Saturday, December 20, 2025
Home Blog Page 4611

महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना घ्यावी लागणार काळजी

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मधील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील  आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, उत्तर पश्चिम रेल्वेने एका पत्राद्वारे सांगितले असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
राजस्थानमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राजस्थान राज्यात जाताना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक केले आहे.

कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे आवश्यक असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

युपीएच्या कॅप्टन बदलावर 16 वा गडी बोलत आहे ; फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

Sanjay Raut Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीए अध्यक्षपदी निवड व्हावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत या गोष्टीची मागणी राऊतांकडून होत आहे. यावरून काँग्रेस संजय राऊत यांच्यावर नाराज असतानाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

शिवसेना अद्यापही युपीएची सदस्य नाहीये, याच मुद्द्यावरून फडणवीसांनी राऊतांच्या मागणीवर हल्लाबोल केला आहे. ‘युपीएच्या कॅप्टन बदलावर 16 वा गडी बोलत आहे. त्याच्या म्हणण्याला अर्थ नसते, त्यासाठी टीममध्ये असावं लागतं,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान यापूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राऊतांवर निशाणा साधला होता. संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का असा सवाल करतानाच मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

ICICI Bank-Videocon case: दीपक कोचर यांना मिळाला जामीन, नकी काय प्रकरण आहे ते जाणून घ्या

मुंबई । आयसीआयसीआय बँकेची माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंगची ही घटना आहे. या प्रकरणात दीपक कोचर यांना ईडीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक केली होती.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दीपकची जामीन याचिका विशेष न्यायालयातून काढून टाकण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.डी.नायक यांनी जामीन मंजूर केला.

आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंग प्रकरण काय आहे ?
आयसीआयसीआय बँकेच्या पॉलिसीचे उल्लंघन करून व्हिडीओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना कर्ज मंजूर करून आयसीआयसीआय बँकेचे नुकसान केल्याप्रकरणी सीबीआयने कोचर दाम्पत्य, व्हिडिओकॉन समूहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला होता. यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

ईडीने चंदा कोचर आणि दीपक कोचर यांची अनेकदा चौकशी केली आहे
चंदा आणि दीपक कोचर दोघांचीही सीबीआय आणि ईडी कथित भ्रष्टाचार आणि पैशाच्या घोटाळ्याबद्दल चौकशी करत आहेत. ईडीने या दोघांवरही अनेकदा प्रश्न विचारला आहे. ईडीचा आरोप आहे की, चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखालील आयसीआयसीआय बँकेच्या समितीने व्हिडिओकॉन इंटरनेशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 300 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजने कर्ज दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी 8 सप्टेंबर, 2009 रोजी न्यु पॉवर रिन्यूएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) कडे 64 कोटी रुपये हस्तांतरित केले. NRPL चे मालक दीपक कोचर आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Corona Impact: सन 2020 मध्ये जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली प्रचंड वाढ

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) मुळे सर्व देशांवर फार परिणाम झाला आहे. 2020 मध्ये दुसर्‍या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा सामना करावा लागला. असे असूनही, सन 2020 मध्ये जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली.

आता काही लोकं त्यांच्या वेल्थ मॅनेजरशी साथीच्या दरम्यान पकड कशी मजबूत ठेवू शकतात याबद्दल सांगत आहेत. काही लोकं सरकार आणि लोकांकडील मागण्या कशा पूर्ण करता येतील आणि नॅव्हिगेट कसे करावे यावर चर्चा करीत आहेत जेणेकरुन रिकव्हरी खर्च काढला जाऊ शकेल.

ब्लॅकरोकचे माजी एमडी मॉरिस पर्ल म्हणाले की, “एक वर्षापूर्वी शेअर बाजार क्रॅश्ड झाला होता आणि जुलै पर्यंत माझा पोर्टफोलिओ परत आला. वर्षाच्या सुरूवातीस तो खूपच जास्त झाला आहे.” ते म्हणाले की,” मूलभूत समस्या ही अत्यंत असमानता आहे जी दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालली आहे.” स्विस वेल्थ मॅनेजर Tiedemann Constantia चे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉब बेबर म्हणाले, “हे बिल सर्वांसाठी येत आहे हे स्पष्ट झाले आहे.” ते पुढे म्हणाले की,”काही ग्राहक कर दर वाढविण्यापूर्वी व्यवसायांसारख्या महत्त्वाच्या मालमत्तेची विक्री करण्याचा विचार करीत आहेत.”

जो बिडेन अमेरिकेत अध्यक्ष झाल्यानंतर श्रीमंतांसाठी जास्त कर लावण्याची शक्यता आहे. वेल्थ मॅनेजरच्या मते ट्रस्टच्या स्थापनेसाठी ग्राहकांची मागणी वेगाने वाढू लागली आहे. यामुळे त्यांना प्रत्येक व्यक्तीसाठी सध्याच्या 11.7 मिलियन डॉलर टॅक्स फ्री मर्यादेअंतर्गत मुलं किंवा इतर नातेवाईकांना पैसे देण्याची परवानगी मिळेल. आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान, बिडेन यांनी 2009 च्या पातळीवर परत जाण्याचा प्रस्ताव ठेवला, जेव्हा सूट 3.5 मिलियन डॉलर होती.

जगातील अब्जाधीश लोकसंख्येपैकी जवळजवळ दोन तृतियांश लोकांची संपत्ती वाढली आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार 2020 मध्ये डिसेंबरच्या मध्यापर्यंत जगातील अब्जाधीश 20 टक्के श्रीमंत झाले होते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

दहावी- बारावीच्या विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा देऊ द्या, हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने केली बोर्डाकडे विनंती

औरंगाबाद | दहावी- बारावीच्या परीक्षेत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनीना बुरखा किंवा स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमती द्यावी, यासह आदी मागण्यांसाठी हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ औरंगाबाद  विभागीय सचिव  सुगता पुन्ने यांची भेट घेतली.

हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या वतीने बोर्डाच्या सचिव पुन्ने यांच्याशी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल-मे २०२१ संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी परीक्षांमध्ये मुस्लिम समाजातील मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा किंवा स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमति द्यावी तसेच परीक्षा हॉल व परीक्षा केंद्रात प्रवेश करतांना महिला पोलीस अधिकारी, शिक्षिकांतर्फे सर्व पळताडणी करण्यात यावी.  यात काहीही अडचणी नाही. तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा एप्रिल-मे २०२१ ची परीक्षा ही मुस्लिम बांधवांचा सण रमजान या महिन्यात येत असल्यामुळे परीक्षेचे काही पेपर हे दुपारी ३ ते सायं ६ : ३० वाजेपर्यंत आहे.

या पेपरच्या वेळी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना उपवास सोडण्याची वेळ असल्याकारणाने या वेळेत कृपया बदल करण्यात यावे, अशी विनंतीही करण्यात आली. सदरील पेपर सकाळच्या सत्रात किंवा मागे पुढे घेऊन ही अडचण दूर करण्यासाठी कार्यालयातून पाठपुरावा व्हावे ही विनंती करण्यात आली. यावेळी विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी राज्य मंडळाकडे निवेदन पाठविण्यात येईल व मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी हॅपी टू हेल्प फाऊंडेशन व मेयार अससोसिएशनचे विभागीय अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, शफीक पठाण, सय्यद अब्दुल रहीम, शेख यासेर, डॉ. सोहेल नवाब, सय्यद ताजीम, मोहसीन खान आदींची उपस्थिती होती.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

सचिन वाझेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; 3 एप्रिलपर्यंत कोठडीतच मुक्काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अँटिलिया स्फोटकं प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझेंच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. सचिन वाझेंना ३ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात आहेत. वाझे यांना १३ मार्चला अटक करण्यात आली.

सचिन वाझेंना यापूर्वी एनआयएने 14 मार्च रोजी एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली होती. आज वाझेंची कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वाझेंच्या कोठडीत नऊ दिवसांची म्हणजे 3 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

यावेळी एनआयएने कोर्टाला आज अत्यंत धक्कादायक माहिती दिली. वाझेंना पोलीस अधिकारी म्हणून सरकारी कोट्यातून 30 जिवंत काडतुसे देण्यात आली होती. तसेच त्यांना एक रिव्हॉल्वर देण्यात आली होती. 30 पैकी पाच बुलेट्स वाझेंकडे आहेत. मात्र 25 काडतुसे गायब आहेत. ही 25 काडतुसे कुठे गेली याबाबत वाझे काहीही माहिती देत नसल्याचंही एनआयएने कोर्टाला दिली.

मला बळीचा बकरा केलं जातंय; वाझेंचा दावामुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याच्या कटाचे मुख्य सूत्रधार वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. मला बळीचा बकरा केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. मी समाजाविरोधात कट केलेला नाही. तसं असल्यास एनआयएनं ते सिद्ध करावं. मी एनआयएला तपासात, चौकशीत पूर्ण सहकार्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा कोठडी देऊ नका, अशी विनंती वाझेंनी न्यायमूर्तींकडे केली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Stock Market Today: सेन्सेक्स 740 अंकांनी खाली तर निफ्टी 14325 वर बंद झाला

नवी दिल्ली । वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात मोठी घसरण झाली आहे. एका दिवसाच्या व्यापारानंतर सेन्सेक्स 740 अंकांनी घसरून 48,440 च्या पातळीवर बंद झाला आहे. या व्यतिरिक्त निफ्टी इंडेक्स 225 अंकांनी घसरून 14,325 च्या पातळीवर बंद झाला आहे. दिवसाच्या विक्रीवरही बँक निफ्टीचा वरचष्मा होता. बँक निफ्टी 287 अंकांनी खाली येऊन 33,006 च्या पातळीवर बंद झाला आहे. देशभरात वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे बाजारपेठेतील सेंटीमेंट खराब झाली आहे. आज दिवसाच्या घसरणीनंतर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांविषयी बोलायचे झाले तर त्यांची मार्केट कॅप 1,98,92,302.79 कोटींवर गेली आहे. त्याच वेळी बुधवारी मार्केट कॅप 2,02,48,094.19 कोटी रुपये होती.

टॉप गेनर्स शेअर्स
सेन्सेक्सच्या टॉप 30 शेअर्स विषयी बोलताना आज डॉ. रेड्डी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि एलटी यांचे शेअर्स ग्रीन मार्कमध्ये बंद झाले आहेत. याशिवाय 26 शेअर्स रेड मार्कवर बंद झाले आहेत.

विक्री झालेले शेअर्स
या व्यतिरिक्त मारुती 3.98 टक्क्यांनी घसरून टॉप लूजर्सच्या लिस्टमध्ये आहे. त्याचबरोबर, HUL, Bharti Airtel, Bajaj Auto, NTPC, ONGC, Reliance, SBI, Sun Pharma, HDFC Bank, IndusInd Bank, Kotak Bank सर्वच रेड मार्कवर बंद झाले आहेत.

सेक्टरल इंडेक्समध्ये विक्री
सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलताना बीएसई ऑटो, बँक निफ्टी, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्यूरेबल्स, एफएमसीजी, हेल्थकेअर, आयटी, मेटल, तेल आणि गॅस, पीएसयू आणि टेक क्षेत्रांची विक्री झाली आहे.

स्मॉलकॅप-मिडकॅप इंडेक्स
स्मॉलकॅप-मिडकॅप आणि सीएनएक्स मिडकॅप इंडेक्सही घसरणीसह ट्रेड करीत आहेत. स्मॉलकॅप 2008.06 च्या पातळीवर 378.86 अंकांनी खाली आहे. मिडकॅप इंडेक्स 446.64 अंकांनी घसरून 19643.89 च्या पातळीवर बंद झाला आहे. त्याशिवाय सीएनएक्स इंडेक्सही 476.50 अंकांनी खाली आला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

दिलासादायक…! घाटी रुग्णालयातील २५ रुग्णांना पाठविले घरी

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकीकडे ७२ हजार पार गेला आहे. त्यामुळे चिंता जरी वाढली असली तरी दुसरीकडे बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने दिलासा मिळाला आहे.  घाटी रुग्णालयात आज पुन्हा २५ रुग्णांना सुट्टी देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

घाटीत आज आयसीएमआरच्या नवीन नियमानुसार २५ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. त्यात औरंगाबादसह जालना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

शहरातील औरंगपुरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, बजाजनगर, सिडको, उल्कानगरी, कोकनवाडी, पैठण, एन-८ सिडको, एन -४ सिडको, गारखेडा, सिल्लोड येथील रुग्णांचा समावेश आहे. तर  जालना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत घाटी रुग्णालयात ३४१३ रुग्णांना सुटी देण्यात आली असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

‘या’ तारखेपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढला कहर ,पंधरा दिवसापासून धक्कादायक आकडा; काळजी घेण्याचे आवाहन

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा प्रतिदिन वाढत चालला आहे. यामुळे सर्वाधिक चिंतेत भर पडली आहे. ११ मार्चपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. ११ ते २४ मार्चपर्यत प्रतिदिन येणारा आकडा हा धक्कादायक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता आकडा पाहिला तर १० मार्चपर्यत पाचशे पर्यत कोरोनाचे रुग्ण प्रतिदिन आढळून येत होते. १० मार्च पर्यत औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा ५४ हजार ४३९ वर होता. परंतु ११ मार्च रोजी जिल्ह्यातील दिवसभरात येणाऱ्या कोरोनाच्या अहवालानुसार एकाच दिवशी धक्कादायक आकडा समोर आला. एकाच दिवशी ९०२ रुग्णाची भर पडली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा ५५ हजार ३४१ वर जाऊन पोहोचला. त्यामुळे चिंता आणखी वाढली. त्यानंतरचा कोरोनाच्या रुग्णांचा अहवालानुसार प्रतिदिन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. ११ ते २४ मार्च दरम्यान प्रचंड कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. ११ तारखेला केवळ जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही ५५ हजार ३४१ वर होती. तर ती काल रात्रीपर्यंतच्या अहवालानुसार ७२ हजार २५३ वर जाऊन पोहोचली आहे.

…अशी वाढली रुग्णसंख्या
११ मार्च ला ९०२ कोरोनाचे रुग्ण एकाच दिवशी आढळून आले. त्यानंतर १२ मार्चचा अहवालानुसार कोरोनाची रुग्णसंख्या दिवसभरात कमी म्हणजे ६१७ आढळून आली. त्यामुळे दिलासा मिळाला. परंतु १३ मार्च ला एकाच दिवशी ७२० कोरोनाचे रुग्ण वाढले आणि १४ तारखेला तर एकाच दिवशी तब्बल १०२३ कोरोनाच्या रुग्णांची भर पडली. त्यानंतर हजारांहून अधिक रुग्णसंख्या प्रतिदिन आढळून आली आहे. १५ मार्च ला एकाच दिवशी ११२८ रुग्ण आढळून आले आहेत. तर १६ तारखेला १२७१, १७ तारखेला १३३५, १८ मार्चला १५५७ रुग्ण आढळून आले. याशिवाय १९ तारखेचा दिवसभरातील कोरोनाचा आकडा पाहिला तर १२५१ रुग्ण आढळून आले. २० मार्च ला १६७९, २१ ला १४३२, २२ ला १४०६, २३ तारखेला १७९१ आणि काल दि. २४ मार्च ला एकाच दिवशी १७०२ कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता आणखी वाढली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

शहरातील रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा -पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद | शासन अनुदानीत शहरी सडक योजनअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या 152 कोटी व 100 कोटी निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महानगरपालिकेच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस.डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्यासह इतर सर्व प्रमुख यंत्रणाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, कोरोना संसर्गाबाबत जिल्ह्यात उत्तम पध्दतीने प्रतिबंधात्मक उपाय राबवण्याची कामे चालू असली तरी विकास कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये याकरिता महानगरपालिका अंतर्गत सर्व विकास कामे विहित मुदतीत व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी यावेळी निर्देशित केले.

यावेळी मनपा आयुक्त पाण्डेय यांनी शासन अनुदानित शहरी सडक योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महानगरपालिकेच्या निधीतून सुरु असलेल्या रस्ते कामांची माहिती देताना म्हणाले की, एमआयडीसीच्या निधीतून 60 टक्के कामे, तर एम.एस.आर.डी.सी तून 30 टक्के कामे, तर मनपा 40 टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे तर विशेष बाब म्हणून मनपाच्या हिश्याचे 50.57 कॉंक्रेट रस्ते करण्यासाठी शासन मूलभूत सोई सुविधातंर्गत अनुदान देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

शहर अभियंता पानझडे यांनी शहरात 16 हजार स्ट्रेट लाईट बसवण्यात आले असून अजून 3 हजार स्ट्रेट लाईट बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जलकुंभाचे सर्वेक्षण करण्यात आले असून शहरात सहा विविध ठिकाणी जलकुंभाचे काम चालू करण्यात आले असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली तर घनकचरा व्यवस्थापन अधिकारी भोंबे यांनी ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत खामनदीची स्वच्छता नदी किनारी वृक्षारोपण करण्यात आले असून 1 हजार झाडे लावण्यात आली असल्याची माहिती दिली.

क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची उंची वाढविण्या संदर्भात, सफारी पार्क, नवीन पाणीपुरवठा योजना, संत एकनाथ महाराज नाटयगृहाचे काम, देवळाई या भागांकरिता मलनि:सारण व्यवस्था, अमरप्रित चौक वाहतूक बेटामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प, इत्यादी विकास कामाचा सविस्तर आढावा पालकमंत्री देसाई यांनी घेतला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group