Monday, December 29, 2025
Home Blog Page 2943

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! प्रसिद्धीसाठी करणार तब्बल साडेसोळा कोटी खर्च

Uddhav Thackery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्य सरकारकडून अनेक योजना, उपक्रम राबविण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याची जनतेला माहिती नसल्याने त्या जनतेपर्यंत पोहचतच नाहीत. त्या योजनांची जनतेला माहिती व्हावी म्हणून ठाकरे सरकारच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ती म्हणजे राज्यात विविध शासकीय योजना, शासकीय संदेश आणि शासकीय कामे याच्या प्रसिद्धीसाठी तब्बल साडे सोळा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय योजना, कामाची प्रसिद्धी विविध माध्यमातून केली जाणार आहे.

राज्य सरकारच्यावतीने आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यात राज्य सरकारकडून विविध शासकीय उपक्रम, योजना राबविल्या जातात. त्यांना प्रसिद्धीही दिली जाते. त्यामुळे शासनाने राबविल्या योजनांची नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर त्याचा लाभ लोकांकडून घेतला जातो. राज्य सरकारने घेलेल्या निर्णयात कृषी, आरोग्य यासह इतर विभागात ज्या शासकीय योजना आहेत. त्याचा यात समावेश करण्यात आलेला आहे.

राज्य सरकारने राबविलेल्या तसेच राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, उपक्रमांची माहिती जनतेला व्हावी आणि जनतेने लाभ घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मीडिया, फेसबुक, ट्विट्सह इतर माध्यमातून शासकीय योजनांची प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. म्हणून राज्य सरकारे आज यासाठी तब्बल साडे सोळा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

कौतुकास्पद ! भंगारातील एमएटी अन रिक्षाचे साहित्य वापरून बनविली 1930 सालची फोर्ड गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

देवराष्ट्रेच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी बनवलीय सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकने. दता लोहार यांच्याप्रमाणे अशोक आवटी यांनी देखील भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून, जुगाड करत ही 1930 सालची ही फोर्ड गाडीची हुबेहूब गाडी बनवलीय. अशोक आवटी यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे.

सध्या ते सांगली-कर्नाळ रोडवरील गॅरेजचे चालक आहेत… काकानगर मध्ये टू व्हीलर गाड्या व ट्रॅक्टर दुरुस्तीचं गॅरेज असलेल्या अशोक यांनी केवळ आपल्या कल्पकता आणि 2019 ला सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात you tube वर चे व्हिडिओ पाहून एक घरात एक चार चाकी गाडी मुलाना खेळण्यासाठी असावी याचे स्वप्न पाहिले. आज अडीच वर्षानंतर अशोक आवटीचे स्वप्न प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलय ते या फोर्ट गाडीच्या रुपात.. रिक्षा प्रमाने हँड किक वर सुरु होणारी ही गाडी प्रेटोल वर चालते…30 किमी इतका मायलेज देते.

अगदी कमी वयापासून अशोक यांना गाड्या दुरुस्तीचा छंद जडला. गॅरेज थाटले. गाड्या दुरूस्त करता-करता अनेक वस्तू, मशीन खोलाखोलीचा नाद लागला. वेगवेगळ्या गाड्या माॅडिफाय केल्या. याचं पार्ट त्याला त्याचं याला, अशी उसाबर केली. चांगलं आणि वेगळं बनवायचा प्रयत्न केला. आता चारचाकी गाडी बनवायचं मनावर घेतलं आणि दोन वर्षे खपून पठ्ठ्यानं गाडी तयार केलीही. भंगारातील एमएटी गाडीचं इंजिन आणि रिक्षाचे हब आणि आणखी काही पार्टचा जुगाड कररून आणि लोखंडी पत्रा आणि अँगल पासून ही १९३० ची अलिशान FORD साकार झाली आहे. फक्त तीस हजार खर्च आला आहे. गाडीला led लाइट आहेत, इंडिकेटर , हॉर्न अशी ही सेम टू सेम फोर्ड गाडी आहे असे वाटत.

Cryptocurrency Prices : METAF 3000 टक्क्यांनी वाढले तर Bitcoin अन Ethereum रेड मार्कमध्ये

Online fraud

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 1.51% ने घट झाली आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता, जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $2.04T ट्रिलियन पर्यंत खाली आले आहे. बिटकॉइन आणि इथेरियम हे दोन्ही मोथे कॉईन्स रेड मार्कवर ट्रेड करत होते. दोन्ही 2 टक्क्यांहून जास्तीने घसरले आहेत. शुक्रवारी, Dogecoin 11 टक्क्यांहून अधिकने उडी मारेल.

शुक्रवारी, बिटकॉइन 2.03% खाली $42,783 वर ट्रेड करत होता. बिटकॉइनने गेल्या 24 तासांत $42,447.04 चा नीचांक गाठला आणि नंतर $44,278.42 चा उच्चांक गाठला. इथेरियम 2.14% खाली $3,275 वर व्यापार करत आहेत.इथेरियमने त्याच कालावधीत $3,236.23 चा नीचांक आणि $3,396.97 चा उच्चांक गाठला. शुक्रवारी बातमी लिहिली तेव्हा, क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे वर्चस्व 39.7% होते, तर इथेरियमचे वर्चस्व 19.1 टक्के नोंदवले गेले होते.

Dogecoin चा स्फोट झाला
Coinmarketcap च्या आकडेवारीनुसार, Dogecoin ने शुक्रवारी गेल्या 24 तासात 11.54% ची उडी मारली आहे. Dogecoin $0.188273 वर ट्रेड करत होता. सलग दोन दिवसांच्या उसळीनंतर ही करन्सी 11 व्या क्रमांकावर आली आहे. काल म्हणजे गुरुवारी देखील त्याच वेळी Dogecoin मध्ये 12 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

BNB, Tether आणि Polkadot चा शुक्रवारी एकाच वेळी ग्रीन मार्कवर ट्रेड करणाऱ्या मोठ्या करन्सीमध्ये समावेश करण्यात आला. Shiba Inu 5.18 टक्के, Terra Luna 1.86% आणि Cardano 3.86% घसरले.

एका दिवसात सर्वाधिक वाढणाऱ्या करन्सी
METAF, YHC आणि NJF ही गेल्या 24 तासांत (सकाळी 10:45 वाजता) टॉप तीन करन्सी होत्या. Metaverse Future (METAF) ने 3158.51% उडी घेतली तर YoHero (YHC) मध्ये 1141.51% ची वाढ झाली. याशिवाय, NinjaFloki (NJF) मध्ये 1095.29% ची घट नोंदवली गेली.

अजित पवारांचा मोबाईल नंबर वापरून बिल्डरला 20 लाखांच्या खंडणीसाठी धमकी; 6 जण अटकेत

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून चक्क पुण्यातील बड्या बिल्डरला 20 लाखांच्या खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

सदर आरोपींनी गूगल प्ले स्टोर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले. याच्या मदतीने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकचा वापर करून बांधकाम व्यवसायिकाला फोन केला. बिल्डरकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिल्यानंतर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता. नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत

‘या’ बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर काय आहेत जाणून घ्या

Banking Rules

नवी दिल्ली । बंधन बँकेने आपल्या FD वरील व्याजदरात बदल केले आहेत. बंधन बँकेतील सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD साठीचे फिक्स डिपॉझिट दर वार्षिक 3 टक्के ते वार्षिक 6.25 टक्के आहेत. बंधन बँक 7 दिवस ते 14 दिवस आणि 15 दिवस ते 30 दिवसात मॅच्युर होणाऱ्या FD साठी 3% व्याज दर देते.

त्याचप्रमाणे, बँक 31 दिवसांपासून सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युर होणाऱ्या FD साठी 3.50 टक्के व्याज दर देत आहे. 6 महिने ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी बंधन बँक 4.50 टक्के व्याजदर देते. बंधन बँक 6 महिने ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युर होणाऱ्या FD साठी 4.50 टक्के देते. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ डिपॉझिट्सवर FD चे दर लागू होतात.

नवीन व्याजदर काय आहेत ते जाणून घ्या (2 कोटींपेक्षा कमी)
7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर – 3.00%
15 दिवस ते 30 दिवस – 3.00%
31 दिवस ते 2 महिन्यांपेक्षा कमी- 3.50%
2 महिने ते 3 महिन्यांपेक्षा कमी- 3.50%
3 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी- 3.50%
6 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी – 4.50%
1 वर्ष ते 18 महिने – 5.25%
2 वर्षांखालील 18 महिन्यांच्या वर – 5.25%
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी- 6.25%
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 6.25%
5 वर्षे ते 10 वर्षे – 5.60%

ज्येष्ठ नागरिकांसाठी बंधन बँक नवीन एफडी दर (₹2 कोटींपेक्षा कमी)
ज्येष्ठ नागरिकांना नियमित ग्राहकांसाठी स्लॅब दरांपेक्षा अतिरिक्त 75 बेसिस पॉइंट मिळतात. ताज्या सुधारणांसह, बंधन बँकेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी FD चे दर आता 3.75 टक्के ते 7 टक्के वार्षिक आहेत.

Budget 2022: अर्थसंकल्पापूर्वी सादर केले जाणारे ‘आर्थिक सर्वेक्षण’ म्हणजे नेमकं काय असते; चला जाणून घेऊया

नवी दिल्ली । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2022-23 च्या अर्थसंकल्पाची तयारी अर्थ मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.आर्थिक सर्वेक्षण हा अर्थ मंत्रालयाचे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. दरवर्षी, अर्थसंकल्प सादर करण्याच्या फक्त एक दिवस आधी, सरकार संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2022 सादर करते.

मुख्य आर्थिक सल्लागार तयार करतात
अर्थ मंत्रालयाच्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक सर्वेक्षण तयार केले जाते. अर्थमंत्र्यांच्या मान्यतेनंतर ते जारी केले जाते. देशाच्या वार्षिक आर्थिक विकासावर मंत्रालयाचा हा आढावा असतो . आर्थिक सर्वेक्षण गेल्या 12 महिन्यांतील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आढावा घेतो, प्रमुख विकास कार्यक्रमांचा सारांश देतो.

सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर आर्थिक सर्वेक्षण हे देशाच्या आर्थिक आरोग्याचा लेखाजोखा देते. या डॉक्युमेंटच्या माध्यमातून सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे आणि सरकारी योजना किती वेगाने सुरू आहेत हे सांगत असते. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात हा डॉक्युमेंट सादर केला जातो. 2014-15 च्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले होते की, भारत $ 750 अब्ज ते $ 1 ट्रिलियन पर्यंत परकीय चलन साठा ठेवू शकतो.

सरकारी धोरणांची माहिती
आर्थिक सर्वेक्षण भारत सरकारच्या धोरणांची माहिती देते. याद्वारे सरकार अर्थव्यवस्थेच्या संभाव्यतेचे विश्लेषण करते. बर्‍याचदा, आर्थिक सर्वेक्षण आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पासाठी धोरण मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करते. मात्र, सरकारने आपल्या शिफारशी लागू केल्यास ते बंधनकारक नाही. आर्थिक सर्वेक्षणामध्ये धोरणात्मक विचार, आर्थिक मापदंडावरील प्रमुख डेटा, स्थूल आर्थिक संशोधन आणि क्षेत्रवार आर्थिक ट्रेंडचे विश्लेषण समाविष्ट आहे.

पहिले सर्वेक्षण 1950 मध्ये झाले
भारताचे पहिले आर्थिक सर्वेक्षण 1950-51 मध्ये सादर करण्यात आले. 1964 पर्यंत ते केंद्रीय अर्थसंकल्पासोबत सादर केले जात होते, मात्र 1964 पासून ते अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले.

2015 नंतर आर्थिक सर्वेक्षण दोन भागात विभागले गेले. पहिल्या भागात अर्थव्यवस्थेची स्थिती सांगितली जाते, जी सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी जाहीर केली जाते. दुसऱ्या भागात महत्त्वाची तथ्ये आहेत, जी जुलै किंवा ऑगस्टमध्ये सादर केली जातात. आर्थिक सर्वेक्षण सादरीकरणाची ही विभागणी जेव्हा फेब्रुवारी 2017 च्या शेवटच्या आठवड्याऐवजी पहिल्या आठवड्यात सादर करण्यात आली तेव्हा लागू झाली.

हीच ती वेळ मुख्यमंत्र्याची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवण्याची – चंद्रकांत पाटील 

Chandrakant Patil Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असं आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे,” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी करीत राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आमचे मित्र आहेत. पण शत्रू जरी असला तरी त्याच्या तब्यतीबद्दल आपण त्याला शुभेच्छा देतो. त्यामुळे तो विषय नाही, विषय वारंवार असा चाललेला आहे की, जर मुख्यमंत्र्यांची अशी तब्यतीची स्थिती असेल तर त्यांनी कोणाला तरी चार्ज दिला पाहिजे. याच कारण मुख्यमंत्री हे महाराष्ट्रासारख्या 12 कोटी जनता असणाऱ्या राज्याचे असतात. कालची बैठक ही अत्यंत महत्वपूर्ण होती. या पंतप्रधानांच्या बैठकीला तुम्ही टोपे, दिलीप वळसेंना पाठवले.

देशात इतरही राज्य आहेत. त्या राज्यातही मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधानांच्या बैठकीला सर्व राज्याचे मुख्यमंत्री असल्याने आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलायला वाव मिळणार नाहीच. पण तेच जर तुम्ही असता तर तुम्ही केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर तुमचे खूप जवळचे संबंध देखील आहेत. महत्वपूर्ण निर्णय करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करतो वैगरे हे पुरत नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल एक महत्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, मुंबै बँकेचे अध्यक्षपद मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. पण शिवसेनेचा उमेदवार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडला. कसं झालं हे? आता हे शिवसेनेला कळत नाही की, तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्या प्लॅनमध्ये तुम्ही फसत चालला आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

वाहन विमा 20 टक्क्यांपर्यंत महागणार ! सर्व वाहनधारकांना बसणार फटका

Car Loan

नवी दिल्ली । आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीनंतर देशातील करोडो वाहनधारकांना अजून एक धक्का बसणार आहे. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता वाढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याची गरज आहे. कंपन्यांची मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील करोडो वाहनधारकांवर होणार आहे.

IRDAI ला दिलेला प्रस्ताव
Zeebiz च्या रिपोर्ट्स नुसार, भारतात सुमारे 25 सामान्य विमा कंपन्या आहेत. त्यांच्या प्रस्तावाला IRDA हिरवा कंदील देईल, अशी कंपन्यांना आशा आहे. कंपन्यांचा असा विश्वास आहे की, त्यांना कोरोनामुळे खूप त्रास होत आहे. हे पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्सचा सध्याचा प्रीमियम चांगला नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. काही कंपन्यांची परिस्थिती अशी झाली आहे की, त्यांची सॉल्व्हेंसी त्यांच्या विहित मर्यादेच्या खाली गेली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दावेही वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांवरील दबावही वाढला आहे.

आवश्यक थर्ड पार्टी विमा
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, नवीन दुचाकी खरेदी करताना 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि चारचाकी वाहनांसाठी 3 वर्षांचा थर्ड पार्टी विमा घेणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, कोणतेही वाहन जे रस्त्यावरून फिरते, त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. विमा प्रीमियम IRDAI द्वारे निर्धारित केला जातो. प्रीमियम दरवर्षी बदलतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.

सातारा जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्ह रेट 19 टक्यांवर

Satara corona patient

सातारा | सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 981 जण बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित मंगळवारी आढळून आले. शंभरीच्या खाली असलेला बाधिताचा आकडा आता हजारासमीप पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा हाहाकार झालेला पहायला मिळत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 327 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 981 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 18.41 टक्के आला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील एकूण बाधितापैकी 80 टक्के रूग्ण हे गृहविलगीकरण कक्षात आहेत. त्यामुळे रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांचे प्रमाण अल्प आहे.

गुरूवारी जिल्ह्यात 314 जणांना विविध रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केवळ एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 2 हजार 212 जण उपचार्थ आहेत.

स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाका

Kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर राजकारण देखील तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हा तर भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केलाय.

किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. असे सचिन सावंत म्हणाले.

पण हीच भाजपा सेलीब्रिटींवर दबाव आणून आपल्या शेतकरीविरोधी किंवा मोदी समर्थनाच्या अजेंड्यावर बोलायला भाग पाडते. मविआ सरकारने ठामपणे किरण मानेंच्या पाठीशी उभे राहावे व स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाकावे. भाजपातर्फे कोणी दबाव आणला याची चौकशी व्हावी