Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3743

संकटांवरही मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

sharad pawar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शरद पवार बोलत होते.

अलीकडे महाराष्ट्रावर काही ना काही सातत्याने संकटं येत आहेत. एक मोठं अतिवृष्टीचं संकट राज्यावर आलं… हजारो घरं पडली… अनेक घरांमध्ये पाणी शिरलं… होतं नव्हतं ते वाहून गेलं… पण एक गोष्ट चांगली आहे, या संकटावरही मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

”एका बाजूने या पूरग्रस्त भागातील घरांची बांधणी करणं हे आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूने समस्त कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मोठं पाऊल पडत आहे. या चाळीच्या ठिकाणी मोठ-मोठ्या इमारती उभ्या राहणार आहेत. पण मला तुम्हाला सांगायचंय की यातला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका… तुम्ही चाळीत आतापर्यंत जसे एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात, एकमेकांच्या जीवनाचा भाग होतात, त्याचप्रमाणे इथून पुढेही बिल्डिंगमध्ये असेच एकत्र राहा असे आवाहन पवारांनी केलं.

दादा…….क्या हुवा तेरा वादा…; एमपीएससी नियुक्त्यांवरून चित्रा वाघ यांचा अजित पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. लोणकर याच्या आत्महत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरलेली नाहीत. त्यावरून आज भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. वाघ यांनी “मुख्यमंत्रीजी. व उपमुख्यमंत्रीजी स्वप्नीलच्या मृत्युचा इतक्यात विसर पडला. दादा…….क्या हुवा तेरा वादा…”असे ट्विट करून म्हंटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात एमपीएससी नियुक्त्यावरून महत्वाची घोषणा केली होती. त्यामध्ये त्यांनी 31 जुलै पर्यंत एमपीएससीच्या सर्व जागा भरू, असे सांगितले होते आणि बाहेर येऊन फक्त आयोगावरील ‘सदस्यांच्या’ जागा भरू असे सांगितले होते. आता 31जुलै उलटून गेल्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून टीका केली जाऊ लागली आहे.

 

एमपीएससीच्या नियुक्त्यावरून आज सुरुवातीला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ हे अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते, असे पडळकर यांनी म्हंटले आहे. त्यांच्यानंतर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

…कधी कधी लोकांना विनोद करायची हुक्की येते”; छगन भुजबळ यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून त्यांना टोला लगावला. ” कधी कधी काही लोकांना विनोद करायची हुक्की येते,” असे टोला लगावताना भुजबळ यांनी म्हंटले आहे.

शिवसेना भवनबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सध्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार टीका केले जाऊ लागली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडूनही या प्रकरणी मत व्यक्त केले जात आहे. भाजप आमदार लाड यांच्या वक्तव्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी मंत्री भुजबळ यांच्याकडे विचारणा केली असता भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच आमदार लाड यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडवली.

मंत्री छगन भुजबळ यांच्या मनात आजही शिवसेना भवनबद्दल आपुलकीची भावना आहे. त्यांच्याकडून अनेकवेळा शिवसेनेच्या कार्यपध्दतीबद्दल कौतुकही करण्यात आले आहे. मंत्र, आज भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला कोण प्रसाद लाड? असा प्रतिप्रश्न केला. तसेच यावेळी लाड यांना भुजबळ यांनी आपल्या शैलीत टोलाही लगावला.

एकच झापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपलं सरकार ट्रिपल सीट आहे. हे मुद्दामहून बोलतोय. कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

लहानपणापासून माझं चाळीत येणं जाणं होतं. या चाळीचेभूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, हे स्वप्नात पाहिले नाही. माझ्यावर लोकांनी पुष्पवृष्टी केली. पण आम्ही लोकांच्या ऋणात आहोत. मुंबईने, मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. स्वतःची हक्काची घरं झाल्यावर मोहाला बळी पडू नका” असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रहिवाशांना दिला

ईडीच्या कारवाईला घाबरून राणे पिता-पुत्रांनी भाजपाचे पाय पकडले; राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना भवनावरून भाजप व शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपमधील नेत्यांनाही टार्गेट केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे व नितेश राणे यांच्यावर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. “ईडीच्या कारवाईला घाबरून नारायण राणे, नितेश राणे यांनी भाजपाचे पाय पकडले. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे काही आहे ते आधी शोधावं आणि मग शिवसेनेवर टीका करावी,” अशा शब्दात खासदार राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली आहे.

शिवसेना भवनावरून रविवारी भाजप नेते व शिवसेना नेत्यांमध्ये वादावादीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या प्रसाद लाड, नितेश राणे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी राऊत यांनी टीका करताना म्हंटले आहे की, हे भांडगे लोक आता खूप भुंकायला लागलेले आहेत. या भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला शिवसेनेला फारसा वेळ लागणार नाही. परंतु भाजपा नेत्यांनी त्यांची तोंडे बंद केली तर तर भविष्यकाळ आहे अन्यथा या भांडग्यांच्या संगे भाजपा सुद्धा संपून जाईल.

यावेळी भाजपच्या नेत्यांवर टीका करताना खासदार राऊत यांनी म्हंटले आहे की, ” नारायण राणे व नितेश राणे यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्ही भाजपाचे पाय पकडले आहेत. त्यामुळेच त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही आहे ते आधी शोधावे आणि मग शिवसेनेवर टीका करावी. तुमची ओळखच शिवसेनेतून निर्माण झालेली आहे, त्या शिवसेनेवर टीका करत असताना तुमची जीभ हसडण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. हे तुम्ही लक्षात घ्यावे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

खंडापीठाने विद्यापीठाला बजावली कारणे दर्शक नोटीस

bAMU
bAMU

औरंगाबाद | विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयात पी एच डी साठी प्रवेश देण्यात यावा, या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगास कारणे दर्शक नोटीस बजावण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एन. लढ्ढा यांनी दिला आहे.

संशोधक चंद्रशेखर भाऊराव जाधव यांनी ॲड. शिरिष कांबळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. याचिकाकर्ते चंद्रशेखर जाधव यांनी २०१४ ला पेट दिली होती. परीक्षेत ते एसबीसी, एसटी आणि ओबीसी च्या जागांवर गुणवत्ता यादीत आले होते. गुणवत्ता यादी २०१५ साली प्रसिद्ध होती. तत्कालीन नियमाप्रमाणे गुणवत्ता यादीमधील संशोधकांसाठी मार्गदर्शक देत होते.

पण, विद्यापीठाने जाधव यांना संशोधन मार्गदर्शक उपलब्ध करून दिले नाही. यामुळे याचिकाकर्त्याने मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावे म्हणून पत्रव्यवहार केला. मात्र विद्यापीठाने त्यांना मार्गदर्शक दिले नाही. त्यांनी विद्यापीठाला दोन वेळा अर्ज केला. तरीही विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शक आणि प्रवेशपत्र दिले नाही. त्यामुळे अखेर त्यांनी याचिका दाखल केली.

राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे वागत आहेत- नाना पटोले

nana patole koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर पलटवार केला आहे. राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे वागत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

पंडित नेहरू यांच्यावरील टीका राज्यपाल यांना शोभत नाही. त्यांनी भाजपचा कार्यकर्ता बनावं. राज्यपालांच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारची टीका करण्याचे अधिकार राज्यपालांना नाही. ते भगतसिंग कोश्यारी म्हणून बोलत असतील. तो त्यांचा अधिकार आहे. मग त्यांना ती खुर्ची सोडावी लागेल. मग आम्ही त्यांना उत्तर काय द्यायचे ते निश्चित देऊ”, असा इशारा पटोले यांनी दिला.

कोशारी नेमकं काय म्हणाले-

पंडित नेहरू हे मोठे नेते होते. त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्यांची एक कमजोरी होती. ते ‘शांतीदूत’ या प्रतिमेत अडकले. शांततेची कबुतरं उडवण्यात ते मग्न राहिले. त्याचा परिणाम देशाच्या सुरक्षेवर झाला. सुरक्षेच्या बाबतीत देश कमकुवत राहिला. प्रदीर्घ काळ हे चालत राहिले,’ असं कोश्यारी म्हणाले होते.

आठ दिवसात पुलाचे काम सुरू करा – आमदार प्रदीप जैस्वाल

pradeep jaiswal

औरंगाबाद | सध्या पावसाळा सुरु झाला असून रस्तावरील खड्ड्यामध्ये पाणी साचते. ते पाणी घरात येऊ नये म्हणून दलालवाडीतील औषधीभवन येथील नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम सूरु होते. परंतु कंत्राटदाराने नाल्यातील कचरा न काढताच बांधकाम सुरू केल्यामुळे बांधकामास स्थगिती मिळाली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता. आता या नाल्यातील कचरा काढून पुलाचे काम आठ दिवसात सुरू करण्याचे आदेश आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिला आहे.

दलालवाडी भागात असलेल्या नाल्यामध्ये थर्माकोलचे तुकडे, औषधांचे बॉक्स, प्लास्टिक बॅग असा कचरा बऱ्याच वर्षापासून पडलेला आहे. पावसामुळे या भागात आणि नाल्यात भरपूर पाणी आणि कचरा पडून राहिल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा उच्छाद वाढतो. त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील गुलमंडी ते पैठणगेट हा रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना एकाच बाजूच्या रस्त्याने ये-जा करावी लागते. कोरोना महामारीमुळे बाजारपेठा सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे गुलमंडी भागात मोठया प्रमाणात वाहन कोंडी होते. जर पैठणगेट दलालवाडी हा रस्ता सुरू झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. यापार्श्वभूमीवर आठ दिवसात पुलाचे काम सुरु करण्याच्या सूचना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी दिल्या आहे.

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी प्रदीप जैस्वाल यांना त्यांच्या समस्या सांगितल्या. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता संजय काकडे, उपअभियंता नामदेव गाडेकर यांची उपस्थिती होती.

‘टीईटी’ अर्ज भरण्यासाठी तीन ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू

TET Exam

औरंगाबाद | शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 10 ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर परीक्षा परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 ऑगस्ट पासून सुरू होईल. 25 ऑगस्टपर्यंत डीटीएड, बीएड धारकांना अर्ज भरता येणार आहेत.

शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक असल्याने 2013 पासून राज्यात परीक्षा घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2019 पासून परीक्षेचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेला करता आलेले नाही. कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याने परिषदेने याबाबत सरकारकडे विचारणा केली होती.

परीक्षा घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर परिषदेने वेळापत्रक जाहीर केले असून (प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 1) व (माध्यमिक स्तरावर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 2) परीक्षा घेतली जाते. परीक्षा संदर्भात ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती http://mahatet.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हा तर लोकशाहीचा खून म्हणावा लागेल; पृथ्वीराज चव्हाण यांची मोदी सरकारवर टीका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पेगॅसिसबाबत केंद्र सरकारवर विरोधकांकडून आरोप केले जात आहे. त्यांच्या तर आता काँग्रेसचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरनावावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले पाहिजे कि, आम्ही सरकारच्यावतीने हेरगिरी केलेली नाही. मात्र, सरकार तसे स्पष्टपणे सांगत नाही. जर केले असेल तर हा लोकशाहीचा शेवट, खून म्हणावा लागेल. याचा जितका निषेध करावा तितके थोडे आहे, अशी टीका आमदार चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे.

कराड येथील माध्यमांशी संवाद साधताना आमदार चव्हाण म्हणाले की, ” हेरगिरी प्रकरण हा देशातील इतिहासातील सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे. लोकशाही मोडण्याकरिता केंद्र सरकारचे जे काही प्रयत्न चालले आहेत. एखाद्या विदेशी संस्थेला पैसे देऊन विदेशी सॉफ्टवेअर विकत घ्यायचे. देशातील विरोधी पक्षातील नेते, पत्रकार यांच्यासह नामांकित व्यक्तींची हेरगिरी पेगॅसिसमार्फत करण्याचा प्रकार सध्या केंद्रातील भाजप सरकार करत आहे. यात अनेक देशाचा समावेश आहे. त्यामध्ये भारताचाही समावेश आहे.

एकीकडे पेगॅसिसकडून म्हंटले जात आहे कि, आम्ही सरकारव्यतिरिक्त कोणालाही माहिती दिलेली नाही. तसेच सॉप्टवेअर आम्ही कोणत्याही खासगी कंपनीला विकलेले नाही. मात्र, भारतातील लोकांवर हेरगिरी सध्या होत आहे. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले पाहिजे कि, आम्ही सरकारच्यावतीने हेरगिरी केलेली नाही. मंत्री सांगत आहेत की, आम्ही नियमाने सर्व केले आहे. त्यांनी केले असेल तर तुम्ही नियमाने व परवानगी घेऊन केले आहे का? जर केले असेल तर अत्यंत दुर्देवी गोष्ट म्हणावे लागेल. हा लोकशाहीचा शेवट, खून म्हणावा लागेल. याचा जितका निषेध करावा तितके थोडे आहे. त्यामुळे या हेरगिरी प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या समिती मार्फत व्हावी, अशी आम्ही मागणी करीत असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली.