Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3754

काले गावातील पूरग्रस्तांना सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अन्नधान्यांचे किट वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील काले या गावात आलेल्या महापुरामुळे गावातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काले गावातील तब्बल 80 पूरग्रस्त कुटुंबाना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी तेजस शिंदे म्हणाले, दक्षिण मांड नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले होते. दोन ते तीन घरांचे भिंती पडून मोठे नुकसान झाले आहे. या पुरात 3 हजार कोंबड्यांची पोल्ट्रीच पूर्ण नुकसान झालं आहे. त्या कुटुंबांना भेटून धीर दिला. अचानक पाणी आल्याने काहीच करता आले नाही असं ग्रामस्थांनी सांगितलं. एका आजीचं घर पडलं असून कराड तालुक्याचे तहसीलदार यांना फोन करून आजींना पूर्ण नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी विनंती केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची तात्पुरती मदत तात्काळ देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुढाकार घेईल. त्यांच्या नातवांच्या अभ्यासाची वह्या व पुस्तके राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तातडीने घेऊन देईल, असा विश्वास त्यांना दिला.

गावातील गाव कामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधून सर्वच पंचनामे लवकरात पूर्ण करा. पंचनामे करताना लोकांना झालेल्या नुकसानीची सर्व भरपाई मिळेल, याची दक्षता घ्या अशी आग्रहाची मागणी केली आहे. ‘काले’ गावातील राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सागर देसाई हे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून लोकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकसान झालेल्या कुटूंबाना शासनाने जाहीर केलेली मदत मिळवून देण्यासाठी ते पुढाकार घेतील, याकामी काहीही अडचण निर्माण झाल्यास मी मदत करीन असा विश्वास तेजस शिंदे यांनी दिला.

यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन कुराडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष वैभव कळसे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कराड सागर देसाई, युवक कराड तालुकाध्यक्ष अमित पाटील, कराड तालुका उपाध्यक्ष राहुल भोसले, युवक सातारा तालुका अध्यक्ष मंगेश ढाणे, अमर माने, विद्यार्थी जिल्हा संघटक अक्षय शिंदे, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय परदेशी, विद्यार्थी कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रथमेश बिचकुले, कोडोली ग्रामपंचायत सदस्य विकास अवघडे व काले ग्रामपंचायत सदस्य विकास देसाई आदी उपस्थित होते.

भाजपची खेळी यशस्वी; काँग्रेस सोडून आलेले शेळके भाजपकडून उपसभापती

sabhapati arjun shelake
sabhapati arjun shelake

औरंगाबाद | औरंगाबाद तालुका पंचायत समितीच्या झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे अर्जुन शेळके यांनी महा विकास आघाडीचे अनुराग शिंदे यांचा पराभव करून विजय संपादन केला. पंचायत समितीच्या उपसभापती मालतीबाई पडवळ यांनी राजीनामा दिल्यामुळे गुरुवारी रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती.

औरंगाबाद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे आठ, भाजप सात, शिवसेना तीन, अपक्ष दोन असे राजकीय संख्याबळ आहे. काँग्रेस शिवसेना व पक्षांची आघाडी झाल्यामुळे औरंगाबाद पंचायत समितीवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यामुळे काँग्रेसच्या छायाताई घागरे या सभापती तर सेनेच्या मालतीबाई पडूळ या उपसभापती पदी विराजमान होत्या. परंतु उपसभापतीपदी मालतीबाई पडूळ यांना पदाचा राजीनामा दिल्यामुळे गुरुवारी निवडणूक घेण्यात आली.

यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अर्जुन शेळके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे अनुराग शिंदे यांच्या विरोधात उभे राहात 10 मते घेऊन उपसभापती पद मिळवले. यात सभापती यांनी स्वतः शेळके यांना मतदान केल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेबाबत बैठक संपन्न

सातारा | गेल्या आठ दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच बाधित कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणेबाबत व त्यांच्या अडचणी सोडवणेबाबत चर्चा झाली. सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, तात्पुरत्या – कायमस्वरूपी उपाययोजना व पुनर्वसन या अनुषंगाने राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी श्री रामचंद्र शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धोत्रे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम श्री मुनगिलवार, अधीक्षक अभियंता महावितरण श्री गायकवाड, अधीक्षक अभियंता सिंचन श्री डोईफोडे व श्री मिसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात पाटण, जावली, वाई व महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सातरा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पूराच्या पाण्याचा फटकाही बसलेला आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहून तसेच तडे गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तेव्हा या सर्वांचा पंचनामा व पाहणी करून अहवाल तयार करण्यात यावा, अशाही सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत.

उशीर झालाय, पण सरकारने आता तरी मदत करावी- फडणवीसांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यावर आलेलं महापुराचं भयंकर संकट पाहता राज्य सरकारकडून तातडीची मदत अपेक्षित होती पण ती मिळाली नाही. त्यामुळे आता तरी सरकारने पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.

फडणवीस म्हणाले, हे नुकसान पाहता, राज्य सरकारकडून तातडीची मदत येणं अपेक्षित होतं, पण अजून पोहोचली नाही. आपत्ती आल्यानंतर तात्काळ मदत आवश्यक असते. नागरिकांच्या घर-दुकानांमध्ये चिखल घुसतो, ते सफाई करण्यासाठीही खर्च असतो. मिठापासून कपड्यांपर्यंत खराब झाले असतात. ही जी तातडीची मदत द्यावी लागते, कारण या पूरग्रस्तांकडे काहीही नसतं. आता उशीर झालाय, पण सरकारने तातडीने मदत करावी,

खरं तर या महापुराकडे आपल्याला अतिशय गांभीर्याने पाहावं लागेल. एवढा मोठा पाऊस न होता, विसर्ग न होता पाणी का साठलं यावर उपाय शोधावे लागतील. महापुरामुळे प्रशासकीय इमारती, शाळांचं नुकसान. घरांचं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे सरकारने आता तरी मदत करावी असे फडणवीसांनी म्हंटल.

अवैधरित्या बायोडिझेलचा साठा करून विक्री करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

chikalthana police station
chikalthana police station

औरंगाबाद | औरंगाबाद पोलिसांनी मोठी कामगिरी करत अवैधरित्या बायोडिझेलचा साठा करून विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल ३३ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सर्व आरोपींविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिनानगर येथील रोडवर काही इसम विना परवाना बायोडिझेलचा साठा करून वाहनांमध्ये अवैधरित्या भरुन त्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांकडून मिळाली. मग मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास हिनानगर रोडलगत असलेल्या के.के. ट्रेडर्स येथे छापा टाकला असता त्याठिकाणी एक टोळी अवैधरित्या बायोडिझेलचा साठा करून विक्री करत असल्याचे निर्दशनास आले. याठिकाणी आरोपी इरफान खान खमर खान (३५), जाहेद हमीद शेख (२९), जयराम चव्हाण (४५), शेख तखीयोद्दीन शेख अहेमद (३४), मोहसीन खान मोहम्मद खान (३०), शाकेर खान इफ्तेखार खान (२६), बाळासाहेब आहेर (३९) यांना ताब्यात घेतले आहे.

या आरोपींकडून घटनास्थळावर २ हजार ५९७ लिटर व टॅंकरमध्ये ९ हजार ९४० किलो असे एकूण ८ लाख ७७ हजार ५५० रुपये किमतीचे बायोडिझेल, ३ लाख २७ हजार ६० रोख रक्कम, २१ लाख ४ हजार ७०० रुपये किंमतीचे वाहन आणि मोबाईल असे एकूण ३३ लाख ९ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला असून, आरोपींवर कलम ३ व ७ जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ प्रमाणे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

धनगर आरक्षणप्रश्नी मंत्री समिती स्थापन करा- विक्रम ढोणे

बारामती ः पाठीमागील देवेंद्र फडणवीस सरकारने एसटी आरक्षणप्रश्नी धनगर समाजाची घनघोर फसवणूक केली, त्याचप्रमाणे विद्यमान उद्धव ठाकरे सरकारही धनगर समाजाची उपेक्षा करत असल्याचा निषेध म्हणून गुरूवारी (ता. २९) धनगर विवेक जागृती अभियानाच्या वतीने बारामतीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर आरक्षणप्रश्नी तातडीने कार्यवाही करण्यासाठी राज्य सरकारने मंत्री समिती स्थापन करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय इमारतीसमोर काळा पोशाख घालून हे आंदोलन करण्यात आले. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने धनगर समाजाचे खच्चीकरण केल्याचे फलक आंदोलकांच्या हाती होते. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने मंत्री समिती स्थापन करून तातडीने कार्यवाही करावी, तेसच केंद्र शासनाने समन्वय समिती स्थापन करून याप्रश्नी पाठपुरावा करावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

आंदोलनाची भुमिका मांडताना विक्रम ढोणे म्हणाले की, धनगर आरक्षणाचा संपुर्ण अभ्यास केला आहे, आम्हीच आरक्षण देणार अशी भुमिका भाजपचे नेते २०१४ च्या निवडुकांपुर्वी मांडत होते. देवेंद्र फडणवीस हे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून बारामतीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी २९ जुलै २०१४ रोजी भाजपचे सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार, असे घोषित केले होते. प्रत्यक्षात फडणवीस यांनी पाच वर्षे समाजाचा विश्वासघात केला.

समाजाचे खच्चीकरण करून दलाल आणि गुलाम तयार केले. हा प्रकार धनगर समाजातील जागरूक तरूण विसरलेला नसल्याने तीन वर्षांपासून २९ जुलैला धनगर समाज विश्वासघात दिवस पाळला जात आहे. त्याअंतर्गत आज (२९ जुलैला) बारामतीत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यासंदर्भाने भाजपने केंद्र सरकारच्या पातळीवरून पाठपुरावा करायचे धैर्य दाखवावे, असेही ढोणे म्हणाले.

धनगर वेशभुषा करणारे नेते गेले कुठे

फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते सातत्याने धनगर आरक्षणप्रश्नी बोलत होते. विधीमंडळात धनगर समाजाची वेशभुषा घालून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे हे नेते लक्ष वेधत होते. मात्र या सर्व नेत्यांना आता या प्रश्नाचा विसर पडला नाही, मात्र आम्ही त्यांना विसरू देणार नाही. आठवण करत राहू, असेही विक्रम ढोणे म्हणाले. या आंदोलनात प्रवीण गदडे,सुरेश हक्के, युवराज हाक्के, तात्यासो खांडेकर आदी सहभागी झाले होते

फुकटची बिर्याणी महिला पोलीसाला पडणार महागात; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील महिला DCP ने फुकट बिर्याणी साठी केलेला हट्ट आता त्यांच्याच अंगलटी येण्याची शक्यता आहे. आपल्याच हद्दीतील हॉटेल वाल्याला पैसे का द्यायचे असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी आणायला सांगणाऱ्या या महिलेची आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत

मी ती ऑडिओ क्लिप ऐकली असून निश्चितच हि गंभीर गोष्ट आहे. मी पोलीस आयुक्तांना सांगितले आहे कि यासंदर्भामधे चौकशी करून अहवाल द्यावा. त्या अहवाला नंतर राज्य सरकार या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईल असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले

काय आहे प्रकरण –

पुण्यातील महिला DCP ने कर्मचाऱ्यांकडे फुकट बिर्याणीची मागणी केली .आपल्याच हद्दीतील हॉटेल मालकाकडून आपण पैसे देऊन बिर्याणी का घ्यायची असा सवाल महिला पोलिसने केला असता कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याच सांगतोय. अशावेळी मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे. हे रेकॉर्डिंग सध्या जोरदार व्हायरल होत असून आता खुद्द गृहमंत्र्यांनी याबाबात चौकशीचे आदेश दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत

मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री; उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्याची पाहणी केली. यावेळी म्हुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि महाराष्ट्रात मोठे संकट आले आहे. अशा संकटात त्यांना मदत करणे गरजेची आहे. ती करताना मी जनतेच्या जीवाशी खेळ करणार नाही. मी पॅकेज देणारा नसून मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे अशा टोला यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

कोल्हापुरातही महापुरामुळे नुकसान झाले असल्याने या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नुकसानीबाबत राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीबाबत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले कि, महापुरात नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत एकीकडे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे महापुराचे पाणी ओसरत असल्याने या ठिकाणी कोरोनासह इतर आजारही पसरण्याची भीती आहे.

त्यामुळे या ठिकाणी मदत देत असताना वेगवेगळ्या स्वरूपात मदत देणे आवश्यक आहे. एकीकडे घरांचे तसेच शेतीचे नुकसान तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. काल पूरग्रस्त व्यावसायिक, दुकानदारांना विमा रक्कम मिळण्यासंदर्भात विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले. त्यात “पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची 50 % रक्कम तातडीने द्यावी,”अशी विनंतीही केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्तांसाठी केल्या जात असलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, मी अजूनही नुकसानीची पाहणी करणार आहे. मोठ्या प्रमाणात महापुरामुळे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मी कोणत्याही स्वरूपाच्या आर्थिक पेकेजची घोषणा करणार नसून मी जनतेला मदत करणारा मुख्यमंत्री आहे केवळ आर्थिक पेकेजची घोषणा करणारा मुख्यमंत्री नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी फडणवीस यांना टोला लगावला.

पूरग्रस्तांना ५० टक्के विमा रक्कम वितरित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्मला सीतारामन यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे दुकानांमध्ये महापुराची पाणी शिरल्याने त्यांच्या मालाचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर काल पूरग्रस्त व्यावसायिक, दुकानदारांना विमा रक्कम मिळण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले. त्यात “पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची 50 % रक्कम तातडीने द्यावी,”अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विमा कंपनीला राज्यातील पूरग्रस्तांना 50 टक्के विमा रकमेचे वाटप करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, “विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कव्हरेजची किमान 50 टक्के रक्कम देण्यास सहमती दर्शवली आहे. तथापि, त्यांनी केंद्र सरकारकडून विमा कंपन्यांच्या मुख्यालयांना तसेच आयआरडीए ला निर्देश किंवा सूचना मिळवण्यावर भर दिला,”

विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या बैठकीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, विमा कंपन्यांनी नुकसानीच्या मूल्यांकनासाठी नुकसान झालेल्या वस्तू काढू नयेत म्हणून आग्रह धरू नये. महसूल अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईच्या जागेची स्पष्ट छायाचित्रे घ्यावीत. मुल्यांकनात कोणताही गोंधळ होऊ नये, विमा कंपन्यांनी याचा विचार करावा.

पुण्यात DCP मॅडमना हवी फुकट बिर्याणी; कर्मचाऱ्याची थेट महासंचालकांकडे तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्याच हद्दीतील हॉटेल मालकाकडून आपण पैसे देऊन बिर्याणी का घ्यायची अशी उद्दामपानाची भाषा संबंधित महिला पोलीस अधिकारी वापरत असल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याच सांगतोय. अशावेळी मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे.

कर्मचाऱ्यांने एक ऑडिओ क्लिप पाठवली आहे. जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी आणि प्रॉन्सची ऑर्डर द्यायला सांगते ते सुद्धा फुकट. जर त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलिस निरीक्षकाकडे तक्रार करा, असही त्या मॅडम आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे.

तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याच सांगतोय. अशावेळी मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे. जर त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलिस निरीक्षकाकडे तक्रार करा, असही त्या मॅडम आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे. सरतशेवटी मॅडमच्या या कारभाराला त्रस्त होऊन त्या कर्मचान्याने महासंचालकाकडे दाद मागितली आहे. आता पोलिस महासंचालक या पोलिस उपायुक्त मॅडमवर कारवाई करतील का, हे पाहणं महत्त्वाचे आहे.