Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2907

शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण; औरंगजेब आणि रावणाचा दाखला देत विषयच संपवला …

Sharad Pawar Amol Kolhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात  नथुराम गोडसेंची भूमिका साकारल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधेच 2 गट पडले असून काहींनी अमोल कोल्हे यांना विरोध केला आहे तर काही नेत्यांनी समर्थन करत कोल्हे यांची पाठराखण केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र अमोल कोल्हे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत त्यांची पाठराखण केली आहे

अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून ती भूमिका केली. अमोल कोल्हे यांनी ज्यावेळी भूमिका केली, त्यावेळी ते आमच्या पक्षातही केली, त्यांनी कलाकार म्हणून भूमिका केली म्हणजे त्यांनी गांधींविरोधात भूमिका आहे असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळे कलाकार म्हणून कोल्हेंच्या या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी रामायण आणि मुघलांच्या इतिहासाचा दाखल दिला. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत जो औरंगजेबाची भूमिका करतो. त्यात तो मुघलांचा समर्थक होत नाही, किंवा रामराज्य सिनेमात रावणाची भूमिका केलेल्या कलावंताने सीतेचं हरण केलं होत, याचा अर्थ तो कलाकार रावण होता असं नाही असे शरद पवार यांनी म्हंटल.

आधी डोक्यात घातला दगड, मग जाळले गुप्तांग; तरुणाच्या अमानूष हत्येने हादरले शहर

औरंगाबाद – शहरात खुनांचे सत्र सुरूच असून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या मैदानात ही हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचे गुप्तांग जाळल्याचंही उघड झालं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिसारवाडी भागातील खुनाची घटना ताजी असतानाच ही एक खुनाची घटना उघडकीस आल्याने पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.

शहरातील टी व्ही सेंटर चौकातील ग्राउंडवर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वय सुमारे 32 वर्षे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून त्याचे गुप्तांगही आरोपींनी जाळले आहे. आरोपी एक पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाची हत्या होऊन 24 तासांपेक्षाही अधिक काळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरुन वाद झाल्यानंतर ही हत्या केली असावी असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. मृतक तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

‘या’ जिल्ह्यात रुग्णसंख्येसह मृत्यू संखेतही झाली वाढ, कोरोनाचे नवे 870 रुग्ण तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट तीव्र होत असताना सहाव्या दिवशीही रुग्णवाढ कायम राहिली. जिल्ह्यात चोवीस तासात नव्याने 870 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 290 रुग्णांचा समावेश आहे. तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा पार केला. बाधित रुग्णापैंकी 354 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. तसेच आटपाडी 33 कडेगाव 12, खानापूर 51, पलूस 61, तासगाव 81, जत 57, कवठेमहांकाळ 41, मिरज 92, शिराळा 46 आणि वाळवा तालुक्यात 106 रुग्ण आढळले.

मगील चार दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांमध्ये वाढ होत असताना मृत्यूमध्येही वाढ झाली. चोवीस तासात कोरोना संयशित असलेल्या रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या 1280 पैकी 355 बाधित तर 2042 अँन्टीजेन चाचणीमध्ये 546 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यांमध्ये 870 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या 5 हजार 62 वर पोहोचली. याशिवाय बाधित रुग्णापैंकी 354 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 2 लाख 6 हजार 256 हजार रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 5 हजार 414 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 1 लाख 95 हजार 780 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 62 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून त्यापैकी 4894 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय 165 रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु असून 39 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

केंद्र सरकार तुम्हाला देणार 10 हजार रुपये; फायदा घेण्यासाठी तुम्हाला घरबसल्या करावे लागेल ‘हे’ काम

SIP

नवी दिल्ली । लहान व्यावसायिक आणि रोजंदारी वरील मजुरांना कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसला आहे. आता हळूहळू उद्योगधंदे सुरू झाले आहेत. देशात अजूनही मोठ्या संख्येने अशी लोकं आहेत, जी रस्त्यावर फेरीवाले किंवा गाडी लावून (Street Vendors)आपला उदरनिर्वाह करतात, मात्र त्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू झालेला नाही. अशा लोकांना काळजी करण्याची गरज नाही. केंद्र सरकार 10 हजार रुपये थेट तुमच्या खात्यावर पाठवेल.

देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी केंद्रातील केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी पीएम स्वानिधी योजना ही एक आहे. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना 10,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास सबसिडीही दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करावा लागेल.

योजनेचे ठळक मुद्दे
या योजनेअंतर्गत कर्जदाराचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
हे कर्ज 24 मार्च 2020 रोजी किंवा त्यापूर्वी आधारशी मोबाईल नंबर लिंक करणार्‍यांना उपलब्ध असेल.
योजनेचा कालावधी फक्त मार्च 2022 पर्यंत आहे, त्यामुळे त्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करा.
रस्त्यावरील विक्रेते मग ते शहरी असो की निमशहरी किंवा ग्रामीण असो त्यांना हे कर्ज मिळू शकते.
या कर्जाच्या व्याजावर सबसिडी उपलब्ध आहे आणि रक्कम तिमाही आधारावर खात्यात ट्रान्सफर केली जाते.

या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना एका वर्षासाठी 10,000 रुपयांपर्यंतचे गॅरेंटी कोणत्याही गॅरेंटीविना दिले जाते. यामध्ये मासिक आधारावर कर्ज भरता येते. रस्त्यावरील विक्रेत्याने पीएम स्वानिधी योजनेंतर्गत मिळालेल्या कर्जाची नियमित परतफेड केल्यास 7 टक्के दराने वार्षिक व्याज सबसिडी देण्याची तरतूद आहे. व्याज सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT) तिमाही आधारावर पाठवली जाईल.

चिखलात घसरू नये म्हणून त्याने मारली उडी अन झाले अभ्यंगस्नान ; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळ्यात चिखलातून जाताना प्रत्येक्जण काळजी घेतो कि आपण घसरून खाली तर पडणार नाही ना. मात्र, काहीजण चिखलातून चालताना सटकन खाली घसरून पडतात. असाच प्रकार एका पठ्याच्या बाबतीत घडला आहे. त्याचा चिखलातून घसरलेला आणि पाण्यात पडलेला व्हिडीओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावरव्हायरल झालेल्या व्हिडिओत व्यक्ती एका नाल्यात साचलेल्या पाण्यातून पुढे उडी मारताना दिसत आहे. चिखलातून घसरू नये म्हणून त्याने हातात चप्पलही घेतली आहे. मात्र, पुढे उडी मारल्यानंतर तो थेट पाण्यातच पडला. आणि त्यामुळे तो पूर्णपणे भिजून गेला.

https://www.instagram.com/p/CY3695sPFIA/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

 

सध्या या तरुणाचा नाल्यातील पाण्यात घसरून पडलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओकडे पाहिल्यावर हसू आवरता येत नाही. सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.

जातीयवादी विचारांना काँग्रेसने हद्दपार केले : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

उंडाळे- सवादे भागातील बरेचसे लोक कामानिमित्त मुंबईला असतात. गावाच्या विकासासाठी ते सर्वजण गावकऱ्यांच्या सोबत कायमच असतात. अश्या वेळी प्रत्येक निवडणुकीत या भागातील गावांनी काँग्रेस पक्षाचा विचार जपला आहे. स्व यशवंतराव मोहिते, स्व. विलासराव पाटील व त्यांच्यानंतर माझ्या पाठीशी येथील जनता ठामपणे उभी असल्याने राज्यात व देशात काम करण्याची संधी मिळाली व त्यामुळेच या भागात विकास करता आला. अजून भरपूर विकासकामे या भागात करायची आहेत. धोरणात्मक पद्धतीने या भागातील विकास आजपर्यंत झाला आहे यापुढेही केला जाईल. चातुर्वर्णाची उतरंड काँग्रेस पक्षाने मोडीत काढून घटनेनुसार देशात सर्वांना सोबत घेऊन विकास केला. संधीची समानता व सर्वाना समान वागणूक कायमच काँग्रेस पक्षाने देशात रुजविली आहे. जातीयवादी विचारांना काँग्रेसने जसे हद्दपार केले तसेच या भागातील जनतेने सुद्धा हद्दपार केले आहे. काँग्रेसच्या विचारांची पाईक असलेल्या जनतेने कधीच जातीय शक्तींना थारा दिला नसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

उंडाळे- सवादे भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन, उदघाटनं कार्यक्रम माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत जि प सदस्य उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सवादे च्या सरपंच लक्ष्मीताई सुतार, उपसरपंच पुजाराणी थोरात, इंद्रजीत चव्हाण, शिवाजीराव मोहिते, नरेंद्र पाटील, उदय पाटील (आबा), मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव, येळगावचे माजी सरपंच मन्सूर इनामदार, मालखेडचे देवदास माने, बाजीराव थोरात, प्रकाश पाटील, तुकाराम थोरात, शिवाजीराव थोरात, विलास थोरात, रघुनाथ पाटील, महादेव थोरात, दीपक थोरात, हिम्मत थोरात, दादासो थोरात (LIC), निवास थोरात, शंकर थोरात, मारुती शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा थोरात, जयश्री कदम, जयश्री साठे, कविता बांदेकर, शिवाजी सुतार आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

यावेळी सवादे ते तुळसण ग्रामीण मार्ग रस्ता डांबरीकरण साठी १५ लाख रु., व्यायाम शाळा बांधणीसाठी १५ लाख रु., सवादे येथील बाबा महाराज व गाडेवाट काँक्रिटीकरण साठी १० लाख रु., मातंग वस्ती लागत बालोद्यान सुशोभीकरण साठी १० लाख रु. हायमास्क लॅम्प साठी ३ लाख रु., स्मशानभूमी काँक्रिटीकरण साठी १० लाख रु., स्मशानभूमी साठी संरक्षक भिंत व शेड साठी १० लाख रु., तसेच जि प सदस्य उदयसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून गावातील अंतर्गत गटार काँक्रिटीकरण साठी ४ लाख रु., जि प सदस्या मंगलाताई गलांडे यांच्या स्थानिक विकास निधीतून मातंग वस्ती सभा मंडप साठी ७ लाख रु., पं स सदस्य काशिनाथ कारंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ वॉटर एटीएम मशीन बसविण्यासाठी २ लाख रु. असे एकूण ८६ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या व जि प सदस्य उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जि प सदस्य उदयसिंह पाटील म्हणाले कि, विकास हाच काँग्रेस पक्षाचा ध्यास आहे. हे आधीच्या लोकप्रतिनिधींनी व आताच्या लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून दिसत आहे. लोकप्रतिनिधी सक्षम असल्यामुळेच आपल्या भागात विकासाची गंगा वाहत आहे. यामुळे गावाच्या विकासासाठी लोकांनी मतभेद सोडून एकत्र आले पाहिजे तरच गावचा विकास साधता येईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नांगरे यांनी केले. आभार कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन थोरात यांनी मानले.

‘विमानाने प्रवास करणाऱ्यांना कोरोनाच्या पहिल्या लाटेची जास्त आणि दुसऱ्या लाटेची भीती कमी’ – DGCA रिपोर्ट

Flight Booking

नवी दिल्ली । कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक असेल, ज्यामध्ये जास्त मृत्यू झाले आहेत, मात्र विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची भीती कमी होती. यामुळेच पहिल्या लाटेच्या (म्हणजे 2020) तुलनेत तिसर्‍या लाटेत (म्हणजे 2021) 33 टक्के जास्त प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. DGCA ने जारी केलेल्या रिपोर्ट नंतर हा खुलासा झाला आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) च्या 2021 च्या रिपोर्ट मध्ये संपूर्ण वर्षभरात 33 टक्के प्रवाशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर दुसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त धोकादायक होती. पहिल्या लाटेत सुमारे दोन महिने फ्लाईट्स बंद राहिल्या असली, तरी सरासरी काढल्यास गेल्या वर्षी जास्त प्रवाशांनी प्रवास केला आहे. मात्र, संपूर्ण वर्षाच्या तुलनेत मे महिन्यात कमी प्रवाशांनी विमानाने प्रवास केला आहे. मे महिन्यात कोरोनाचा उच्चांक होता, जेव्हा दररोज चार लाखांहून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदवली जात होती, मात्र या महिन्यापूर्वी आणि नंतर लोकांनी खूप प्रवास केला आहे.

DGCA च्या रिपोर्ट नुसार 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये दोन कोटींहून जास्त प्रवाशांनी प्रवास केला आहे. जिथे 2020 मध्ये 630.11 लाख प्रवाशांनी विमानाने प्रवास केला, तर गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये 838.14 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामध्ये 747.47 लाख लोकांनी खासगी फ्लाईट्स मधून प्रवास केला, तर 100.67 लाख लोकांनी एअर इंडियाने प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे.

रिपोर्ट नुसार, 2020 च्या तुलनेत एअर इंडिया आणि अलायन्स एअरने मिळून 47.34 टक्के प्रवासी वाढले आहेत आणि खाजगी विमान कंपन्यांनी 31.27 टक्के वाढ नोंदवली आहे. जर आपण मार्केट शेअरबद्दल बोललो तर, पूर्वीप्रमाणेच, इंडिगोचा बाजारातील हिस्सा निम्म्याहून जास्त म्हणजे 54.8 , एअर इंडियाचा 12 टक्के आणि तिसऱ्या क्रमांकावर स्पाइसजेटचा 10.4 टक्के बाजार हिस्सा आहे.

गृहराज्यमंत्री.. स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार ? : चित्रा वाघ

सातारा | जिल्ह्यातील पळसवेड गावच्या माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या आक्रमक झालेल्या असून ट्विट करत त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.

विनविभागातील महिला वनरक्षक सिंधू सानप यांना मारहाण करणारा माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्याच्या पत्नीला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत वाघ यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘साता-यात पळसवडेचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यानं गर्भवती वनरक्षक महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. अशा नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे,’ असा संताप वाघ यांनी व्यक्त केला आहे.

माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाणही घटना सातारा जिल्ह्यातील असल्याने चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शंभुराज देसाई, तुम्ही गृहराज्यमंत्री.. तुम्हालाच स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार, असा सवाल त्यांनी केला आहे. वनरक्षक सिंधू सानप यांच्या तक्रारीनंतर जानकर व त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बुधवारी दोघांनाही अटक केली आहे.

शाळा सुरु करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय काल ठाकरे सरकारच्या वतीने घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात शाळा सुरु करण्या बाबत बैठक घेतली जाणार आहे. यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना सल्ला दिला आहे. “कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा, ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे तिथे 10 विद्यार्थ्यांना बोलवावे, असे म्हणत पाटील यांनी पवारांना सल्ला दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पुणे या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण वाढत आहेत. अशा परिस्थितीत शाळा या सुरु कराव्या लागणार आहेत. ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे. त्या वर्गात 10 विद्यार्थ्यांना बोलवावे. अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्यांनी पुण्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती करणार आहे.

पुण्यात शाळा सुरु करायच्या असतील तर काही गोष्टीचा विचार हा करावा लागणार आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा, विद्यार्थ्यांचे स्लॉट पाडणे, ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे तिथे 10 विद्यार्थ्यांना बोलवावे, अशा प्रकारच्या गोष्टींचा अवलंब करावा, असा सल्ला यावेळी पाटील यांनी दिला.

CBDT ने ULIP मधील 2.5 लाखांहून अधिक प्रीमियमवरील कर सवलत मर्यादा कमी केली

नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 2021-22 या आर्थिक वर्षासाठी युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIP) वरील कर सवलत मर्यादा कमी केली आहे, ज्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. बोर्डाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात इन्कम टॅक्स सवलतीसाठी ULIP च्या प्रीमियमची मर्यादा 2.5 लाख रुपये निश्चित केली आहे. यापेक्षा जास्त प्रीमियम भरणाऱ्या करदात्यांना लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) कर भरावा लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 च्या अर्थसंकल्पातच यासाठी तरतूद केली होती, जी चालू आर्थिक वर्षापासून लागू होईल.

CBDT ने आयकराच्या कलम 10(10D) अंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, 2020-21 नंतर ULIPs वरील कर सवलतीची गणना करण्यासाठी एकूण प्रीमियम मर्यादा 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. वास्तविक, ULIP हा इन्कम टॅक्स सवलतीसाठी सर्वाधिक वापरला जाणारा पर्याय आहे कारण तो डबल टॅक्स सूट देतो. सर्वप्रथम, जेव्हा इन्शुरन्स खरेदी केला जातो, तेव्हा त्याचा हप्ता आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्स फ्री असतो. ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये असू शकते. दुसरी सूट आयकर कलम 10(10d) अंतर्गत इन्शुरन्सवरील सम एश्‍योर्डवर उपलब्ध आहे, ज्यावर काही विशेष नियम देखील लागू होतात. सरकारने हा नियम बदलला आहे, ज्यामुळे टॅक्स सूट मर्यादेवर परिणाम होणार आहे.

वित्त कायदा 2021 असे नमूद करतो की जर ULIP चा एकूण प्रीमियम वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावरील इन्शुरन्सची रक्कम इन्कम टॅक्स सवलतीच्या कक्षेतून बाहेर काढली जाईल. जर एखाद्या करदात्याने ULIP मध्ये गेल्या आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम भरला असेल तर त्याला 80C ची पूर्ण सूट दिली जाईल मात्र 10(10d) अंतर्गत सूटचा लाभ संपेल. सम एश्‍योर्डच्या रकमेत बोनस म्हणून मिळालेले पैसे देखील समाविष्ट असतील.

या पॉलिसीवर परिणाम होणार नाही
1 फेब्रुवारी 2021 पूर्वी खरेदी केलेल्या ULIP वर नवीन नियमांचा परिणाम होणार नाही आणि करदाते पूर्वीप्रमाणेच भविष्यातील इन्शुरन्सच्या रकमेवर इन्कम टॅक्स सवलतीचा दावा करू शकतील. त्यानंतर, खरेदी केलेल्या सर्व ULIP वर प्रीमियमची कमाल मर्यादा लागू होईल. करदात्याने एकापेक्षा जास्त पॉलिसी घेतल्यास, सर्व पॉलिसींचा एकूण प्रीमियम जोडून त्याची गणना केली जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्याने अनेक लहान पॉलिसी खरेदी केल्या असतील ज्यामध्ये प्रत्येकाचा प्रीमियम 2.5 लाखांपेक्षा कमी असेल मात्र त्या सर्वांनी मिळून ही मर्यादा ओलांडली असेल, तर करदात्याला फक्त त्या पॉलिसीवर टॅक्स सूट मिळू शकेल ज्याचा एकूण प्रीमियम असेल. 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही..

याप्रमाणे कर सवलतीचे गणित समजून घ्या
समजा एखाद्या व्यक्तीने 1 फेब्रुवारी 2021 पूर्वी x पॉलिसी खरेदी केली आहे, ज्याचा वार्षिक प्रीमियम 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. 2030 मध्ये या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, त्याला सम एश्‍योर्ड म्हणून बोनससह मिळालेल्या एकूण रकमेवर टॅक्स सूट मिळेल. आता जर त्याच व्यक्तीने 1 फेब्रुवारी 2021 नंतर तीन ULIP A, B, C खरेदी केले असतील, ज्यामध्ये प्रत्येकाचा प्रीमियम 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकतो मात्र त्यांना जोडून एकूण प्रीमियम यापेक्षा जास्त झाला तर करदाते पात्र ठरतील. फक्त त्या पॉलिसींसाठी. ज्यांचे प्रीमियम 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा आश्‍वासितांवर टॅक्स सूट मिळेल. उदाहरणार्थ, जर ULIPs A आणि B ची प्रीमियम बेरीज 2.5 पेक्षा कमी असेल मात्र C जोडल्यावर त्यापेक्षा जास्त असेल, तर करदात्याला पहिल्या दोन ULIP च्या इन्शुरन्सच्या रकमेवर टॅक्स सवलतीचा दावा करता येईल. लाँग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG) कर तिसर्‍या ULIP सम एश्‍योर्डमधील शिल्लक रकमेवर वजा प्रीमियम रकमेवर भरावा लागेल.

या प्रकरणात संपूर्ण सूट दिली जाईल
पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वी आयुर्विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला इन्सुरन्सची रक्कम म्हणून मिळालेल्या संपूर्ण रकमेवर टॅक्स सूट दिली जाईल. या विम्याचा प्रीमियम 2.5 लाख मर्यादेपेक्षा जास्त नसला तरीही.