Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2909

Stock Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 600 पेक्षा जास्त तर निफ्टी 169 अंकांनी घसरला

Share Market

नवी दिल्ली । आज शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 601.85 अंकांची घसरण करत 68,862.77 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. तर दुसरीकडे, निफ्टी 168.45 अंकांनी किंवा 1.01 टक्क्यांनी 17,620.10 च्या पातळीवर घसरताना दिसत आहे. बाजार सुरू झाल्याने घसरण वाढली आहे.

निफ्टीच्या 50 पैकी 38 शेअर्स मध्ये घसरण दिसून येत आहे तर सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्सचे वर्चस्व आहे. त्याच वेळी, निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअर्स रेड मार्कमध्ये ट्रेड करत आहेत.

गुरुवारी बाजाराची वाटचाल कशी होती ?
वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात प्रॉफिट बुकींग होते. सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 634 अंकांनी घसरून 59,465 वर बंद झाला तर निफ्टी 181 अंकांनी घसरून 17,757 वर बंद झाला. काल आयटी आणि फार्मा शेअर्सनी सर्वाधिक विक्री केली तर ऑटो, एफएमसीजी आणि ऑइल-गॅस शेअर्सनी दबाव आणला. मात्र, घसरणीच्या काळातही पॉवर, मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये खरेदी झाली. त्याचबरोबर साखर आणि शिक्षणाशी संबंधित शेअर्सनाही मागणी होती.

या शेअर्समध्ये घसरण होत आहे
सेन्सेक्समधील 30 शेअर्स पैकी 25 शेअर्सनी घसरणीवर वर्चस्व राखले. बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक घसरणीसह ट्रेड करत आहेत. याशिवाय टेक महिंद्रा, कोटक बँक, टायटन, विप्रो, एक्सिस बँक, सन फार्मा, एचडीएफसी, टाटा स्टील, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक टीसीएस, एलटी, एचसीएल टेक इत्यादींमध्ये घसरण होते आहे.

T-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना ‘या’ दिवशी होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2022 T20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाले असून 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. ही विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे कट्टर विरोधक पुन्हा एकदा एकाच ग्रुप मध्ये आहेत.

ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे तर ग्रुप २ मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. बाकी राहिलेले 4 संघ हे फर्स्ट राउंड च्या निकालातून ठरतील.

दरम्यान, मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांसमोर असतील. याआधी टी 20 विश्वचषकात भारत पाकिस्तान  2021मध्ये भिडले होते. त्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे रोहित शर्मा च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा ‘इतका’ अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

suprim court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेहमी संपत्तीच्या कारणांवरून घरगुती भांडणे होत असतात. घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. दरम्यान हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांचा वडिलांच्या संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने एका खटल्यावर सुनावणी करताना वडिलांच्या संपत्तीवर जितका मुलाचा हक्क आहे तितकाच मुलींचाही हक्क असणार असल्याचे म्हंटले आहे.

घरातील मुख्य व्यक्ती असलेल्या वडिलांच्या संपत्ती संबंधित एका खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. जर एखाद्या हिंदू पुरुषाचा विना मृत्यूपत्र मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात त्याच्या मुलीला त्याने कमविलेली संपत्ती आणि अन्य संपत्ती मिळवू शकते. मुलांपेक्षा या संपत्तीमध्ये मुलींना प्राधान्य असणार आहे.

हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत हिंदू महिला आणि विधवांना संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी मद्रास न्यायालयाच्या एका निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तामिळनाडूतील एका खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने हा 51 पानांचा निकाल दिला. या प्रकरणात 1949 मध्ये याचिकाकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी स्वतःच्या आणि विभाजित मालमत्तेसाठी कोणतेही मृत्युपत्र तयार केले नव्हते. वडील संयुक्त कुटुंबात राहत असल्याने मद्रास उच्च न्यायालयाने भावाच्या मुलांना त्यांच्या मालमत्तेवर हक्क दिला होता.

आता सर्वोच्च न्यायालयाने वडिलांच्या एकुलत्या एक मुलीच्या बाजूने निकाल दिला आहे. मुलीचे वारस हे खटला लढवत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यूपत्र न वनविताच झाला असेल तसेच ती मालमत्ता त्याने स्वत: कमवलेली असेल किंवा वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेचे कायदेशीर वारसांमध्ये विभाजन होते.

जर हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला आणि त्याची मुलगी ही वारस असेल, तसेच त्या पुरुषाचे भाऊ किंवा भावांची मुले आदींमध्ये जर वडिलोपार्जित संपत्ती वाटली जात असेल तर त्या पुरुषाच्या मुलीला समान हक्क मिळणार आहे. या प्रकरणात मुलीने वडिलांनी स्वत: कमविलेल्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळविण्यासाठी कोर्टाचा दरवाजा खटखटावला होता. अन्यकायदेशीर वारसाच्या अनुपस्थितीत खंडपीठाने मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत हिस्सा कसा देता येईल यावर सुनावणी घेतली. या प्रकरणी न्यालयाच्यावतीने निर्णय देण्यात आला आहे.

मुलीचे लग्न झाल्यानंतर काय?

या अगोदर मुलींना केवळ कुटुंबाचा सदस्य मानले जात होते. मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये मात्र समान वारसाचे अधिकार देण्यात आलेले नव्हते. मुलीचे लग्न झाल्यावर तर तिला माहेरच्या घरचा सदस्य देखील मानले जात नव्हते. मात्र, 2005 मध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानले जाऊ लागले. मुलीचे लग्न झाल्यानंतरही मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार आबाधित राहणार आहे.

विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

bAMU
bAMU

औरंगाबाद – शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सन 2021-22 या चालू शैक्षणिक वर्षाचा हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची तयारी केली असून, 8 फेब्रुवारी पासून पदवी तर 22 फेब्रुवारीपासून पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

यासंदर्भात विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षातील हिवाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक तयार झाले असून, सर्व पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 8 फेब्रुवारी पासून तसेच 22 फेब्रुवारीपासून पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यानुसार पेपर सेटर्सकडून ऑनलाईन पेपर चे नियोजन केले जात आहे.

पंतप्रधान मोदी जगात भारी; लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यातीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. 71 टक्के रेटिंग सह मोदींनी ही लोकप्रियता मिळवली आहे. मोदींनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही पहिला क्रमांक पटकावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं मॉर्निंग कन्सल्टंट पोलिटिकल च्या सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.

या सर्वेक्षणात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सहाव्या स्थानी आहेत. त्यांना ४३ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. बायडेन यांच्या खालोखाल कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांचा क्रमांक या यादीमध्ये लागलाय. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा क्रमांक असून ४१ टक्के लोकांनी मॉरिसन यांच्या बाजूने मतदान केलंय.

पटोलेंविरोधात आंदोलन करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभर आदोलने केली. यात भप नेते तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यावेळी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण सांगत पोलीस प्रशासनाने बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच्या वक्तव्याचा निषेध दर्शविण्यासाठी बुधवारी कोराडी पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमवली. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना घेऊन आदोलनेही केली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कोविड मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन केले. त्यामुळे बावनकुळे यांच्यावर प्रशासनाकडून कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बावनकुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले होते.

पटोलेंविरोधात बावनकुळे आक्रमक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील जेवणाळा येथे “मोदींना मी मारू शकतो, मी शिव्या देऊ शकतो,” असे कार्यकर्त्यांसोबत बोलताना म्हटले. तो व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर मोदी म्हणजे नरेंद्र मोदी नव्हे, तर तो गावगुंड मोदी असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.परंतु भाजपने पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी राज्यभर आंदोलने केली. केली. या दरम्यान कोराडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले होते.

क्रांती चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा ‘या’ तारखेपर्यंत शहरात

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी चौथ्या चे काम पूर्णत्वाकडे आहे. हा पुतळा पुण्यातील धायरी येथील थोपटे स्टुडिओमध्ये घडविला आहे. हा पुतळा शहरात आणण्याची तयारी सुरू झाली असून, 23 जानेवारीपर्यंत पुतळा शहरात येईल, अशी माहिती शिल्पकार दीपक थोपटे व शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी याबाबत काल बैठक घेतली शिल्पकार खोपडे यांनी सांगितले की, शिवरायांचा पुतळा 25 फूट उंच, 21 फूट लांब व 8 फूट रुंद तर 10 टन वजनाचा आहे. पोलिसांची परवानगी घेऊन शिवरायांचा पुतळा मोठ्या ट्रकमध्ये ठेवण्यात येईल शुक्रवारी दुपारी पुण्यातून हा पुतळा निघेल. औरंगाबाद येथे पोहोचण्यासाठी त्याला दोन दिवस लागतील. त्यामुळे रविवार पर्यंत पुतळा शहरात येईल.

शिवजयंतीपूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे.

अमोल कोल्हेंची कृती ही नथुराम गोडसेचे समर्थनच : जितेंद्र आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे नथुराम गोडसेंची भूमिका साकारणार आहेत. याबाबत नुकतीच त्यांनी सोशल मिडीयावर माहिती दिली होती. व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हेंची कृती ही नथुराम गोडसेचे समर्थनच असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही अशा आशयाचे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

विनय आपटे ~शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार असल्याची भुमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे.

अमोल कोल्हे आपल्या भूमिकेवर ठाम असले तरी या वादावर आता राजकारण तापताना दिसतंय. काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनीदेखील अमोल कोल्हे यांनी ही भूमिका टाळायला हवी होती असं मत व्यक्त केलं आहे. हुसैन दलवाई पुढे म्हणाले की, ज्या व्यक्तीने महात्मा गांधींचा खून केला ती भूमिका कशाला करायची? गांधीजी किंवा नेहरुंची भूमिका करायची. इतकी हिंस्त्रक भूमिका कशाला करायची? ते चूक आहे. ती भूमिका साकारताना त्यांनी ती भूमिका किती छान केली ते पण दाखवावं लागेल. ते कलाकार आहेत हे मान्य आहे. पण ते एका पक्षाचे खासदार देखील आहेत. त्यांनी आपल्या पक्षाची आयडोलॉजी घेऊन चालायला हवं”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी दिली.

वडीलांना शेतात मदत करत होता 5 वर्षांचा मुलगा; अचानक झुडपातून बिबट्यानं झडप मारली अन्..

कराड | वडीलांना शेतातील कामात मदत करत असलेल्या एका पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. कराड तालुक्यातील किरपे या गावात सदर घटना घडली. गेल्या काही दिवसापूर्वी किरपे गावाशेजारील येणके येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. आता पुन्हा याच परिसरात बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, किरपे ता. कराड येथे आज दि.२०.०१.२०२२ संध्याकाळी ६ वाजता धनंजय देवकर यांच्या शिवारात बिबट्याने लहान मुलावर हल्ला केला. धनंजय हे शेतीचे काम उरकून घरी येण्यासाठी निघाले असताना त्यांचे शेती अवजार  साहित्य हे भरून पिशवीत ठेवत असताना त्यांचा लहान मुलगा राज धनंजय देवकर वय वर्ष ५ हा त्यांच्या जवळच खाली वाकून शेती अवजार (कैची) वडिलांना उचलून देत होता. राज अवजारं देण्यासाठी खाली वाकलेला असताना अचानक शेतातून बिबट्याने हल्ला केला व मुलाला मानेला पकडून ओडून शेतात घेऊन जाऊ लागला.

प्रसंगवधान राखत अतिशय धैर्याने वडिल धनंजय यांनी मुलाचे पाय पकडून त्याला बिबट्याच्या तोंडातून सोडविण्यासाठी ओढू लागले व आरडा ओरडा करु लागले. शेतालगत असलेल्या तारेचे कुपनात बिबट्या धडकल्याने त्याला मुलाला पुढे ओढता आले नाही. वडिलांचा दंगा ऐकुण बिबट्याने मुलाला सोडले.

सुदैवाने मुलगा सुटला अन् वडिलाने त्याला उचले

सदर राज देवकर ह्यास मानेला व कानाला दात जोरात लागले आहेत, तर पाठेवर व पायावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. पुढील वैध्याकीय उपचारासाठी त्याला कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सहायक वनसंरक्षक महेश झांझुरणे, वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव राक्ष्जक रोहन भाटे, वनपाल व वनरक्षक, तसेच पोलीस पाटील किरपे हे सर्व हॉस्पिटल मध्ये उपस्थित आहेत. बिबट्या हल्या बाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच ! आजही हजारांहून अधिक रुग्णांचे निदान 

 

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आता तर कोरोना अक्षरशः कहर करत असल्याचे दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 1089 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 734 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 355 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 57 हजार 792 झाली आहे. आज तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3668 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5712 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 381 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 310 तर ग्रामीणमधील 71 रुग्णांना सुटी देण्यात आली.