही तर संधीसाधू सेना… कॉंग्रेसने जन्माला घातली. मुस्लिम लीगच्या मांडीवर बसली, कॉंग्रेससोबत रमली, कॉंग्रेसशी दोस्ती केली, पीएसपीशी गाठ बांधली, आणि सारे फसल्यावर हिंदुत्वाचा घोष करीत भाजपसोबत आली… आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना!”असे ट्विट उपाध्ये यांनी केली.

मुंबईतील मालाडच्या एका क्रीडा संकुलाला टीपू सुलतानचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नाम करणावरून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरू आहे.या मुद्द्यावरून प्रजासत्ताक दिनी भाजपाने मालाडमधील क्रीडा संकुलासमोर आंदोलनही केले. दरम्यान यावरून उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

TCS ने रचला इतिहास, अमेरिकन कंपनी IBM ला मागे टाकून जगातील दुसरा सर्वात मौल्यवान IT ब्रँड बनला

नवी दिल्ली । टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) हा जगातील दुसरा सर्वात मौल्यवान IT ब्रँड बनला आहे. TCS व्यतिरिक्त, इतर पाच भारतीय आयटी कंपन्यांनीही जगातील टॉप-25 कंपन्यांमध्ये स्थान मिळवले.

ब्रँड व्हॅल्युएशन कंपनी ब्रँड फायनान्सने एका रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, जगातील सर्वात मौल्यवान आयटी ब्रँडच्या लिस्टमध्ये इन्फोसिस तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय अन्य चार मोठ्या देशांतर्गत आयटी कंपन्यांनीही टॉप-25 मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. विप्रो सातव्या, एचसीएल आठव्या, टेक महिंद्रा 15व्या आणि एलटीआय 22व्या स्थानावर आहे.

Accenture या वर्षी देखील सर्वात मजबूत ब्रँड
Accenture हा जगातील सर्वात मौल्यवान आणि मजबूत IT सर्व्हिस ब्रँड आहे. रिपोर्ट नुसार, त्याची ब्रँड व्हॅल्यू $36.2 अब्ज आहे. 2021 मध्ये Accenture हा सर्वात मौल्यवान आणि मजबूत IT सर्व्हिस ब्रँड होता. TCS मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्के आणि 2020 च्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढला आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू $16.8 अब्ज आहे.

भारतीय IT कंपन्यांनी अमेरिकेला मागे टाकले
2020 ते 2022 दरम्यान भारतातील विविध IT सर्व्हिस ब्रँड्सची सरासरी 51 टक्के वाढ झाली आहे. यादरम्यान, यूएस आयटी कंपन्यांच्या ब्रँडमध्ये सात टक्क्यांनी घसरण झाली. यामुळेच अमेरिकन कंपनी IBM 2022 च्या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू $16.05 बिलियन वरून $10.5 बिलियनवर आली आहे.

इन्फोसिस सर्वात वेगाने वाढणारी कंपनी
यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला, इन्फोसिस जगातील सर्वात वेगाने वाढणारा IT सेवा ब्रँड म्हणून उदयास आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याची ब्रँड व्हॅल्यू 52 टक्के आणि 2020 च्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये त्याचे ब्रँड मूल्य $12.8 अब्ज आहे.

ग्राहकांचा TCS वर विश्वास
टीसीएसचे मुख्य विपणन अधिकारी राजश्री आर यांनी सांगितले की, ही क्रमवारी कंपनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे बाजारपेठेतील कंपनीच्या वाढत्या प्रासंगिकतेची आणि ग्राहकांसाठी तिच्या नवकल्पना आणि परिवर्तनाची साक्ष देते.

मलकापूरात प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर मलकापूर नगर पालिकेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मलकापूर शहरातील दुकानांची पालिकेच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाने पाच दुकानांवर केली दंडात्मक कारवाई केलेली आहे.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक वापरास बंदी घालण्यात आली आहे. पालिकेने याबाबत वारंवारं व्यावसायिकांना याबाबतची माहिती देवून कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यावर बंदी असल्याचे सांगितले होते. परंतु तरीही पालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक प्लास्टिक वापरत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे पालिकेने स्वतंत्र पथक तयार करून शहरातील दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे.

याबाबत मलकापूर मधील दुकानांमध्ये कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे अशी माहिती मलकापूर नगरपालिकेला मिळाली होती. त्यानुसार मलकापूर नगरपंचायतीचे रमेश बागल, अंकुश गावडे, सुनील शिंदे, सुभाष बागल, प्रसाद बुधा, अमृत येडगे, पंकज बागल, वैभव अरणे यांनी मलकापूर परिसरातील दुकानांची तपासणी केली. यामध्ये कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मलकापूर मधील दुकानदारांनी कमी मायक्रोनच्या प्लास्टिक पिशव्या वापरू नये तसेच प्लास्टिक बंदीला सहकार्य करावे असे आवाहन मलकापूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; शरण येण्यास 10 दिवसांची मुदत

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. तसेच त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे लवकरच राणेंना अटक होण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आता सुप्रीम कोर्टाने देखील राणेंना दणका देत अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. दरम्यान, कायदा सर्वाना समान असतो , केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असला तरी कायदा तोच अस हे आज सिद्ध झाले अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली.

नेमकं काय आहे प्रकरण-

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या प्राणघातक हल्ला झाला. प्रकरणी पोलिसांना चौघांना अटक केली आहे. संतोष परब यांनी हल्लेखोरांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. त्यांनतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती.

.. तर सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा घ्या; टिपू सुलतान वादावरून राऊतांनी भाजपला खिंडीत गाठले

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आक्रमक झाली असून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप कडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दाखला देत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊत म्हणाले, टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा असा टोला राऊतांनी लगावला.

भाजपच्या काही नेत्यांनी याप्रकरणावरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून देखील संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. जे दंगलीची भाषा करत आहेत त्यांनी हिम्मत असेल तर दंगल करून दाखवावी. इथे ठाकरे सरकार आहे. दंगल करून दाखवाच, असा इशारा राऊतांनी दिला.

जर तुम्हीही PNB मध्ये ‘हे’ खाते उघडले असेल तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल 2 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या

Punjab National Bank

नवी दिल्ली । जर तुमचे पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर हे लक्षात घ्या कि बँक तुम्हाला अनेक सुविधा देत आहे. वास्तविक, PNB आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा मोफत इन्शुरन्स देत आहे. जन धन खाते असलेल्या खातेधारकांना बँक ही सुविधा देत आहे. याशिवाय ग्राहकांना बँकेच्या अनेक सुविधांचा लाभ घेता येईल. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात …

2 लाखांचा लाभ मोफत मिळणार आहे
पीएनबी रुपे जनधन कार्डची सुविधा बँकेकडून जन धन ग्राहकांना दिली जाते. या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरची सुविधा देत आहे. रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदीही करू शकता.

केवळ 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर 2 लाखांचा PMJJBY लाभ
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा (PMJJBY) वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेंतर्गत व्यक्तीला लाइफ कव्हर मिळते. यामध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतील. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY योजना अत्यंत कमी प्रीमियमवर लाईफ इन्शुरन्स देते. PMSBY ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्या अंतर्गत खातेदाराला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर मिळते.

अटल पेन्शन योजना
केंद्र सरकारने कमी गुंतवणुकीवर पेन्शनची गॅरेंटी देण्यासाठी अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत, सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची गॅरेंटी देते. सरकारच्या या योजनेत 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.

अजित पवारांचे पुत्र जय पवारांचे कारनामे लवकर बाहेर काढणार ; सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर अनेक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याच्यावर निशाणा साधला आहे. “जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करून बाहेर काढणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १०५५ कोटींची संपत्ती बेनामी घोषित झाली आणि जप्त झाली. आता पुढे काय होते ते सर्वांनी पहावे. मी आता अजित पवार यांचा मुलगा जय पवार याने काय कारनामे केलेत, ते लवकरच बाहेर येतील. त्याचेही कारनामे मी बाहेर काढणार आहे.

सोमय्या यांनी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. बेनामी गुंतवणूक करून, कंपन्यांचे जाळे निर्माण करत उपमुख्यमंत्री पवार यांनी कारखान्याची खरेदी केली. आणि एवढेच नव्हे तर सर्व नियमांचे उल्लंघन करून पवार यांनी स्वत:च हा कारखाना स्वत:ला विकला, असा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. अजित पवारानंतर आता जय पवार यांच्याकडे सोमय्या यांनी मोर्चा वळवला आहे.

नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

Malik Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टिपू सुलतान हे स्वातंत्र्यसेनानी होते अस म्हंटल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मलिकांवर निशाणा साधला. नवाब मलिक हे हिंदू द्वेष्टी आहेत अशी टीका त्यांनी केली.

नवाब मलिक यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा नाही. मुळातच ते मुस्लिम असल्याने हिंदू द्वेष्टी आहेत. त्यांच्या नसानसात हिंदू द्वेष भरला आहे अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मराठा समाजाचे साम्राज्य नष्ट करणाऱ्या टिपू सुलतान बाबत राष्ट्रावादी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी असे आव्हान दरेकर यांनी दिले.तसेच राष्ट्रपतीनी टिपू सुलतानचा कोणताही गौरव केला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले-

टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते. ते ब्रिटिशांना कधीही शरण गेले नाहीत. ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी त्याकाळी हादरवून सोडले होते, असे मलिक म्हणाले. मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव दिले म्हणून त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप करत आहे. असा आरोप मलिकांनी केला होता.