Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2882

जि. प. माजी सभापतींकडून अधिकार्‍यास शिविगाळ, अदखलपात्र गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यावर सोमवारी झालेल्या राड्यानंतर आता मंगळवारी पुन्हा माजी पदाधिकारी आणि अधिकार्‍यामध्ये राडा झाला. माजी सभापती तमनगौडा रवि-पाटील यांनी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबतचा विश्रामबाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन करून मुख्याल्यासमोर निदर्शने केली. रवि-पाटील यांना अटक करा अन्यथा बुधवारी काळ्या फिती बांधून काम करण्याचा इशारा देण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ अंतिम टप्प्यात आहे, जिल्हा परिषदेची ऑनलाइन पद्धतीने सर्वसाधारण सभा होणार होती, मात्र ही सभा ऑनलाइन पद्धतीने न घेता, ऑफलाइन घेण्याची काही सदस्यांची मागणी होती, या वादातूनच सोमवारी रात्री उशिरा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर सदस्य व अध्यक्षांचे पती आणि दीर यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली होती. हा वाद शांत होतो न होतो, तोपर्यंत जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपचे पक्षप्रतोद रवि-पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लोखंडे यांच्यात मोबाईलवरुन जोरदार वादावादी झाली. या वादाचे रुपांतर शिवीगाळपर्यंत गेले.

माजी सभापती रवि-पाटील यांनी शिवीगाळ केली असल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लोखंडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात केली असून याबाबतचा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन करून मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. माजी सभापती रवि-पाटील यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली. बुधवारी काळ्या फिती बांधून काम करण्यात येणार आहे, त्यानंतरही अटक न झाल्यास काम बंदचा इशारा अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

जर तुम्हालाही स्वस्तात घर घ्यायचे असेल तर ‘या’ तीन बँका देत आहेत संधी, त्याविषयीचे तपशील जाणून घ्या

home

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वस्त घर घेण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला चांगली संधी आहे. वास्तविक, देशातील अनेक मोठ्या सरकारी बँकांनी तुमच्यासाठी ही खास ऑफर आणली आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BoB) आणि बँक ऑफ इंडिया (BOI) त्यांच्या डिफॉल्ट मालमत्तांचा ई-लिलाव (E-Auction) करणार आहेत.

या अशा मालमत्ता आहेत ज्या डीफॉल्टच्या लिस्टमध्ये आलेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात तुम्हांला आपल्या स्वप्नातील घरं कधी आणि कसे खरेदी करता येईल.

BOI E-Auction
बँक ऑफ बडोदा (BOB) ने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये लिहिले की, मेगा ई-लिलाव 29 जानेवारी 2022 रोजी केला जाईल. यामध्ये रेसिडेन्शिअल आणि कमर्शिअल मालमत्तांचा ई-लिलाव केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.

PNB E-Auction
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्विटमध्ये लिहिले की, मेगा ई-लिलाव 31 जानेवारी 2022 रोजी केला जाईल. यामध्ये रेसिडेन्शिअल आणि कमर्शिअल मालमत्तांचा ई-लिलाव केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.

BOI E-Auction
बँक ऑफ इंडिया (BOI) त्यांच्या डिफॉल्ट मालमत्तांचा ई-लिलाव करत आहे. BOI ची ही लिलाव प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 25 जानेवारीपासून देशभरात सुरू झाली आहे.

कुठे रजिस्ट्रेशन करायची?
या मेगा ई-लिलावासाठी, इच्छुक बोलीदाराला ई-बक्रे पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

KYC डाक्यूमेंट आवश्यक असेल
बोलीदाराला आवश्यक KYC डाक्यूमेंट अपलोड करावे लागतील. KYC डाक्यूमेंटची ई-लिलाव सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारे व्हेरिफिकेशन केले जाईल. यास 2 दिवस लागू शकतात.

ई-कचऱ्याद्वारे करता येईल भरपूर कमाई, त्यासाठी काय करावे ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । विचार करा ! आपले खराब झालेले मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही, रिमोट, एलईडीचे काय होत असेल. आपल्यापैकी बहुतेकजण ते कचऱ्यात टाकून विसरतात. मात्र, हा कचरा कोट्यवधी रुपयांच्या कमाईचा स्रोत बनू शकेल. आज आपण E-Waste Management Business बद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला जंकद्वारे करोडपती बनवू शकतात.

इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) नुसार, देशात दरवर्षी सुमारे 50 लाख टन ई-कचरा (E-Waste) तयार होतो. गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स च्या वाढत्या वापरामुळे हे प्रमाणही दरवर्षी आश्चर्यकारकरीत्या वाढणार आहे. यामुळे ई-कचऱ्याचा ढीगही मोठ्या प्रमाणात वाढेल आणि तुम्ही या व्यवसायाशी संबंधित असाल तर तुमची कमाईही वाढेल.

खर्च न करता कमवा
जुन्या, निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर अशा वस्तू स्वस्त किंमतीत खरेदी करून आणि रीसायक्लिंग सेंटरमध्ये विकून तुम्ही पैसे कमवू शकता. यासाठी कोणती कंपनी किंवा दुकान मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार करते हे आधी सांगावे लागेल. अशा प्रकारे तुमची सुरुवातीची कमाई थोडी कमी होईल मात्र तुम्हाला त्यात विशेष गुंतवणूक करण्याची गरज नाही.

ई-कचरा रीसायक्लिंग द्वारे पैसे कमवा
यासाठी तुम्हाला मोठ्या फंडस् ची आवश्यकता असेल, मात्र ई-वेस्ट रिसायकलिंगच्या माध्यमातून अल्पावधीत मोठा नफाही कमावता येईल. तुम्ही हे काम टप्प्याटप्प्याने सुरू करू शकता-

वर्गीकरण : ई-कचरा रीसायकलिंग प्लॅन्टमध्ये आणून मॅन्युअली वर्गीकरण केले जाते. बॅटरी इत्यादी उपकरणांमधून काढून वेगळे केले जाते. लॅपटॉप, HDD, मेमरी देखील वेगळी केली जाते.

डिस्‍मेंटल करणे : उपकरणे वेगळे केल्यानंतर, ते डिस्‍मेंटल केले जाते, ज्यामध्ये बऱ्याच लोकांची आवश्यकता असते. या प्रक्रियेअंतर्गत, उपकरणांमधून काढलेले मेटल्स आणि प्लॅस्टिक वेगळे केले जाते, जेणेकरून रीसायकलिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही.

लहान आकारात वितरित करा : डिस्‍मेंटल केल्यानंतरही, ज्या मटेरियलचा आकार मोठा आहे, ते दोन इंच व्यासाचे कापून लहान केले जातात. अशा प्रकारे सर्व ई-कचरा एका आकाराचा होतो. आता त्यांची पावडर क्रशर मशिनद्वारे तयार केली जाते.

धातूंना वेगळे करणे : मोठ्या चुंबकाच्या साहाय्याने सर्व लोखंडी अवजारे भुस्यापासून बनवलेल्या कचऱ्यापासून वेगळी केली जातात. या प्रक्रियेतून वेगळा केलेला कच्चा माल पुन्हा कारखान्यांना विकला जातो, ज्याचा वापर इतर प्रॉडक्ट्स करण्यासाठी केला जातो.

पाणी वेगळे करण्याची प्रक्रिया : आता पाण्याच्या मदतीने प्लॅस्टिक आणि काच ई-कचऱ्यापासून वेगळे केले जातात. प्लॅस्टिक उपकरणे किंवा चप्पल बनविणाऱ्या कंपन्यांना ते विकले जाऊ शकते. उरलेले ग्लास मोबाईल किंवा इतर उपकरणांसाठी स्क्रीन बनवणाऱ्या कारखान्यांना विकून तुम्ही मोठा नफा कमवू शकता. या प्रक्रियेतून मिळणारे तांबे, पोलाद यासारखे धातूही वेगवेगळ्या कंपन्यांना विकता येतात.

किती जागा आणि यंत्रसामग्री आवश्यक असेल
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 हजार चौरस फूट जागा आवश्यक आहे, जिथे रीसायकलिंग पासून सर्व प्रक्रिया करता येतील. व्यवसायात वापरल्या जाणार्‍या मशीन 25 लाखांना विकत घेता येतात. प्रकल्पानुसार इतर खर्च होणार आहेत. यंत्रे चालवण्यासाठी 20 किलोवॅट वीज जोडणी आवश्यक आहे. हे 8 ते 10 लोकांसह सुरू केले जाऊ शकते.

‘ही’ कागदपत्रे आवश्यक असतील
सर्व प्रथम, जीएसटी नोंदणी करणे आवश्यक आहे.
एंटरप्राइझ लायसन्स म्हणजेच एमएसएमई घ्यावे लागेल.
अग्निशमन आणि प्रदूषण मंडळाची एनओसी आवश्यक आहे.
घातक कचरा व्यवस्थापनासाठी राज्य आणि आयएसडीसीकडून मेंबरशिप घ्यावी लागेल.

ट्रेन रद्द झाल्यास ऑनलाइन रिफंड कसा मिळवायचा ते जाणून घ्या

railway

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने आज देशभरातील 1155 गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द झालेल्या बहुतांश गाड्या बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसामच्या मार्गांवर धावणार होत्या. याशिवाय रेल्वेच्या 14 गाड्याही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या काळात आधीच रेल्वे कमी गाड्या चालवत आहे. आता धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. बुधवारीही संपूर्ण उत्तर भारत थंडीत दाट धुक्याने व्यापला गेला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

घरातून बाहेर पडण्यापूर्वी ‘या’ गोष्टी करा
जर तुम्हालाही ट्रेनने प्रवास करायचा असेल तर घरून निघण्यापूर्वी तुमच्या ट्रेनचे स्टेट्स जाणून घ्या. ज्या ट्रेनने तुम्हाला प्रवास करायचा आहे ती रेल्वे रद्द केतर झालेली नाही ना हे एकदा तपास. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या रद्द होत आहेत. एक दिवस आधीच मंगळवारी देखील तब्ब्ल 458 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या. तर सोमवारीही हजारहून जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या.

ट्रेनचे स्टेट्स कसे तपासायचे ?
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट रेल्वेच्या वेबसाइटवर टाकते. याशिवाय त्याची माहिती NTES App वरही उपलब्ध आहे. कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या  https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे ट्रेनचा नंबर टाकून तुम्ही ट्रेनचे स्टेट्स जाणून घेऊ शकाल.

ट्रेन रद्द झाल्यावर मिळतो ऑटोमेटिक रिफंड
जर तुमच्याकडे ई-तिकीट असेल आणि तुम्ही ज्या ट्रेनमध्ये प्रवास करणार आहात ती काही कारणास्तव रद्द झाली असेल तर तुम्हाला ई-तिकीट रद्द करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ट्रेन रद्द झाल्यास ई-तिकीटचे पैसे ऑटोमेटिक रिफंड केले जातात. अशा परिस्थितीत तिकीट जमा पावती म्हणजेच TDR भरण्याची गरज नाही.

ट्रेन लेट झाली तर मिळू शकतात पूर्ण पैसे
जर ट्रेनला 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल आणि प्रवासी प्रवास करत नसेल तर ट्रेन सुटण्यापूर्वी TDR भरावा लागेल. TDR फाइल करण्यासाठी, एखाद्याला IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल ऍपवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर My Account वर जा आणि My Transaction हा पर्याय निवडा. आता फाइल TDR वर क्लिक करा.

काउंटर तिकीट कसे रद्द करावे ?
ऑनलाइन काउंटरवर तिकीट रद्द करण्यासाठी  https://www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf  या लिंकला भेट द्या. तुमचा PNR नंबर, ट्रेन नंबर आणि कॅप्चा ऑप्शन भरल्यानंतर, रद्द करण्याच्या नियमांसह बॉक्सवर टिक करा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. आता बुकिंगच्या वेळी तुम्ही फॉर्मवर दिलेल्या नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर, तुमच्या PNR डिटेल्स पेजवर दिसेल. PNR डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर, तिकीट रद्द करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर रिफंड रक्कम पेजवर दिसेल. यासोबतच बुकिंग फॉर्मवर लिहिलेल्या नंबरवर एक कन्फर्मेशन मेसेज येईल, ज्यामध्ये PNR आणि रिफंडची माहिती असेल.

Budget 2022 : यावेळी रेल्वे भाडे वाढवणार की नाही, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । पुढील आठवड्यात 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्प 2022 मध्ये सरकार रेल्वे भाड्याबाबत मोठा दिलासा देऊ शकते. मात्र कोरोनामुळे आधीच त्रस्त भारतीय रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्पात रेल्वे भाड्यात कोणताही बदल अपेक्षित नाही.

या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, मालवाहतूक किंवा प्रवासी भाडे वाढवण्याऐवजी सरकार रेल्वेचा खर्च भागवण्यासाठी अर्थसंकल्पात वेगळ्या निधीची तरतूद करू शकते. 2021-22 मध्ये कोरोना महामारीचा फटका बसत असतानाही रेल्वे मालवाहतुकीच्या महसुलात 25 टक्के वाढ होण्याच्या जवळ आहे. असे मानले जाते की, चालू आर्थिक वर्षात रेल्वेला मालवाहतुकीतून एकूण 1.45 लाख कोटींची कमाई अपेक्षित आहे. प्रवासी भाड्यातून रेल्वेचे उत्पन्नही 10 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तूर्तास अर्थसंकल्पात भाडेवाढ करण्याची गरज भासणार नाही.

दोन वर्षांपासून प्रवासी भाडे वाढलेले नाही
डिसेंबर 2019 मध्ये, रेल्वेने स्वतंत्र आदेश जारी करून प्रवासी भाड्यात प्रति किलोमीटर 4 पैसे वाढ केली होती, मात्र त्यानंतर भाडे स्थिर राहिले आहे. त्याचवेळी, 2014 पासून सरकारने अर्थसंकल्पातून प्रवासी किंवा मालवाहतुकीच्या भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष अरुणेंद्र कुमार म्हणतात की,”यावर्षी रेल्वे भाडे वाढवण्यामागे कोणतेही तर्क नाही आणि आम्ही लोकांवर अतिरिक्त भार टाकू शकत नाही. मात्र, कोरोना महामारीच्या काळात प्रवाशांवर अतिरिक्त शुल्काचा बोझा निश्चितच वाढला आहे.”

मालवाहतुकीद्वारे होते प्रवासी भाड्याच्या नुकसानीची भरपाई
भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना भाड्यावर दरवर्षी सुमारे 40 हजार कोटी रुपयांची सबसिडी देते. त्याची भरपाई करण्यासाठी त्याला मालवाहतुकीत वाढ करणे भाग पडले आहे. यामुळेच सर्वाधिक रेल्वे मालवाहतूक करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. रेल्वेचाही तोटा होत आहे, कारण मालवाहतुकीतील तिचा वाटा सातत्याने कमी होत आहे. गेल्या 50 वर्षांत एकूण मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा 75 टक्क्यांवरून 39 टक्क्यांवर आला आहे.

Cryptocurrency Prices : क्रिप्टो मार्केटने केली रिकव्हरी, बिटकॉइन आणि इथेरियममध्ये तेजी

Online fraud

नवी दिल्ली । आज, बुधवार, 26 जानेवारी 2022, रोजी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत ग्लोबल क्रिप्टो मार्केट 4 टक्क्यांहून अधिकने वाढले आहे. भारतीय वेळेनुसार, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप काल दुपारी 2 च्या सुमारास $1.64 ट्रिलियन वरून सकाळी 10:50 IST वाजता $1.69 ट्रिलियन पर्यंत वाढले आहे. बिटकॉइन आणि इथेरियम दोन्ही 4 टक्क्यांहून अधिकने वाढले आहेत.

बातमी लिहिण्याच्या वेळी, बिटकॉइन 4.67% च्या वाढीसह $37,673.47 वर ट्रेड करत होते. Bitcoin ने गेल्या 24 तासांत $35,779.43 ची नीचांकी आणि $37,812.09 चा उच्चांक केला. इथेरियम आज 4.26% वाढले आहे आणि हा कॉइन $2,487.37 वर ट्रेड करत आहे. इथेरियमने त्याच कालावधीत $2,359.38 ची नीचांकी आणि $2,498.51 ची उच्च पातळी गाठली. Bitcoin चे मार्केट वर्चस्व 42.2 टक्के आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 17.5 टक्के आहे.

24 तासांत सर्वाधिक वाढणाऱ्या करन्सी
गेल्या 24 तासांत सर्वात जास्त वाढणाऱ्या टॉप करन्सीमध्ये NinjaFloki (NJF), PAPPAY आणि Asgardian Aereus (VOLT) यांचा समावेश आहे. याच कालावधीत NinjaFloki (NJF) ने 565.91%, PAPPAY 480.23% आणि Asgardian Aereus (VOLT) 438.83% ची जबरदस्त उडी घेतली आहे.

मार्केट कॅपनुसार, NinjaFloki (NJF) सकाळी 11 वाजता $0.000002931 (रु. 0.00022) वर ट्रेड करत होता, PAPPAY $0.0000005812 (रु. 0.000043) वर ट्रेड करत होता आणि Asgardian Aereus (VOLT) 0.207 $207 (VOLT) 0.207 वर ट्रेड करत होता.

आज कोणत्या कॉइनची किंमत किती आहे जाणून घ्या

कॉइन / टोकन बदल (% मध्ये) प्राइस
BNB + 6.19% $382.01
Cardano + 3.23% $1.06
Solana + 8.92% $95.98
XRP + 5.41% $0.6274
Terra LUNA – 1.65% $62.67
Dogecoin + 8.65% $0.1461
Avalanche + 11.02% $69.27
Shiba Inu + 6.16% $0.00002163
Litecoin + 2.68% $109.88

खालील तक्त्यामध्ये, आम्ही सकाळी 11:00 ते रात्री 11:05 पर्यंतच्या किंमती देत ​​आहोत.

Investment Tips : ‘या’ म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीवर मिळतील चांगले रिटर्न

post office

नवी दिल्ली । म्युच्युअल फंड हे आजच्या काळात गुंतवणुकीचे सर्वात लोकप्रिय माध्यम बनले आहे. कोणताही व्यक्ती आपले कोणतेही आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडाची मदत घेऊ शकतो. त्याच्या मदतीने रिटायरमेंट प्लॅनिंग, मुलांचे उच्च शिक्षण, घर बांधणे किंवा इतर कोणतेही आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. जरी ही बाब सोपी दिसत असली तरी स्वतःसाठी योग्य म्युच्युअल फंड निवडणे हे सर्वात अवघड काम आहे. ब्रोकिंग कंपनी एंजेल वनचे एसव्हीपी रिसर्चर वैभव अग्रवाल अशा 5 म्युच्युअल फंडांबद्दल सांगत आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करून मोठा रिटर्न मिळू शकतो.

कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी ग्रोथ
हा लार्ज कॅप फंड ब्लूचिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. याद्वारे, गुंतवणूकदार दीर्घ कालावधीत मोठा फंड उभारू शकतात आणि इतर फंडांच्या तुलनेत यामध्ये जोखीम देखील कमी असते. जे गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हे योग्य आहे. यातून मिळणारा रिटर्न महागाईवर मात करू शकतो.

पराग पारिख फ्लेक्सी कॅप ग्रोथ
हा फ्लेक्सी कॅप फंड एकाच फंडाद्वारे वेगवेगळ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. एवढेच नाही तर त्यातील 30.35 टक्के भाग हा विदेशी शेअर्समध्येही गुंतवला जातो. जर तुम्ही 5 वर्षे किंवा त्याहून जास्त काळ गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा फंड एक चांगला पर्याय बनू शकतो.

कोटक एमर्जिंग इक्विटी ग्रोथ
हा मिड कॅप फंड अशा गुंतवणूकदारांची निवड असू शकतो ज्यांना बाजारातील चढ-उतारांची जाणीव आहे आणि त्यांना हाताळण्याची क्षमता आहे. या फंडातून दीर्घ मुदतीत मजबूत रिटर्न मिळू शकतो कारण हा फंड त्याच्या विभागातील सर्वोत्तम फंड मानला जातो. जर तुम्ही 7 वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा फंड 10 टक्के जास्त रिटर्न देऊ शकतो.

ICICI प्रू इक्विटी अँड डेट ग्रोथ
या फंडाद्वारे गुंतवणूकदार इक्विटी आणि डेट या दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकतात. मार्केट किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरुवात करणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या हायब्रीड फंडाच्या कर्जामध्ये गुंतवणूक केल्याने इक्विटीचा धोका कमी होतो, तर बाजारातील वाढीच्या वेळी इक्विटी भाग जास्त रिटर्न देऊ शकतो.

HDFC S&T ग्रोथ
ज्या गुंतवणूकदारांना कर्जाच्या पर्यायांमध्ये अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे त्यांनी हा फंड वापरून पहावा. यावर तुम्हाला FD पेक्षा जास्त रिटर्न मिळेल आणि कोणतीही विशेष जोखीम घ्यावी लागणार नाही. यामध्ये एक ते तीन वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. त्याचे खर्चाचे प्रमाणही खूप कमी आहे.

झेंडावंदन सुरु असतानाच महिलेनं स्वत:च्या अंगावर ओतून घेतलं राॅकेल; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांची तारांबळ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्योती नलावडे या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

जावली सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप या महिलेने आणि कुटुंबीयांनी केला आहे. बँकेच्या संचालकांवर कारवाई करून दोषारोप दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच प्रजासत्ताक दिनादिवशी आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता.

प्रशासनाने आणि पोलिसांनी दखल न घेतल्याने महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या संचालक मंडळावर कारवाईची मागणी या महिलेने केली आहे..

किरपेत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद : वनविभागाने गुपचूप हलविला

कराड | तालुक्यातील किरपे येथे आज बुधवारी दि. 26 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सापडला आहे. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता, वनविभागाने हा बिबट्या किरपे गावातून अन्य ठिकाणी नेला आहे.

कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या दोन महिन्यांपूर्वी पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर आज 26 जानेवारी रोजी दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, किरपे, येणके, सुपने, तांबवे या भागात बिबट्याचे प्रमाण अजून असल्याने वनविभागाने त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांच्यातून करण्यात येत आहे.

किरपे येथील मौवटी शिवारात नारायण मंदिराजवळ हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. यावेळी विद्याधर देवकर, आनंदा देवकर, पोलीस पाटील प्रविण तिकवडे यांना बिबट्या पिंजऱ्यात कैद झाल्याचे वनविभागाने दाखविले. तसेच तेथून तात्काळ बिबट्या अन्य ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आला आहे.