Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3758

एप्रिल -जून तिमाहीत भारतात सोन्याची मागणी 19 टक्क्यांनी वाढली, यामागील कारण जाणून घ्या

gold silver
gold silver

नवी दिल्ली । वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,”एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी 19.2 टक्क्यांनी वाढून 76.1 टनांवर पोहोचली आहे, मुख्यत: खालच्या बेस परिणामामुळे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडींवर वाईट परिणाम झाला होता.

WGC च्या रिपोर्टनुसार, 2020 च्या दुसर्‍या तिमाहीत सोन्याची मागणी वाढली आहे. 2020 च्या दुसर्‍या तिमाहीत सोन्याची एकूण मागणी 63.8 टन होती. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सोन्याच्या मागणीत सोन्याच्या किंमतीत 23 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 32208 कोटी रुपयांवर गेली आहे. 2020 च्या याच कालावधीत ते 26,600 कोटी रुपये होते.

रिपोर्टनुसार कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक झाल्याने मागच्या तिमाहीच्या तुलनेत मागणीत 46 टक्के घट झाली आहे.त्याचप्रमाणे चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण मागणी 157.6 टन होती, जे 2019 च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 46 टक्के होते.

WGC चे इंडिया रिजनल सीईओ सोमसुंदरम पीआर यांनी पीटीआय-भाषेला सांगितले,”कोविड -19 संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत प्रादेशिक आधारावर लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, तर गेल्या वर्षी देशभरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. हा क्वार्टर देखील चांगला आहे कारण व्यवसाय अधिक तयार झाले होते.” रिपोर्टनुसार, जागतिक सोन्याची मागणी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल-जून तिमाहीत एक टक्क्याने घटली आणि 955.1 टन राहिली.

सहसचिवांची मनमानी! औरंगाबादचे परस्पर केले नामांतर

Muncipal Corrparation

औरंगाबाद | रोजगार हमी योजनेचे सहसचिव चि. नि. सूर्यवंशी यांनी चक्क औरंगाबादचे नावच बदलून टाकले आहे. २९ जुलै रोजी मराठवाड्यातील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना कामांची यादी पाठविण्यासाठी दिलेल्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

सरकारी दस्तऐवजावर संभाजीनगर असा उल्लेख मुद्रित होऊन आल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये याविषयीची चर्चा आहे. जिल्ह्याचे नाव परस्पर संभाजीनगर असे करणाऱ्या सहसचिवांनी पत्रावर न वाचता सही केल्याचे यातून दिसत आहे. हे पत्र तयार करताना त्यांनी कुणाची मंजुरी घेतली होती, की परस्पर हा कारभार केला, यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत २९ जुलै रोजी रोहयो सहसचिव सूर्यवंशी यांनी एक पत्र बीड, लातूर, जालना, उस्मानाबाद, भंडारा, नागपूर, रायगड, नंदूरबार, बुलडाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. या पत्रात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मजूर वाढविण्यासाठी कामनिहाय यादी पाठविण्याचा संदर्भ होता.

विधानपरिषद उपसभापती यांच्याकडे मार्च २०२० मध्ये झालेल्या बैठकीत वरील सर्व जिल्ह्यांतील प्रायोगिक तत्त्वावर मजूर वाढविण्यासाठी केलेल्या कामांची यादी मागविली होती.
अद्याप या जिल्ह्यांकडून ती माहिती पाठविली गेली नाही. याप्रकरणी लवकरच बैठक होणार असल्यामुळे माहिती तातडीने पाठविण्यासाठी सूर्यवंशी यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले. त्या पत्रात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. दरम्यान, सूर्यवंशी यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आज किती लिटर रुपयांनी विकले जात आहे जाणून घ्या

नवी दिल्ली पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये सर्वसामान्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गुरुवारी सलग 13 व्या दिवशी दिलासा मिळाला आहे. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये तेलाचे दर समान आहेत. राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 101.84 रुपये आणि डिझेलची किंमत 89.87 रुपये आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 74 डॉलरच्या आसपास धावत आहेत.

मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल 42 दिवसांत सुमारे 11.52 रुपयांनी महाग झाले आहे. मे ते जुलै या कालावधीत अधून मधून इंधन दरामध्ये वाढ झाली आहे.

एप्रिलनंतर पेट्रोलच्या किंमतीत 39 पट आणि डिझेलच्या किंमतीत 36 पट वाढ झाली

यावर्षी एप्रिलपासून पेट्रोलचे दर 39 वेळा वाढले आहेत. त्याच वेळी, डिझेलचे दर 36 पट वाढले आहेत. यामुळे देशातील सर्व राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने लोकसभेत ही माहिती दिली आहे. यादरम्यान पेट्रोलचे दर एकदा आणि डिझेल दोन वेळा कमी करण्यात आले.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये तर डिझेल प्रति लिटर 89.87 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये तर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 102.49 रुपये तर डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर आहे.

>> बेंगलुरु मधील पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लिटर आहे.

>> लखनऊ – पेट्रोल 98.69 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लिटर आहे.
>> पाटणा – पेट्रोल 104.57 रुपये आणि डिझेल 95.51 रुपये प्रति लिटर आहे.
>> भोपाळ – पेट्रोल 110.20 रुपये तर डिझेल 98.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> जयपूर – पेट्रोल 108.71 रुपये तर डिझेल 99.02 रुपये प्रति लिटर आहे.
>> गुरुग्राम – पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

महिला तक्रार निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

Women's Grievance Redressal Center
Women's Grievance Redressal Center

औरंगाबाद | पोलीस अधिक्षक कार्यालय, औरंगाबाद (ग्रामीण) येथील महिला तक्रार निवारण केंद्र व भरोसा सेलच्या अद्यावत इमारतीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणुन घेतली. यावेळी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहूल, पोलीस निरिक्षक भागवत फुंदे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, पोलीस विभाग कायमच सामान्य नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याचे काम करत असतात. त्यात सध्या आधुनिकीकरणासोबत वाढत्या कौटुंबिक समस्या समोपचाराने सोडविण्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्र व भरोसा सेल सारख्या उपक्रमातून भरोसा म्हणजेच विश्वास देण्याचे कामही पोलीस करीत आहे. हे कौतुकास्पद आहे. कौटुंबिक समस्या, वादविवाद या भरोसा सेलच्या माध्यमातून सोडविल्यास त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यात पोलीसांसह मानसोपचार तज्ज्ञ, वकील तसेच समाजकल्याण अधिकारी यांचे सहकार्याने तक्रारदारांचे अधिक चांगल्या प्रकारे समुपदेशनाचे कार्य होईल. त्यामुळे बरेच कुटुंब तुटण्यापासून वाचतील. नागरिकांच्या जीवनात विश्वास असणे हेही एक प्रकारे विकासाचे प्रतिक आहे, असे मतही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच या भरोसा सेल साठी विविध साधन सामुग्रीची आवश्यकता भासल्यास मदत करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, महिला तक्रार निवारण केंद्रात महिला तक्रार घेऊन येतात तेव्हा ती समस्या केवळ महिलेचीच नाहीतर संपूर्ण कुंटुंबाची समस्या असते. तेव्हा या कक्षाच्या माध्यमातून त्या कुटुंबांच्या समस्यांचे योग्य मार्गदर्शन, समुपदेशन केले जाते. या महिला तक्रार निवारण केंद्र व भरोसा सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या कौटुंबिक समस्या निवारणासाठी फायदा होणार आहे. यावेळी मोक्षदा पाटील यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयाद्वारे महिला तक्रार निवारण केंद्राच्या अद्यावत इमारती सोबतच, पोलीसांसाठी उपहार गृह, परिपूर्ण सुविधा असलेले कैलास शिल्प सभागृह, पार्किंग व्यवस्था, अत्याधुनिक सुविधापूर्ण जीम, वाचनालय यासह विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती दिली. यासोबतच कार्यालयास जिल्हानियोजन समितीच्या निधीतून प्राप्त वाहनांमुळे पोलीसांच्या कार्याची गतिमानता वाढली असून पोलीस अंमलदार, महिला अंमलदार यांचेमध्ये कर्तव्याप्रती उत्साह वाढल्याचे श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच डीपीडीसीतून निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

पुणे मेट्रोच्या पहिल्या ट्रायल रनला अजित पवारांकडून हिरवा झेंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुप्रतीक्षीत पुणे मेट्रो आज अखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेच्या अंतर्गत वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्याची महामेट्रोचा विचार आहे

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे सांगितले की, पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून निवडणुका झाल्यावर राजकीय विचार बाजूला ठेवून विकास कामाला महत्त्व द्यायचं असतं, हे लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. त्यातूनच पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. शरद पवार कायम सांगत आलेत, कोणत्याही गोष्टीचा विचार करताना कमीतकमी 25 तर जास्तीतजास्त 50 वर्षाचा विचार करुन करत जा. पुढची 50 वर्ष डोळे समोर निर्णय घेतोय. ही सगळी काम करताना राजकारण न करता करण्याचा आमचा मानस आहे, असंही अजित पवार म्हणाले.

कराड कोरोना हाॅटस्पाॅट : सातारा जिल्ह्यात नवे 864 पाॅझिटीव्ह, उपचार्थ रूग्णसंख्या वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे

सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 864 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 658 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 10 हजार 167 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 8.5 टक्के इतका आहे. जिल्ह्यात कराड कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनलेला आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 403 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 18 हजार 170 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 3 हजार 952 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 240 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 11 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा कहर जिल्ह्यातील तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामध्ये कराड तालुका हाॅटस्पाॅट बनलेला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या 30 टक्के कोरोना बाधितांचे प्रमाण हे कराड तालुक्यात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट कमी करणे प्रशासनापुढील आव्हान आहे, मात्र त्यासाठी कोणतेच विशेष प्रयत्न करताना प्रशासन दिसून येत नाही.

दिलासादायक ! तब्बल १५६ दिवसांनी जिल्ह्याचा कोरोना मृत्यूवर विजय

corona

औरंगाबाद | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेली रुग्ण मृत्यूची मालिका तब्बल १५६ दिवसांनंतर काल गुरुवारी थांबली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर काल दिवसभरात जिल्ह्यात केवळ २८ रुग्णांची वाढ झाली असून आजघडीला जिल्ह्यात सध्या ३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिन्यांनंतर म्हणजे १८० दिवसांनंतर मृत्यूचक्र थांबले होते. त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत अधूनमधून अनेक दिवशी कोरोनाबळी टळले. जिल्ह्यात २३ फेब्रुवारी रोजीही एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र, दुर्दैवाने त्यानंतरचा प्रत्येक दिवस घातवार ठरत गेला. दुसऱ्या लाटेत कोरोना मृत्यूचे तांडव पहायला मिळाले. गेल्या काही दिवसांत दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रुग्णसंख्येबरोबर मृत्यूचे प्रमाण कमी झाले. त्यातही शहराने अनेकदा मृत्यूवर मात केली. मात्र, ग्रामीण भागात रोज मृत्यू सुरूच होते. मात्र, जिल्ह्याने गुरुवारी कोरोना मृत्यूवर विजय मिळविला.

जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ३४४ झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४३ हजार ५५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत दुर्दैवाने ३ हजार ४९० रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील सात आणि ग्रामीण भागातील ३०, अशा ३७ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. जिल्ह्यात एकही मृत्यू नसणे ही बाब समाधानकारक असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या. अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे, त्या तुलनेत औरंगाबादेत कमी रुग्ण आणि शून्य मृत्यू हे दिलासादायक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले.

भास्कर जाधव तुझी औकात काय??तुला कुत्रं तरी विचारत का? निलेश राणेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नारायण राणे यांच्या मुलांसारखी मुले महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये असं म्हणणाऱ्या शिवसेना आमदार भास्कर जाधव याना भाजप नेते आणि नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधव तुला कुत्रं तरी विचारत का? असा जहरी वार निलेश राणे यांनी केला.

भास्कर जाधव तुझी औकात आम्ही 2024 ला दाखवतोच . कधी 5 मुलाना तरी कामाला लावलं का, की 5 रुग्णांना कधी उपचार दिले का…भर चौकात तू आमच्या समोर तरी उभा राहू शकतो का अशा शब्दांत निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांचा समाचार घेतला.

भास्कर जाधव तुज्या सारखे सतराशे साठ भास्कर जाधव जरी एकत्र झाले तरी राणेंच काही उखाडु शकत नाही. जास्त बोलत राहिलास तर तुझे रंग कसे उतरवायचे ते आम्हाला माहीत आहे अस म्हणत गंभीर इशारा देखील निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना दिला.

भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले-

नारायण राणे यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाहीए. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, संतप्त पूरग्रस्तांचा आदित्य ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी संतप्त झालेल्या पुरग्रस्तांनी मात्र त्यांच्यावर संताप व्यक्त केला. एवढे मोठे निक्सन झाले आहे. आणि पर्यावरणमंत्री असूनही तुम्ही काय केलं?, असा सवाल यावेळी पुरग्रस्तांनी आदित्य ठाकरे यांना केला.

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी दरड कोसळून पूरस्थिती निर्माण झाली. राज्यात 16 हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. यात आता पुराचे पाणी ओसरल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण भागातील दौऱ्यासाठी आज चिपळूणमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी आणि समस्या जाणून घेतल्या. मात्र, त्यांच्या या दौऱ्यावर पुरग्रस्तांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जेव्हा चिपळूणमध्ये पुरग्रस्थांची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यावर पुरग्रस्तांनी प्रश्नांचा भडीमार केला. ठाकरेंवर पुरग्रस्तांनी संताप व्यक्त केला.

पुरग्रस्तांनी संताप व्यक्त केल्यानंतर मंत्री ठाकरे म्हणाले कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हा पाहणी दौरा नसून मदतीसाठीचा दौरा आहे. आता मदतकार्याला सुरुवात झाली आहे. शासनाकडून मदत सुरु करण्यात आली आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठी काम करत आहोत. पंचनामे पूर्ण झाल्यावर त्यांना सर्वोतोपरी मदत मिळेल.

मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही; त्यामुळे 2024 मध्येही मोदीच पंतप्रधान – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 साली कोणता पक्ष सत्तेवर असेल याबाबत सध्या चर्चा, दावेही केले जाऊ लागले आहेत. तर विरोधी पक्षांकडून भाजपला मात देण्यासाठीही प्रयत्न सुरु झाले आहे. या पार्शवभूमीवर आज संसदेच्या अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्वाचा दावा केला तो म्हणजे “2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार निवडून येईल. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही, असे आठवले यांनी म्हंटले.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात विरोधी पक्षांकडून गोंधळ घातला गेल्याने त्यांच्यावर मंत्री आठवले यांनी सडकून टीका केली. तर आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा असतील असेल दावाही केला.

यावेळी निवडणुकीबाबत व विरोधकांबाबत मंत्री आठवले म्हणाले की, आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकारच निवडून येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. मात्र, सध्या तरी आमच्या विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदींसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही,” असे आठवले यांनी सांगितलं.