Sunday, December 7, 2025
Home Blog Page 3759

आता बहाणेबाजी बंद करा; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला. या पार्श्वभूमीवर काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आज त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. आघाडी सरकारनंही केंद्राकडे बोट करण्याऐवजी स्वत: मदत करावी, राज्य सरकारने बहाणेबाजी बंद करावी, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी पश्चिम महाराष्ट्राचा तीन दिवसीय दौरा सुरु केला आहे. त्या दृष्टीने काल सातारा जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आज सांगली जिह्यात ते पोहचले. या दौऱ्यावेळी पुरस्थितीची पाहणी करताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला. तर महाविकास आघाडी सरकारवरही टीकास्त्र सोडले.

 

यावेळी फडणवीस म्हणाले की, सांगली जिल्ह्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जलसंपदा खात्याच्या चुकलेल्या अंदाज अंदाजामुळेच यंदा अधिक नुकसान झाले आहे. सांगली आणि कोल्हापूरच्या पूरस्थितीबाबत वडनेरे समितीने जो अहवाल तयार केला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेची आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची तातडीने कार्यवाही करावी.

भाजपला बदनाम तर ओबीसींचा फुटबॉल केला जातोय; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाबाबत दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात बारामतीमधूनओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस व राज्य सरकारवर टीका केली. माझ्यावर सरकार पाडण्याचे आरोप करून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे तर या राज्य सरकारच्याच मनात ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही म्हणून ओबीसींचा फुटबॉल केला जातोय, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

भाजपनेते भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्य सरकावर टीका केली आहे. त्याचबरोबर बावनकुळे यांनी भाजपला कशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातआहे. या मागचे कारणही सांगितले. यावेळी त्यांनी राजकारण न करता भाजपचे नेते सरकारच्या मदतीला तयार आहेत, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे म्हणाले की, ओबीसी आयोग तयार झाला आहे. डेटा तयार करायला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण थांबवलं नाही, केवळ डेटा तयार करण्याची सूचना केलीय. पण ओबीसींना आरक्षण द्यायचं मनात नसेल म्हणून ओबीसींचा फुटबॉल केला जातोय. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्यावर आरोप केला. पण आमच्या कोणत्याही आमदाराने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नसून जाणीवपूर्वक अफवा निर्माण करून मला आणि भाजपला बदनाम करण्याचे काम केले जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात निर्बंधात शिथिलता आणली जावी अशी मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यात १ ऑगस्टपासून 25 जिल्ह्यात निर्बंध अजून शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

टोपे पुढे म्हणाले की, अजूनही धोका टळलेला नाही. दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. मात्र, तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येत नाही. या लाटेशी दोन हात करण्यासाठी राहय सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या असून लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही तयारी केली आहे. सध्या राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण अजूनही जास्तच आहे. त्यामुळे या ठिकाणी निर्बंध शिथील केले जाणार नाही.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

अनेक बँक खात्यांमध्ये बेवारसपणे पडून आहेत 49000 कोटी रुपये, केंद्र सरकार याचा वापर कशा प्रकारे करणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील वेगवेगळ्या बँका आणि विमा कंपन्यांकडे सुमारे 49 हजार कोटी रुपये बेवारस अवस्थेत पडून आहेत. याचा अर्थ असा की, या पैशांचा कोणीही दावेदार नाही. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी ही माहिती दिली. ही आकडेवारी 31 डिसेंबर 2020 ची आहे. दरवर्षी बँकांमध्ये पडून असलेल्या अशा अनक्लेम्ड डिपॉझिटसची संख्या सतत वाढत आहे. सन 2018 मध्ये RBI ने सर्व बँकांना आदेश दिले होते की, गेल्या दहा वर्षांपासून कोणताही दावेदार उपस्थित नसलेल्या खात्यांची लिस्ट तयार करुन ती त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करा. या अपलोड केलेल्या माहितीत खातेदारांचे नाव, पत्ता यांचा समावेश असेल.

तर अनेक हजार कोटी रुपये बँकांमध्ये अनक्लेम्ड पडून आहेत
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2021 पर्यंत वेगवेगळ्या बँकांच्या 8.1 कोटी खात्यात 24356 कोटी रुपये पडून आहेत, ज्यावर दावा करण्यास कोणीही नाही. म्हणजेच जवळपास प्रत्येक खात्यात 3000 कोटी रुपये पडून आहेत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या 5.5 कोटी खात्यात 16597 कोटी रुपये पडून आहेत. देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या 1.3 कोटींच्या खात्यात 3578 कोटी रुपयांचा अनक्लेम्ड पडून आहेत.

राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री काय म्हणाले
अर्थ राज्यमंत्र्यांनी राज्यसभेला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की,” भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) नुसार 24586 कोटी रुपये सरकारी आणि खाजगी विमा कंपन्यांकडे बिना दाव्याचे पडून आहेत. हे पैसे अशा लोकांचे आहेत ज्यांनी विमा घेतला मात्र दोन-तीन प्रीमियम भरल्यानंतर प्रीमियम भरणे थांबवतात किंवा बरेच लोक विमा कागदपत्र हरवतात आणि ते दावा करण्यास सक्षम होत नाहीत.

2018 मध्ये काय पॉलिसी बनली होती
सन 2018 मध्ये देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (SBI) 47 लाख खाती (1,036 कोटी रुपये जमा), कॅनरा बँक 47 लाख खाती (995 कोटी रुपये) आणि पंजाब नॅशनल बँकेच्या 23 लाख खाती (829 कोटी) अशी होती ज्यांचे कोणीही दावेदार नव्हते. त्याचप्रमाणे सन 2016 मध्ये हा आकडा 8928 कोटी होता. सन 2017 मध्ये या अनक्लेम्ड डिपॉझिटचा आकडा वाढून 11494 कोटी झाला आहे. 2018 मध्ये ही आकडेवारी 26.8 टक्क्यांवरून वाढून 14578 कोटी झाली आहे. सन 2019 आणि 2020 मध्येही हा आकडा सतत वाढतच गेला.

क्लेम न केलेल्या रकमेचे काय होते?
जिथे बँकांमध्ये पडलेल्या अनक्लेम्ड डिपॉझिटचा संबंध आहे, RBI ने बँकिंग नियमन अधिनियम 1949 मध्ये दुरुस्ती आणि त्याच कायद्याच्या कलम 26A च्या समावेशानुसार डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयरनेस फंड (DEAF) स्कीम 2014 तयार केली आहे. या योजनेअंतर्गत, बँका 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ ऑपरेट न केलेल्या सर्व खात्यांमधील व्याजासह एकत्रित शिल्लक मोजतात आणि ती रक्कम DEAF ला ट्रान्सफर करतात. जर DEAF कडे ट्रान्सफर केलेल्या अनक्लेम्ड डिपॉझिटला ग्राहक मिळाला तर बँक व्याजासह त्या ग्राहकास पैसे देते आणि DEAF कडून रिफंडचा दावा करते. DEAF याचा उपयोग डिपॉझिटच्या व्याज वाढीसाठी आणि RBI ने सुचवलेल्या अशा इतर आवश्यक कामांसाठी केला जातो.

विमा कंपन्यांचे हक्क सांगितलेले पैसे कसे वापरले जातात?
त्याच वेळी, जेव्हा विमा कंपन्यांमध्ये पडून असलेली अनक्लेम्ड अमाउंट बद्दल बोलायचे तर या कंपन्यांना दरवर्षी 1 मार्च किंवा त्यापूर्वी सीनियर सिटीजन वेलफेयर फंड (SCWF) दहा वर्षांपेक्षा जास्त काळ पडून असलेली अनक्लेम्ड अमाउंट ट्रान्सफर करावी लागते. SCWF चा उपयोग सीनियर सिटीजन वेलफेयरसाठी प्रमोट देणार्‍या योजनांमध्ये केला जातो. नंतर जर कोणी अनक्लेम्ड अमाउंटचा दावा केला तर विमा कंपन्यांना प्रक्रियेनुसार गुंतवणूकीच्या उत्पन्नासह अनक्लेम्ड अमाउंट द्यावी लागेल.

पूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून होणार 10 हजाराची मदत जमा – विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्रमध्ये महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यातही मुसळधार पाऊस व दरडी कोसळून नागरिकांचे जीव गेले. तर घरांचे नुकसान झाले. अशांसाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज माहिती दिली असून राज्य सरकारने तातडीची 10 हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांसाठी जाहीर केली आहे. ती उद्या त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी आज दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस होत असून अतिवृष्टी निर्माण झालेली आहे. पावसाचा मोठा फटका पश्‍चिम महाराष्ट्राला बसला असून अनेक जिल्ह्यामध्ये महापुराची स्थिती उद्भवली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले. अशा भागाचा नुकताच राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी पुरग्रस्थांसाठी मदत दिली जाईल असे सांगितले होते. त्यानंतर मंत्री वडेट्टीवार यांनी आज प्रत्यक्ष मदत जाहीर केली.

यावेळी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने जाहीर केलेली मदत हि त्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचे वाटप वाटप केल्यास अनेक आरोप केले जातात. पैसे वाटपात गैरप्रकार झाले. मात्र, आता अशा आरोपांच्या पिंजऱ्यात आम्हाला उभे राहायचे नसून म्हणून आम्ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल अहवाल देण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

दोन चिमुकल्यांना सोडून आईने संपवले जीवन

Death
Death

औरंगाबाद |  पंचवीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे 28 जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

रेणुका संतोष गोडसे (रा. केकत जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. केकत जळगाव येथील गट नंबर 14 मधील भागवत बडे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आपले जीवन संपविले आहे.

शवविच्छेदन विहामांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रेणुकाच्या पश्चात दोन चिमुकले असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक व टीमचा गौरव

 

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील वेरुळ गावाजवळील जय श्रीराम पेट्रोल पंपचे मॅनेजर अशोक काकडे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वेरुळ येथे पैसे भरण्यासाठी मोटार सायकल वर जात असताना वेरुळ उड्डाणपूला जवळ कोणी तरी मागून धक्का देऊन त्यांना खाली पाडले व यांचेवर भरदिवसा प्राणघातक हल्ला करून त्यांच्या जवळील पाच लाख सदोतीस हजार रुपयाची बॅग हिसकावून घेऊन मोटार सायकल वर पळून गेल्याची तक्रार पंपाचे मालक विजय बोडखे यांनी पोलीस ठाणे खुलताबाद येथे दाखल केली.

येथील पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे व त्यांच्या पोलीस टीमने आरोपींचा, ४८ तासात शोध घेऊन त्यांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी मुळे पत्रकार सेवा संघाच्या वतीने गौरव, सत्कार करण्यात आला. खुलताबाद तालुक्यातील अनेक गावातील अवैध धंद्याला पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे व टीमने आळा घातला आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना वचक बसला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वसंता शिरसाट, गल्ले बोरगावकर यांनी सन्मान केला आहे.

या गौरव सत्कार समारंभात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, पोलीस हेड कॉस्टेबल नवनाथ कोल्हे, पोलीस नाईक यतीन कुलकर्णी,भगवान चारावंडे, कारभारी गवळी, सुहास डबीर, पोलीस शिपाई कृष्णा शिंदे, महिला पोलिस शिपाई रुपाली सोनवणे, चालक हेड कॉन्स्टेबल रामदास दिवेकर, प्रमोद गरड, यांचा सहृदय गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पत्रकार सेवा संघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रंगनाथ जऱ्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व सुरडकर जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वा खाली जेष्ठ पत्रकार वसंता शिरसाट गल्ले बोरगावकर जिल्हा उपाध्यक्ष, नईम शहा जिल्हा संघटक, अजिनाथ बारगळ तालूका उपाध्यक्ष, सलमान सर,शैफुद्दीन शेख, दिनकर शिरसाट सदस्य, सरपंच दगडू मुऱ्हाडे, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पोलीसांचा गौरव करण्यात आला.

वैद्यकीय प्रवेशाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता OBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आरक्षण

नवी दिल्ली । वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मंजूर केले आहे. सरकारने ओबीसी प्रवर्गात 27 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ओबीसी प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना आरक्षण जाहीर केले.

मंत्रालयाने 2021-22 सत्रापासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सुमारे 5,500 विद्यार्थ्यांना फायदा होईल. या आरक्षणाचा फायदा UG आणि PG मेडिकल / डेंटल कोर्स (एमबीबीएस / एमडी / एमएस / डिप्लोमा / बीडीएस / एमडीएस) प्रवेश घेणाऱ्यांना मिळू शकेल. OBC आणि EWS प्रवर्गातील लोकांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

वास्तविक, या प्रकरणाला वेग तेव्हा आला जेव्हा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच NEET 2021 च्या तारखा 12 जुलै रोजी जाहीर केल्या. यावेळी त्यांनी OBC प्रवर्गाला आरक्षण न देता OBC परीक्षा घेण्यात येईल, असे ते म्हणाले होते. यानंतर अनेक विद्यार्थी संघटनांनी देशव्यापी संपाची धमकी दिली. यासह अनेक राजकीय पक्षांनीही आरक्षणाची मागणी केली. हे प्रकरण तिथेच थांबले नाही तर या आरक्षणाच्या समर्थनार्थ भाजपचे अनेक नेते बाहेर आले. केंद्रीय राज्यमंत्री अनुपिया पटेल आणि भूपेंद्र यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले.

ट्रॅक्टरमधून प्रवास ते पुरग्रस्तांसोबत जेवण; पृथ्वीराजबाबांनी केलं नागरिकांचे सांत्वन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड व पाटण तालुक्यातील अनेक गावांना आठवडाभर पडलेल्या पावसाच्या महापूराचा फटका बसलेला आहे. काल पाटण तालुक्यातील दुर्घटनेतील गावांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवून पूरग्रस्तां बरोबर जेवण केले होते. तर आज गुरूवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ट्रक्टरमधून प्रवास करत नुकसानग्रस्त लोकांची भेट घेवून जेवण केले आहे.

कराड तालुक्यातील कराड दक्षिण मतदार संघात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे, रस्त्यांचे तसेच लोकांच्या घरांचे मोठे नुकसान जाले आहे. या मतदार संघाचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवसभरात लोकांची भेट घेवून नुकसानीची पाहणी केली. यावेळी बांदेकरवाडी येथे पुराच्या पाण्यामुळे अनेक रस्ते खचले आहेत. सवादे – बांदेकरवाडी पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद होता अशा परिस्थितीत बांदेकरवाडी येथील परिस्थिती पाहण्यासाठी व ग्रामस्थांना आधार देण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्रॅक्टर मधून जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या आग्रहावरून गावातील हनुमान मंदिरात ग्रामस्थांच्या सोबत पृथ्वीराज चव्हाण यांनी जेवण केले.

कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी जेवण केल्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांनीही पूरग्रस्तांसोबत जेवण केल्याची चर्चा रंगू लागल्या. तर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पाटण तालुक्यातील मोरगिरी- आंबेघर येथे भूस्खलन झालेल्या दुर्घटनेतील बाधितांची भेट घेवून जेवण केल्याचे फोटो व व्हिडिअो ट्विट होत आहेत. तर महाविकास आघाडी सरकारलाही भाजपाकडून टोला लगावला जात होता. मात्र आता पृथ्वीराज चव्हाण यांचे फोटो व्हायरल होत असून भाजपाला आता या फोटोवरून सडेतोड उत्तर दिले जावू लागले आहे.

कोयनेला पोहोचू शकत नाहीत ते दिल्लीला काय पोहोचणार; संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्रमध्ये महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यातही मुसळधार पाऊस व दरडी कोसळून नागरिकांचे जीव गेले. तर घरांचे नुकसान झाले या ठिकाणी जाताना हवामानाचत बिघाड झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे याना दौरा अचानक रद्द करावा लागला. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावे, असे म्हंटले. यावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी “जिथे मुख्यमंत्री कोयनाला पोहोचू शकत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोचणार,” असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला आहे.

राज्यात आगामी महानगरपालिका तसेच नगरपालिका निवडणूक येणार आहेत. त्या दृष्टीने अनेक पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज नाशिक इथे महत्वपूर्ण घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावे, त्यांच्यात क्षमता आहेत, असे म्हटले होते. राऊतांच्या या विधानावरून देशपांडेंनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी नाशिक दौऱ्याला सुरुवात केली आहे. या ठिकाणी मनसे स्वतंत्रपणे महापालिकेचे निवडणूक लढणार असल्याचे घोषणाही यावेळी देशपांडे यांनी यावेळी केली आहे.