Saturday, December 20, 2025
Home Blog Page 3926

डेल्टा प्लसचा शहरात एकही रुग्ण नाही; तरी बाजारांवर निर्बंध का?- जिल्हा व्यापारी महासंघ

Unlock

औरंगाबाद : शहरात डेल्टा प्लसचा एकही रूग्ण नाही. तरी सुद्धा शासनाने नवीन नियमावली लागू करत बाजारपेठेच्या वेळा कमी केल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे व्यापारी व व्यापाऱ्यांवर अवलंबून असणारे कामगार व त्यांचे कुटुंब प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. शासनाकडूनही व्यापाऱ्यांसाठी कोणतेही आर्थिक पॅकेज मिळत नाही.

यासंदर्भात व्यापारी महासंघाच्या कार्यकर्ते व सदस्य यांनी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली.
टोपे यांच्या सोबत चर्चा करून व्यापाऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. तसेच शहरातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती आटोक्यात असून शहरातील बाजारपेठेवर वेळेबाबत घातलेले निर्बंध शिथिल करून सकाळी सात ते रात्री सात पर्यंतची वेळ निश्चित करण्यात यावी.

सोमवार ते रविवार पर्यंत बाजारपेठ उघडण्यास परवानगी देण्यात यावी औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी असून शनिवार-रविवार बाजारपेठ बंद असल्यास चुकीचा संदेश जात आहे. अशा प्रकारच्या मागण्या प्रामुख्याने समोर ठेवण्यात आल्या. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी तुपे यांच्याशी चर्चा करून मुंबईला गेल्यानंतर व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सुचक वक्तव्य याप्रसंगी केले व व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्नही केला.

यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे ,सचिव लक्ष्मी नारायण राठी, अजय शहा, प्रफुल मालानी, तनसुख झांबड, जयंत देवळानकर, सरदार हरी सिंग, गुलाम हक्कानी, संतोष कावळे, स्वामी व इतर व्यापारी हजर होते.

राज्य सरकारने फुलप्रूफ कृषी कायदा करावा अशी काँग्रेसची भूमिका ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या पावसाळी अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद निवड व आरक्षण मुद्यांवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका व्यक्त केली. “राज्याच्या दृष्टीने कृषी कायदा करणी महत्वाचे आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याचा मुद्दा आहे. राज्य सरकारला कृषी कायदा बनवण्याचा पूर्ण अधिकार आहे. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी फुलप्रूफ कृषी कायदा करावा,” अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटले आहे.

थोड्याचवेळात सुरु होणाऱ्या या अधिवेशनात अध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असले असे आम्हाला वाटते. मात्र, आज किती आमदार येणार त्यावर निर्णय होईल, असे पटोलेंनी म्हंटल आहे. दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला मंत्री हजेरी लावू लागले आहेत. या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाद्यक्ष नाना पटोलेही उपस्थित राहण्यासाठी अधिवेशनाच्या स्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना अध्यक्षपदाच्या निवडीबाबत माध्यमांनी विचारणा केली असता. त्यांनी विधानसभेत आमदार किती उपस्थित राहतात. त्यांच्या उपस्थितीनंतरच आज अध्यक्षपदाचा निर्णय अंतिम राहणार आहेत. त्यांच्यानंतरच काय तो निर्णय होईल, असे म्हंटले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्ष निवड व कृषी कायद्याबाबत काँग्रेसची भूमिका यावेळी व्यक्त केली. त्यांच्यानंतर आता प्रत्यक्षात किती आमदार उपस्थित राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. त्यामुळे दोन दिवसाच्या पावसाळी आधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांना पडळकर समर्थकाकडून धमकीचा फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबियांवर टीका करत असून त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी चोख शब्दांत खडेबोल सुनावल्यानंतर आता पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून सक्षणा सलगर यांना धमकी देण्यात आली असून स्वतः सक्षणा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

मला आज सायंकाळी 06:14 वा. 9922300038 या नंबरवरुन फोनवरुन कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ. गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता.” असं ट्वीट सलगर यांनी केलं आहे.

दरम्यान सक्षणा यांना धमकीचा फोन आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पक्षभेद न बघता लेखी तक्रार दे मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हंटल. सक्षणा, तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी. अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही. हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सक्षणा यांना पाठिंबा दिला.

प्रसाद लाड अडचणीत?? ‘त्या’ 100 कोटींच्या प्रकरणाच्या ईडी चौकशीची राऊतांची मागणी

sanjay raut prasad lad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची सातत्याने होत असलेल्या ईडी चौकशीला आता सरकार कडून देखील त्याच पद्धतीने सडेतोड उत्तर देण्यात येत असल्याच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीत 100 कोटींची अफरातफर झाली असून या प्रकरणाची सुद्धा ईडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

भाजपचे उपरे पुढारी प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोटयवधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. त्यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीने सरकारी पैशाचा केलेला अपहार 100 कोटींच्या वर आहे. ईडी’ने तत्काळ त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद करावा व अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणे या कंपनीच्या मालकांनाही समन्स पाठवावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

‘ईडी’ने याप्रकरणी डोळे मिटून दूध पिण्याचे ठरवले असेल तर राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाने तत्काळ कारवाई करावी. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करणारया विरोधी पक्षाच्या या उद्योगांचाही भंडाफोड़ होणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष कोणत्या मुद्द्यांवर व गुद्दयांवर सरकारची कोंडी करणार आहे? जरूर करा, पण त्याआधी तुमच्या पार्श्वभागाखाली कोणत्या मुद्दयांना मोड फुटलेत तेही पाहा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

कृषी कायद्याच्या विरोधात अधिवेशनात ठराव मांडणार ; मंत्री नितीन राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कृषी कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहे. याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्य सरकारकडून अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबाबत माहिती दिली. “केंद्र सरकारकडून आणण्यात आलेले कृषी कायद्याचे विधेयक हे कोणत्याही परिस्थितीत आम्ही रद्द करणार आहे. सुरु होणाऱ्या अधिवेशनात याबाबत चर्चा करून त्यात राज्यात नवीन कृषी विधेयक आणणार आहे. केंद्राचे कृषी कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द करावा व त्याबाबतचा इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून द्यावा याबाबत ठराव मांडणार असल्याची माहिती मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अनेक दिवसांपासून कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱयांकडून केल्या जात असलेल्या आंदोलनाबाबत व मागण्याबात समर्थन करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राऊत म्हणाले कि, ओबीसी आरक्षणानाबाबत इंपिरियल डेटा महत्वाचा विषय आहे. केंद्र सरकारने तो देता राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री राऊत यांनी केली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाबाबत मंत्री राऊत म्हणाले कि, सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तर द्यावे कि, ज्या मुस्लिमाना मारले गेले. त्यांच्याबाबत भगवंत काहीच बोल्ट नाही. आज पाच राज्याच्या निवणुका येत आहे. त्यामुळे आरएसएस गिरगिटा प्रमाणे रंग बदलत आहेत. हे त्यांनी सोडून द्यावे. दरम्यान अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले कि, अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन संपवलेला नाही. त्यामुळे केंद्राने आपले तीनही कृषी विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. ती केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत मान्य करावी.

आजपासून अधिवेशन!! सरकारला घेरण्यात विरोधक यशस्वी होणार?? की ठाकरे सरकार विरोधकांना पुरून उरणार?

uddhav thackarey fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून विरोधी पक्ष भाजप वेगवेगळ्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे भाजपचा प्रत्येक वार सडेतोड पध्दतीने परतवुन लावण्यासाठी महाविकास आघाडी सुद्धा सज्ज झाली असून आरोप-प्रत्यारोपांच हे अधिवेशन वादळी होईल यात काही शंका नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केले जात आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती, अनेक नेत्यांच्या मागे लागलेली ईडी चौकशी, अनिल देशमुख प्रकरण, मराठा आरक्षण,सचिन वाझेला झालेली अटक , तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यावर ईडी ने घातलेली जप्ती या अनेक मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी च्या रडारावर असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. परमवीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुख यांना ईडी ने तीनवेळा समन्स बजावला असून अद्याप ते ईडी समोर हजर झाले नाहीत. यावरून देखील विरोधक सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करू शकतात.

तर दुसरीकडे सरकार कडून काही मुख्य प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा यासाठी ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.

स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन देखील विरोधकानी सरकार वर तोंडसुख घेतलं होतं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारला लवकरच एमपीएससी परीक्षा घेण्याची विनंती केली. एमपीएससी परीक्षा संदर्भात राज्य सरकार एक समिती गठीत करणार आहे. ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करुन शासनाला अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती आता मिळतेय.

भ्रमात असलेल्या विरोधकांच्या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी…; शिवसेनेची टीका

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणार असल्याचे यापूर्वीच विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. यावरूनच आज सामनातून विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. “देशमुखांपासून ते परब, सरनाईक, अजित पवारांवर कारवाई करून राज्य सरकारची कोंडी करता येईल, या भ्रमात विरोधकांनी राहू नये. त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केली तरी सत्ता त्यांना मिळणार नाही,” असे म्हणत ‘सामना’तून विरोधकांवर टीका करण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या कोंडीत न सापडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून चांगलेच प्रयत्न करण्यात आले आहेत. तर सत्ताधारींना आपल्या डावपेचात अडकवण्यासाठी विरोधी भाजपकडूनही रणनीती आखली गेली आहे. आज सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर सामनातून ठाकरे सरकारने विरोधकांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे. भाजपच्या रणनीतीबाबत ‘सामना’तून मनातले आहे कि, भाजपची रणनीती म्हणजे सभागृहात गोंधळ घालायचा, बोलू द्यायचे नाही, कामकाज बंद पडायचे. विधानसभेच्या अध्यक्षांसमोर असलेल्या खुल्या जागेत जाऊन घोषणाबाजी करायची, अशी रणनीती भाजपकडून ठरवलेली दिसत असल्याचे ‘सामना’तून शिवसेनेने म्हंटले आहे.

सरकारवर विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपा बद्दलही शिवसेनेने सामनातून म्हंटले आहे कि, विरोधी पक्षांचे पहिले कर्तव्य म्हणजे राज्य सरकारवर बेछूट आरोप करीत नामोहरण करायचे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून डेटासाठी कायदेशीर प्रयत्नांना कमी पडल्याचा गाजावाजा विरोधी पक्षाकडून सुरु आहे. केंद्र सरकारहि मराठा समाजाला आरक्षण देण्यात कमी पडले आहे. मग काय तेंच्या दारात बसून आक्रोश करायला पाहिजे काय? असा शिवसेनेने सवाल केला आहे.

दिलासादायक! जिल्ह्यात फक्त 25 नव्या रुग्णांची वाढ; 25 जणांना सुटी

corona

औरंगाबाद | दिवसेंदिवस जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 25 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 11 आणि ग्रामीण भागातील 14 जण घरी परतले. सध्या जिल्ह्यात सध्या 532 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागांतील 492 रुग्णांवर तर शहरात अवघ्या 40 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात 1 लाख 42 हजार 427 कोरोना बाधितांवर उपचार पूर्ण झाल्याने कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. आजपर्यंत 3 हजार 440 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील 13 आणि ग्रामीण भागातील 83 अशा 96 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना, म्हस्की, वैजापूर येथील 50 वर्षीय पुरुष, गारखेड्यातील 67 वर्षीय महिला, किनगाव, फुलंब्री येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरातील मनपा हद्दीतील घाटी 1, पडेगाव 1, टाऊन हॉल, सिडको 1, हर्सूल 1, घाटी 1, गारखेडा 2, शहानूरवाडी 1, इटखेडा 1, अन्य 3 त्याचबरोबर ग्रामीण भागात औरंगाबाद तालुक्यात 1, फुलंब्री 1, गंगापूर 1, कन्नड 2, खुलताबाद 1, वैजापूर 3, पैठण 5 रुग्ण आढळले आहे.

तलवार खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 36 तलवारी, 6 कुकरी, 2 गुप्तीसह एकूण 49 धारदार शस्त्र जप्त

sword
sword

औरंगाबाद | शनिवारी पुंडलिकनगर पोलिसांनी सेव्हन हिल येथे सापळा रचून ब्लू डार्ट कुरिअर सेवा देणारा छोटा हत्तीसह (एमएच 20 ईजी 1107) त्यातील पाच तलवारी जप्त केल्या होत्या. याप्रकरणी इंदिरानगर बाजीपुरा येथील दानिश खान याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते.

त्यानंतर रविवारी जिन्सी व पुंडलीकनगर पोलीस ठाण्याने संयुक्त कार्यवाही ऑनलाईन तलवार खरेदी करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी इरफान खान ऊर्फ दानिश खान व अय्युब खान (रा. हमजा मस्जीतजवळ जुना बायजीपुरा औरंगाबाद) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून जिन्सी पोलिसांनी रविवारी 41 तलवारी जप्त केल्या आहेत. यामध्ये 6 कुकरी 2 गुप्ती आणि 36 तलवारी असे एकूण 49 धारदार शस्त्र पोलीसांनी जप्त केले आहेत. तसेच औरंगाबाद शहरात हे आरोपी इतरही ठिकाणी तलावर विक्री करत असल्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, पोलीस उपआयुक्त दिपक गि-हे यांनी सर्व नागरिकांस आव्हान केले आहे की, कुणाकडेही धारदार शस्त्र केल्या असेल तर त्यांनी जिन्सी पोलीस ठाणे येथे जमा करावे. तसेच सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 06 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगीरी डॉ. निखील गुप्ता साहेब, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर, पोलीस उपआयुक्त डॉ दिपक गि-हे साहेब, निशीकांत भुजबळ सहायक पोलीस आयुक्त साहेब सिडको विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, स.पो.नि. सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर, शेख सरवर, दत्ता शेळके विशेष शाखा, सफी अय्युब पठाण, संपत राठोड, हारुण शेख, भाऊसाहेब जगताप, गणी शेख, बाळु थोरात, पोलीस शिपाई सुनील जाधव, संजय गावंडे, इरफान खान सिडको पोलीस ठाणे, तसेच पुडंलीक नगर पोलीस स्टेशनचे बाळाराम चौरे, अजय कांबळे, दिपक जाधव, मान्टे. प्रविण गुळे यांनी केली आहे.

दिवसभरात दुप्पट मृत्यू : सातारा जिल्ह्यात नवे 666 पॉझिटिव्ह तर 120 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 666 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 120 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या चाचण्या आणि त्यामध्ये आलेल्या बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 8. 96 इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 741 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 97 हजार 523 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 82 हजार 670 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 482 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 32 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 8 हजार 437 जणांचे नमुने घेण्यात आले.

बाधितांचे प्रमाण कमी होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्ह्याची चिंताजनक परिस्थितीत पहायला मिळत आहे. तसेच दिवसभरात बाधितांचा मृत्यू संख्या दुप्पटीने वाढलेली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी 16 व 18 तर काल दिवसभरात तब्बल 32 मृत्यू झालेले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसातील मृत्यूपेक्षा शुक्रवारी दिवसभरात दुप्पट मृत्यू झाले.