Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3741

औरंगाबाद : शहरात 9 आणि ग्रामीण मध्ये 27 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 36 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9,तर ग्रामीण भागातील 27 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 443 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत 3501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 24 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये शहरातील 8 आणि ग्रामीण मधील 16 रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील

घाटी 1,आकाशवाणी 1, मायानगर 1,सिडको 1, आर्मी कॅम्प 1, सातारा परिसर 2,इतर 2 रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात औरंगाबाद 2, कन्नड 1, गंगापूर 4,पैठण 3, वैजापूर 19 रुग्ण आढळले आहे. वैजापूर येथील 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

दु:खद अपयश : लोकवर्गणीतून तब्बल 16 कोटींचे इंजेक्शन दिलेल्या वेदिका शिंदे या चिमुरडीचा मृत्यू

Vedica shinde

पुणे | वेदिका शिंदे या चिमुरडीला अमेरिकेतून तब्बल 16 कोटींचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचा जीव वाचविण्यात यश मिळालं होतं. पुण्यातील वेदिका शिंदे ही चिमुरडी जनुकीय आजाराने ग्रस्त होती. तिच्यासाठी 16 कोटी रुपये लोकवर्गणीतून जमा करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी वेदिकाचा मृत्यू झाला. सायंकाळी ती खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केला. मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही.

वेदिकावर उपचार व्हावेत आणि तिला महागडे 16 कोटीचं इंजेक्शन मिळावं यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप धडपड केली होती.तिच्या इंजेक्शनसाठी लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमाही करण्यात आले होते. तसेच पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. मात्र, एवढे सारे प्रयत्न करुनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत. हे ही आईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद?वेदिकाला होता असाध्य आजार वेदीका पाच महिन्यांची असताना तिला SMA टाईप-1, या जनुकीय आजारानं ग्रासल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे वय वाढण्याबरोरब तिच्या शरीरातील एक-एक अवयव निकामी होत होता. त्यामुळे उपचार करणं अत्यावश्यक होतं. या आजारावर मात करण्यासाठी झोलगेन्स्मा ही एकमेव लस उपलब्ध आहे.

पण या एका लशीची किंमत तब्बल 22 कोटी आहे. असं असताना वेदिकाच्या आई बाबानं तिला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं. वेदिकाला मदत करणाऱ्यांचे डॉ. अमोल कोल्हेंनी मानले होते आभार वेदिकावर उपचार करण्यासाठी पैशांच्या रुपात मदत करणाऱ्यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आभार मानले होते. 16 जून रोजी 16 कोटींचे इंजेक्शन वेदिलाला दिल्यानंतर आनंदाचा पारावर उरला नव्हता, असं कोल्हे म्हणाले होते. वेदिकाला इंजेक्शन मिळाल्यामुळे तिच्या पालकंसह आमच्या कष्टांचं चीज झाल्याचं समाधान वाटलं असंही ते पुढे म्हणाले होते.

…तर राज्यात जाणाऱ्या हजारो बळीस राज्य सरकार जबाबदार असेल; विद्यार्थ्यांचा इशारा

MPSC

औरंगाबाद | राज्यात एमपीएससीच्या जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. हजारो विद्यार्थी जागा कधी निघतील याची वाट पाहत आहेत. अभ्यास पूर्ण आहे घरच्यांकडून आता अपेक्षाही वाढलेल्या आहेत. मात्र परीक्षा होत नसल्यामुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. राज्य सरकारने जर लवकरात लवकर रिक्त जागा भरण्याची घोषणा केली नाही तर राज्यात जाणारे हजारो बळी यास राज्यसरकार जबाबदार असेल. असा संतप्त इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

राज्यात नोकर भरतीकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे लावणारे वेळापत्रक, महापरीक्षा पोर्टल वरील गैरप्रकार यामुळे तरुणांमध्ये संताप आहे. अनेकांनी परीक्षा उत्तीर्ण होऊनही आत्महत्या केल्या आहेत. नुकतेच स्वप्नील लोणकर प्रकरण राज्यात घडले. त्यानंतर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. राज्य सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र अजूनही या प्रकरणाला फारसे गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. पदभरती अजूनही सुरू झालेली नाही.

याबाबत शनिवारी दिवसभरात विद्यार्थ्यांनी ‘डिक्लेअर एमपीएससी एक्झाम’ असा हॅशटॅग तर सोशल मिडीयावरुन अनेक विद्यार्थी टीका करताना दिसून आले. राज्यभरातून या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. लवकरात लवकर एमपीएससी भरतीसाठी रिक्त जागा भरा, जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत मात्र अजूनही त्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आलेले नाही अशा विद्यार्थ्यांची प्राधान्याने नियुक्ती करा. अशा अनेक मागण्या विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आल्या आहेत.

व्यापाऱ्यांना दिलासा नाहीच; निर्बंध तुर्तास जैसे थे

Unlock

औरंगाबाद | राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार अशी घोषणा २-३ दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्या २५ जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा देखील समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट कमी असला तरी जोपर्यंत शासनाचे लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाही, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.‌

शासनाच्या २५ जिल्ह्यांच्या यादीत औरंगाबादचे नाव असले तरी मात्र लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत शासनाकडून काहीही सुचना, आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही असेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.‌

व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्याची मागणी केली असली तरी शासनाकडून काहीही सुचना न आल्यामुळे जिल्ह्यात सध्या तीसऱ्या स्तराचे निर्बंध लागू राहणार आहेत. सोमवारी शासनाकडून काही आदेश आल्यास निर्बंध शिथिल करणे शक्य होईल. दरम्यान शासनाने गुरुवारी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत सुतोवाच केले होते, त्यामुळे औरंगाबाद मध्ये काय सवलती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Happy Anniversary : शरद पवारांच्या लग्नाला 54 वर्ष पुर्ण

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज शरद पवार यांच्या लग्नाला 54 वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्त शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी इंस्टाग्रामवर शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांचा एक फोटो शेअर करून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या आई बाबा असे लिहिले आहे. शरद पवार यांचे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात मोठे नाव आहे.

https://www.instagram.com/p/CSCWsj6DoJ3/?utm_medium=copy_link

राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांचे 1 ऑगस्ट 1967मध्ये लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाला आज 56 वर्ष पुर्ण झाली आहेत. मा.शरद पवार यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्यांचा वर्षाव होत आहे.

लोकअदालतीमध्ये पुन्हा जुळुन आले 25 संसार

Couple

औरंगाबाद । तिची मला समजून घेण्याची तयारी नाही, त्याला/तीला मोबाईलमधुन वेळच मिळत नाही. तो/तीच्या माहेरची/सासरची माणसे मिळुन माझा छळ करतात. तिच्या/त्याच्या जाचाला मी आता कंटाळले आहे. बायको/नवरा विरूद्धच्या अशा अनेक तक्रारी घेऊन कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्यांना तडजोडीचा एक आशेचा किरण म्हणजे कौटुंबिक न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालत होय. आज औरंगाबाद येथील कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. या लोकअदालतीत तब्ब्ल 30 प्रकरणांची तडजोड होऊन प्रकरणे निकाली निघाली.

आजच्या कोरोना काळात व समाजात कौटुंबिक हिंसाचार वाढत असलेल्या परिस्थितीत कौटुंबिक न्यायालय यांनी अथक परिश्रम घेऊन 25 जोडप्यांची संसार जुळविण्यात यश मिळवले आहे. हि अत्यंत अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे. आज एकुण 43 प्रकरणे आली होती. त्यात दोन्ही बाजुची 30 जोडपी हजर राहीली व एकुण 30 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. आज झालेल्या लोकअदालतीमध्ये मैत्री दिनाचे औचित्य साधून 25 प्रकणांमधील जोडपी आनंदाने पुन्हा एकत्र नांदण्यास गेली. तसेच 5 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली 13 प्रकरणांमध्ये उभय पक्षकार गैरहजर राहिले.
याप्रसंगी पॅनल क्र. 1 यावर न्यायाधीश आशिष आयाचित यांनी पॅनल प्रमुख म्हणुन तर विधिज्ञ श्रीमती अमृता परांजपे व समुपदेशक श्रीमती रश्मी देशपांडे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले, तर पॅनल क्र. 2 यावर निवृत्त न्यायाधीश टी.बी. जाधव यांनी पॅनल प्रमुख म्हणुन तर विधिज्ञ संतोष पाथ्रीकर व समुपदेशक श्रीमती मनिषा कांदे यांनी पॅनल सदस्य म्हणुन काम पाहिले.

राष्ट्रीय लोकअदालत प्रमुख न्यायाधीश श्रीमती आय.जे.नंदा यांचे अध्यक्षतेखाली पार पडली व कौटुंबिक न्यायालयातील विवाह समुपदेशक भरत काळे व श्रीमती ज्योती सपकाळे तसेच श्रीमती वंदना कोचर, न्यायालयीन व्यवस्थापीका श्रीमती एम.आर.दाणी, प्रभारी प्रबंधक व कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी यांनी लोकअदालतीसाठी विशेष परिश्रम घेतले.

विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने प्रपोजल नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल

Sucide

संबलपूर : वृत्तसंस्था – एका महिला कॉन्स्टेबलच्या प्रेमात पडलेल्या एका युवकाने त्याचे प्रपोजल नाकारल्यानंतर आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. बलपूर जिल्ह्यातील खेत्रजपूर पोलीस हद्दीतील बडा बाजार परिसरातील रहिवासी नवीन शर्मा यांनी मंगळवारी टाऊन पोलीस स्टेशनच्या आवारात हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन हा एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या प्रेमात होता आणि त्याने तिला अनेक वेळा प्रपोजसुद्धा केले होते. मात्र, ती महिला विवाहित होती, तरीही तो 2012 पासून तिचा पाठलाग करत होता. यादरम्यान महिला वाहतूक पोलिसाने त्याच्याविरोधात स्थानिक पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारदेखील केली होती. यानंतर संतापलेल्या नवीनने त्या महिलेचा पाठलाग केला आणि तिला पुन्हा प्रोपोज केले त्यावेळी पुन्हा या महिलेने त्याला नकार दिला.

यानंतर नवीनने टाऊन पोलीस स्टेशन कॅम्पसमध्ये विष प्राशन केले आणि स्वतःचे जीवन संपवले. यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना विमसार,बुर्ला येथे पाठवण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान महिला कॉन्स्टेबलने मंगळवारी पोलिसांशी संपर्क साधून त्याच्याविरोधात पाठलाग केल्याची लेखी तक्रार दाखल केली होती.

सांगली जिल्ह्यातील दुधोंडीत तिहेरी हत्याकांड : धारदार शस्त्राने तिघांचा खून

सांगली | पलूस तालुक्यातील वसंतनगर – दुधोंडी येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे सांगली जिल्हा हादरला आहे. धारदार शस्त्राने वार करून एकाच वेळी तिघांची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्यात अरविंद बाबुराव साठे (वय-45) , विकास आत्माराम मोहिते (वय- 32), सनी आत्माराम मोहिते (वय- 27) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत तर अन्य चौघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. हा खूनी हल्ला करून हल्लेखोर पसार झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली आणि घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, दुधोंडी येथील या मयत कुटुंबाच्या संबंधीत एका मुलीवर काही दिवसांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याविषयी यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता आणि याच पूर्व वैमनस्यातून काल रात्रीही या दोन कुटुंबात वाद झाला होता. पोलिसांंनी हा वाद मिटवला होता. मात्र तरीही आज विजय मोहिते, हिम्मत मोहिते, किशोर मोहिते, आदित्य मोहिते, प्रवीण मोहिते, सचिन इनामदार यांनी येऊन धारदार शस्त्राने हल्ला केला.

या हल्ल्यात अरविंद साठे, विकास मोहिते, सनी मोहिते हे जागीच ठार झाले. तर अन्य चार जण जखमी झाले. या घटनेने दुधोडी परिसर हादरला आहे. पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. एकाच वेळी तिघांची हत्या करण्याची घटना घडल्याने पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावात तणावसदृष्य परिस्थिती असली तरी पोलीस मोठ्या संख्येने घटना स्थळी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास पलूसच्या पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पूरग्रस्तांना मदत : कराड शहरात इंद्रजित गुजर मित्र परिवाराकडून आ. पृथ्वीराज चव्हाण याच्या हस्ते अन्नधान्य वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मुसळधार झालेल्या पावसाने लोकांचे मोठे नुकसान केले आहे. या संकटातून पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी सामाजिक संस्था व व्यक्ती यांनी काम करणे गरजेचे आहे. नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी पाटण काॅलनीतील लोकांना मदत करून एक सामाजिक आदर्श पुढे ठेवला आहे. पुरामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे, अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासन पुरग्रस्तांच्या पाठीशी आहे व एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

कराड शहरातील पाटण कॉलनी पुरग्रस्त 85 कुटुंबांना इंद्रजित गुजर मित्र परिवाराकडून 15 दिवस पुरेल एवढे अन्नधान्याचे किट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, नगरसेवक इंद्रजीत गुजर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, श्रीकांत मुळे, काँग्रेसच्या कायदे विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अमित जाधव, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक फारूक पटवेकर, सिद्धार्थ थोरवडे आदी यावेळी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे आणि या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती, जनावरे आणि रस्ते वाहून गेले आहेत. अश्या प्रसंगी राज्य शासन पुरग्रस्तांच्या पाठीशी आहे. या आपत्कालीन परिस्थितीत राज्य शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ दिले जात आहे. तसेच पुरग्रस्तांच्या मालमत्तेचे पंचनामे काही प्रमाणात पूर्ण झाले असून त्यांना लवकरात लवकर मदत मिळेल तसेच पुरग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आग्रही राहू.

मग शिवसेना भवनकडे तिरक्या नजरेने बघण्याच तुमच धाडस झालं नसतं- शंभूराज देसाई

जावली । शिवसेना भवनाविषयी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लाड यांच्या या वक्तव्याबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लाड यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला असून त्यांनी इशाराही दिला आहे.” शिवसेना भवनबद्दल लाड यांनी जी काही विधाने केली आहेत. त्यानंतर त्यांनी आपली विधाने मागे घेतली. जर त्यांनी घेतली नसती तर त्याचे परिणाम त्यांनी महाराष्ट्र्भर पहिले असते. मग त्यांचे शिवसेनाभवनकडे तिरक्या नजरेने बघण्याचे धाडसही झाले नसते, असे देसाई यांनी सांगितले.

यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, “महाबळेश्वर तालुक्यातील नुकसानीबाबतीत पाहणी करून तेथील नुकसानीची माहितीही घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी प्रशासनाने दळणवळण सुरु करावे. दुर्गम व डोगराळ महाबळेश्वर तालुक्याच्या मदती करीता सरकार संवेदनशील असुन संवेदनशील मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याची परिस्थितीबाबत विचारपुस करीत असतात. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन नुकसानग्रस्त भागाला नक्कीच मदत केली जाणार आहेअसे सांगत गृहराज्यमंत्री देसाई यांनी याबाबत ठोस कृतीआरखडा लवकरात लवकर प्रशासनाने सादर करावा, अशा सूचना दिल्या.

महाबळेश्वर येथे नुकसानीबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी नुकसानाची व त्यासाठी शासनाकडून केल्या जात असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. यावेळी शिवसेना जिल्हाअध्यक्ष यशवंत घाडगे, माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेश कुंभारदरे, शिवसेना नेते डी. एम. बावळेकर, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन वागदरे, शिवसेना शहर प्रमुख राजु गुजर आदी उपस्थित होते.