Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 3705

औरंगाबाद : शहरात 2 आणि ग्रामीण मध्ये 16 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश,एकही मृत्यू नाही

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 18 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 2,तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश असून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 599 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 813 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3 हजार 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 43 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये शहरातील 7 आणि ग्रामीण मधील 36 रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद शहरात 2 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात औरंगाबाद 2, फुलंब्री 2, गंगापूर 1,सिल्लोड 2, खुलताबाद 1, वैजापूर 7, आणि पैठण येथे 2 रुग्ण आढळले आहे. त्याचबरोबर शनिवारी एकाचाही मृत्यू झालेला नाही.

6 कोटी ते क्लास-1 नोकरी; ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रावर देशभरातून बक्षिसांचा वर्षाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकत इतिहास रचला. यानंतर देशभरातून नीरजचे कौतुक होत असून बक्षिसांचा वर्षाव होत आहे. हरियाणा सरकारने नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल.

तसेच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू. तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,’ अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली.

दरम्यान, पंजाब सरकारकडून देखील नीरज चोप्राला दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. सोबतच बीसीसीआयने देखील नीरजचं कौतुक करत एक कोटी रुपयांचं बक्षीस दिलं आहे तर आयपीएल फ्रंचायजी चेन्नईनं देखील एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राला नवीन लॉन्च होत असलेली एसयूवी 700 गिफ्ट करणार असल्याचं म्हटलं आहे.

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला आनंद महिंद्रा देणार ‘हे’ स्पेशल गिफ्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. यानंतर नीरजचे देशभरातून कौतुक होत असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांची आगामी XUV700 SUV गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे. महिंद्रा कंपनी आपली फ्लॅगशिप XUV700 SUV गाडी येत्या आठवड्यात लॉन्च करणार आहे. महिंद्रा आपल्या आगामी XUV700 SUV गाडीचा जोरदार प्रचार करत आहे. या वर्षातील सर्वात अपेक्षित गाड्यांपैकी ती एक गाडी आहे.

दरम्यान नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवत इतिहास रचला आहे. देशभरातुन नीरज चे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फोन लाऊन नीरजचे अभिनंदन केले.

Tokyo Olympic 2020 : दमदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंसाठी BCCI कडून बक्षिस; जाणुन घ्या कोणाला किती रुपये

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : टोकिया ऑलिम्पिकमध्ये भारताल पदक जिंकूण देणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने बक्षीस जाहीर केले आहे. यासंदर्भात बीसीसीआयचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी माहिती दिली आहे.

यामध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणार्‍या निरज चोप्राला 1 कोटी रुपये जाहिर करण्यात आले आहेत. तसेच देशाला रौप्य पदक मिळवून देणार्‍या मिराबाई चानू अन् रवीकुमार दहिया यांना प्रत्तेकी 50 लाख घोषीत करण्यात आलेत. याबरोबरच देशाला कांस्यपदक मिळवून देणार्‍या पी.व्ही. सिंधू, लोव्हलिना बोर्गोहेन, बजरंग पुनिया यांना प्रत्तेकी 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच कास्यपदक पटकावणार्या भारतीय पुरुष हॉकी संघाला 1 कोटी 25 लाख रुपये देण्यात येणार आहेत.

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये हिंदुस्थानच्या नीरज चोप्रा याने शनिवारी सुवर्णवेध घेतला आणि हिंदुस्थानला सातवे पदक जिंकून दिले. आजपर्यंत झालेल्या कोणत्याही एका ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे हे सर्वाधिक पदकं आहेत. याआधी 2012 ला झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने दोन रौप्यपदकांसह सहा पदकं जिंकली होती.

थोडासा दिलासा : सातारा जिल्ह्यात 658 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 119 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा | सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 658 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 119 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 10 हजार 873 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 6.5 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 905 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 24 हजार 692 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 10 हजार 670 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 433 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 10 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची गुरूवारी रात्री आलेली संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात.
जावली 32 (9478), कराड 137 (35797), खंडाळा 24 (13285), खटाव 112(22211), कोरेगांव 123 (19530), माण 87 (15224), महाबळेश्वर 1 (4535) पाटण 29 (9681), फलटण 184 (31750), सातारा 133 (46235), वाई 39 (14620) व इतर 8(1688) असे आज अखेर एकूण 224034 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

साताऱ्यात टेम्पो- दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार

सातारा |  शहरातील गुरुवार बागेजवळ पिकअप टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारील युवकाचा जागीच मृत्यू झाला.  शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास झाला हा अपघात झाला. या अपघातात विनायक संपतराव साळुंखे (वय – 35 वर्षे रा. पिलानीवाडी, ता. सातारा) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विनायक साळुंखे हा दुचाकीवरुन समर्थ मंदिरकडून पोवई नाक्याकडे निघाला होता. तर नाक्यावरून समर्थ मंदिरकडे पिक अप टेम्पो येत होता. याचवेळी गुरुवार बागेजवळील शुभम अॅटो गॅरेज समोर दुचाकी आणि टेम्पोची धडक झाली. वाहनांची झालेली धडक इतकी भीषण होती की विनायक साळुंखे याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यामुळे डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या अपघातामध्ये त्याच्या दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. विनायक साळुंखे हा फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. पंचनामा झाल्यानंतर टेम्पो चालका विरुध्द गुन्हा दाखल केला.

गृहमंत्र्यांचा मोठा निर्णय! महिला अत्याचाराच्या प्रश्नावर कोठेवाडी ग्रामस्थांना शस्त्र परवाना देणार

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील बारा आरोपींची मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. संदर्भित विषयावर गावातील ग्रामस्थांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. भेटीत तेथील माता भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा अशी मागणी केली. तत्काल मागणी मान्य करत गृहमंत्र्यांनी कोठेवाडी ग्रामस्थांनी योग्य त्या नियमानुसार त्यांना शस्त्र परवाने द्या ते यांना द्या अाशा सुचना देखील दिल्या. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती ना.डॉ. नीलमताई गोर्हे, नगरचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील, डी. वाय. एस. पी. सुदर्शन मुंडे उपस्थित होते.

ग्रामस्थांसमावेत झालेल्या या बैठकीत डॉ. नीलमताई गोर्हे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने गावात संरक्षण वाढवावे, गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नजर असवी यासाठी सीसीटीव्ही दुरूस्ती करून द्यावे, ग्राम रक्षक दलामार्फत समन्वय करून द्याव जेणेकरून काही अडचणी असतील तर पोलीस आणि सरकारचे सहाय्यता त्यांना मिळू शकेल.

या बैठकीत महिला अत्याचाराच्या प्रश्नावर भगिनींनी शस्त्र परवाना मिळावा या हाकेला परवाना देण्याचा एतिहासिक निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला हे राखी पेक्षा अनोखी भेट शासनाने दिली त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचे ही त्यांनी आभार मानले.

राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट सस्पेंड; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. यावर भाजपने आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी तेव्हाच ते ट्विट ट्विटर वरून हटवल होत. परंतु ट्विटर ने तरीही त्यांचे अकाउंट तात्पुरत बंद केलं.

राहुल गांधी यांनी नागर येथील पीडित मुलीचे फोटोचे ट्विट केल्यानंतर विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल यांनी केलेलं कृत्य हे पोक्सो कायद्यांतर्गत येतं. तसेच भादंविच्या कलम 228अच्या कलम 23 अंतर्गत हा गुन्हा आहे, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती.

दरम्यान राहुल गांधी यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्वीट करत म्हंटल की, “राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हे तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे. राहुल गांधी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहतील.. . जय हिंद.”

धक्कादायक ! प्रेमभंग झाल्यानं फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या

Sucide

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने प्रेमभंग झाल्यामुळे फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे . मृत तरूणाच्या प्रेयसीने मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असे बोलताच त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्याअगोदर केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण प्रेम प्रकरणातुन आत्महत्या करत असल्याचं सांगितले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अंकुश नामदेव पवार असे आहे. तो जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई गावात कुटूंबातसह राहत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने मृत अंकुश हा चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कल्याण येथे आला होता. कल्याण मधील एका खाजगी रुग्णालयात वार्डबॉय म्हणून नोकरी करत होता.

यादरम्यान एका घटस्फोटीत तरुणीशी त्याची ओळख झाली होती. यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले होते. अंकुशला या तरूणीशी लग्न करायचे असल्याने तो पगाराचे पैसे तिच्याकडे जमा करत होता. मात्र तरुणी हे पैसे स्वतःच्या मौजमजेसाठी वापरत होती. हि गोष्ट अंकुशला समजल्यावर त्यांच्यात खटके उडू लागले. यावेळी प्रेयसीने तू मर जा , मला तुझी गरज नाही असे सांगितले. हे शब्द त्याच्या जिव्हारी लागल्याने त्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे.

मोक्कातून सुटका : राज्यात गाजलेल्या कोठेवाडी प्रकरणातील दरोडा टाकून महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची मुक्तता

अहमदनगर | संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून देत समाजमनात चीड आणलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील 12 आरोपींची मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून सुटका करण्यात येत असल्याचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या शिक्षा भोगलेल्या गुन्हेगारांनी भरलेल्या दंडाची रक्कम त्यांना परत करावी आणि त्यांच्या अन्य गुन्ह्यातील शिक्षा प्रलंबित राहिलेली नसेल तर त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावे, असा आदेशही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.

कोठेवाडी प्रकरणात आरोपींना नगरच्या जिल्हा न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती, पुढे ही शिक्षा उच्च न्यायालयात कायम झाली. तसेच पोलिसांनी या आरोपींचा विविध ठिकाणी असलेल्या गुन्ह्यांचा संदर्भ देत शिक्षेच्या काळात त्यांच्यावर मोक्का लावला. यावर औरंगाबादच्या विशेष न्यायालयात सुनावणी होऊन मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी डिसेंबर 2016 मध्ये या गुन्ह्यातील 13 आरोपींना 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 10 लाखांचा दंड ठोठावला. आरोपींनी या विरुद्ध उच्च न्यायालयात आपील केले. त्यावर 3 ऑगस्ट 2021 रोजी न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी निकाल देत आरोपींविरुद्ध लावण्यात आलेली मोक्का कायद्यातील कलमे अयोग्य असल्याने ते संघटित गुन्हे असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे आरोपींची सुटका करण्यात येत असल्याचे निकालपत्रात म्हटले आहे.

कोठेवाडी दरोडा-अत्याचार प्रकरणातील आरोपी– दारासिंग उर्फ मारुती वकिल्या भोसले (वय -28, रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड), रमेश उर्फ रेच्या धुपाजी काळे (वय -32, रा. ब्राह्मणगाव, ता. आष्टी), बंडू उर्फ बबन उत्तम भोसले (वय -30, रा. वाळूंज, ता. जि. नगर), हबीब उर्फ हब्या पानमळ्या भोसले (वय -30, रा. साबलखेड), गारमन्या खुबजत चव्हाण (वय -37, रा. शेरी, ता. आष्टी), राजू उर्फ अंदाज वकिल्या भोसले (वय -25, रा. धामणगाव), उमऱ्या धनश्या भोसले (वय -37, रा. चिखली, ता. आष्टी), रसाळ्या डिंग्या भोसले (वय – 30, रा. चिखली), संतोष उर्फ हरी डिस्चार्ज काळे (वय -25, रा. हिवरे पिंपळखेड, ता. आष्टी), सुरेश उर्फ तिर्थ्या चिंतामण काळे (वय -21, रा. शेरी, ता. आष्टी), हनुमंता नकाशा भोसले (वय -25, रा. हिवरे पिंपळखेड, ता. आष्टी), चिकू उर्फ चिक्या सरमाळ्या भोसले (वय -35, रा. वाळूंज, ता. आष्टी),

काय होते कोठेवाडी अत्याचार प्रकरण-

17 जानेवारी 2001 रोजी मध्यरात्री सुमारास पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथे 12 ते 15 आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करीत चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. अनेक ग्रामस्थांना प्रचंड मारहाण केली होती. 44 हजार 35 रुपयांचे दागिने लुटले होते. तेव्हा ही घटना राज्यात गाजली होती. आरोपींनी घरातील कपडे पेटवून देत कौर्याची सीमा पार करत तरुण आणि वृद्ध महिलांवर अत्याचार केले होते. हे प्रकरण त्यावेळी राज्यात प्रचंड चर्चेत आले होते. राज्य सरकारवर विरोधकांनी मोठी टीका करत आरोपींना तात्काळ शोधून अटक करावी अशी जोरदार मागणी केली होती.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने कोठेवाडी इथे येत पोलिसांना आरोपींच्या अटकेच्या सूचना दिल्या होत्या. नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक कोठेवडीत तळ ठोकून होते. नगर, बीड सह इतर जिल्ह्यांचे पोलीस पथके यांनी मोठी मेहनत घेत काहीं दिवसात 8 आरोपींना अटक केली होती. तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश ज्योती फणसाळकर-जोशी यांनी आरोपींना जन्मठेप सुनावली होती. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.

त्यानंतर आरोपी शिक्षा भोगत असताना पोलिसांनी आरोपीं विरोधात त्यांनी विविध जिल्ह्यात केलेल्या गुन्ह्यांच्या माहितीवर न्यायालयात त्यांच्यावर मोक्का अन्वये शिक्षा व्हावी, यासाठी न्यायालयात अपील दाखल केले. त्यामुळे आरोपींवर ‘मोक्का’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावर औरंगाबादच्या विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने मोक्का कायद्याच्या कलम 3 (1) (2) अन्वये सर्व 13 आरोपींना 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 लाख रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी 2 वर्षे सक्तमजुरी, तर मोक्का कायद्याच्या कलम 3 (4) अन्वये सर्व आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 लाख रुपये दंड व दंड न भरल्यास 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. मात्र आरोपींनी मोक्का न्यायालयाच्या निकाला विरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते आणि, त्यावर सुनावणी पूर्ण होऊन उच्च न्यायालयाने मोक्का न्यायालयाचा निकाल रद्द ठरविली आहे. यातील काही आरोपींची पूर्वीची शिक्षा भोगून झालेली आहे. एकूणच उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे यातील शिक्षा भोगून झालेल्यांची आता सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.