Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3744

दुचाकी चोरीचे सत्र सुरूच! आणखी चार दुचाकी लांबवल्या

bikes

औरंगाबाद | गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. वाहनधारकांनसोबतच पोलिसांची सुद्धा या घटनेमुळे डोकेदुखी वाढली आहे. शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरामध्ये वाहन चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

औरंगाबाद शहरातून आतापर्यंत शेकडो दुचाकी चोरीला गेले आहे.त त्याच कंपन्या समोरून, पार्किंगमधून आणि घरासमोरून दुचाकीला लांबवले आहेत. त्यातील मोजक्याच दुचाकींचा तपास लागू शकला. गेल्या आठ दिवसात चोरांनी आणखी दोघांची दुचाकी लांबले आहेत. विशेष म्हणजे या दुचाकी मध्यरात्री चोरीला गेल्या आहेत.

राम श्रीधर कुलकर्णी (रा. वाळूज) यांची 29 जुलै रोजी रात्री घरासमोर उभी असलेली दुचाकी (एमएच -20 डिडब्ल्यू- 7398) चोरट्यांनी पळवली. तुकाराम सोनटक्के (रा. गारखेडा परिसर) यांची दुचाकी (एमएच-20 ईसी – 0098) 26 जुलै रोजी शिवाजी नगरातील एका इलेक्ट्रिक दुकानासमोर उभी केली होती ती चोरीला गेली. गणेश पुंडलिक पैठणकर (रा. राजनगर, मुकुंदनगर) यांची दुचाकी (एमएच 20 बीएच 3502) ही 20 जुलै मुकुंदवाडी रेल्वे रुळाजवळून पळवली. सुमित गायकवाड (रा. समतानगर) यांची दुचाकी (एमएच-20 एक्स-4 11) ही 25 जुलै रोजी घरासमोरून चोरट्यांनी नेली. या प्रकरणी त्या-त्या पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरा बाळांच्या आमदारकी खासदारकीच पडलंय; पडळकरांचा अजितदादांवर निशाणा

ajitdada padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे.

कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला मार्ग आणखी विद्यार्थ्यांनी निवडावा असं या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतंय.म्हणूनच काय अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ हे अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते.. असे पडळकरांनी म्हंटल.

अजित पवारांनी ३१ जुलै पर्यंत MPSC च्या सर्व जागा भरू सांगितले होते आणि बाहेर येऊन फक्त आयोगावरील ‘सदस्यांच्या’ जागा भरू असे सांगितले होते… आता ३१ जुलै उलटून गेलीये.. MPSC च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या तर सोडाच साध्या MPSC आयोगावरील सदस्यांच्या नियुक्त्या तरी केल्यात का? असा सवाल पडळकरांनी केला.

या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोरा बाळांच्या आमदारकी खासदारकीच पडलेलं आहे.. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील या विषयी त्यांना काहीही पडलेलं नाही अशा शब्दांत पडळकरांनी अजित पवार आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

पंचवीस वर्षीय तरुणाची खोलीत गळफास घेऊन आत्महत्या

Suside
Suside

औरंगाबाद | शहरातील गारखेडा परिसरात कन्नड तालुक्यातील युवकाने खोलीमध्ये गळफास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 30 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

सागर शिवाजी आगाडे, वय 25,( रा. जवखेड, ता. कन्नड) हा सिग्मा रुग्णालयात कामाला होता. गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी तो शंभू नगरात किरायाने खोली घेऊन राहत होता. दुपारी 1 च्या सुमारास त्याने गळफास घेतल्याचे शेजारी भागवत जाधव यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी सागरला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

नुकसानीबाबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्या; फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी तसेच महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाचा नुकताच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी दौरा केला. यात 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये “नुकसानग्रस्त भागास तातडीच्या आणि दीर्घकालिन अशा दोन्ही स्वरूपात मदत देण्यासाठी बैठक घ्यावी तसेच लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हंटल आहे की, “कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा माझे सहकारी प्रवीण दरेकर यांच्यासमवेत दौरा करून, पूरग्रस्तांच्या व्यथा आणि गरजा समजून घेतल्या. त्यानंतर आता तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनाबाबत मागणी करीत आहोत.

दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 25 जुलै रोजी कोकण आणि 28 ते 30 जुलै या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागात दौरा केला आहे. यावेळी पूरग्रस्तांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या झालेल्या नुकसानीचीही माहिती घेतली आहे. ती घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र पटवून महत्वाच्या मागण्याही केलेल्या आहेत.

मनपाकडून वाढवले जाणार 20 एमएलडी पाणी

Water supply
Water supply

औरंगाबाद | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत 20 एमएलडी पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत देण्यात आलेल्या सूचना महापालिकेच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने शहरात 20 एमएलडी पाणी वाढवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, बऱ्याच ठिकाणी 5 ते 6 दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामध्ये सर्वाधिक फटका सिडको-हडको या भागाला होतो. त्यामुळे एक्सप्रेस लाइनवरील क्रॉस कनेक्शन बंद करून गारखेडा येथील पाण्याच्या टाकीवरून शिवाजीनगर पुंडलिकनगरला पाणी देण्याचा प्लान महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. यासाठी नवीन सम्ब बांधल्या जाणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही किलोमीटरची पाईपलाईन बदलून आणि पाणी उपसा करण्यासाठी 1 हजार हॉर्सपॉवरचे पंप धरणावर बसविण्याचा पर्याय सुचवला होता. यातून किमान 20 एमएलडी जास्तीचे पाणी शहराला मिळेल असे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. परंतु महापालिका प्रशासनाने हा पर्याय योग्य नसल्याचे म्हणणे आहे. सिडको भागातील टाक्यांमध्ये आलेल्या एक्सप्रेस लाईन वरून अनेक भागात पाणीपुरवठा केला जातो. शिवाजी नगर गारखेडा पुंडलिक नगर परिसरात हा पाणीपुरवठा होतो. जर पुंडलिक नगर ऐवजी गारखेडा परिसरातून हा पाणीपुरवठा केला तर हा प्रश्न मार्गी लागेल.

शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक; बाटग्यांना हे कसे समजणार; राऊतांची घणाघाती टीका

sanjay raut prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेळ आली तर आम्ही शिवसेना भवन देखील फोडू अस वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना आता शिवसेनकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसे समजणार अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार? अस ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

प्रसाद लाड यांची कोलांटीउडी-

दरम्यान शिवसेना भवन फोडू अस मी म्हणलंच नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला अस म्हणत प्रसाद लाड यांनी पलटी मारली. शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही असे स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिले.

त्यासाठी घराची कडी काढावी लागते; भातखळकरांचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. कोल्हापूर दौऱ्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भटखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे. “काय करावं आणि काय करू नये हे घरात बसून कसे कळेल? त्यासाठी घराची कडी काढावी लागते, मंत्रालयात जावं लागतं,” असे म्हणत भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

भाजप आमदार भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, ” काय करावं आणि काय करू नये हे घरात बसून कसे कळेल? त्यासाठी घराची कडी काढावी लागते, मंत्रालयात जावं लागतं, अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागते, फायली चाळाव्या लागतात, रात्री अपरात्री फोन घ्यावे लागतात. थोडक्यात काम करावं लागतं,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.

सेवानिवृत्त विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या ‘कोविड मुक्तीचा मार्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तसेच कोरोना परिस्थितीत सामोरे जाव्या लागणाऱ्या संकटाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या अनुभबद्दल भाजप आमदार भातखळकर यांनी त्यांना टोला लगावला आहे.

भररस्त्यावर तरुणाला चाकुने भोसकले; आरोपीला शस्त्रासह अटक

Crime

परभणी | गंगाखेड शहरातील डॉक्टर लाईन परिसरात शनिवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान एका व्यक्तीने धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल प्रकाश कदम वय 22, (रा. हटकर गल्ली) गंगाखेड असे जखमी तरुणाचे नाव आहे. सिद्धेश्वर गीते (रा. हळंब ता. परळी गंगाखेड) असे हल्ला केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, शनिवारी दुपारी एक वाजता डॉक्टर लाइन परिसरात अचानक एक युवक दुसऱ्या युवकास धारदार चाकूने सपासप वार करीत होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी आंदोलन बोलावून जखमी युवकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी हल्लेखोराने ॲम्बुलन्स चालकाला अडवण्याचा प्रयत्न केला आणि विशालवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

जखमी युवकाला उपजिल्हा रुग्णालय रुग्णालयात दाखल करेपर्यंत ॲम्बुलन्सचा पाठलाग करीत जखमीवर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. जखमी युवकाला प्राथमिक उपचार करून नांदेडला पाठवण्यात आले. गुन्हेगाराला गांगखेड पोलिसांनी शस्त्रासह अटक केली आहे.

काही लोकांना गांजा घेऊन बोलण्याची सवय; राऊतांचा राणेंना टोला

raut rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही लोकं गांजा ओढून बोलतात असं मी कुठेतरी ऐकलं आहे, असा टोला संजय राऊत यांनी राणेंना लगावला.

मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत याना राणेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता काही लोकं गांजा ओढून बोलतात असं मी कुठेतरी ऐकलं आहे असा चिमटा राऊतांनी काढला. तसेच यावर मी बोलण्यापेक्षा आमचे शाखाप्रमुख बोलतील कारण हा त्या लेव्हलचा विषय आहे असं म्हणत आपण या गोष्टीला महत्त्व देत नाही असे दाखवून दिले.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते-

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी जोरदार टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी याच कार्यक्रमात केली

अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला; राणेंनी साधला निशाणा

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातावरण तापल होत. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरली नसल्याने भाजपकडून अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे.

भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. ‘MPSC मार्फत भरण्यात येणारी सर्व रिक्त पदे ३१ जुलै पूर्वी भरण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती आज ३१जुलै आहे रिक्त पदे अद्याप भरलेली नाही. अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला.’ अस ट्वीट करून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी एमपीएससीबाबत केलेली घोषणा खोटी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी याआधी केला होता.