Friday, January 2, 2026
Home Blog Page 3001

नशा करणाऱ्या युवकांना वॉचमनने थांबविले, मग युवकांनी वॉचमनलाच…

औरंगाबाद – नशा करण्यासाठी जात असलेल्या काही युवकांना वॉचमनने थांबवण्याचा राग आल्याने या युवकांनी वॉचमनलाच बेदम मारहाण केल्याचा प्रकार काल दुपारच्या सुमारास शहरातील टीव्ही सेंटर भागातील नवीन कॉम्प्लेक्स येथे घडला‌. याप्रकरणी वॉचमनच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही सेंटर येथील पोलिस कॉलनी मागे असलेल्या मोकळ्या जागेची देखभाल करण्याचे काम फिरोज खान हे करत असतात‌. काल दुपारी या ठिकाणी सय्यद नजीर, फिरोज आणि रशीद व अन्य तीन ते चार जण आले. हे सर्व तरुण नशा करण्यासाठी मोकळ्या मैदानात आल्याची चुनचून लागताच वॉचमन फिरोज खान यांनी त्यांना खुल्या जागेत बसण्यासाठी मज्जाव केला. त्याचा राग आल्याने या युवकांनी वॉचमनला बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिरोज खान हे जखमी झाले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात त्यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणानंतर आसपासच्या लोकांनी पोलीस कॉलनी मागील भाग नाल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नशेखोर मुले बसत असल्याची माहिती दिली. यापूर्वी पोलिसांनी याच भागात कारवाई करून ड्रग्ज विकणार्‍यांना ताब्यात घेतले होते. आताही या भागात अशा प्रकारची अवैध अमली पदार्थ व दारूची विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे.

अबब!! चक्क शेळीने दिला मानवासारख्या मूलाला जन्म, पण काही वेळातच झालं असं काही …..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका पाळीव शेळीने मानवसदृश असलेल्या एका मुलाला जन्म दिल्याची घटना आसाममध्ये घडली आहे. विशेष म्हणजे मुलाचे संपूर्ण रूप नवजात बाळासारखे होते. हा अनोखा झालेला चमत्कार पाहण्यासाठी लांबून लोक येऊ लागले. मात्र, जन्मानंतर अर्ध्या तासाने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शेळी मालकाने सांगितले की, शेळीने मुलाला जन्म देताच त्याला बघून सर्वांनाच धक्का बसला. या मुलाचे दोन पाय आणि कान वगळता संपूर्ण शरीर मानवी मुलासारखे होते. . शेळीच्या बाळाला शेपूटही नव्हती. मात्र जन्मानंतर अवघ्या अर्ध्या तासातच त्या नवजात बाळाचा मृत्यू झाला.

दरम्यान , शेळीने मानवी मुलाला जन्म दिल्याचे समजताच गावात लोकांची गर्दी झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा लोकांनी कछार जिल्ह्यातील गंगा नगर गावात या बकरीचे बाळ पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. प्रत्येकजण एकच म्हणत होता की हे मानवी मुलासारखे आहे. शेळीच्या बाळाचे दोन पाय आणि कान वगळता सर्व काही माणसासारखे होते.

 

गोव्यात शिवसेना- काँग्रेस एकत्र लढणार ? संजय राऊतांच्या ट्विटने चर्चाना उधाण

Raut Gandhi Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीची शक्यता निर्माण झाली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका ट्विट ने चर्चाना उधाण आले आहे. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली. असे स्पष्ट विधान संजय राऊत यांनी केलं

आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली. असे ट्विट संजय राऊत यांनी केले.

शिवसेनेची गोव्यात फार अशी मोठी ताकद नाही, पण गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील जवळीक वाढली आहे त्यामुळेच आगामी निवडणुकीत गोव्यात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार का, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. तसेच जर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तर जागावाटपात प्रत्येकाला किती जागा मिळणार हेही पाहावे लागेल

जिल्हा नियोजनासाठी 500 कोटी मागणार

collector

औरंगाबाद – कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून विकासकामांना फारसा निधी मिळालेला नाही. त्यामुळे बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी वाढीव निधीची मागणी केली. त्यामुळे राज्याकडे जिल्हा नियोजनासाठी 500 कोटी रुपयांची मागणी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली.

यावेळी प्रारंभी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वार्षिक योजना, विशेष घटक योजना, डिसेंबर अखेर झालेल्या खर्चाचा आढावा तसेच कोरोना काळात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. बैठकीनंतर पालकमंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 2022-23 ची वित्तीय मर्यादा 315 कोटी 84 लाख रुपयांची होती यात वाढ करून 404 कोटी रुपयांचा जिल्हा नियोजनाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यंत्रणांकडून एकूण 604 कोटी 23 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. कोरोनामुळे मागील दोन वर्षात विकास कामांना खीळ बसली होती. जिल्हा नियोजनाच्या निधीही आरोग्य सुविधांवर खर्च करण्यात आला होता. त्यामुळे रस्ते, शाळा खोल्या, वीज यांचे प्रश्न कायम होते.

घाटी रुग्णालयात जवळपासच्या 14 जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे त्यासाठीही नियोजन विभागाकडे जास्तीचा निधी मागण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विकास कामांसाठी लोकप्रतिनिधींकडूनही वाढीव निधीची मागणी बैठकीत करण्यात आली होती. त्यामुळे 408 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी शासनाकडे 500 कोटी रुपयांची मागणी केली जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

राणेंसारख्याला मी खपवतो, खासदारांनी माझ्या नादी लागू नये, गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्याकडून सध्या एकमेकांवर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. गुलाबराव पाटलांवर उन्मेष पाटील यांनी कुंपणच शेत खात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला पाटलांनी प्रत्युत्तर दिली आहे. “नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, अशा माझ्या नादी लागू नये,” शब्दांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, वाळू माफियामध्ये चेतन शर्मा कोणत्या पक्षाचे होते हे खासदारांनी पाहावे, वाळू माफियामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक होते. पण, खासदारांना गुलाबराव पाटील नावाचा रोग झालेला आहे. परिक्रमा करायची असेल तर नदीच्या काठावरुन फिरायला लागते.

आपल्याकडून काहीच होत नाही. त्यांना जिल्ह्यात कुणी विचारत नाही, म्हणून गुलाबराव पाटील नावाचा जप करत आहे. मागेच मी सांगितले आहे की, त्यांनी माझ्या नादी लागू नये, नारायण राणे सारख्या नेत्याला मी खपवतो. हे तर चिल्लर आहेत, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी उन्मेष पाटलांवर निशाणा साधला आहे.

नेमके काय म्हणाले उन्मेष पाटील?

गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना उन्मेष पाटील यांनी म्हंटले होते की, पालक या शब्दाचा अर्थ समजून घेतला असता तर या बाबी समोर आल्या असत्या. कुंपणच शेत खात असेल तर व्यथा कुणाकडे मांडायाच्या अशी भावना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन या बाबतीत लोकांमधून आवाज उठवता येईल. पालकमंत्र्यांना 12 महिने झाले आहेत तरी बैठक घ्यायला वेळ नाही. तर, कोरोना लसीकरण झालेले आहे त्यामुळे आम्ही यासंदर्भात आवाज उठवता येतो का हे पाहणार आहे, असे उन्मेष पाटील यांनी म्हंटले होते.

25 वर्षीय युवतीच्या खून प्रकरणाला वेगळ वळण? ; मृतदेहाजवळ चिठ्ठ्या अन् दोन दारुच्या बाटल्या..

कराड | डोक्यात दगड घालून 25 वर्षीय युवतीचा निर्घृण खून करण्यात आला. कोरेगाव (ता. कराड) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळला असून संबंधित युवतीच्या ओळखीबाबतची ठोस माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागली नव्हती. एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याच्याकडूनही खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळालेली नाही. परंतु मृतदेहाजवळ एक पिशवी मिळालेली असून त्यामध्ये काही चिठ्ठ्या मिळालेल्य असून दारूच्या रिकाम्या बाटल्याही सापडल्या आहेत. परंतु यावरूनही अद्याप पोलिस अंतिम तपासापर्यंत पोहचलेले नाहीत. तरीही आज मंगळवारी दुपारपर्यंत खूनाचा उलगडा व त्या संदर्भात माहिती पोलिसांनी मिळेल असा विश्वासही व्यक्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव गावच्या हद्दीत कार्वे ते कोरेगाव जाणाऱ्या रस्त्यालगत भैरोबा मंदिर आहे. या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. सोमवारी सकाळी काही शेतकरी त्याठिकाणी गेले होते. त्यावेळी फडात त्यांना युवतीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पथक त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता युवतीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र, संबंधित युवती त्या परिसरातील नसल्यामुळे तिची ओळख पटली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. मृत युवतीचे नाव पोलिसांसमोर आले आहे. मात्र, त्या नावाबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्या युवतीचे नाव तेच आहे की नाही, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. तसेच या प्रकरणात एका संशयीतालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याच्याकडूनही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्याच्याकडेही उशिरापर्यंत पोलीस कसून तपास करत होते. युवतीची ओळख पटविण्यासह मारेकऱ्यांचा तपास करण्याचे आव्हान सध्या ग्रामीण पोलिसांसमोर आहे.

युवतीकडे आढळल्या चिठ्ठ्या

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, त्याठिकाणी एक पिशवी आढळून आली. त्या पिशवीमध्ये काही चिठ्ठ्या असून त्यामध्ये मृत्यूस जबाबदार म्हणून काहीजणांची नावे लिहीण्यात आली आहेत. त्या चिठ्ठ्यांमध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे, त्यांच्याकडेही पोलिसांनी कसून तपास केला. मात्र, ज्यांची नावे आहेत, तेही संबंधित युवतीला ओळखत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यासाठी हल्लेखोरानेच या चिठ्ठ्या असाव्यात, असा पोलिसांना संशय आहे.

घटनास्थळी दारुच्या बाटल्या

ऊसाच्या फडात ज्याठिकाणी युवतीचा मृतदेह आढळून आला, त्याठिकाणी पोलिसांना दारुच्या दोन रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. आरोपीने त्याठिकाणी मद्यप्राशन केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेला दगडही आढळला असून पोलिसांनी तो तपासासाठी जप्त केला आहे.

पुन्हा निराशा ! औरंगाबादची पीटलाईन जालन्याला पळवली

औरंगाबाद – औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली रेल्वेची पीटलाईन अखेर जालन्याला पळविण्यात आली आहे. पीटलाईन जालन्यात करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केली.

औरंगाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या पीटलाईनची प्रतीक्षा केली जात होती. रेल्वेची पीटलाईन आधी औरंगाबाद रेल्वे स्टेशन आणि नंतर चिकलठाणा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे कामही रेल्वेने हाती घेतले. मात्र चिकलठाण्यात रेल्वेची जागा अपुरी आहे. राज्य शासनाने जमीन दिली तरच चिकलठाण्यात पीटलाईन शक्य होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्याच वेळी जालन्यातही जागेची पाहणी झाली. त्यामुळे पीटलाईन जालन्याला जाण्याचे संकेत मिळाले होते. अखेर जालना रेल्वे स्टेशनवर 100 कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा दानवे यांनी केली.

औरंगाबादेत 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी पीटलाईनसाठी औरंगाबादेत महिनाभरात जागा शोधण्याची जबाबदारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड आणि खा. इम्तियाज जलील यांच्यावर सोपवली होती. द. म. रेल्वेच्या मुख्यालयाकडून 2017 मध्ये पीटलाईनला मंजुरी मिळाली होती. परंतु ती पुढे विविध कारणांनी अडविली गेली. संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात औरंगाबाद हे एक मोठे शहर आहे. पीटलाईनसाठीचे सर्व निकष औरंगाबाद पूर्ण करते. तसेच पीटलाईन नसल्यामुळे औरंगाबादहून नव्या रेल्वेगाड्या सुरू होण्यास अडचणी येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात आले. आता जालन्याला पीटलाईन होणार असल्याने जालन्याहूनच नव्या रेल्वे सुरू होतील.

पहिल्या दिवशी जिल्ह्यात 6 हजार मुले लसवंत

औरंगाबाद – केंद्र सरकारने काल पासून 15 ते 18 वर्षाच्या तरुणांना कोरणा प्रतिबंधक लस देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबादेतही कालपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तब्बल 6 हजार 194 मुलांचे लसीकरण करण्यात आले. या योजनेचा प्रारंभ पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गारखेडा येथील प्रियदर्शनी विद्यालयात करण्यात आला.

यावेळी आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर स्मिता घोगरे, मनपा प्रशासन अस्तिक कुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त बि. बि. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांची उपस्थिती होती. प्रास्तविक प्रशासन पांडे यांनी केले. कमीत कमी वेळेत 15 ते 18 वर्षे वयोगटातील तरुणांचा लसीकरण पूर्ण करण्यात येईल. त्यावेळी प्रियदर्शनी शाळेतील 40 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.

शहरातील लसीकरण –
एसबीओ शाळा – 534
अंबिका नगर आरोग्य केंद्र – 118
मेल्ट्रॉन हॉस्पिटल -42
प्रियदर्शनी विद्यालय – 40
राजनगर आरोग्य केंद्र – 115
क्रांती चौक आरोग्य केंद्र – 219

पती-पत्नीने एकाच झाडाला गळफास घेत संपविले जीवन

औरंगाबाद – शेतातील लिंबाच्या झाडाला पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारात उघकीस आली आहे. रामदास (25) आणि शीतल इंगळे (20) अशी मृतांची नावे असून ते वाघजाळी येथील रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, वाघजाळी येथे रामदास आपली पत्नी शीतल आणि आईसह शेतात राहत असे. दोघांनी आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, हे सांगणे शक्य नसल्याचे घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांच्या मृत्यूची वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी शेतात गर्दी केली होती.

शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत या प्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद झाली नाही. पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असून पुढील तपास सुरु आहेत. पोलीस तपासाअंतीच घटनेमागील खरे कारण पुढे येणार आहे.

आई मला माफ कर म्हणत नवविवाहितेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

priyanka

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमधील सिडको या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 24 वर्षीय नवविवाहितेनं इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर विवाहितेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

प्रियांका पगारे असे आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय नवविवाहितेचे नाव आहे. ती सिडको परिसरातील खटवडनगर येथील कृष्णा अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. प्रियंकाने रविवारी सकाळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

अंबड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. ‘आई, मला माफ कर, माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये’ असे प्रियंकाने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. मात्र प्रियंकाने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही. यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून घटनेच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.