Saturday, December 6, 2025
Home Blog Page 3755

ATSची कारवाई : साताऱ्यात मध्यरात्री तलवारीसह 11 धारधार हत्यारे जप्त, एकजण ताब्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील वर्दळीच्या ठिकाणावरून दहशतवादी विरोधी पथकाच्या सेलने (एटीसी) सुमारे 4 तलवारीसह 11 धारधार इतर हत्यारे जप्त केली. सातारा शहरात गुरुवारी (दि. 29) रात्री 9 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. शहरातील दिव्यनगरी ते कोंडवे रोडवरील या घटनेने नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सातारा शहरात संशयास्पद फिरणाऱ्या सचिन बाळू चव्हाण (रा. आकाशवाणी झोपडपट्टी) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी रात्री एटीसीचे पथक साताऱ्यात गस्त घालत होते. यावेळी एकजण संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळला. यानंतर पोलिसांनी त्याला अडवून कसून चौकशी केली असता त्याच्याकडे अनेक हत्याराचे कोठार असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील 11 धारदार हत्यारे जप्त केली आहेत. आरोपीकडे सातारा पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

संशयितांकडे पोत्यात तलवारीसह 7 कोयतेही सापडले आहेत. या शस्त्रांची किंमत 18 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पो.नि. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली स.पो.नि शिवाजी विभुते, भोसले यांनी ही कारवाई केली आहे. अशा घटना वाढल्याने नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

वेरूळ लेणी परिसरात आढळला बिबट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

found Leopards
found Leopards

औरंगाबाद | जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात गुरुवारी एका व्यक्तीला बिबट्या दिसला होता. त्याने याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा बिबट्या आहे की वाघ याबद्दल सध्या सर्वत्र तर्क वितर्क लावले जात आहेत.

धुळे सोलापूर महामार्गावर एका व्यक्तीला गुरुवारी सकाळी लेणी परिसरात डोंगरकपारीत बिबट्या दिसला त्याने बिबट्याची मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग केली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हा बिबट्या खुलताबाद गेस्ट हाउसच्या दिशेने गेल्याची माहिती मिळत आहे. यामुळे वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन, म्हैसमाळ परिसरात भीतीचे वातावरण आहे.

माहिती मिळताच वनविभागाचे एक पथक बिबट्याच्या शोधासाठी परिसरात रवाना झाले. हा बिबट्या किंवा याबद्दल तर्कवितर्क असले तरी तो वाघ नसून बिबट्याचा असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. पर्यटक व या परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

महागाई म्हणजे मोदी सरकारची टॅक्स वसुली; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई झपाट्याने वाढत आहे. एकीकडे कोरोना संकट आले असताना दुसरीकडे महागाईत देखील वाढ होत असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की , सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकऱ्यांना होत आहे का? नाही! कारण, ही महंगाई म्हणजे खरे तर मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसूली आहे.

दरम्यान, देशात गॅस, पेट्रोल, डिझेल वाढीमुळे जनता आधीच त्रस्त आहे. त्यात कोरोना संकट अजून गेलेलं नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार वर टीका करत असतात. देशात पेगॅसस प्रकरणावरून राजकारण तापलं असून पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचे राहुल गांधी यांनी यापूर्वी म्हंटल होत.

Bank Holidays : बँका ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहतील, कोण-कोणत्या दिवशी सुट्टी आहे; येथे लिस्ट पहा

नवी दिल्ली ।आजकाल बँका आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगचे माध्यम वापरण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, तरीही बँकेशी संबंधित काही कामं करण्यासाठी त्यांच्या बँकेच्या जवळच्या शाखेलाच भेट देणे आवश्यक असू शकते. या वेळी ऑगस्ट महिन्यात बँका शनिवार आणि रविवारसह एकूण 15 दिवस बंद राहतील. म्हणून, ऑगस्ट महिन्याच्या सुट्टीची संपूर्ण लिस्ट आधीच पाहून घ्या.

रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, सर्व बँका महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी बंद आहेत. खासगी आणि सरकारी दोन्ही बँकांमध्ये हा नियम लागू आहे. RBI च्या कॅलेंडरनुसार ऑगस्ट महिन्यात बँका 8 दिवस बंद राहतील. बाकी राहिलेले दिवस त्यांची साप्ताहिक सुट्टी असेल. परंतु येथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, देशातील सर्व राज्यांच्या सर्व बँकांना एकाच वेळी 8 दिवसांची सुट्टी असणार नाही. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये स्थानिक गरजेनुसार सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

बँकांच्या ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्या
1 ऑगस्ट 2021 – रविवार असल्याने बँका बंद राहतील.
8 ऑगस्ट, 2021 – या दिवशी देखील रविवार आहे, त्यामुळे बँकेला सुट्टी असेल.
13 ऑगस्ट 2021 – Patriots Day मुळे इम्फाळ झोनमध्ये बँका बंद राहतील.
14 ऑगस्ट 2021 – दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
15 ऑगस्ट 2021 – रविवार आणि स्वातंत्र्य दिनासाठी बँका बंद असतील.
16 ऑगस्ट, 2021 – या दिवशी पारशी नवीन वर्षामुळे, महाराष्ट्रातील बेलापूर, मुंबई आणि नागपूर झोनमध्ये बँका बंद राहतील.
19 ऑगस्ट, 2021 – मोहरम मुळे, आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगर या झोनमध्ये बँका असतील.
20 ऑगस्ट 2021 – मुहर्रम आणि पहिल्या ओणममुळे बेंगळुरू, चेन्नई, कोची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी असेल.
21 ऑगस्ट, 2021 – तिरुवोनममुळे कोची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी असेल.
22 ऑगस्ट, 2021 – रक्षा बंधन आणि रविवार असल्यामुळे या दिवशी बँकेला सुट्टी असेल.
23 ऑगस्ट, 2021 – श्री नारायण गुरु जयंतीमुळे या दिवशी कोची आणि केरळ झोनमध्ये बँका बंद राहतील.
28 ऑगस्ट, 2021 – चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
29 ऑगस्ट, 2021 – रविवारमुळे बँका बंद राहतील.
30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमीमुळे बँका या दिवशी कायम राहतील.
31 ऑगस्ट, 2021 – श्री कृष्ण अष्टमीमुळे या दिवशी हैदराबादमध्ये बँका बंद राहतील.

तरूणाई एकवटली अन् एका दिवसात गाव स्वच्छ झाला, तांबवेकरांची कमाल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला. यामध्ये कराड तालुक्यातील तांबवे गावात सलग दोन दिवस पूर आलेला होता. पूरातील पाण्यामुळे गावातील रस्त्यांवर तसेच नदीकाठच्या पाणवठ्यावर गाळ साचलेला होता. साचलेला गाळ काढण्यासाठी तांबवे गावची तरूणाई एकवटली अन् एका दिवसात संपूर्ण गाव स्वच्छ केला.

तांबवे गावात पूर आेसरल्यानंतर स्मशानभूमी परिसरात गाळ साचलेला होता. या परिसरात गाळ साचल्याने दुचाकी चालकांना कसरत करावी लागत होती. गाळातून प्रवास करणाऱ्या काही दुचाकी घसरलेल्याही होत्या. तेव्हा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील व त्यांच्या युवक मित्रमंडळीनी पाण्याने रस्ता स्वच्छ धुवून काढला. रस्ता स्वच्छ केल्याने वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कोयनेच्या महापुरामुळे तांबवेतील लोहार पाणवठा, खडा पाणवठा (रघुनाथ), ब्राह्मण पाणवठा या पाणवठ्यांवर साठलेला प्रचंड गाळ, पुरामुळे वहात आलेला कचरा यामुळे पाणवठ्यांवर जाणेच मुश्किल झाले होते. गावातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह अबालवृध्दांनी खोरी, पाट्या, टिकाव, पाणी फवारण्याठी इलेक्ट्रीक मोटर, पाईप घेऊन पाणवठ्यांवर जमा झाले होते. एका दिवसात पाणवठ्यांवर तसेच रस्त्यांवर श्रमदान करत स्वच्छ केले.

पाण्याचा हौदात पडून मेंढपाळाच्या मुलीचा मृत्यू

Water

औरंगाबाद | सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे इमारत बांधकामाच्या पाण्यासाठी बनवलेल्या पाण्याच्या हौदात पडून एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आशा चंद्रभान आहिरे, वय – 7 वर्षें (रा. बेलखेडा ता. कन्नड) असे मृत मुलीचे नाव आहे.

कन्नड तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब बेलखेडा येथील घाटमाथ्यावर काही दिवस मेंढ्या चराईसाठी आले होते. ती परतीच्या मार्गावर असताना बनोटी येथील ग्राम स्वच्छालय याच्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर थांबले होते. बाजूलाच महसूल विभागाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते.

ठेकेदाराने पाण्यासाठी मोठा हौद बांधून त्यात पाणी साठले होते. चिमुकली आशा ही खेळता-खेळता हौदात जाऊन पडली. जवळ कोणीही नसल्याने ते कुणाच्याही लक्षात आले नाही. थोड्यावेळाने मुलगी दिसत नसल्याने आईने शोधाशोध केली असता पाण्याच्या हौदात मुलीचा मृतदेह आढळून आला.

खुशखबर ! केंद्र सरकार करू शकते मोठी घोषणा, बेसिक सॅलरी 15000 वरून 21000 पर्यंत वाढू शकेल

नवी दिल्ली । 1 ऑक्टोबरपासून खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी येणार आहे. वास्तविक, मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकारला 1 जुलैपासून कामगार संहिता नियम लागू करायचे होते, परंतु राज्य सरकारांच्या तयारीच्या अभावी, ते 1 ऑक्टोबरपासून लागू करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबरपासून कामगार संहितेचे नवीन नियम लागू झाले तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 15000 रुपयांवरून 21000 रुपयांपर्यंत वाढू शकते.

कोणते नियम बदलेल ते जाणून घ्या
नवीन मसुद्याच्या नियमानुसार, बेसिक सॅलरी एकूण सॅलरीच्या 50% किंवा अधिक असावे. यामुळे बहुतेक कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होईल. बेसिक सॅलरीमध्ये वाढ झाल्यामुळे, PF आणि ग्रॅच्युइटीसाठी कट केलेली रक्कम वाढेल कारण कट केलेले पैसे बेसिक सॅलरीच्या प्रमाणात आहेत.

संघटनेची ही मागणी आहे
असे झाल्यास तुमची टेक होम सॅलरी कमी होईल, रिटायरमेंटनंतर PF आणि ग्रॅच्युइटीचे पैसे वाढतील. कामगार संघटनेची अशी मागणी होती की, मिनिमम बेसिक सॅलरी 21000 रुपये केले पाहिजे जेणेकरून PF आणि ग्रॅच्युइटीमध्ये पैसे कट करूनही टेक होम सॅलरी कमी होणार नाही.

रिटायरमेंटनंतरचे पैसे वाढतील
ग्रॅच्युइटी आणि PF मध्ये योगदान वाढल्यामुळे रिटायरमेंटनंतर मिळणारी रक्कम वाढेल. PF आणि ग्रॅच्युइटी वाढल्याने कंपन्यांचा खर्चही वाढेल. कारण त्यांनाही कर्मचाऱ्यांसाठी PF मध्ये अधिक योगदान द्यावे लागेल. या गोष्टींचा कंपन्यांच्या बॅलन्सशीटवरही परिणाम होईल.

1 ऑक्टोबरपासून पगाराशी संबंधित महत्त्वाचे नियम बदलतील
सरकारला 1 एप्रिल 2021 पासून नवीन कामगार संहितेतील नियमांची अंमलबजावणी करायची होती, परंतु राज्यांची तयारी न केल्यामुळे आणि कंपन्यांना HR पॉलिसी बदलण्यासाठी अधिक वेळ दिल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले. कामगार मंत्रालयाच्या मते, सरकारला 1 जुलैपासून कामगार संहिताच्या नियमांना अधिसूचित करण्याची इच्छा होती, परंतु राज्यांनी या नियमांच्या अंमलबजावणीसाठी अधिक वेळ मागितला, ज्यामुळे त्यांना 1 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले.

कोल्हापूर पूरग्रस्त भागाचा दौरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस आमने सामने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोल्हापुरातही महापुरामुळे नुकसान झाले असल्याने या ठिकाणी शाहूपुरीती सहाव्या गल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आमने सामने आले. यावेळी दोघांच्यात काहीवेळी महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चाही केली.

कोल्हापुरात महापुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही समोरासमोर आले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोल्हापूरकरांच्याही भुवया उंचावल्या. या ठिकाणी दोघांनी काहीवेळ चर्चाही केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस याना निरोप पाठवला. त्यामध्ये त्यांनी म्हंटले की, वेगवेगळ्या पद्धतीने पाहणी करण्यापेक्ष एकत्रितपणे पाहणी करूया, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली येथे दौरा केल्यानंतर कोल्हापूर शहरात दुपारू बारा वाजता दाखल झाले तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही याचवेळी या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मुख्यमत्री ठाकरे याना विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.

राज्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे महापूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. यात आता पुराचे पाणी ओसरल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.

RBI ने ‘या’ सहकारी बँकेचे लायसन्स केले रद्द, बँकेत जमा असलेल्या ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गोवास्थित मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे लायसन्स रद्द केले आहे. केंद्रीय बँकेने गुरुवारी निवेदन जारी करून ही माहिती दिली. RBI ने म्हटले आहे की, सहकारी सोसायट्यांच्या रजिस्ट्रारच्या ऑफिसला बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे आणि त्यासाठी लिक्विडेटरची (liquidator) नेमणूक केली गेली आहे.

99% ठेवीदारांना पूर्ण पैसे परत मिळतील
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर गोव्याची ही बँक कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवसाय करू शकत नाही. तथापि, बहुतेक ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. RBI ने म्हटले आहे की, बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार 99 टक्के ठेवीदारांना DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) अंतर्गत पूर्ण पैसे मिळतील.

पेमेंट प्रक्रिया सुरू होईल
RBI ने म्हटले आहे की, लायसन्स रद्द केल्याने आणि लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू झाल्यावर, DICGC ऍक्ट 1961 नुसार ठेवीदारांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होईल. RBI ने पुढे म्हटले आहे की, बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 99 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळेल.

या कारणास्तव रद्द केले लायसन्स
बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने रिझर्व्ह बँकेने बँकेचे लायसन्स रद्द केले असल्याचे RBI ने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे बँक आपल्या विद्यमान ठेवीदारांना संपूर्ण पेमेंट देण्यास असमर्थ ठरेल आणि जर बँकेने त्याचा बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिली तर जनतेच्या हितावर विपरीत परिणाम होईल.

RBI ने अनेक बँकांचे लायसन्स रद्द केले
रिझर्व्ह बँकेने यापूर्वीही अनेक बँकांचे लायसन्स आर्थिक अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रद्द केले आहेत. रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले सहकारी बँक, पुणे, महाराष्ट्र आणि वसंतदादा नागरी सहकारी बँक, उस्मानाबाद, महाराष्ट्र यांचेही लायसन्स रद्द केले होते.