Monday, December 29, 2025
Home Blog Page 2944

स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाका

Kiran Mane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर राजकारण देखील तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हा तर भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केलाय.

किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. असे सचिन सावंत म्हणाले.

पण हीच भाजपा सेलीब्रिटींवर दबाव आणून आपल्या शेतकरीविरोधी किंवा मोदी समर्थनाच्या अजेंड्यावर बोलायला भाग पाडते. मविआ सरकारने ठामपणे किरण मानेंच्या पाठीशी उभे राहावे व स्टार प्रवाहचे कान उपटून भाजपाच्या सांस्कृतिक दहशतवादाला उखडून टाकावे. भाजपातर्फे कोणी दबाव आणला याची चौकशी व्हावी

Gold-Silver Prices : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, खरेदी करण्यापूर्वी आजचे दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आज चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 0.26 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करताना दिसत आहे. चांदीच्या दरात 0.07 टक्क्यांची किंचित वाढ झाली आहे.

सोन्याचा दर 0.01 टक्क्यांनी वाढला होता, त्यानंतर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,659 रुपयांवर पोहोचला होता. जर आपण चांदीबद्दल बोललो तर तो 0.08 टक्क्यांनी वाढल्यानंतर 61,030 रुपये प्रति किलो होता.

आज सोन्या-चांदीचे दर किती आहे जाणून घ्या
आज फेब्रुवारीतील डिलिव्हरीसाठी MCX सोने 0.26 टक्क्यांनी वाढून 47,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 61,962 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,340 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,850 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,110 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,110 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,110 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,110 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,110 रुपये
पुणे – 46,340 रुपये
नागपूर -47,110 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,110 रुपये
पुणे -48,850 रुपये
नागपूर – 49,110 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4633.00 Rs 4612.00 -0.455 %⌄
8 GRAM Rs 37064 Rs 36896 -0.455 %⌄
10 GRAM Rs 46330 Rs 46120 -0.455 %⌄
100 GRAM Rs 463300 Rs 461200 -0.455 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4884.00 Rs 4863.00 -0.432 %⌄
8 GRAM Rs 39072 Rs 38904 -0.432 %⌄
10 GRAM Rs 48840 Rs 48630 -0.432 %⌄
100 GRAM Rs 488400 Rs 486300 -0.432 %⌄

कराडच्या काॅटेज हाॅस्पीटलला अखेर पूर्णवेळ अर्थोपडीक सर्जनची नेमणूक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील स्व. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सुमित सतीश शिंदे यांची अर्थोपेडीक सर्जन म्हणून नेमणूक झाली आहे. रिक्त असलेल्या पदावर बऱ्याच कालावधीनंतर उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ अर्थोपडीक सर्जन मिळाल्याने रुग्णांची चांगली सोय होणार आहे.

वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत पूर्णवेळ देणारे अर्थाेपडीक सर्जन कोणी नव्हते. त्यामुळे रूणांना पुरेशी सेवा मिळत नव्हती. गंभीर अपघात किंवा सांध्याचे आजार व अवघड शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना सातारा किंवा खासगी रुग्णालयात पाठवावे लागत होते. अनेक वर्षे या रुग्णालयाला पूर्ण वेळ अर्थाेपडीक सर्जनची गरज होती. डॉ. सुमित शिंदे यांच्या नेमणुकीने ही गरज पूर्ण झाली असून रुग्णांना शासकीय खर्चात चांगली सेवा मिळणार आहे.

या निवडीबद्दल डॉ. सुमित शिंदे यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, जयंतकाका पाटील, बाळासाहेब कुलकर्णी तसेच लायन्स क्बल कराडचे अध्यक्ष खंडू इंगळे व पदाधिकारी तसेच कराड शहरातील सिनियर डॉक्टर्स यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. सुमित शिंदे यांचे पदव्युत्तर शिक्षण हे अत्यंत प्रसिध्द संचिती इन्स्टिट्यूट पुणे तसेच मुंबई महानगर पालिकेतील व्ही. एन. देसाई व भाभा हॉस्पिटल येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. हैद्राबाद येथील सनशाईन हॉस्पिटल जेथे फक्त गुडघ्याच्या कृत्रिम सांधे रोपनाच्या शस्त्रक्रिया होतात तेथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. डॉ. सुमित शिंदे यांच्या नेमणुकीमुळे कराड व परिसरातील गरीब रुग्णांना नक्कीच फायदा होणार आहे.

राज्यातील कारभार सुरळीत, चंद्रकांत पाटलांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर टीका केली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांवर निशाणा साधला. “देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता येईल का हे पाहतो. त्यांना श्रवणयंत्रपण देणार आहे. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे सुरु आहे, असा टोला राऊतांनी लगावला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते. मुख्यमंत्री नाही हजर राहिले, कधी काळी पंतप्रधानही एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत.

काल चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री ठाकरेंबद्दल एक वक्तव्य केले. त्यांना एवढंच सांगतो की, भाजपाच्या आय़ुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे. खरं तर भाजपाने चीनने केलेल्या घुसखोरीवर बोललं पाहिजे. तिथे सीमेवर फार गंभीर स्थिती आहे. चंद्रकांत पाटील किंवा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल.

Stock Market: कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजाराची कमकुवतपणाने सुरुवात, सेन्सेक्स 392 अंकांनी घसरला

Share Market

नवी दिल्ली । कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान भारतीय बाजाराने देखील आज कमकुवतपणाने सुरुवात केली आहे. सेन्सेक्स 392.12 अंकांनी किंवा 0.64 टक्क्यांनी घसरून 60843.18 वर उघडला, तर निफ्टी 114.30 अंकांनी किंवा 0.63 टक्क्यांनी घसरून 18143.50 च्या पातळीवर गेला.

सकाळी 9:44 वाजता, बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स आज खाली आहेत. एचडीएफसी, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, विप्रो आणि यूपीएल हे निफ्टीचे टॉप लुझर्स ठरले आहेत. तर दुसरीकडे, सिप्ला, आयओसी, एल अँड टी, टायटन कंपनी आणि डिव्हिस लॅब्स हे निफ्टीच्या टॉप गेनर्स आहेत.

ग्रीन मार्कवर बाजार बंद
गुरुवारी ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 85.26 अंकांच्या किंवा 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 61,235.30 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 45.45 अंकांच्या किंवा 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 18,257.80 वर बंद झाला.

30 पैकी 20 शेअर्स घसरले
सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 20 शेअर्स घसरले आहेत. एक्सिस बँक सर्वात मोठ्या घसरणीसह ट्रेड करत आहे. 2.33 टक्क्यांच्या घसरणीनंतर तो 723.15 रुपये प्रति शेअरवर दिसत आहे. त्याच वेळी, रिलायन्सच्या शेअरमध्ये 1.22 ची वाढ होत आहे. हा शेअर 2566.30 वर आहे. याशिवाय अल्ट्रा सिमेंट, एचडीएफसी बँक, मारुती, एलटी, एनटीपीसी, पॉवरग्रीड आदी शेअर्स वधारत आहेत.

मदरसन सुमी फोकसमध्ये आहे
बिझनेस रीस्ट्रक्चरिंगसाठी आज एक्स डेट आहे. कंपनी देशांतर्गत वायर व्यवसाय डिमर्ज करत आहे. डिमर्जर नंतरचे मूल्य प्रति शेअर 190-200 रुपये असेल. नवीन कंपनीचे नाव SAMIL असेल. नवीन कंपनीमध्ये ऑटो एंसिलियरी आणि संबंधित व्यवसायांचा समावेश असेल.

तुम्ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तिकीट देता, मग मला का नाही? उत्पल पर्रीकरांचा फडणवीसांना सवाल

Utpal Parrikar Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर याना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झालं आहे. केवळ मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आहे म्हणून कोणाला भाजपमध्ये तिकीट मिळत नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट संकेत दिले. यानंतर उत्पल पर्रीकर यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

उत्पल पर्रीकर म्हणाले की, तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

फडणवीस नेमकं काय म्हणाले होते –

उत्पल परिकर केवळ मनोहर परिकरांचा मुलगा आहे म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही. तसेच उत्पल यांची वेगळी ओळख आणि कामही नसल्याचे ही फडणवीस पुढे म्हणाले होते. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे या संदर्भातला जो निर्णय घ्यायचाय, तो मी घेऊ शकत नाही, आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, हेच त्यासंदर्भातलं निर्णय घेऊ शकतं. असे सूचक विधान फडणवीसांनी केलं होत

नेमकं काय आहे प्रकरण –

दिवंगत नेते मनोहर पर्रीकर हे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2019 ला परिकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबुश मोंसरात यांचा विजय झाला. मात्र बाबुश यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. पणजी विधानसभा मतदारसंघ हा मनोहर पर्रिकरांचा पारंपारीक मतदारसंघ होता. पण बाबूश यांनी भाजपच्या बाजूनं सहानुभूती असतानाही निवडणूक जिंकली होती. आताही त्यांनीच पणजीच्या जागेवर दावा केलाय त्यामुळे उत्पल पर्रीकर याना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाही

राज्याची दशा करणारा नव्हे, तर राज्याला दिशा देणारा मुख्यमंत्री हवा !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. आता भ्रष्टाचाराच्या, शेतकरी आत्महत्येच्या आणि कोरोनाच्या मुद्यांवरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “राज्यात गत वर्षात भ्रष्ट्राचार तब्बल 16 टक्यांनी वाढला. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्ण संख्येत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. अशात राज्याला दिशा देणारा मुख्यमंत्री हवा होता, राज्याची दशा करणारा नाही. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची अधोगती करून दाखवली, अशी टीका भाजपने केली आहे.

भाजपने आपल्या ट्विट अकाऊंटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकावर हल्लबोल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, स्वतः, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी राज्यातील जनतेला वेठीस धरणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात राज्याची झालेली वाताहत भरून निघणारी नाही. राज्याला दिशा देणारा मुख्यमंत्री हवा होता, राज्याची दशा करणारा नाही. महाराष्ट्राची अधोगती करून दाखवली आहे.

वास्तविक पाहता देशाच्या एकूण बेरोजगारांपैकी सर्वाधिक 22 टक्के बेरोजगार महाराष्ट्रात आहेत. राज्यात गत वर्षात तब्बल 16 टक्यांनी भ्रष्ट्राचार वाढला. सर्वाधिक भ्रष्ट हे गृहखाते आहे. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून कोरोनाच्या रुग्ण संख्येत महाराष्ट्र अव्वल तब्बल स्थानी आहे. 70 हून अधिक लाख कोविड रुग्ण असून राज्यात कोरोनामुळे आजवर 1 लाख 41 हजार लोकांनी प्राण गमावले आहे. देशातील एकूण रुग्ण संख्येपैकी तब्बल 34 टक्के रुग्ण व मृत्यू एकट्या महाराष्ट्रात आहेत, असे भाजपने ट्विटमध्ये म्हंटले आहे.

ब्लॅकमेल.. अत्याचार : अल्पवयीन तरूण- तरूणीचा व्हाॅटसअप चॅटींगने केला घात

सातारा | सतरा वर्षाच्या महाविद्यालयीन मुलीला सतरा वर्षीय मुलानेच ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे. मात्र, व्हाॅटसअप चॅटींग तरूणीला चांगलेच महागात पडले असून होणाऱ्या त्रासापसाून सुटका होण्यासाठी पोलिस ठाणे गाठावे लागेल आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिच्या मैत्रिणीच्या मामाच्या घराशेजारी राहणाऱ्या युवकाने पीडित मुलीशी ‘तिची मैत्रीण बोलतेय, असे भासवून चॅटींग केले. पीडित मुलीला वाटले तिची मैत्रीणच तिच्याशी चॅटींग करत आहे. त्यामुळे ती सुद्धा बिनधास्तपणे चॅटींग करु लागली. मात्र काही दिवसांनी आपल्याशी चॅटिंग करणारी ही मैत्रीण नसून मुलगा आहे, हे तिला समजले. त्यावेळी त्या तरुणाने पीडीत तरुणीला धमकी देऊन प्रेमाचे संबंधित मेसेज पाठवायला भाग पाडले.

मुलगा एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी जवळीक साधून तिला एके दिवशी राजवाड्यावरील बसस्थानकात बोलावून घेतले. तिला दुचाकीवरुन शाहूपुरी परिसरातील दिव्यानगरीतील एका खोलीत नेले. या ठिकाणी त्याने ‘तुझे कॉल रेकॉर्ड तुझ्या घरच्यांना दाखवीन’ असे ब्लॅकमेल करुन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर संशयित युवकाकडून वारंवार त्रास सुरु झाल्याने मुलगी घाबरली. अखेर मुलीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात पोनि विश्वजीत घोडके यांना प्रत्यक्ष भेटून ओढवलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ संबंधित युवकावर गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढणार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळाबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. त्यामुळे गोव्यात शिवसेना आणि तृणमुलं काँग्रेस सोबतच्या युतीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. . गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रसार माध्यमांसमोर पटेल यांनी राष्ट्रवादीच्या स्वबळाची घोषणा केलीय. गोव्यात कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच तृणमूल काँग्रेस मध्ये युती करीत लढणार असल्याचे चिन्ह दिसत नाही असे पटेल म्हणाले.

यावेळी त्यांनी बाकी राज्यातील राष्ट्रवादीचा निवडणूकिचा प्लॅन देखील सांगितला. उत्तरप्रदेश मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांची आघाडी झाली आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी एक जागा लढवणार असून पुढच्या टप्प्यातील माहिती लवकरचं कळेल, असं पटेल म्हणाले. तर मणिपूर मध्ये आम्ही काँग्रेस सोबत युती केली असून मणिपूर मध्ये राष्ट्रवादीला 5 जागा मिळतील असेही पटेल म्हणाले.

दरम्यान, गोवा विधानसभा रंगतदार अवस्थेत आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजप मध्ये थेट सामना असताना त्यात शिवसेना , तृणमूल काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत उडी मारल्याने यंदा गोव्याची निवडणूक चुरशीची होईल यात शंकाच नाही

“ओमिक्रॉननंतर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी तयार राहा”; पंतप्रधानांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही केल्या. शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्‍या वर्षात दाखल झाला आहे. ओमिक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहावे, असे मोदींनी म्हटले.

राज्यातील मुख्यमंत्र्यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीवेळी पंतप्रधानांसोबतच्या गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपली तयारी कोविडच्या सर्व प्रकारांपेक्षा पुढे असली पाहिजे. आपण ओमिक्रॉनवर विजय मिळवल्यानंतर, आपल्याला व्हायरसच्या इतर प्रकारांशी लढण्यासाठी देखील तयारी करावी लागेल. आणि यामध्ये राज्ये एकमेकांना सहकार्य करतील.

ओमिक्रॉनचा प्रसार पूर्वीच्या प्रकारांपेक्षा वेगाने होत आहे, तो अधिक प्रसारित होत आहे. आपले आरोग्य तज्ञ परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. स्पष्टपणे आम्ही सतर्क आहोत. राहावे लागेल. कठोर परिश्रम हाच आमचा एकमेव मार्ग आहे आणि विजय हाच एकमेव पर्याय आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.