Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3742

बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय घोडेस्वार विद्यार्थिनीची आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीने आत्महत्या केली आहे. या मुलीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पुणे जिल्ह्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड भागात ही घटना घडली आहे. या मुलीने आत्महत्या का केली हे अजून समजू शकले नाही.

मुलगी खाली पडल्याचा शेजाऱ्यांना आवाज आला
हावीला तब्बल 95 टक्के गुण मिळवून यशस्वी झालेल्या आणि सध्या बारावी इयत्तेत शिकत असलेल्या नॅशनल हॉर्स रायडरने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही. रविवारी सकाळी अचानक 9 वाजताच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणाऱ्या शेजाऱ्यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी खाली पाहिलं असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी पडली असल्याचं दिसून आलं. यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

बालपणीपासून घोडेस्वारीचे धडे
हाती आलेल्या माहितीनुसार, मयत विद्यार्थिनी ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते.तिच्या वडिलांची हॉर्स रायडिंगची ॲकॅडमी आहे. याच ॲकॅडमीमध्ये ती बालपणीपासून घोडेस्वारीचे धडे घेत होती. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने हॉर्स रायडिंगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. एवढे सगळे ठीक असताना तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.

धक्कादायक ! पुण्यात लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कंपनीतील HRने विवाहित असल्याची माहिती लपवून ठेवत कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. या आरोपीने लग्नाचे आमिष देऊन या तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. यानंतर या तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, आरोपीनं तिला धमकी देण्यास सुरुवात केली. यानंतर पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आरोपीचे नाव नीलेश अरविंद मोरे असे आहे. तो पुण्यातील हडपसर परिसरात वास्तव्याला आहे. पण तो मुळचा बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे या ठिकाणचा रहिवाशी आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हि पीडित तरुणी शिक्षण सुरू असतानाच, इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती. या दरम्यान तिची ओळख आरोपी नीलेश मोरे याच्याशी झाली. आरोपी मोरे हा पुण्यातील एका कंपनीत HR म्हणून काम करतो.

यानंतर या आरोपीने संबंधित कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषानं पीडितेवर बलात्कार केला आहे. आरोपीने लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी पीडितेच्या इच्छाविरुद्ध लैंगिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर पीडितेने आरोपीकडे लग्नाची विचारणा केली असता, त्यानं पीडितेसोबत बोलण्यास टाळाटाळ केली व तिला धमकावण्यास सुरुवात केली. या आरोपीने लग्न झालं असूनही त्यानं अविवाहित असल्याची खोटी माहिती सांगत पीडितेचं लैंगिक शोषण केलं. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आल्यानंतर पीडितेनं हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री ठाकरेंकडे पुरातील नुकसानीबाबत केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकसान झालेल्या पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. . “सरकारकडुन वैयक्तिक मदत होत आहे याविषयी तक्रार नाही. मात्र, पुरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या सार्वजनिक पाणी पूरवठा योजना, केटीवेअर, पुल, रस्ते यांची तत्काळ दुरुस्ती होणे गरजेची आहे. त्यामुळे त्यांची दुरुस्ती करण्याबाबत तशा स्वरूपाचा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबंधीत विभागाला द्याव्यात.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात शेती, राहती घरे यासह जनजीवनावर अपरिमित नुकसान ओढवले आहे. त्याचप्रमाणे कराड दक्षिण मतदारसंघातील दक्षिण मांड नदीच्या पुरामध्ये नुकसान झाले आहे. या भागाचा नुकताच माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे महत्वाची मागणी केली.

आमदार चव्हाण म्हणाले की, कराड दक्षिण भागाचे महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीत शेती पिके, नळपाणी पुरवठा योजना, केटीवेअर, पुल, रस्ते यांचाही समावेश आहे. या कामाची दुरुस्ती राज्य सरकारने तात्काळ करणे गरजेची आहेत. अतिवृष्टी व महापुरामुळे दोन प्रकारचे नुकसान झाले आहे. एक वैयक्तिक नुकसान व दुसरे कायम स्वरूपाचे सार्वजनिक प्रकारचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ अशा प्रकारची कामी हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्याव्यात, असे आमदार चव्हाण यांनी म्हंटले आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2021: बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मिळवले कांस्यपदक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. चीनच्या बिंग जियाओ चा पराभव करत तिने कांस्यपदक पटकावले. 21-13…21-15 असा सरळ सेट मध्ये तिने बिंग जियाओ चा पराभव केला. रिओ ओलीम्पिक मध्ये सिंधू ने रौप्य पदक मिळवलं होत.

2 ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी सिंधू भारताची एकमेव खेळाडू असून भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तत्पूर्वी पी. व्ही. सिंधू हिला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले होते. तेई झू यिंग हिच्याकडून पी. व्ही. सिंधूला 21-18 आणि 21-12 अशी हार सहन करावी लागली. यामुळे तिच्या महिला गटात सुवर्ण पदक जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले गेले.

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा ५ ऑगस्ट रोजी धुळे दौरा ; साक्रीत दौरा नियोजन तालुका निहाय बैठक संपन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युवासेना सचिव वरुण सरदेसाई हे येत्या ५ ऑगस्ट रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत.त्यानिमित्ताने जिल्हाभर या दौऱ्याच्या नियोजन बैठकांचा सपाटा लागल्याचे चित्र आहे.धुळ्यातल्या साक्रीत जिल्हा विस्तारक मा.अमित पाटील आणि धुळे जिल्हा युवा सेना अध्यक्ष ॲड.पंकज गोरे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली.

या बैठकीला शिवसेना साक्री तालुका प्रमुख पंकज मराठे,तालुका संघटक अमोल सोनवणे,युवतीसेना जिल्हा समन्वयक प्रियंका जोशी,युवा सेना तालुका प्रमुख बाळासाहेब उर्फ चेतन देवरे,महेश खैरनार,रमेश शिंदे,युवतीसेना तालुका प्रमुख कामिनी देसले, युवासेनेचे नवनियुक्त पदाधिकारी व तालुक्यातील युवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीविषयी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलताना बाळासाहेब देवरे म्हणाले की “जिल्ह्यात शिवसेनेला आणि युवासेनेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता.वरुणजी सरदेसाई यांच्या दौऱ्याचे नियोजन करणे भागचं होते.सुरवातीला आम्ही फक्त ८ – १० लोकचं युवासेनेचे काम करत होतो.आज त्या रोपट्याचा महावृक्ष झाला आहे.हे सगळं वरिष्ठांच मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे शक्य झालयं.वरूणजी देसाई यांच्या दौऱ्याने आम्हाला काम करण्याची अजून प्रेरणा मिळेल असा माझा विश्वास आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब देवरे यांनी केले तर सूत्रसंचालन कामिनी देसले यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजक बाळासाहेब देवरे,महेश खैरनार आणि रमेश शिंदे हे मान्यवर होते.

संजय राऊत यांच्यासारख्या सोंगाड्यावर काय बोलायचं?; प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली होती. राऊतांच्या टीकेला आमदार प्रसाद लाड यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. “शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असून माझ्यासाठी हा विषय संपला आहे. मात्र, माझ्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यासारख्या सोंगाड्यावर काय बोलायचं?,” असा प्रश्न करीत लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. अशी टिक्का राऊत यांनी केली होती. त्यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईत केलेल्या वक्तव्याबद्दल पुन्हा खुलासा केला. लाड म्हणाले कि, आपण शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. तशा स्वरूपाची मी प्रसिद्धी माध्यमांना माहितीही दिली आहे. त्यामुळे आता कुणीही यापुढे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करू नये.

शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही, असेही स्पष्टीकरण लाड यांनी यावेळी दिले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागलीय; रवी राणांची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अमरावतीतील राणा दाम्पत्य सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. त्यातच आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागलीय अस वादग्रस्त वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात सतत संकटं येत आहेत. ‘करोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर कोकणात चक्रीवादळ आलं. पूर आला. अनेक गावं बुडाली. लोक मरण पावले. कधी नव्हे ते मुंबईत चक्रीवादळ आलं. विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी आत्महत्या करताहेत. उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून कारभार सुरू केला, तेव्हापासून हे सुरू आहे,’ असं राणा म्हणाले.

अमरावती जिल्ह्यातून करोनाची दुसरी लाट सुरू झाली तरीही मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांमध्ये अमरावतीमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही. वारंवार विनंती करूनही त्यांनी ऐकलं नाही. वारंवार सांगूनही जे ऐकत नाहीत, त्याला आपल्याकडं बेशरम म्हणतात. त्यामुळं ‘मातोश्री’वर बेशरमेचं झाड लावावं लागेल अशी घणाघाती टीका रवी राणा यांनी केली.

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडतही नाही- फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता ही भाजपची संस्कृती नाही पण जर आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही सोडत नाही असे म्हणायलाही ते विसरले नाहीत.

फडणवीस म्हणाले, काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हिडीओद्वारे खुलासाही केला आहे. आमच्यासाठी विषय संपला आहे.तोडफोड करणं आमची संस्कृती नाही. आम्ही तोडफोड करत नाही. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही.

प्रसाद लाड यांची कोलांटीउडी-

दरम्यान शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला अस म्हणत प्रसाद लाड यांनी पलटी मारली. शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही असे स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिले.

बहिणीच्या दिरासोबत जुळलेल्या प्रेमसंबंधामुळे आईच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

Love Murder

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वर्धा नदीकिनारी पोत्यात भरून असलेले एक शव आढळल्याने पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला आणि एक मोठे हत्येचे प्रकरण पुढे आले. यामध्ये पत्नीने आपल्या प्रियकर आणि आईच्या मदतीने कोळसा खाणीत काम करणाऱ्या पतीची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचे नाव मारूती काकडे असे असून तो सरकारी कोळसा कंपनीत खाण कामगार होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी प्राजक्ताशी त्याचे कौटुंबिक वाद व्हायचे. यादरम्यान प्राजक्ताचे स्वतःच्या बहिणीचा दीर संजय टिकलेसोबत अनैतिक संबंध होते. यानंतर या दोघांनी मारूतीचा कायमचा काटा काढण्यासाठी कट रचला. मारूतीचा मृत्यू झाला तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल व प्रियकरासह विवाह करून आपले आयुष्य सुखी होईल असा तिचा प्लॅन होता.

यानंतर या दोघांनी शांत डोक्याने मारूतीला संपवण्याचा प्लॅन केला. बल्लारपूर शहरापासून दूर 50 किमी अंतरावर असलेल्या नकोडा येथे कट तडीस नेला. यासाठी आणखी एक साथीदार विकास नागरले याची मदत घेण्यात आली. विकास हा ठरल्यानुसार, मारुतीच्या घरी पोहोचला. किरायाने घर मिळेल का? याबाबत विचारपूस करण्यासाठी त्याला बाहेर बोलावून त्याला दारू पाजण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर दोघे जण नकोडा इथं पोहोचले. त्यानंतर तिथेच मारुतीचा गळा आवळून खून करण्यात आला. तो जिवंत राहू नये यासाठी नदीपात्रात बुडवण्यात आले व नंतर मृतदेह एका पोत्यात भरून पुन्हा बल्लारपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदी किनारी फेकण्यात आला.

या हत्येमागे पोलिसांना मृतदेह तातडीने मिळावा व त्यानंतर मृत मारुतीच्या जागी आपल्या नोकरीची प्रक्रिया सोपी व्हावी असा उद्देश होता. मात्र, पोलिसांनी मृताचे मोबाईल कॉल डिटेल्स व आरोपींचे डिटेल्स यांची पडताळणी केल्यावर पोलिसांना त्यांच्यावर अधिक संशय आला. यानंतर पोलिसांनी पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर हि सगळी घटना उघडकीस आली. या गुन्ह्यात पत्नी प्राजक्ता, तिची आई कांता म्हशाक्षेत्रे, प्रियकर संजय टिकले व कटात सहभागी साथीदार विकास नागरले यांचा समावेश आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

राऊत साहेब, नशामुक्तीची सुरुवात कलानगरातून करा; राणेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही लोक गांजा पिऊन बोलत असतात त्यामुळे महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांच्यावर टीका केली होती. या टिकेनंतर नितेश राणे यांनीदेखील प्रत्युत्तर देत करताना मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

नितेश राणे म्हणाले, एकदम बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे.. पण.. त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या “कलानगरातून” करा.. जेणेकरून रोज संध्याकाळी DINO च्या घरी होणारे कार्यक्रम एकदाचेच संपतील..!!!

नशामुक्त महाराष्ट्र बरोबर “महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र” हाही कार्यक्रम तातडीने घेतला पाहिजे..जेणेकरून डॉ. स्वप्ना पाटकर सारख्या महिलांना न्याय भेटेल! बरोबर ना राऊत साहेब? असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार? अस ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.