Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2908

पुणे रेल्वे स्थानकात ट्रेन रुळावरून घसरली; घटनास्थळी कर्मचारी दाखल

पुणे | पुणे रेल्वे स्थानकात डेमु ट्रेन रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. यार्ड मधून बाहेर येत असताना रेल्वेचे 2 डबे घसरले. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक माहितीनुसार, ही रेल्वे दौंडच्या दिशेने जात होती त्यावेळी ही घटना घडली आहे. डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सोलापूर वरून मुंबईला येणारी मार्मिका बंद झाली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाकडून 5 लोकांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

Budget 2022: कृषी क्षेत्राला मिळणार भेट,वाढू शकेल PM किसान सन्मान निधीची रक्कम

PM Kisan

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला मोठी भेट देऊ शकतात. अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी वार्षिक 6,000 वरून 8,000 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय मागणीवर आधारित शेतीला चालना देण्यासाठी सरकार प्रगतीशील शेतकऱ्यांना कर्ज देण्याबरोबरच इतर सुविधा देण्याचीही घोषणा करू शकते.

अर्थसंकल्पात सर्व पिकांसाठी MSP वर पॅनेल तयार करण्याची घोषणा देखील केली जाऊ शकते. ही आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. कृषी विधेयके रद्द करण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसपीवर समितीची घोषणा केली होती.

मूल्यवर्धनावर भर
कृषी क्षेत्रात मूल्यवर्धनाला (Agri-value Addition) चालना देण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थसंकल्पात त्याबाबत घोषणा होऊ शकते. शेतकऱ्यांनी पीक विविधतेचा अवलंब करावा अशी सरकारची इच्छा आहे. बाजाराच्या मागणीनुसार पिके निवडा आणि लागवड करा आणि अन्न प्रक्रियेकडे वाटचाल करा. पारंपारिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी, पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेती करणाऱ्या अशा शेतकऱ्यांसाठी सरकार अर्थसंकल्पात काही विशेष घोषणा करू शकते.

कृषी अन्न प्रक्रिया आणि निर्यात
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी अन्न प्रक्रियेला चालना देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे. कृषी उत्पादनांचे मार्केटिंग, ब्रँडिंग आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अर्थसंकल्पात मोठी घोषणा करू शकते. सरकार कृषी क्षेत्रातील अन्न प्रक्रियेसाठी 10,900 कोटी रुपयांची उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना (PLI) मंजूर करू शकते.

कृषी अन्न प्रक्रिया किरकोळ बाजाराशी जोडली गेल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थसंकल्पात सरकार या दिशेने काही महत्त्वाचे पाऊलही उचलू शकते. कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात निर्यातदारांना प्रोत्साहन देण्याचीही घोषणा करणे अपेक्षित आहे.

सहकार मजबूत करा
सहकारी संस्था (Cooperative Societies) हा कृषी क्षेत्राचा कणा आहे. सहकाराच्या बळकटीकरणासाठी सरकार अर्थसंकल्पात मोठी पावले उचलणार आहे. शेतकरी उत्पादक संघटना (Farmer Producer Organizations – FPO) लोकप्रिय करण्यासाठी सरकारने आधीच अनेक पावले उचलली आहेत. अर्थसंकल्पात सरकार FPO साठी कर्ज मर्यादा वाढवण्यासह इतर काही घोषणा देखील करू शकते. शेतकरी एकत्र FPO तयार करू शकतात. त्याची निर्मिती आणि ऑपरेशनमध्ये, सरकार कर्जासह इतर मदत पुरवते.

सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 652 कोरोना बाधित : पाॅझिटीव्ह रेट 33 टक्क्यांवर

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 652 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 32. 37 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 104 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 652 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 33 टक्क्यांजवळ आला आहे. गुरूवारी दिवसभरात 973 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 23 जणाचा मृत्यू झाला आहे.

गांधी हत्येचं समर्थन कधीच केलं नाही; अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधेच 2 गट पडले असून काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला आहे तर काही नेत्यांनी समर्थन करत कोल्हे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत गांधी हत्येचं समर्थन कधीच केलं नाही असे म्हंटल आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, २०१७मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, तेव्हा मी सक्रिय राजकारणात नव्हतो, किंवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी शंभर टक्के जोडले गेलेलो असतो असे नाही असे अमोल कोल्हे यांनी म्हंटल.

मी सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधीहत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे केवळ एक कलाकार म्हणून भूमिका निभावताना त्याचा राजकीय विचारांशी संबंध जोडला जाऊ नये. या दोन भिन्न गोष्टी आहेत,’ असा खुलासा कोल्हे यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. अमोल कोल्हे यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही अस म्हणत आपण या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल.

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनी चुकूनही करू नयेत ‘या’ 4 चुका, नाहीतर होऊ शकेल मोठे नुकसान

Credit Card

नवी दिल्ली । देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा कल वाढला आहे. त्याचा उपयोग हुशारीने केल्यास फायदा होतो. मात्र , क्रेडिट कार्डचा बेजबाबदार वापर तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकतो. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड प्रभावीपणे वापरत आहात याची खात्री करण्यासाठी, येथे 4 गोष्टी आहेत ज्या तुम्ही पूर्णपणे टाळल्या पाहिजेत.

1. फक्त मिनिमम अमाउंट ड्यू पेमेंट करणे
जेव्हा कार्डधारक फक्त मिनिमम अमाउंट ड्यू भरतात, तेव्हा त्यांना लेट फीस भरण्याची आवश्यकता नसते. मिनिमम अमाउंट ड्यू हे पेमेंट युझर्सच्या थकबाकीच्या बिलाचा एक छोटा अंश (सामान्यतः 5 टक्के) आहे. मात्र, यामुळे तुमचे कर्ज जलद वाढू शकते कारण दररोज न भरलेल्या रकमेवर फायनान्स चार्ज आकारले जाते. क्रेडिट कार्डवरील फायनान्स चार्ज साधारणपणे 40 टक्क्यांहून जास्त वार्षिक असते.

2. ATM मधून पैसे काढा
क्रेडिट कार्डद्वारे ATM मधून पैसे काढणे टाळले पाहिजे. वास्तविक, क्रेडिट कार्डमधून कॅश काढण्यासाठी क्रेडिट कालावधी उपलब्ध नाही. तुमच्या कार्डवर आकारले जाणारे व्याजदर तुम्ही ATM मधून पैसे काढता त्या दिवसापासून सुरू होते.

3. पूर्ण क्रेडिट मर्यादा वापरणे
संपूर्ण क्रेडिट कार्ड मर्यादा वापरणे टाळा. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. साधारणपणे, क्रेडिट कार्ड कंपन्या क्रेडिट युटिलायझेशन रेशो 40 टक्क्यांपेक्षा जास्त हे कर्जाचे लक्षण मानतात. वास्तविक, क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) चा क्रेडिट स्कोअरवर मोठा प्रभाव पडतो. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड किती वापरता यावर तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो अवलंबून असते.

4. व्याजमुक्त कालावधीनुसार नियोजन नाही
व्याजमुक्त कालावधी सहसा 18-55 दिवस असतो. या कालावधीत क्रेडिट कार्ड ट्रान्सझॅक्शनवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही जोपर्यंत तुम्ही वेळेवर थकबाकी भरली नाही. जास्तीत जास्त लाभासाठी तुम्ही तुमच्या खरेदीचे इंटरेस्ट फ्री कालावधीनुसार नियोजन करावे. तुम्ही तुमच्या बिलिंग सायकलच्या सुरुवातीलाच मोठ्या खरेदी कराव्यात. या परिस्थितीत तुम्हाला रक्कम परत करण्यासाठी जास्त इंटरेस्ट फ्री दिवस मिळू शकतात.

Cryptocurrency Prices: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी घसरण, बिटकॉइन 2021 च्या नीचांकी पातळीवर

नवी दिल्ली । शुक्रवार, 21 जानेवारी 2022 रोजी, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली. गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टो मार्केट 7.45 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. IST सकाळी 10:04 वाजता, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप काल 11:04 वाजता $1.97 ट्रिलियन वरून $1.83 ट्रिलियनवर घसरली. सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये लक्षणीय घट झाली. Bitcoin, Ethereum, BNB, Cardano आणि Solana मध्ये सर्वात मोठी घसरण झाली, तर उर्वरित प्रमुख करन्सी तुलनेने कमी पडले.

बातमी लिहिण्याच्या वेळी, सर्वात मोठे करन्सी असलेले बिटकॉइन 7.43% ने घसरले आणि हे कॉइन $38,812.98 वर ट्रेड करत होते. Bitcoin ने गेल्या 24 तासात $38,560.45 ची नीचांकी आणि $43,413.02 चा उच्चांक केला. इथेरियम 8.50% खाली $2,860.99 वर ट्रेड करत आहेत. इथेरियमने त्याच कालावधीत $2,827.73 ची नीचांकी आणि $3,265.34 ची उच्च पातळी गाठली.

बिटकॉइन गेल्या वर्षीच्या नीचांकी पातळीवर बंद झाले
बिटकॉइन गेल्या वर्षीच्या 2021 च्या निम्न पातळीच्या अगदी जवळ आहे. या कॉइनने सप्टेंबर 2021 चा नीचांक मोडला आहे आणि सध्या ऑगस्ट 2021 मध्ये $37,400 च्या पातळीच्या अगदी जवळ आहे. त्यापूर्वी, जून-जुलै 2021 मध्ये, बिटकॉइन 29,000 यूएस डॉलरच्या खाली ट्रेड करत होते.

 

कॉइन / टोकन बदल (% मध्ये) प्राइस
बीएनबी (BNB) -9.31% $426.73
कार्डानो (Cardano) -9.83% $1.22
सोलाना (Solana) -7.52% $126.53
XRP -6.17% $0.699
टेरा लूना (Terra LUNA) -3.66% $78.51
डोज़कॉइन (Dogecoin) -8.02% $0.1517
शिबा इनु (Shiba Inu) -6.58% $0.00002584
चेनलिंक (Chainlink) -10.80% $19.41
लाइटकॉइन (Litecoin) -10.00% $124.78
एल्गोरैंड (Algorand / ALGO) -11.16% $1.12

 

टीप – टेबलमध्ये दिलेला डेटा 10:20 ते 10:30 दरम्यान आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?; शाळेच्या निर्णयावरून भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आलेल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय आणि विद्यार्थ्यांच्या लसीकरणा वरून ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “कॉलेज विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पालक आणि शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. मात्र, लसींचे डोस घेतलेल्याना शाळेत जात येणार आहे, असे म्हंटले आहे. तर काल राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही माध्यमांशी संवाद साधताना सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत माहिती दिली. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. शाळेत जाऊन १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत, असे गायकवाड यांनी म्हंटले आहे.

Gold Price : सोने पुन्हा महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे दर पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा उसळी आली आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सोने महागले. चांदीच्या दरात आज घसरण झाली असली तरी आज चांदीच्या दरात 0.38 टक्क्यांनी घट झाली आहे. यासह आज सोने 0.02 टक्क्यांच्या किंचित वाढीसह ट्रेड करत आहे.

जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांनी वाढून 48,327 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, तो 48,327 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

आज चांदीची किंमत किती झाली?
त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंग मध्ये चांदी 0.38 टक्क्यांनी घसरली आहे. यासह 1 किलो चांदीचा भाव 65,130 रुपयांवर पोहोचला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,840 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,,380 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,600 रुपये
पुणे – 46,840 रुपये
नागपूर -47,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,600 रुपये
पुणे -49,380 रुपये
नागपूर – 49,600 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4683.00 Rs 4640.00 -0.927 %⌄
8 GRAM Rs 37464 Rs 37120 -0.927 %⌄
10 GRAM Rs 46830 Rs 46400 -0.927 %⌄
100 GRAM Rs 468300 Rs 464000 -0.927 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4937.00 Rs 4892.00 -0.92 %⌄
8 GRAM Rs 39496 Rs 39136 -0.92 %⌄
10 GRAM Rs 49370 Rs 48920 -0.92 %⌄
100 GRAM Rs 493700 Rs 489200 -0.92 %⌄

अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत; आव्हाडांकडून विरोध तर टोपेंचं समर्थन… राष्ट्रवादीतच मतमतांतरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त करत हे चुकीचे आहे असं स्पष्ट मत मांडले. तसेच आपण या चित्रपटाला विरोध करणार आहे असेही त्यांनी म्हंटल.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही अस ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

विनय आपटे ~शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार अशी स्पष्ट भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

अमोल कोल्हे यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पहा – टोपे

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हेंची खरी ओळख ही अभिनेता म्हणून आहे. ते लोकप्रिय आणि गुणी अभिनेते आहेत. अभिमान वाटावा असे कलाकार आहेत. त्यांची संभाजी मालिका सर्वजण पाहात असतात. अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. गोडसेंचा रोल केला असला तरी अभिनेत्याच्या अँगलने त्याकडे पाहिलं पाहिजे. ते कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पाहा, असं आवाहन टोपे यांनी केलं.

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले-

२०१७मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते, तेव्हा मी सक्रिय राजकारणात नव्हतो, किंवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नव्हतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या चित्रपटात एखादी भूमिका करतो म्हणजे त्याच्या विचारधारेशी शंभर टक्के जोडले गेलेलो असतो असे नाही असे अमोल कोल्हे यांनी म्हंटल. मी सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधीहत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे केवळ एक कलाकार म्हणून भूमिका निभावताना त्याचा राजकीय विचारांशी संबंध जोडला जाऊ नये. या दोन भिन्न गोष्टी आहेत,’ असा खुलासा कोल्हे यांनी केला.

Stock Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 600 पेक्षा जास्त तर निफ्टी 169 अंकांनी घसरला

Share Market

नवी दिल्ली । आज शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 601.85 अंकांची घसरण करत 68,862.77 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. तर दुसरीकडे, निफ्टी 168.45 अंकांनी किंवा 1.01 टक्क्यांनी 17,620.10 च्या पातळीवर घसरताना दिसत आहे. बाजार सुरू झाल्याने घसरण वाढली आहे.

निफ्टीच्या 50 पैकी 38 शेअर्स मध्ये घसरण दिसून येत आहे तर सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्सचे वर्चस्व आहे. त्याच वेळी, निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअर्स रेड मार्कमध्ये ट्रेड करत आहेत.

गुरुवारी बाजाराची वाटचाल कशी होती ?
वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात प्रॉफिट बुकींग होते. सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 634 अंकांनी घसरून 59,465 वर बंद झाला तर निफ्टी 181 अंकांनी घसरून 17,757 वर बंद झाला. काल आयटी आणि फार्मा शेअर्सनी सर्वाधिक विक्री केली तर ऑटो, एफएमसीजी आणि ऑइल-गॅस शेअर्सनी दबाव आणला. मात्र, घसरणीच्या काळातही पॉवर, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये खरेदी झाली. त्याचबरोबर साखर आणि शिक्षणाशी संबंधित शेअर्सनाही मागणी होती.

या शेअर्समध्ये घसरण होत आहे
सेन्सेक्समधील 30 शेअर्स पैकी 25 शेअर्सनी घसरणीवर वर्चस्व राखले. बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक घसरणीसह ट्रेड करत आहेत. याशिवाय टेक महिंद्रा, कोटक बँक, टायटन, विप्रो, एक्सिस बँक, सन फार्मा, एचडीएफसी, टाटा स्टील, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक टीसीएस, एलटी, एचसीएल टेक इत्यादींमध्ये घसरण होते आहे.