सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?; शाळेच्या निर्णयावरून भातखळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आलेल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय आणि विद्यार्थ्यांच्या लसीकरणा वरून ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “कॉलेज विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पालक आणि शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. मात्र, लसींचे डोस घेतलेल्याना शाळेत जात येणार आहे, असे म्हंटले आहे. तर काल राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही माध्यमांशी संवाद साधताना सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत माहिती दिली. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. शाळेत जाऊन १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत, असे गायकवाड यांनी म्हंटले आहे.