Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3753

सचिन तेंडुलकरने डिजिटल मनोरंजन कंपनी JetSynthesys मध्ये केली 14.8 कोटी रुपयांची गुंतवणूक

sachin tendulkar

नवी दिल्ली । डिजिटल एंटरटेनमेंट आणि टेक्नॉलॉजी कंपनी JetSynthesys ने गुरुवारी सांगितले की,”भारताचा प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कंपनीत 20 लाख डॉलर्सची (सुमारे 14.8 कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. JetSynthesys ही पुणेस्थित कंपनी आहे आणि ती भारताव्यतिरिक्त जपान, यूके, ईयू, यूएसए येथे त्यांचे ऑफिसेस आहेत.

या गुंतवणुकीमुळे कंपनीचे तेंडुलकरसोबतचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. डिजिटल क्रिकेट डेस्टिनेशन ‘100MB’ आणि इमर्सिव क्रिकेट गेम्स – ‘सचिन सागा क्रिकेट’ आणि ‘सचिन सागा व्हीआर’ साठी या दोघांचे आधीच एक जॉइंट वेंचर आहे.

JetSynthesys सोबत सचिनचे नाते पाच वर्षांचे आहे
तेंडुलकर म्हणाले, “ JetSynthesys बरोबरची माझा संबंध जवळपास पाच वर्षांपूर्वी पासूनच आहे. आम्ही सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्ससह आमचा प्रवास सुरू केला आणि एका खास व्हर्च्युअल रियलिटी क्रिकेट अनुभवासह ते बळकट केले. हे त्यांच्या श्रेणीतील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे आणि 2 कोटींहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे.

या डीलनंतर, JetSynthesys चे उपाध्यक्ष आणि एमडी राजन नवानी म्हणाले की,”100MB सह, कंपनीने सचिनच्या चाहत्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करण्याची संधी दिली जिथे ते त्याच्याशी थेट संवाद साधू शकतील.”

नवानी म्हणाले, “या गुंतवणूकीमुळे सचिन JetSynthesys कुटुंबातील आणखी एक महत्त्वाचा सदस्य झाला हे पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही या भारत रत्नचा अभिमान बाळगतो, जो मजबूत मूल्यांचा माणूस आहे आणि एक प्रतिष्ठित भारतीय आणि जागतिक ब्रँड आहे, कारण आम्ही जागतिक नवीन युगातील डिजिटल मीडिया मनोरंजन आणि क्रीडा प्लॅटफॉर्म तयार करतो. ”

हे तर आरक्षणावर पडदा टाकण्याचे कारस्थान; राम शिंदे यांचा आघाडी सरकारवर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीतील नुकसानीतील मदतीवरून आज कोल्हापुरात दौऱ्यावेळीही मुख्यमंत्री ठाकरे व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलेबाजीही झाली. त्यांनतर आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी भाजपवर आरोप केला आहे. “मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आतापर्यंत वेळकाढूपणा केला आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीचे निमित्त मिळाले आहे. मात्र, त्या आडून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पडदा टाकण्याचे कारस्थान केले जात आहे.”

यावेळी भाजपचे नेते शिंदे यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला. ठाकरे सरकारच्या कणाहीन धोरणामुळे मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नालाही ग्रहण लागले आहे. ठाकरे सकारच्या नव्या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा ठाकरे सरकारच्या धरसोडपणामुळे टांगणीवर पडलेला आहे.

या ठाकरे सरकारच्या धोरणशून्य कारभारामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षणदेखील गमावल्याने मुख्यमंत्र्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. ठाकरे सरकारकडे धोरण नाही आणि निर्णय घेण्याची हिंमत व क्षमतादेखील नाही, अशीही घणाघाती टीका यावेळी शिंदे यांनी केली.

पान मसाला ग्रुपच्या 31 ठिकाणांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा छापा, 400 कोटींचे अवैध व्यवहार उघडकीस

नवी दिल्ली । उत्तर भारतातील ‘पान मसाला’ या ग्रुपच्या अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला 400 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे अवैध व्यवहार (Unaccounted Transactions) आढळले आहेत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी संलग्न केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात CBDT ने शुक्रवारी ही माहिती दिली.

CBDT च्या म्हणण्यानुसार, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने गुरुवारी कानपूर, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि कोलकाता येथे असलेल्या ग्रुपच्या एकूण 31 ठिकाणी छापे टाकले. पान मसाला बनवणारा हा ग्रुप रिअल इस्टेटचा व्यवसायही करतो. या छाप्यांमध्ये, ग्रुपचे 400 कोटींपेक्षा जास्त रकमेचे अवैध व्यवहार उघडकीस आले आहेत. या निवेदनात ग्रुपची ओळख दिलेली नाही.

निवेदनानुसार, पान मसाला आणि रिअल इस्टेट व्यवसायाच्या बेहिशेबी विक्रीतून हा ग्रुप प्रचंड नफा कमावत होता. या ग्रुपने बनावट कंपन्यांद्वारे आपल्या व्यवसायात मिळविलेला हा नफा पुन्हा गुंतविला.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने या छाप्यादरम्यान 52 लाख रुपये रोख आणि सात किलो सोने जप्त केले. आरोपी ग्रुपने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आपला व्यवसाय देशभर पसरविला होता. या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून, या ग्रुपने फक्त तीन वर्षांत बँकांकडून सुमारे 226 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केला.

Gold-Silver Price : सोन्याचे दर वाढले तर चांदीची झाली घसरण, आजची किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 294 रुपयांनी वाढून 47,442 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. सोन्याचा मागील बंद भाव प्रति 10 ग्रॅम 47,148 रुपये होता.

याउलट चांदी 170 रुपयांनी घसरून 66,274 रुपये प्रति किलो झाली. त्याची आधीची बंद किंमत 64,444 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,830 डॉलर प्रति औंस होती, तर चांदी 25.57 डॉलर प्रति औंसवर राहिली.

सोन्याचे भाव का वाढले ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, “डॉलरच्या विक्रीमुळे एफओएमसीच्या बैठकीनंतर सोन्याची जोरदार खरेदी झाली. डॉलर निर्देशांक चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला, त्यामुळे सोन्याची खरेदी वाढली.” परकीय चलन बाजारामध्ये सकाळच्या व्यापारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे न बदललेले कल सुरू झाले आणि नंतर डॉलरच्या तुलनेत रुपया चार पैशांनी सुधारला.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, “अमेरिकन फेडरल गव्हर्नरने व्याज दरात वाढ आणि नरम भूमिका घेण्याच्या संदर्भात चिंता कमी केल्यामुळे सोन्याची मागणी सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून वाढली आहे आणि त्यामुळे वाढती वाढ झाली आहे. सोन्याची मागणी. “सोन्याला गती मिळाली आहे आणि जवळजवळ दोन महिन्यांत सर्वाधिक साप्ताहिक वाढ करण्याची तयारी आहे.”

जूनमध्ये रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 92.37 टक्क्यांनी वाढली
विशेष म्हणजे जून महिन्यात रत्ने आणि दागिन्यांची एकूण निर्यात 92.37 टक्क्यांनी वाढून 20,851.28 कोटी रुपये झाली. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) च्या मते, गेल्या वर्षी याच कालावधीत रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 10,838.93 कोटी रुपये होती. GJEPC ने रिपोर्ट दिला आहे की, सोन्याच्या दागिन्यांची निर्यात जूनमध्ये 398.70 टक्क्यांनी वाढून 4,185.10 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच महिन्यात 839.21 कोटी रुपयांच्या तुलनेत होती.

Stock Market : सेन्सेक्स 66 अंकांनी खाली तर निफ्टी 15763 वर बंद

मुंबई ।आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार सपाट पातळीवर बंद झाला. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स 66.23 अंक किंवा 0.13 टक्क्यांनी खाली 52586.84 वर बंद झाला. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 15.40 अंकांनी किंवा 0.10 टक्क्यांनी 15763.05 वर बंद झाला.

हेवीवेट्समध्ये सन फार्मा, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, एसबीआय आणि श्री सिमेंटचे शेअर्स ग्रीन मार्कवर बंद झाले. तर दुसरीकडे एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, हिंडाल्को आणि यूपीएलचे शेअर्स रेड मार्कवर बंद झाले. सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलताना शुक्रवारी खासगी बँक, पीएसयू बँक, फायनान्स सर्व्हिस, बँक आणि मेटल हे घसरणीने बंद झाले. दुसरीकडे, फार्मा, ऑटो, एफएमसीजी, आयटी, मीडिया, बँक आणि रियल्टी वाढीने बंद झाले.

एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे गुरुवारी ट्रेडिंगच्या अखेरीस, सेन्सेक्स 209.36 अंक किंवा 0.40 टक्क्यांच्या बळासह 52653.07 च्या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 69.10 अंक किंवा 0.44 टक्के वाढीसह 15778.50 वर बंद झाला.

Marico Q1: पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 5.9 टक्के घसरला
देशातील आघाडीची FMCG कंपनी Marico ने 30 जून 2021 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर दर केले आहेत. त्यानुसार पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 5.9 टक्क्यांनी घसरून 365 कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 388 कोटी होता. पहिल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 31.2 टक्क्यांनी वाढून 2,525 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत 1,925 कोटी रुपये होते.

गॉड गेमच्या नावाखाली राज कुंद्राकडून ३ हजार कोटींचा घोटाळा; राम कदमांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोर्नोग्राफी प्रकारणामुळे अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राज कुंद्रानं हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. तसेच फ्रॉड केल्यानंतर याच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”, असा दावाही त्यांनी केला.

गॉड गेमच्या नावावर राज कुंद्राने लोकांकडून ३०-३० लाख रुपये घेतले आणि ते त्यांना कधीच परत केले नाहीत, असा आरोप कदम यांनी केला आहे. अशा प्रकारे देशातून हजारो नागरिकांची फसवणूक करण्यात येत असून २५०० ते ३०० करोड रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

राज कुंद्राने आपली पत्नी शिल्पा शेट्टीचा हा गेम फॉर्वर्ड करण्यासाठी वापर करत डिस्ट्रिब्यूटर्सला आकर्षित केलं. तसेच डिस्ट्रीब्यूटर जेव्हा त्याच्याकडे पैशांचा तगादा लावयला लागले होते तेव्हा राज कुंद्राच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर पीडितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली असे राम कदम यांनी म्हंटल.

पूरग्रस्त भागातील बाधितांकडून वीजबिल वसुली करु नका – नितीन राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुराचा फटका बसलेल्या भागाचा नुकताच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील वीजवसुली करू नये, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती मंत्री राऊत यांनी दिली.

राज्यात महापुरामुळे शेती पिकांचे तसेच ग्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आता नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. यावेळी मंत्री राऊत म्हणाले की, “ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्त भागात वीजवसुली करु नये असे आदेश दिले आहेत. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर वीजबिलंदेखील दिली जाणार नाहीत. लोकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, मंत्री नितीन राऊत यांनी यावेळी वीजबिल माफ करण्यासंदर्भात निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे अगोदरच मोठ्या प्रमाणात महापुरामुळे शेती, पिके वाहून गेली आहेत. तर घरांवर दरडी कोसळून घरांचीही पडझड झाली आहे. अशात वीजबिलात माफी मिळेल का? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, मंत्री राऊत यांनी आज नुकसानग्रस्त भागात वीजबिल वसुली करू नये, असे निर्देश दिले आहे.

‘माझा भाऊ पोलीस अधिकारी आहे’ म्हणत मद्यधुंद तरूणीचा बसस्थानकावर गोंधळ

Drink by girl

औरंगाबाद | दारूच्या नशेमध्ये असलेल्या एका तरुणीने माझा भाऊ पोलीस अधिकारी आहे म्हणत सिडको बस स्थानक येथे गोंधळ घातला. ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. नशेत असतानाच तिला एकाने बस स्थानका बाहेर आणून सोडले होते आणि तो तेथून गेला होता.

त्यानंतर ती माझा भाऊ पोलीस निरीक्षक आहे, सीपी साहेब माझ्या ओळखीचे आहेत अशी बडबडत होती. यावेळी तिने बराच गोंधळ घातला. बस स्थानकावरील प्रवाशांची मोबाईल द्वारे ती शुटींग काढत होती. त्यानंतर ती सुलभ शौचालय कडे गेली आणि कर्मचाऱ्यांना शौचालय स्वच्छ ठेवत जा अशा सूचना देत होती. दरम्यान तिचा गोंधळ पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती.

दरम्यान, निर्मला निंभोरे यांच्या दामिनी पथकाने आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे बीट मार्शल यांनी तात्काळ धाव घेतली. पोलिसांना पाहताच त्या युवतीला ही माझी नातेवाईक आहे असे म्हणत एक युवक रिक्षाने घेऊन गेला. सदर युवतीला सोडायला आलेल्या शोध घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच होईल; गुलाबराव पाटलांची खुली ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागतच होईल असं विधान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच पंकजा मुंडे यांना शिवसेनेची ऑफर देणारा पहिला मीच होतो असा खुलासा देखील त्यांनी केला.

गुलाबराव पाटील म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून हवे तसे प्रतिनिधित्त्व मिळाले नाही. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी अडचणीच्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे असे गुलाबराव पाटील यांनी म्हंटल तसेच ओबीसी समाजाचे भाजपकडून कुठेतरी खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले, गोपीनाथ मुंडे व मुंडे परिवाराचे काम मोठे आहे. यामुळे मुंडेंचा वारसदार म्‍हणून पंकजा मुंडे यांना योग्‍य स्‍थान व प्रतिनिधीत्‍व शिवसेनेत मिळेल; अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्‍यांचे स्‍वागतच राहिल. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे हे मुख्‍यमंत्री तथा शिवसेना अध्‍यक्ष उद्धव ठाकरे ठरवतील; असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केल.

शहर अभियंता पदावरील नेमणुक ठराव विखंडीत करा – राजेंद्र दाते पाटील

Rajendra Date Patil

औरंगाबाद – औरंगाबाद मनपा चा कार्यभार सध्या आयुक्त आस्तिक कुमार पांडेय हे प्रशासक म्हणून पाहत आहेत. अधिकारी व अभियंत्यांची भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणे, शासन निर्देशांचे पालन न करणे या आणि प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामासाठी शासन निर्णय दि. ९ मार्च २०१५ अन्वये रु.२४.३३ कोटी निधी उपलब्ध करून दिले. तथापि, सदर कामाच्या निविदा प्रक्रिये मध्ये अनियमितता आढळुन आल्याने शहर अभियंता एस.डी. पानझडे यांचे विरुद्ध विभागीय चौकशी होऊन त्यात ते दोषी आढळले असुन या अधिकाऱ्याची शहर अभियंता पदावरील नेमणुक ठराव विखंडीत करा अशी मागणी पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजचे सचीव तथा शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे केली आहे.

आपल्या तक्रार अर्जात राजेंद्र दाते पाटील यांनी नमुद केले की, या बाबत गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत असुन जा.क्र. मनपा/आस्था-१/ २०१६/२०१२ दि.१५ डिसेंम्बर २०१६ अन्वये ज्ञापन बनविण्यात आले होते. कार्यालयीन आदेश क्र. मनपा/आस्था-१/ २०१८/४४  दि.१०/०१/२०१८ प्रमाणे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, ज्या अन्वये ज्ञापन बनविण्यात आले होती, यात उच्च न्यायालयाने २६ एप्रिल २०१८ रोजीआदेश सुद्धा दिला होता. प्रधान सचिव नगरविकास-२ यांच्या अध्यक्षते खालील त्री सदस्यीय समितीने प्राथमिक चौकशी अहवाल ०८ जुन २०१८ रोजी सादर केला सदर अहवाला नुसार शहर अभियंता एस डी पानझडे यांना पुर्वीच्या दोषारोपा सह अतिरिक्त दोषारोप पत्र सुद्धा बजाविण्यात आले होते. कक्ष अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. औमनपा-२०१८/प्र.क्र.३०८-अ/नवि- २४  दि.९ मार्च २०२० आणि या सोबत प्राप्त चौकशी अहवाला नुसार शहर अभियंता एस.डी. पानझडे यांचे वरील ०४ दोषारोप सिद्ध झाले असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९८२ नुसार कारवाई मनपा चा प्रस्ताव क्र.८४/२०२१ दि ०४ फेब्रुवारी २०२१ नुसार प्रस्तावीत सुद्धा करण्यात आलेली आहे. असे सगळे स्पष्ट असतांना देखील पानझडे यांना नव्याने सहा महिन्यांची। नियुक्ती कशा साठी हा महत्वपुर्ण सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे उपस्थित केला आहे.

सदरची गंभीर बाब लक्षात घेता शहर अभियंता एस.डी.पानझडे यांचे विरुध्द विभागीय चौकशी करण्यासाठी ज्ञापन बजाविण्यात आले होते. त्यात त्यांच्यावर “ठपका” ठेवलेला असल्यामुळे  त्यांना उपरोक्त विषयांकित प्रस्ताव/विषया प्रमाणे नियुक्ती देण्याचा शासनास पाठविलेला प्रस्ताव तथा ठराव क्रमांक १६६/२०२१ दि ३० जुन २०२१ आणि ठराव क्रमांक १६६/२०२१ विखंडीत करणेचे आदेश तात्काळ जनहितार्थ विखंडीत करण्याचे निर्देश नगर विकास विभागास व्हावेत अशी लेखी मागणीच शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.