Monday, December 15, 2025
Home Blog Page 3706

भूस्खलन दुर्घटनेतील 13 अनाथ बालकांचे पालकत्व पुण्याच्या भोई प्रतिष्ठानने स्विकारले : डाॅ. मिलींद भोई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर येथील भूस्खलनात अनाथ झालेल्या 13 बालकांचे शैक्षणिक पालकत्व पुण्याच्या भोई प्रतिष्ठानने स्विकारले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलींद भोई, त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पनेतून कोयनानगर मैत्री प्रकल्प कोयनेत सुरु केला आहे. दुर्घटनेनंतरचा रक्षाबंधन पहिला सण अपात्तीग्रस्तांसोबत प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनासोबत पुण्यात साजरा करणार आहे. प्रतिष्ठाननने प्रत्यक्ष लोकांच्या भेटी घेवून मुलांची माहिती घेतली आहे. त्यावेळी तीन बालकांचा वाढदिवस प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी कोयनानगर येथे केक कापून साजरा केला.

कोयनानगर येथे भोई प्रतिष्ठान सात दिवसांपासून कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत पुण्यातील भोई प्रतिष्ठानाने त्यांचे वैद्यकीय मदत पथक मदतीला आणले आहे. कोयनानगर परिसरातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत. राज्यभरातून जीवनावश्यक वस्तूंची मदत येत आहे. परतू ज्यांनी प्रियजन दुर्घटनेत गमावले आहेत, त्यांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी भोई प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे. अशा अस्मानी संकटाने त्यांना खूप मानसिक धक्का बसला आहे. त्यांंना नव्याने उभे करण्यासाठी भोई प्रतिष्ठानातर्फे  कोयना नगर मैत्री प्रकल्प’ सुरु केला आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर्स यांचा त्यात समावेश आहे.

भूस्खलग्रस्त मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ज्यांचे पालक दुर्घटनेत गमावले आहेत, त्यांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानाने स्विकारले आहे. शिक्षणासाठी लागणाऱ्या योजना संस्थेतर्फे राबविल्या जाणार आहेत. त्या मुलांच्या  शिक्षणासह अन्य सेवा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्याचा शुभारंभ रविवारी (ता. 22) रक्षाबंधनाच्या दिवशी पुण्यात होणार आहे. भूस्खलनग्रस्त गावातील बांधवाना, छोट्या मुलांना राखी बांधल्या जामार आहे. दुर्घटनेनंतर त्यांचा पहिला सण येतो आहे. त्यामुले त्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे अश्रू  पुसण्यासह त्यांना पुन्हा जिद्दीने व जोमाने उभे  करण्याचा संकल्प भोई प्रतिष्ठानने केला आहे. कोयनानगर परिसरातील आपत्तीग्रस्त गावे शिरगाव, हुंबरळी, येथील ढोकावले ग्रामस्थ व विदयार्थी रक्षाबंधनात सहभागी होऊन एका अनोख्या नात्यात बांधले जाणार आहेत. अशी माहिती डॉ. भोई यांनी दिली.

शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यातील पाटोदा याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका उच्चशिक्षित अभियंत्यानं गावातील 14 वर्षीय मुलीची सतत छेड काढल्यामुळे पीडित मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

अटक केलेल्या 30 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव उमेश अश्रुबा क्षीरसागर असं आहे. तो पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथील रहिवासी आहे. उच्चशिक्षित अभियंता असणारा हा तरुण सध्या कंत्राटदार म्हणून काम करतो. असं असूनही आरोपी उमेश हा मागील बऱ्याच दिवसांपासून गावातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढत होता. आरोपीनं अनेकदा मृत मुलीची आणि तिच्या बहिणीची छेड काढली होती.

गुरुवारी मृत मुलीचे आई वडील नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेऊन आरोपी उमेशनं संबंधित 14 वर्षीय पीडित मुलगी आणि तिच्या लहान बहिणीची पुन्हा छेड काढली. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं टोकाचं पाऊल उचलत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात छेडछाड करण्यासोबतचं आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जावलीतील शेतकऱ्यांना आ. शिवेंद्रसिहराजेंकडून स्वःखर्चाने साहित्य वाटप

मेढा | जावली तालुक्याला अतिवृष्टीच्या आस्मानी संकटाने तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालादिल झालेल्या जावलीतील बळीराजाच्या शेतीची दैना झाली आहे. तर शेतातील विहीरीवरील मोटारीचे व तत्सम पाईपचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नादगणे, वाहीटे, भुतेघर तसेच पश्चिम जावलीच्या गावांना स्वःखर्चातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साहित्य पुरविले आहे.

अद्याप प्रशासकीय मदत आलेली नाही. अतिवृष्टीने वेण्णा नदीला पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे  स्वखर्चातुन आ शिवेंद्रराजे भोसले यांनी नादगणे व वाहीटे गावातील शेतकऱ्यांना मोटर व संबधित सर्व साहीत्य दिले आहे.
दुर्गम जावलीतील कडेकपारीत सर्वसामान्य शेतकऱ्यांला आस्मानी संकटात मिळालेला मदत लाखमोलांची ठरत आहे. यावेळी ज्ञानदेव रांजणे, वाहिटे गावचे सरपंच राजाराम जांभळे, केळघरचे माजी सरपंच सुनिल जांभळे, अर्जुन जांभळे, दीपक जांभळे आदी उपस्थित होते.

जावलीतील अतिवृष्टीच्या संकटानंतर शेतीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तुचेही मोठे नुकसान झाले आहे. वाहीटे व नादगणे येथील नुकसान ग्रामस्थांनी आणि वाहिटे गावातील मुंबईस्थित लोकांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क साधून पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तात्काळ स्वखर्चाने मोटार, पाईपलाईन, केबल, स्टार्टर आदी सर्व साहित्य उपलब्ध करून ग्रामस्थांकडे सुपूर्द केले आहे.

बेलवडे बुद्रुक येथील ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारा विरोधात कारवाईसाठी निवेदन

कराड | बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील ग्रामविकास अधिकारी विलास देसाई यांच्या मनमानी कारभारा विरोधात सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. ग्रामविकास अधिकारी देसाई यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, बेलवडे बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी विलास देसाई हे कामावर उपस्थित राहत नाहीत. त्यांची कामावर येण्याची व जाण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे ग्रामस्थांची कार्यालयीन कामे अपूर्ण आहेत. सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी नवीन योजनांबद्दल विचारणा केल्यास याबाबत कोणतीही माहिती देसाई यांच्याकडून दिली जात नाही. मासिक सभेत ठरलेली कामे केली जात नाहीत. सर्वांशी उद्धटपणे बोलत आहेत. तसेच उपोषणाला बसा; माझ कोणीही वाकड करु शकत नाही, असा दम दिला जात आहे.

तसेच गावातील मोबाईल टॉवरच्या कामाबाबत देसाई यांनी दिलेला ना हरकत दाखला व त्या कामाबाबत संबंधितांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे देसाई यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन निवेदन सादर केले आहे. तरी मनमानी कारभार करणार्‍या ग्रामविकास अधिकारी विलास देसाई यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रदिप मोहिते यांचा उपोषणाचा इशारा

ग्रामपंचायतीमध्ये देसाई यांचा मनमानी कारभार चालू आहे. त्याचा विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच प्रदिप मोहिते या ग्रामस्थाने माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याबाबत मोहिते यांनी उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला आहे.

पदवीधारकांना नोकरीची संधी!! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लेखनिक (Clerk) पदांच्या जागा भरण्यासाठी – पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पध्दतीने असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट https://www.pdccbank.co.in/

एकूण जागा – 356
पदाचे नाव- लेखनिक

शैक्षणिक पात्रता –
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी
(ii) MS-CIT

वयाची अट – 21 ते 38 वर्षापर्यंत

वेतन- नियमानुसार

 अर्ज शुल्क- 885/

नोकरीचे ठिकाण – पुणे. PDCC Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट- https://www.pdccbank.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा- click here

नीरजने मिळवलेलं यश नेहमी स्मरणात राहील; मोदींनी केलं अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. यानंतर नीरजचे देशभरातून कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निरजला शाबासकी दिली.

टोकियोमध्ये इतिहास घडला आहे! आज नीरज चोप्रा ने जे साध्य केले ते कायम स्मरणात राहील. नीरजने अपवादात्मक कामगिरी केली आहे. तो उल्लेखनीय खेळला आणि नीरज अतुलनीय संयम दाखवला. सुवर्ण जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

दरम्यान भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 7 पदके जमा झाली असून त्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकाचा समावेश आहे.

सणासुदीच्या काळात शनिवार रविवारी पूर्णवेळ मार्केट सुरू करा- व्यापारी वर्ग

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे शाळा महाविद्यालय, दुकाने, मॉल, मार्केट, बाजारपेठ सर्वच बंद ठेवण्यात आले होते. यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता निर्बंध शिथिल करण्यात आले असून ठराविक वेळ काळानुसार दुकाने, मॉल, मार्केट, बाजारपेठ सुरु करण्यात आले होते. सध्या शनिवार रविवार मार्केट बंद ठेवण्यात येत आहे. आता सण उत्सव सुरु होत असून मार्केट बाजारपेठ पूर्णवेळ आणि शनिवार रविवार सुरु करण्यात यावे अशी मागणी व्यापारी वर्गांकडून करण्यात येत आहे.

कोरोना महामारीचा धोका कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले होते पण त्यामध्येही रविवार आणि शनिवार मार्केट बंद ठेवण्यात आले. ज्या दिवशी सर्वात जास्त खरेदी केली जाते. त्याचदिवशी मार्केट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून आतापर्यंत शनिवार आणि रविवार बंद असल्याने व्यापारी वर्गाचे दहा ते पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आता सण उत्सव सुरू होणार असून या काळात तरी शनिवार आणि रविवार पूर्णवेळ मार्केट सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी, राकेश सोनी, विकास साहूजी, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, सरदार हरीसिंह, तनसुब झांबड, जयंत देवळानकर, विजय जैस्वाल, अजय शहा यांनी केली आहे.

नीरज चोप्राने रचला इतिहास; भारताला पहिले सुवर्णपदक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. सर्वात लांब भाला फेकत त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे गोल्ड मिळवून दिलय.

व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवणारा नीरज दुसरा भारतीय ठरला यापूर्वी अभिनव बिंद्राने भारताकडून प्रथम सुवर्णपदक मिळवले होते. दरम्यान भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 7 पदके जमा झाली असून त्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकाचा समावेश आहे.

2016 मध्ये ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरजने लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती. 20 वर्षांखालील स्पर्धेत त्याने 84.48 मीटर भाला फेकला होता. ज्यूनिअर वर्गवारीतील त्याचा हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. त्यामुळेच त्याच्याकडून पदकाची आस होती.

2024 ला आमचं एकच इंजिन असणार; फडणवीसांचे सूचक विधान ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे भाजप युतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान करत सर्वांचे लक्ष्य वेधून घेतलं

पुणे येथ मेट्रोच्या कामाच्या पाहणीनंतर देवेंद फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मनसे आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवाल फडणवीसांना करण्यात आला. त्यावर 2024मध्ये भाजपचं एकच इंजिन असेल एवढं ध्यानात ठेवा, अस सूचक विधान फडणवीस यांनी केलं . फडणवीसांच्या या विधानाने तर्क वितर्कांना उधाण आले आहे

चंद्रकांत पाटील काय म्हणाले-

मी सध्या दिल्लीत आलो असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याना भेटणार आहे तसेच राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीतील चर्चेचा तपशीलही त्यांना देण्यात येईल, असं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं होतं.त्यामुळे राज्यात भाजप मनसे युती होणार का

निवृत्ती वेतनात होणाऱ्या विलंबासंबंधी जि.प. प्रशासन करणार जबाबदारी निश्चित

औरंगाबाद | निवृत्ती वेतन आणि मासिक वेतन मिळण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. खास करून निवृत्तीवेतन धारकांनी अनेकदा याबाबत तक्रारी दिली होती. आता याबाबत जबाबदारी निश्चित करण्याची स्पष्ट ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास दहा ते पंधरा हजार निवृत्ती वेतनधारक आणि कर्मचारी आहेत गेल्या काही महिन्यापासून मासिक वेतन तसेच निवृत्तीवेतनासाठी उशीर होत असून कर्मचारी त्रस्त झालेले आहेत. निवृत्तीवेतन धारक संघटनेने याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार केली असून जिल्हा प्रशासनाने आता वेतन विलंबाची जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून निवृत्त वेतन व वेतन अनुदान आदेश प्राप्त झाल्यानंतर अनुदानाच्या मूळ शाईच्या प्रतीसह ही देयके कोषागारात कार्यालयास सादर करण्यात येतात. परंतु देयकांसोबत मूळचे शाईची प्रत न जोडल्यामूळे कोषागार कार्यालय त्रुटी काढून देयके परत करते. म्हणूनच वेतनात विलंब होत आहे.

आता या बाबींची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून प्रत्येक विभागाने एक महिना अगोदर पत्र दिले होते का? निधी मागणीनुसार वेळेत निधी प्राप्त होतो का? निधी न आल्यास आपल्या स्तरावर काय कारवाई होते? याबाबतची नोंद प्रत्येक विभाग प्रमुखाला ठेवावी लागणार आहे. त्याचबरोबर वेतनाला उशीर झाल्यावर याबाबतची जबाबदारी त्या विभागप्रमुखावर असेल असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहेत.