Saturday, December 20, 2025
Home Blog Page 4619

तंबाखूमुक्त नियंत्रण सर्वेक्षणात मनपाची; शाळा ठरली मराठवाड्यातून अव्वल

औरंगाबाद |  भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय अंतर्गत सलाम फाऊंडेशनच्या तंबाखूमुक्त नियंत्रण सर्वेत मिटमिटा येथील मनपा शाळा मराठवाड्यातून अव्वल ठरली असून सर्वत्र या शाळेने एक वेगळा आदर्श घडवून दिला आहे.

भारत सरकार, आरोग्य मंत्रालयाअंतर्गत तंबाखूमूक्त नियंत्रण शाळा अभियान मार्गदर्शक सूचनानूसार पडेगाव, मिटमिटा येथील मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा यांनी उपक्रम राबविले. यात विद्यार्थी, पालक, समाज, परिसर आदींनी सहभाग घेवून विविध कार्यक्रमाचे नियोजन केले होते. हा उपक्रम राबविण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व भारत सरकार आरोग्य मंत्रालय, मनपा औरंगाबाद यांच्या संयूक्त विद्यमाने महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील  विविध शाळा महाविद्यालयांमधून प्रभावीपणे नऊ निकष ठरवून पोस्टर स्पर्धा, गावकरी, पालक, विद्यार्थ्यांचे  प्रबोधन करुन तंबाखूवर प्रतिबंध करण्यात आला. हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी सलाम मुंबई फाउंडेशन व मिटमिटा मनपा शाळेने स्वीकारली होती. यात मनपा शाळाकडून हे सर्व निकष पूर्ण करुन १०० पैकी १०० गुण मिळवून मराठवाड्यातून प्रथम क्रमांक मिळवला आणि तंबाखू नियंत्रणात टोबॅको फ्री स्कूल म्हणून अव्वल स्थान मिळविले आहे.

मनपा शाळेच्या मूख्याध्यापिका आर.सी. हिवाळे, शिक्षक देवरे, पंडीत, तडवी, जाधव व औरंगाबाद येथील मुंबई सलाम फाऊंडेशनचे समनव्यक संदीप वाहूळ यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, मिटमिटा शालेय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण बनकर, अ‍ॅड. अशोक मुळे, शिवाजी गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

कोरोनाचे नियम पायदळी; बजाज कंपनी प्रशासनाचा हलगर्जीपणा

औरंगाबाद | वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कंपनीमध्ये कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. बसमध्ये मोठ्या संख्येने कामगारांना कोंबून ने-आण केली जात आहे. हा सर्व प्रकार गावातील तरुणांनी समोर आणला. एक व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे बसमध्ये क्षमते पेक्षा अधिक कामगार दिसत असून हा प्रकार त्वरित थांबविण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला.

वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेल्या बजाज कंपनीतील बहुतांश कामगार हे शहरातील रहिवाशी असून जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव हा शहरातच आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी कामगारांना ने-आन करणाऱ्या वाहनांना नियमावली आहे. मात्र त्या सर्व नियमांना पायदळी तुडवत कामगारांची वाहतूक होत आहे. औद्योगिक वसाहतींना चालना मिळण्यासाठी टास्कफोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी विकेंड लॉकडाऊन ची घोषणा करताना औद्योगिक वसाहती मधील कंपनी, कारखाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.मात्र कंपनी प्रशासनच कोरोनाची नियम पळत नसताना दिसत असल्याने आता आशा कंपनी प्रशासन व संबंधितावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

शहरासह वाळूज गावात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आशा परिस्थितीत बजाज कंपनी प्रशासन नियम मोडून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करून कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याची माहिती गावातील तरुणांना मिळताच त्यांनी थेट बजाज कंपनीच्या गेटवर गाड्यांना अडविले व पाहणी केली असता त्या बस मध्ये कामगारांना अक्षरशः कोंबल्याचे दिसले संतप्त तरुणांनी गावात कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली. कोरोनाचे नियम पाळा, अन्यथा गाडी चालू देणार नाही, असा इशारासुद्धा दिला. यावेळी या तरुणांची आणि कंपनीच्या जबाबदारांशी बाचाबाचीसुद्धा झाली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांच्या कन्सलटिंगसाठी 10 नाही तर 2 हजार रुपये फी; मनपा प्रशासकांचे आदेश

औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. शहरातील बहुतांश रूग्णांना खासगी रूग्णालयांतून उपचार घ्यावे लागत आहे. रूग्णांंना बाहेरून तपासण्या कराव्या लागत आहे, अशावेळी खासगी लॅबमधून चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नावाने होणारी रूग्णांची लूट थांबवा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्याना कन्सलटिंगसाठी 10 हजारांऐवजी फक्त 2 हजार रुपये शुल्क आकारावेत, असे प्रशासनाचे आदेश असतानाही काही ठिकाणी हे आदेश धुडकावण्यात येत असून, त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मनपा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार खासगी लॅबमध्ये होणाऱ्या चाचण्यांवर बंदी घालण्यात आली आहे, तसे आदेशही प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. जर डॉक्टरांनी रुग्णाच्या घरी भेट दिल्यास 300 रुपये घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

मराठवाड्यात 26 हजारांवर सक्रिय रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांवर

औरंगाबाद | मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे २६ हजार सक्रीय रुग्ण, तर सव्वालाखापेक्षा जास्त व्यक्ती अलगीकरणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आतापर्यंत विभागातील बाधितांची संख्या ही दोन लाखांवर गेली आहे आणि पावणेदोन लाखांवरील बाधित हे कोरोनामुक्त झाले असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये रविवारी ३,९१६ नवे बाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १४३२ बाधित हे औरंगाबाद जिल्ह्यात, तर नांदेड जिल्ह्यात ९२३ व जालना जिल्ह्यात ५६२ बाधित आढळून आले. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ही २ लाख ५ हजार ७६० झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ६७ हजार ३५४ बाधितांची संख्या ही औरंगाबाद जिल्ह्याची आहे व सर्वांत कमी ५ हजार २९८ बाधितांची संख्या ही हिंगोली जिल्ह्याची आहे. विभागामध्ये आतापर्यंत १ लाख ७५ हजार ३७९ बाधित हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्येही औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या सर्वाधिक व हिंगोली जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या सर्वांत कमी आहे. विभागात आतापर्यंत ४ हजार ९४२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यातही सर्वाधिक १४२० मृत्यू हे औरंगाबाद जिल्ह्यात व सर्वांत कमी ७४ मृत्यू हे हिंगोली जिल्ह्यातील आहे. नांदेड जिल्ह्यामध्येही ७३५ मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. संपूर्ण विभागात रविवारी एकाच दिवशी २७ मृत्यू झाले आणि त्यामध्ये सर्वाधिक ११ मृत्यूची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात, तर लातुरात एकही मृत्यू झालेला नाही. विभागातील मृत्यू दर १.४० (हिंगोली जिल्हा) ते ३.२७ (परभणी जिल्हा) टक्के, तर रिकव्हरी रेट हा ८०.२९ (नांदेड जिल्हा) ते ९१.९४ (लातूर जिल्हा) टक्के आहे.

औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट ३४ टक्के
मराठवाडा विभागामध्ये रविवारी एकाच दिवसांत १८ हजार ३४० चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ४४५५ चाचण्या होऊन त्यामध्ये ९२३ पॉझिटिव्ह आढळले, तर ३५३२ निगेटिव्ह आढळले. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात ४२२२ चाचण्या होऊन त्यामध्ये १४३२ पॉझिटिव्ह व २७९० निगेटिव्ह आढळले. तसेच जालना जिल्ह्यात ३२०६ चाचण्या होऊन ५६२ पॉझिटिव्ह व १८६५ निगेटिव्ह आढळले. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३३.९१ टक्के, नांदेड जिल्ह्याचा २०.७१ टक्के व जालना जिल्ह्याचा १७.५२ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

जलवाहिनी हलवण्यासाठी सव्वा कोटीची तरतूद; निविदा प्रक्रियेद्वारे होणार जलवाहिनी स्थलांतराचे काम

औरंगाबाद | शहराची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. या कामात जलवाहिनींचा अडथळा येत असल्यामुळे त्या स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे.

शहराची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. या कामात जलवाहिनींचा अडथळा येत असल्यामुळे त्या स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. अर्धा किलोमीटर अंतराच्या जलवाहिनी शिफ्टिंगसाठी महापालिकेने तब्बल एक कोटी १८ लाख ८० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. येत्या काही महिन्यात हे काम सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावीर चौक ते चिकलठाणा हा सुमारे दहा किलोमीटरचा रस्ता जालना रोड म्हणून ओळखला जातो. हा रस्ता औरंगाबादच्या दृष्टीने जीवनवाहिनीच आहे.

वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी क्रांती चौक, मोंढानाका, सेव्हन हिल्स आणि सिडको बसस्टँड या ठिकाणी उड्डाणपुलही बांधण्यात आले. रस्ता रुंदीकरणाच्या कामात मातोश्री लॉन्स ते मिनी घाटी चिकलठाणा या दरम्यान दोनशे आणि तीनशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीची जागा बदलावी व रुंद करण्यात आलेल्या रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यात यावी, अशी मागणी प्राधिकरणाने महापालिकेकडे केली होती. प्राधिकरणाने केलेली मागणी मान्य करीत महापालिकेने जलवाहिनी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने एक कोटी १८ लाख ८० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. १९ मार्च २०२१ रोजी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे आता निविदा प्रक्रिया करून जलवाहिनी स्थलांतराचे काम केले जाणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

बनावट कागदपत्रांआधारे नोकरी प्रकरण; आणखी दोघा जणांना अटक

औरंगाबाद | बनावट कागदपत्रांआधारे सरकारी नोकरी मिळविलेल्या उमेदवारांविरुद्ध तसेच कागदपत्रे हस्तगत केलेल्या १८८ जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेने रविवारी आणखी दोघांना अटक केली. निवृत्त क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रय महादावाड (वय ५९) आणि क्रीडा अधिकारी भाऊराव रामदास वीर (वय ५२, रा. ताजनगर, शेवगाव जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

क्रीडा अधिकारी भाऊराव वीर आणि १५ मार्च रोजी अटक करण्यात आलेला आरोपी अंकुश राठोड (वय ३५, रा. पारेगाव, मानेगाव ता. जि. जालना) या दोघांना शनिवारपर्यंत (२७ मार्च) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. श्रृंगारे/तांबडे यांनी सोमवारी दिले. तर, गुन्ह्यात १९ मार्च रोजी अटक करण्यात आलेला आरोपी आणि गेवराई विभागातील कर्मचारी शंकर शामराव पतंगे (वय ४६, रा. न्यू. एसटी कॉलनी) आणि निवृत्‍त अधिकारी राजकुमार महादावाड (५९) या दोघांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले. बनावट कागदपत्रांआधारे काही उमेदवारांनी सरकारी कार्यालयांत नोकरी मिळवून उर्वरित उमेदवारांनी बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची दिशाभूल केली. त्या प्रकरणी विभागीय उपसंचालक उर्मिला गणपतराव मोराळे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात १८८ उमेदवार खेळाडूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, गुन्हे शाखा उपायुक्त रवींद्र साळोखे, गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, जमादार सोनवणे, गवळी, शिरोटे, पाटील आणि व्हावळ आदींनी केली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Gold Price Today: सणासुदीच्या हंगामात स्वस्त सोनं विकत घ्या, आज दहा ग्रॅमचा दर काय आहे ते तपासा

Gold Rates Today

नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या (Gold-Silver) किंमतींमध्ये आज जोरदार वाढ झाली आहे. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchnage) सोन्याचे मूल्य 0.4 टक्क्यांनी वाढून 44,835 च्या पातळीवर आहे. याशिवाय चांदीचा दर (Gold Price Today)आज 0.34 टक्क्यांनी वाढून 65,190 रुपये प्रतिकिलोवर आला.

बुधवारी देशाच्या राजधानीत 24 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price Today) 48040 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये 46130 रुपये, मुंबईत 43990 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 46990 रुपये आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे बाजार
याखेरीज आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण नोंदवून सोन्याचा व्यवहार होत आहे. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार प्रति औंस 6.72 डॉलरने घसरून 1,731.85 डॉलरवर आला. त्याचबरोबर चांदी 0.55 डॉलरने कमी होऊन 25.19 डॉलरवर ट्रेड करीत आहे.

सोने आतापर्यंत 11500 रुपयांनी स्वस्त झाले आहे
यावर्षी गेल्या काही महिन्यांत सोने 11500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोरोना संकटात ते 55 हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून सोन्याच्या किंमती सतत खाली आल्या आहेत. लसीकरणानंतर आर्थिक क्रियेत वेग वाढण्याची अपेक्षा आहे.

दिल्ली सराफा बाजारात किंमत
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅममागे 116 रुपयांची किरकोळ वाढ झाली असून, राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या नवा सोन्याचा भाव आता प्रति 10 ग्रॅम, 44,374 रुपये झाला आहे. चांदीचे दर 117 रुपयांनी घसरून 65,299 रुपये प्रति किलो झाले.

तज्ञांच्या मते, पुन्हा एकदा पिवळा धातू वेगवान होऊ शकतो. भारतात लग्नाच्या हंगामामुळे सोन्या-चांदीच्या किंमतींना आता खरेदीचा आधार मिळेल. जर सध्याच्या किंमतींवर सोन्यात गुंतवणूक केली गेली तर ती दीर्घ मुदतीत मोठा नफा देऊ शकते. तज्ज्ञांचे मत आहे की, 2021 मध्ये सोन्याच्या किंमती निश्चितच वाढतील. यावर्षी सोन्याचे दर 63,000 च्या पातळीवर जाईल असा अंदाज आहे. जर असे झाले तर गुंतवणूकदारांना जोरदार नफा मिळण्याची खात्री आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

सुसाईड नोट लिहून शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या; आदर्श बँकेच्या जाधवसह चौघांनी जमीन बळकावल्याचा आरोप

औरंगाबाद | आदर्श बँकेच्या जाधव सह चार जणांनी मारहाण करीन जीवे मारण्याच्या धमक्यादेत बॉण्ड आणि चेकवर सही घेऊन शेती बळकावल्याची सुसाईड नोट लिहून एका 34 वर्षीय शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना गंगापूर तालुक्यातील किन्होळा गावात घडली.या नंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जो पर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक होत नाही तो मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
गणेश दशरथ पठारे वय-34 (रा.किन्होळा, ता.गंगापूर जि. औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गणेश यांनी मंगळवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात विषारी औषध प्राशन केले.ही बाब कळताच नातेवाईकांनी त्यांना बेशुद्धवस्थेत रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरू असताना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास गणेशची प्राणज्योत मालवली.गणेश च्या खिशात एक तीन पाणी चिट्ठी आढळून आली आहे. त्यामध्ये मृत गणेश यांनी विक्रांत जगन्नाथ जाधव यांच्या कडून रोख रक्कम व्याजावर घेतली होती.बदल्यात त्यांची शेती बॉण्ड वर लिहून दिली होती. त्यांची अडचण दूर झाल्यावर गणेश ने तुमचे पैशे घ्या व माझे बॉण्ड पेपर परत द्या अशी विनवणी केली मात्र जमीन देण्यास जाधव यांनी नकार दिला.जाधव यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून तीन ते चार गुंडाकरवी बॉण्ड पेपरवर साह्य करण्यास भाग पाडले.व त्यानंतर गणेश यांना आदर्श बँकेत घेऊन गेले. तेथे गणेश यांचे खाते उघडण्यात आले व त्याखात्यावर रक्कम टाकण्यात आली.

दरम्यान मारहाण करीत चेक वर साह्य करून घेतल्या. परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत जाधव यांचा साला दीपक पोपट आवारे यांच्या नावावर शेती करायला लावली. दरम्यान गावातीलच दीपक फकिरा बनकर याने देखील जमीन नावावर करण्यासाठी धमकी दिली होती.तर अरुण गवळी नावाच्या व्यक्तीचा देखील सुसाईड नोट मध्ये उल्लेख असून हे चार जण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे नोट मध्ये आहे. आज पहाटे गणेश यांचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली होती.जो पर्यंत संबंधिता विरोधात गुन्हा दाखल होऊन आरोपीना अटक केली जात नाही. तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.

Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कपात, आपल्या शहरात किती स्वस्त झाले आहे ते तपासा

नवी दिल्ली । नवीन पेट्रोल डिझेल किंमत (Petrol Diesel Price) जाहीर केली गेली आहे. ब-याच दिवसानंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याने सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमतींमध्ये कपात केली. तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर 24 दिवस स्थिर ठेवल्यानंतर कमी केले आहेत. आज पेट्रोलच्या दरात 18 पैसे आणि डिझेलच्या 17 पैशांनी कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.99 रुपये प्रतिलिटर होती तर डिझेल 81.30 रुपये प्रतिलिटरवर आले. वास्तविक, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेत दिसू लागला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमती खाली आल्या
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 15 दिवसांत 10% खाली आल्या आहेत. युरोपमधील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे तेथे इंधनाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलर च्या वरून 64 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आली आहे.

फेब्रुवारीमध्ये इतके महागले होते
गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात सुमारे 4 ते 5 रुपयांची वाढ केली. परंतु, 26 फेब्रुवारीनंतर क्रूडच्या किंमतीत 8 डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे, परंतु या कालावधीत फक्त 27 फेब्रुवारी रोजी थोडीशी वाढ झाली आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 90.99 रुपये तर डिझेल प्रति लिटर 81.30 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 97.40 रुपये तर डिझेल प्रति लिटर 88.42 रुपये आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 91.18 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 84.18 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 92.95 रुपये तर डिझेल 86.29 रुपये प्रति लिटर आहे.
>> बेंगळुरूमध्ये पेट्रोल 94.04 रुपये आणि डिझेल 86.21 रुपये प्रति लिटर आहे.
>> भोपाळमध्ये पेट्रोल 99.02 आणि डिझेल 89.58 रुपये प्रतिलिटर आहे.
>> चंडीगडमध्ये पेट्रोल 87.56 रुपये तर डिझेल 81.00 रुपये प्रतिलिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

संजय राऊत कोण आहेत? ते काय इतके मोठे नेते आहेत काय? – देवेंद्र फडणवीस

sanjay raut and devendra fadanvis

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत आपले म्हणणे काय असा प्रश्न विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केला असता संजय राऊत कोण आहेत? ते काय इतके मोठे नेते आहेत काय? असे म्हणत राऊत यांची खिल्ली उडवली. राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांची राज्यपाल कोश्यारी यांनी दाखल घ्यावी अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून रिपोर्ट मागवून माहिती मागवावी असहि विरोधी पक्षाने म्ह्टले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव यांना एक अहवाल सादर केला आहे. हा अहवाल म्हणजे लवंगी फटका असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. यावर मी दिलेला अहवाल लवंगी फटका आहे कि ऍटम बॉम्ब आहे हे लवकरच लक्षात येईल. यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार आहेत कि ज्यांना वाचवण्यासाठी तुम्ही हि माहिती लपवून ठेवली. मी केंद्रीय गृहसचिवांना दिलेला अहवाल छोटा फटका आहे कि मोठा बॉम्ब आहे हे लवकरच समोर येईल. कोण कोणापर्यंत माल पोहोचतो? यात कोणकोण सहभागी आहे? याचे काम कसे चालते हे सर्व त्यातून बाहेर येईल असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/800389767236469

तसेच संजय राऊतांकडे खूप वेळ आहे. ते काही इतके मोठे नेते नाहीत कि मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आम्हाला काही वाटलं तर आम्ही राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आमचे म्हणणे मांडतो. संजय राऊत हे काही अधिकृत व्यक्ती नाहीत. त्यांचे म्हणणे सरकारचे म्हणणे आहे असे म्हणता येणार नाही असं म्हणत फडणवीस यांनी राऊतांच्या विधानावर उत्तर देणे टाळले.